प्रेम पंख ❤️... भाग 38 अंतिम

आकाश इतर मुलींप्रमाणेच माझं हे एक स्वप्न होतं की मलाही एक खूप प्रेम करणारा आणि अतिशय छान असा नवरा हवा होता


प्रेम पंख ❤️... भाग 38 अंतिम

©️®️शिल्पा सुतार
........

आदिती पूनम सोबत घरात राहणं एन्जॉय करत होती, आज तिने पूनम सोबत पूर्ण बंगला फिरून बघितला, कुठे कुठे काय आहे ते, सुंदर आहे घर आपल.

"अदिती तुला रिसेप्शन साठी घागरा घ्यायला जाऊया आपण दोघी",.. दोघीजणी शॉपिंगला गेल्या.

पूनमने अदितीला बऱ्याच साड्या घेतल्या... " या साड्यांवर तुला ब्लाऊज वगैरे शिवायला टाकून दे",..

"काय करणार आहे मी इतक्या साड्यांचे दीदी, तुम्ही पण घ्या ना ",.. अदिती

"लागतात ग असुदे छान दिसते तू साडीत, मला आहेत ",.. पूनम

अदिती साठी छान मोती कलरचा घागरा अदितीने घेतला होता, थोडा फिटिंग करायला टाकला, त्याच्यावर मॅचिंग ज्वेलरी सगळं घेऊन दोघीजणी घरी आल्या, आज त्यांना उशीर यायला उशीर झालेला होता, अविनाश आकाश विकी आलेले होते, ..." कुठे आहेस अदिती? आम्ही केव्हाचे घरी आलो आहोत",.. आकाश फोन करत होता.

" हो आलोच पाच मिनिटात",.. अदिती

"तुमच्या दोघींची छान मैत्री झालेली दिसते बापरे काय आहे या पिशव्यांमध्ये एवढी खरेदी केली",.. अदिती अविनाश जिजूंना सगळं सांगत होती काय काय घेतलं ते,

विकी फोनवर बोलत होता,.. "माझं कॉलेज सुरू होतं आहे मित्राचा फोन होता पुढच्या आठवड्यापासून मी या पुढे नाही येणार ऑफिसला, तो खुष होता ",.. सगळे हसत होते चला सुटका झाली विकीची

" वहिनी तू मला लकी आहेस, तू आली माझा कॉलेज सुरू झाल, आपली मैत्री आहे विसरू नको, मला पैसे लागले तर द्यायचे",.. विकी

आदितीने होकार दिला

" पुढच्या आठवड्यात तर मी पण नाही चार-पाच दिवस अविनाश जिजू एकटे राहतील",.. आकाश

"काही हरकत नाही, मी पूनम सोबत जाईल ऑफिसला ",..अविनाश

" कुठे गेल्या होत्या तुम्ही दोघी ?",..आकाश

"आम्ही शॉपिंगला गेलो होतो दीदीने माझ्यासाठी सुंदर घागरा घेतला",..अदिती

" रिसेप्शन साठी का? ",..आकाश

हो

"तू काय घालणार आहेस आकाश? ",..अविनाश

" कोट घाल",..पूनम

" आजी खरेदी बघत होत्या, छान दिसेल हा रंग तुला अदिती ",.. आजी

" तिला कोणताही रंग छान दिसतो",.. पूनम

" कोणा कोणाला निमंत्रण द्यायचं होतं ते झालं का? मी केला होता आज अदितीच्या घरी फोन ते येणार आहेत आदल्या दिवशी ",.. आजी

जेवण झालं, आदिती आकाश रूम मध्ये आले,

" अदिती आपलं बुकिंग झालेलं आहे, आपण दुसऱ्या दिवशी निघू तीन दिवसांनी वापस येऊ ",.. आकाश

चालेल..

" आजचा तुझा दिवस बिझी गेला ना, मला तर दिवसभर तुझी आठवण येत होती, इकडे ये ",.. आकाशने तिला जवळ घेतल.

" घरात कंटाळा येतो आकाश, ऑफिसला असतो तेच बरं आहे",.. अदिती

"एन्जॉय करून घे ह्या आठवड्यानंतर तू परत बिझी होशील",.. आकाश

" मी उद्या येऊ का तुझ्याबरोबर ऑफिसमध्ये मला सगळ्या मुलांना भेटायचं आहे, त्यांना रिसेप्शन साठी आमंत्रण द्यायचं आहे, लवकर वापस येईल मी घरी ",.. अदिती

"चालेल काही हरकत नाही, आता जरा माझा विचार करणार का? ",.. आकाशने अदितीला जवळ घेतल

दुसऱ्या दिवशी अदिती आकाश सोबत ऑफिस मध्ये गेली, ती आल्यामुळे सगळे मुलं खूप खुश होते, सगळे प्रश्न विचारत होते कसं ठरलं तुमचं लग्न? इथेच ठरलं का सगळं?

सुरेशला माहिती होतं तो हसत होता, काय झालं सुरेश? सगळे विचारत होते,.." मी बघत होतो आकाश सर अदितीच्या मागेपुढे करत होते ते, ते अदिती साठी डबा आणायचे, तेव्हाच मला अंदाज आला होता" ,

अदिती त्याला पेपरने मारल.

यश बाजूला उभे राहून सगळं ऐकत होता, अदिती त्याच्याजवळ गेली,.. "बोलणार की नाही आता माझ्याशी यश, आपण फ्रेंड्स आहोत ना",

"का नाही बोलणार, अदिती तुझं खूप अभिनंदन, यासाठी आकाश सर तुला माझ्याशी बोलू देत नव्हते",..यश

" हो ना मलाही ते माहितीच नव्हतं नंतर समजलं, सगळ्यांनी यायचं आहे रिसेप्शनला",.. अदिती

"तू येणार का आता ऑफिसला अदिती? ",.. यश

" नाही मी आता दुसरं ऑफिस जॉईन केल आहे, ते म्हणाले की नौकरी सोडता येणार नाही लगेच, मी आता सुट्टी घेतली आहे पुढच्या आठवड्यात जॉईन होईल",.. अदिती

" तू आणि आकाश सर कॉलेज पासून सोबत होते का ",.. रोहित

हो..

" आम्हाला सांगितलं नाही कधी",.. सुरेश

"इथे ऑफिस मधे जास्त बोलता येत नाही आहे माहिती नाही का",.. अदिती

सगळे हसत होते.

" चांगला आहे आकाश असा विचार करू नका ",..अदिती आकाशची बाजू घेत होती, त्यामुळे सगळे परत हसत होते

" जा अदिती आत नाही तर परत सर ओरडतील ",.. सुरेश

" आता काय हिम्मत ",.. रोहित

" हो ना आता अदिती बॉस ",.. सुरेश

हळू बोला.... अदिती ही खूप हसत होती, ती केबिन मधे गेली, बापरे या केबिन मधे अजूनही यायची खूप भीती वाटते

का?

"इथे तु असतोस ना आकाश माझा बॉस, बरीच बोलणी बसली आहेत इथे, मला तुझ्याशी बोलायच टेंशन यायच ",.. अदिती

"आता येत का माझ्याशी बोलण्याच टेंशन",.. आकाश

"नाही तू खूप चांगला आहेस",.. अदिती

दुसऱ्या दिवशी रिसेप्शन होतं, आई-बाबा अमित येणार होते, अदिती खूप वाट बघत होती, संध्याकाळी ते तिघं आले अमित खूपच उत्साही होता, अदितीने त्याला फिरून घर दाखवलं, आकाशही आज लवकर घरी आला होता, जेवणाचा छान बेत केला होता, राहुल सर मोना मॅडम इकडेच होते जेवायला, छान गप्पा करत जेवण झालं, त्या सगळ्यांची सोय गेस्ट रूममध्ये केली होती, आई दोघी आजींसोबत गप्पा मारत बसल्या होत्या,

"खूपच छान आहे अदिती स्वभावाने मिळून मिसळून राहते",.. आजी

"हो आधीपासूनच खूप समजूतदार आहे ती, तुम्ही आहातच तिला सांभाळून घ्यायला त्यामुळे मला काळजी नाही",.. आई

"उद्या सकाळी तुम्ही आमच्या ऑफिस मध्ये चला ऑफिस बघायला",.. बाबा आणि राहुल सर बोलत होते

दोघं कुटुंब छान एकत्र झाले त्यामुळे अदिती आकाश खुश होते

आज रिसेप्शन सकाळपासूनच धावपळ सुरू होती सकाळीच बाबा सगळीकडे जाऊन फिरून आले, संध्याकाळी लवकर रिसेप्शन सुरू होणार होतं, त्यामुळे पाच वाजे नंतर हॉटेलवर जायचं होतं, दुपारी पार्लर वाल्या ताई येणार होत्या तयारीसाठी, अदिती पूनम छान तयार होत होत्या,

सगळे आवरून बाहेर बसलेले होते,.. चला झालं की नाही उशीर होतो आहे

खूपच सुंदर दिसत होती अदिती, घागरा तिला एकदम छान दिसत होता, पूनम ही छान दिसत होती,

"जायचं ना आता अदिती की थांबायचं इथे आपण",.. आकाश

आकाश पुरे..

"एवढी छान दिसते आहेस, इतर वेळी अशी रहात जा ना नटून थटून ",.. आकाश

काहीही... अदिती हसत होती

"तयारी ही अश्या वेळी करते ना की काही करता येत नाही ",.. आकाश

"आकाश आता मी ओरडेन ह",..अदिती

सगळे हॉटेलवर आले जरा वेळाने पाहुणे यायला सुरुवात होणार होती

आई बाबा खूप खुश होते, राहुल सरांचे इंडस्ट्रियलिस्ट मित्र एकेक येत होते, खूप जणांशी ओळखी होत्या त्यांच्या, त्या मुळे रिसेप्शनला खूप गर्दी होती,

ऑफिसचे खूप लोक येत होते, सगळेच अदिती आणि आकाशच्या ओळखीचे होते, पण आकाश पेक्षा अदितीच्या सगळे जवळचे होते, अदिती त्यांच्याशी बोलत होती,

तिच्या ऑफिसच्या ग्रुप आला सगळेजण खूप धमाल करत होते, अदितीला खूप चिडवत होते, काही खरं नाही तुझं आता अदिती, दिवस रात्र आकाश सर तुला रागवतील, तू हो कस म्हटल सरांना, काय काय बोलत होते.

अदितीला हसू येत होतं, आकाश दुसर्‍यांशी बोलत होता तो अदिती जवळ आला,.. "काय झालं अदिती मला ही सांगा जरा?",

"काही नाही अशीच गंमत करता आहेत सगळे",.. अदिती

"तू आज मी सोडून सगळ्यांशीच बोलते आहेस तु अदिती, नंतर त्रास होईल तुला याचा ",.. आकाश तिच्या कडे बघत होता

आकाश काय अस,.. अदिती हसत होती... "अरे किती दिवसांनी भेटत आहेत सगळे मित्र ",..

अनु सुहित आले ते खूप गप्पा मारत होते

"काय सुरू आहे मग अदिती? ",.. अनु

अदिती लाजली.." ओ हो असं आहे का, चांगला सुरू आहे तुमचं", .

" गप्प ग तुमच काय सुरू आहे? ",.. अदिती

" आमच्या लग्नाला आत्ताशी दोन तीन दिवस झाले",.. अनु

" मग आता पुढे काय? झाली का थोडी तरी ओळख?",.. अदिती मुद्दाम चिडवत होती

अनु हसत होती..

" नक्की काहीतरी लपवते तू अनु ",.. अदिती

" आम्ही फिरायला जाणार आहोत अदिती चांगला आहे सुहीत",... अनु

"खूप छान मी खुश आहे तुझ्या साठी", .. अदिती

" तुम्ही पण जाता आहात का?",.. अनु

" हो आम्ही पण उद्या निघतो आहोत",.. अदिती

"ऑफिस कधी जॉईन करते?",.. अनु

" फिरून आलो की दुसऱ्या दिवशी जॉईन होईल मी ",.. अदिती

" मी नंतर गावाला जाणार आहे तिकडुन आली की मग जॉईन करेन",.. अनु

सुहित आकाश छान बोलत होते

जेवायला भरपूर मेनू होता, सगळे एन्जॉय करत होते, मेन म्हणजे राहुल सर सगळ्यांशी मोकळेपणाने बोलत होते त्यामुळे टेन्शन नव्हतं

रात्री सगळेच थकून घरी आले, अदिती आकाश बाल्कनीत उभे होते, आकाशने तिला मिठीत घेतलं, आज खूपच छान दिसत होती तू अदिती,.. मग आता काय विचार आहे?

अदिती त्याच्याकडे बघत होती

" अगं म्हणजे उद्याची बॅग भरून झाली का? तुला काय वाटलं?",.. आकाश

अदिती त्याला मारत होती

"मी काही म्हटलो नाही , चोराच्या मनात चांदणं",.. आकाश

दुसऱ्या दिवशी सकाळी आई बाबा गावाला निघून गेले, दुपारी आकाश अदिती फिरायला निघाले.

सुंदर समुद्रकिनारी त्यांनी एक बीच रिसॉर्ट मध्ये रूम बुक केला होता

अदितीला माहिती नव्हतं ते समुद्रकिनारी जाणार आहे तिच्यासाठी ते सरप्राईज होतं, आकाशने सांगितलं होतं की हिल स्टेशनचं बुकिंग आहे, अदितीला पूर्वीपासून समुद्रकिनारा खूपच आवडत होता, त्याने ही सगळी माहिती अमित कडुन घेतली होती, काय काय आवडतं काय काय नाही

"बराच वेळ प्रवास करतो आहे येत कसं नाही आपलं हिल स्टेशन",.. अदिती विचारत होती

येईलच..

दोघं संध्याकाळी पोहोचले अदितीला समजल होतो की आपण बीज रिसॉर्टला चाललो आहे, आजूबाजूच्या वातावरणावरून तिला अंदाज आला होता, खूपच आनंद झाला होता तिला,

"आपण सामान रूमवर ठेवून समुद्रकिनाऱ्यावर जायचं का आकाश लगेच",.. अदिती

"हो जाऊया",.. आकाश

आत जाऊन रूम ताब्यात घेतली, फ्रेश झाले, दोघं लगेच समुद्रकिनाऱ्यावर सूर्यास्त बघायला गेले,

मऊशार वाळूतून अनवाणी पायांनी चालताना खूपच छान वाटत होतं, मोठा वॉक घेतला त्यांनी, थोड्या वेळाने आत आले, रूममध्ये जेवण मागवलं,

आकाश अदितीच्या मागे मागे करत होतं,.. "अदिती तुला माहिती आहे का एवढ्या लग्नाच्या सगळ्या गडबडीत तू मला तुझ्या प्रेमाची कबुलीच दिलेली नाही",

अदिती आकाश कडे बघत होती.

" मी तुला सोडणार नाही अदिती, अजून होकार दिला नाही तू ",.. आकाश

" आकाश मी नाही सांगू शकत अस ",.. अदिती लाजली होती.

"याला काय अर्थ आहे अदिती तुला मी उद्या संध्याकाळपर्यंतचा वेळ देतो पटकन प्रेमाची कबुली द्यायची छान पैकी ",.. आकाश

अदिती आता हसत होती,.. "अस नको ना आकाश प्लीज, न बोलता सगळ्या गोष्टी समजतात ना",..

" नाही ऐकणार मी",.. आकाश

" काही स्पेशल करायचं का? की नुसतं बोलायचं",.. अदिती

" स्पेशल करायचं",. आकाश

ठीक आहे.. अदिती विचार करत होती काय करू या, काही सुचत नव्हतं, उद्या सकाळी ठरवू.

त्यांच्या रूम मधुनं समुद्रकिनारा स्पष्ट दिसत होता, बराच वेळ ते दोघ बाहेर गार्डन मध्ये बसून गप्पा मारत होते, नंतर आकाश तिला हळूच उचलून आत घेऊन आला, दोघे एकमेकांमध्ये रमले होते,

सकाळी ते आजूबाजूचा परिसर बघायला निघाले

"लक्षात आहे ना अदिती आज संध्याकाळपर्यंतचा वेळ आहे",.. आकाश

"अरे पण मग आपण आता बाहेर आहोत आता, उद्या संध्याकाळपर्यंतचा वेळ दे ना", ..अदिती

चालेल.

सगळीकडे फिरून ते उशिरा वापस आले, फ्रेश होऊन बीचवर गेले तिथेच वाळूत बराच वेळ ते बसलेले होते, काही न बोलता अगदी शांत समुद्राकडे बघत.

" असा एकमेकांसोबत वेळ घालवायला छान वाटतं ना",.. अदिती

हो

अदिती विचार करत होती, करू प्रेमाची कबुली द्यायला स्पेशल वातावरण पाहिजे, ती विचार होती काय करावं, मग तिने ठरवलं की आपण आकाशला डिनरला बोलवु, छान साडी वगैरे नेसू, तिने मोबाईलवरच एक इन्व्हिटेशन कार्ड तयार केलं, त्यांच्याच रूममध्ये मागच्या साईडला वेटरला सांगून टेबल एरेंज करायला सांगितल, जेवणाचा मेनू काय असेल ते ती बघत होती, आकाशच्या आवडीच्या पदार्थ तिने ऑर्डर करायचे ठरवले , आता सगळ सेट होत,

दुसऱ्या दिवशी विशेष कुठे जायचं नव्हता आरामात ते दिवस घालवणार होते सकाळपासूनच आकाश अदिती पासून एक मिनिट ही लांब गेला नव्हता, रूममध्येच आराम करत होते ते, तिने दुपारी जेवण झाल्यावर त्याला इनविटेशन पाठवून दिलं

"अरे काय आहे हे? मला संध्याकाळी स्पेशल डिनर साठी कोणीतरी इन्व्हाईट केलं आहे",.. आकाश

"हो पण मला आधी तयारीसाठी वेळ द्यायचा आकाश",.. अदिती

"ठीक आहे मग मी तयार होऊन बीचवर फिरून येईन",.. आकाश तयारी करून बाहेर गेला

अदिती सुंदर अशी गुलाबी साडी नेसली होती पूनम दीदीने सुंदर सुंदर साड्या घेऊन दिल्या होत्या त्यातलीच ही साडी इकडे ती मुद्दाम घेऊन आली होती, बरं झालं आणली ही साडी, आकाशला माहिती नव्हतं, थोडासा हलका मेकअप केला, खूपच छान दिसत होती, वेटरने सांगितलेल्या वेळेत जेवण आणून दिलं, कॅन्डल फुलं आणून दिली, आदितीने डू नॉट डिस्टर्ब चा बोर्ड लावला, आकाशला फोन केला

अदितीने रूमचे लाईट बंद केले होते, आकाश आल्यानंतर तिने लाईट ऑन केले, आकाश अदिती कडे बघतच बसला, अतिशय सुंदर दिसत होती ती, तू म्हणतो ना इतर वेळी अशी तयार होत नाहीस म्हणून केली तयारी,

"कोण आहात आपण मॅडम? ही माझीच रूम आहे ना",.. आकाश

"हो रे",.. अदिती हसत होती

"एवढी सुंदर साडी काही खरं नाही माझं",.. आकाश

बाहेर अंगणात छान टेबल सजवला होता, त्यावर कॅण्डल फुलं होते, अदिती आकाशला बाहेर घेऊन आली, आकाश टेबलवर बसला, अदितीने पुढे होऊन त्याला फुल दिल,

" थँक यु.. मला का बोलावलं आहे मॅडम तुम्ही डिनरला",.. आकाश

"असंच मनातली एक गोष्ट सांगायची होती म्हणून बोलवलं",.. अदिती

"बोल पटकन",.. आकाश

"अरे असं नाही आकाश",.. अदिती लाजली होती, आधी जेवण कर मग सांगते,

दोघांनी छान जेवण केलं, हातात हात घेऊन बसले होते ते,

आकाश इतर मुलींप्रमाणेच माझं हे एक स्वप्न होतं की मलाही एक खूप प्रेम करणारा आणि अतिशय छान असा नवरा हवा होता, मला माहिती नव्हतं माझ्या आयुष्यात काय होणार आहे ते, आमची परिस्थिती तुला माहिती आहे, पण एक दिवस माझ स्वप्न सत्यात उतरल, एक गोड असा राजकुमार माझ्या जीवनात आला तो नुसतं मलाच नाही तर माझ्या घरच्यांना सांभाळून घेतो, जीव लावतो प्रेम करतो, अतिशय चांगला आहे तो, ज्याला माझ्या शिवाय काही सुचत नाही आणि आता मला त्याच्या शिवाय काही सुचत नाही, आकाश मला माहिती नव्हतं मला तुला अशी प्रेमाची कबुली द्यावी लागेल, आय लव यू आकाश , आय कान्ट लिव विद आउट यु... अदिती खूप लाजली होती,

लव यु टु...

आकाशने तिला उचलून घेतलं, आत घेऊन आला, आता ही रम्य संध्याकाळला आणखी छान बनवूया का? अदिती त्याच्या प्रेमात पूर्ण विरघळून गेली होती.
.....
समाप्त.


तिसर्‍या लॉटच काय झाल?
तो लॉट पूर्ण ऑर्डर सक्सेस फुली पूर्ण झाली, राहुल सर अविनाश आकाश वर खुश होते, निशांतने आता आकाशच नाव घेण बंद केल होत, अदिती दुसर्‍या कंपनीत जॉब करत होती एका वर्षाने तिने मेन ऑफिस जॉईन केल, तीच राहुल सरांच खूप पटत होत, विकीच कॉलेज व्यवस्थित सुरू होत.

पूनम प्रेग्नंट होती, तिला मुलगी झाली, दोघी आजी तिची काळजी घेत होते, घरात खूप छान वाटत होत बाळा मूळे,

आकाश रोज अदितीच्या मागे लागत होता आपण कधी घ्यायचा चान्स, आजी समजावत होत्या अदितीला की आम्ही आहोत,

एका वर्षाने हॉस्पिटल मधे सगळी फॅमिली हजर होती, डॉक्टर बाहेर आले, अभिनंदन आकाश मुलगा झाला, सगळे खुश होते अदितीचे आई बाबा, अमित, दोघी आजी, अविनाश, पूनम, राहुल सर, मोना मॅडम, विकी सगळेच आत जायला भांडत होते, कोण आधी जाईल बाळाला घेईल अस झाल होत त्यांना , एक एक आत जावून आले,

शेवटी आकाश आत गेला अदिती त्याची वाट बघत होती त्याने बाळाला घेतल, येवून तो अदिती जवळ बसला, थॅंक्स अदिती इतक छान गिफ्ट दिल, अदिती दमली होती, आकाशला भेटून ती खुश होती, आकाशने तिला मिठीत घेतल. गोड छोटीशी फॅमिली पूर्ण झाली होती.
.......
समाप्त.

वाचकांचे खूप खूप आभार, खूप प्रेम देता तुम्ही, तुमच्या सुंदर सुंदर कमेन्ट्स खूप आवडतात मला, पुढच्या भागाची आतुरता असते तुम्हाला, खूप आनंद होता मेसेज बघून, लव यु. ❤️

🎭 Series Post

View all