प्रेम पंख ❤️... भाग 37

सकाळी आकाश उठला, अदिती बाजूला झोपलेली होती, खूप खुश होता तो,.." उठायच नाही का आज अदिती? मला ऑफिसला जायच आहे
प्रेम पंख ❤️... भाग 37

©️®️शिल्पा सुतार
........

दुपारचे जेवण झाल, अदिती आणि तिचे बाबा निघत होते, अदिती बघत होती आकाश गप्प होता,.. "काय झालं आकाश?, मी जावू ना" .

" अदिती इकडे ये, हे असं ये जा ये जा चांगला आहे का? नको जाऊस ना, मला करमणार नाही, एक तर आता पूजा ही झाली ",.. आकाश

अदिती लाजली होती,.." माझ्या हातात आहे का हे आकाश? , अशी पद्धत असते आणि तिकडे अनु वाट बघत आहे, तिचं लग्न आहे, तू उद्या येशील का?",.

"कधी आहे लग्न परवा ना मग त्याच दिवशी सकाळी येईल मी, लग्न लागलं की आपण घरी येऊ",.. आकाश

" चालेल ",.. अदिती निघाली

अदिती घरी गेल्यामुळे आकाशला अजिबातच करमत नव्हतं, त्यात आता राहुल सरांनी त्याला फॅक्टरीत यायला नाही सांगितलं होतं, त्या विषयावर अजून ते बोलले नव्हते, राहुल सर समोरच बसलेले होते, काय करू बोलू का त्यांच्याशी, आकाश जाऊन त्यांच्याजवळ बसला,

" रिसेप्शनच कधी ठरत आहे मग आकाश? तू आणि अदिती कधी येणार इकडे वापस? ",.. राहुल सर

"आम्ही दोन दिवसांनी येऊ",.. आकाश

"मग ह्या वीकेंडला आपण रिसेप्शन ठेवू",.. राहुल सर

"चालेल,...

" उद्याच मॅनेजरला सांगतो सगळे बुकिंग करायला",.. राहुल सर

"पप्पा मला अजून एक विचारायचं होतं, मी फॅक्टरीत जाऊ शकतो का?, मला माझ काम करायच आहे पप्पा प्लीज ",.. आकाश

" जा तू कर काम, काय झालं?, सुट्टीवर नाही का तू? ",.. राहुल सर

" तुम्ही बोलले होते ना.. इंटरफेअर करू नको",.. आकाश

"ओह.. मी रागात बोललो होतो ते, विसरून जा, तुझ्या एवढ चांगलं काम कोणी करत नाही, राग तर नाही आला ना तुला",.. राहुल सर

" नाही पप्पा ",.. आकाश

" ती फॅक्टरी मेन ऑफिस तुझच आहे सगळं, काही काळजी करायची नाही",.. राहुल सर

आकाश अविनाश सोबत तिसऱ्या लॉटच्या कामच डिस्कशन करत होता, आता त्याला खूपच छान वाटत होतं व्यवस्थित करू आपण हे काम,

आदिती घरी पोहोचली, तिने इकडे फोन करून आकाशला सांगितलं

"काय करतो आहेस तू आकाश ",.. अदिती

" काही नाही ऑफिसचे काम करतो आहे, पप्पा म्हणत आहेत या वीकेंडला रिसेप्शन ठेवायचं, त्यानंतर आपण फिरायला जायचं का? ",.. आकाश

"चालेल",.. दोघांनी मिळून एक ठिकाणी फायनल केलं,

"तू काय करते आहेस",..आकाश

"काही नाही मी आता आराम करणार आणि उद्यापासून अनुच्या घरी सगळे कार्यक्रम आहे तिकडे जाणार उद्या तिची हळद आहे, आज मेहंदी होती",.. अदिती

" उद्याचे तुझे फोटो पाठव मला सगळे",.. आकाश

हो... दोघं बरंच बोलत होते.

अनु कडे आज हळद होती, खूप धमाल येत होती, अदिती साडी नेसून गेली होती, जाण्या आधी तिने तिचे फोटो आकाशला पाठवून दिले, सगळ्या मैत्रिणी तिच्यावर तुटून पडल्या होत्या, नवीन नवरी आली आहे, काय केल आकाश कडे? कस आहे घर, आकाशने बर येवू दिल तुला,

अनु ही खूप चिडवत होती,.. "आता नाही leave in relationship अदिती, आकाश खुश आता",

"चुप ग अनु... तेव्हाही आम्ही तसे रहात नव्हतो" ,.. अदिती

अदिती अनु कडे खूप मदत करत होती हळद लागली, खूप डान्स केला सगळ्यांनी, उद्या लग्न होत अनुच, आकाश येणार होता घ्यायला, आज त्याच्याशी बोलायला वेळ मिळाला नाही ,

सकाळ पासून अदिती आकाशची वाट बघत होती, आकाश आला चहा झाला,

"आटोप आकाश आपल्याला तिकडे लग्न घरी एकदम वेळेवर जाता येणार नाही, खूप काम आहेत" ,.. अदिती

" आदिती तू पुढे जा मी येतो आकाश रावांना घेवून, काय करतील ते तिकडे आता पासून ",.. बाबा

" हो ना बाबा, आपण शेतात जावु मला बघायच आहे शेत",.. आकाश

अदिती तयारी करून आली, खूप साधी आणि सुंदर दिसत होती ती मंगळसूत्र कुंकू वगैरे लावून, वेगळ तेज आल होत, ती अमित सोबत लग्न घरी घरी गेली , जवळचाच हॉल त्यांनी बुक केलेला होता, तिकडे ती मदत करत होती,

आकाश अदितीचे बाबा दोघं शेतावर गेले, खूप फिरले छान वाटलं आकाशला तिकडे,.. "एकदमच शांत वाटत आहे ना इथे बाबा",..

"हो तुम्ही एकदा या आरामात राहायला",.. बाबा

"बाबा तुम्ही मला अहो का म्हणतात आकाश म्हणा",.. आकाश

"नाही आकाश राव असं म्हणता येणार नाही",.. बाबा

आकाश काही म्हटला नाही.

" अजून एक सांगायचं होतं ते ट्रेकिंग वाल्यांचे पैसे कधीचे आलेले आहेत, मी अदितीला सांगतो आहे की घे ते पैसे, तर ती घेत नाही, ऑफिस मधे भरावे लागतील ना ",.. बाबा

" असू द्या ते पैसे तुमच्याकडे, अमितच्या नावाने बाजूला टाका म्हणजे आपल्याला ते पैसे त्याच्या शिक्षणासाठी वापरता येतील ",.. आकाश

" आकाश राव ते पैसे वापस घ्या , तुमचा ही कंपनीचा काही हिशोब असेल ना, अस चालणार नाही ",.. बाबा

"बाबा अजिबात घेणार नाही मी",.. आकाश

आता बाबा काही म्हटले नाही.

आकाश लग्नाच्या ठिकाणी आला, आदिती बाहेर येऊन त्याला आत घेऊन आली, आकाश आल्यामुळे एखादा हिरो आल्यासारखे सगळे बघत होते, अनुचे आई-वडील येऊन भेटले, खूप छान वातावरण होतं, अनुच्या ऑफिसचे बॉस आले सगळीकडे समजल होत, सुहीत येवून भेटले, आपण भेटू तिकडे अस नंतर छान गेट टुगेदर करू,

अनु आज खूप सुंदर दिसत होती, अदिती तिच्या मागे होती, काय हव नको ते बघत होती, अनुचं लग्न लागलं जेवण करून जरावेळ थांबून आकाश अदितीच्या बाबांसोबत घरी निघाला,

"तू केव्हा घरी येते आहे अदिती, आपल्याला जरा वेळाने निघायचं आहे",.. आकाश

"हो येते अजून एक दोन तास, अनु सासरी गेली की येते",.. अदिती

"ठीक आहे",..

"अनुच्या आईजवळ जरा वेळ थांबून येईन",.. अदिती

सगळे प्रोग्राम झाले, अनु सासरी निघत होती, सगळे खूप रडत होते, अदिती तिच्या आईला सांभाळत होती, अनु भेट ग तिकडे, हो, अनु सासरी गेली, आदिती आवरत होती,

" अदिती तू जा घरी, तुझे मिस्टर वाट बघत असतील तुलाही जायचं आहे ना सासरी ",.. काकू

" तुम्ही ठीक आहात ना काकू",.. अदिती

"हो एकदम ठीक आहे बेटा",.. काकू

सगळ्यांना भेटून अदिती घरी आली, जेवण केलं.

"आम्ही आता निघतो बाबा",.. अदिती

"घरी जायला उशीर होईल इथे थांबा आज, उद्या सकाळी जा ",.. बाबा

आकाश अदिती कडे बघत होता.." चालेल ना आकाश?",

" हो उद्या सकाळी लवकर निघू आपण अदिती",.. आकाश

अदिती आत मध्ये आवरत होती,

" अदिती तुम्ही दोघं आत मध्ये झोपा आम्ही बाहेर झोपतो",.. आई

अदिती काही म्हटली नाही.

आकाश बाहेर बसून गप्पा मारत होता, अमित खूप रमला होता त्याच्या सोबत,

"चला आराम करा आता तुम्ही, परत उद्या सकाळी लवकर उठायचं आहे",.. बाबा

आकाश आत मध्ये आला, अदिती फोनवर बोलत होती, तिने पूनमला फोन केलेला होता,

पूनम दीदी आकाश सोबत बोला,.. "आम्ही उद्या सकाळी येतो दीदी",

चालेल..

अदिती बाहेर जाऊन पाणी घेऊन आली, तिने आत येऊन दार लावून घेतलं, आकाश तिच्याकडे बघत होता,.. "काय करते आहेस तू अदिती?,..

" काय झालं आकाश घाबरलास का तू",.. अदिती

" हो मग हे तुझं घर त्यात तुझं रूम, काही खरं नाही माझं",.. आकाश तिच्या जवळ येत होता

"तू बोलतोय वेगळ आणि वागतो वेगळा आहे आकाश ",.. अदिती

" असंच करायचं असतं माझी गोड बायको, आज तू पहिल्यांदा माझ्या सोबत राहणार",.. त्याने अदितीला मिठीत घेतलं, कपाळावर किस केल.

" एक बोलायचं होतं आकाश",.. अदिती

" माहिती आहे काय म्हणणार आहेस तू,.. जा झोप जाऊन, मला माहिती आहे तू इथे कम्फर्टेबल नाही, बाहेर सगळे आहेत, घर लहान आहे ",.. आकाश

" थँक्यू आकाश, तू ठीक आहे ना इकडे माझ्या घरी",.. अदिती

" हो मला काही प्रॉब्लेम नाही, आता जिथे तू तिथे मी, आपण मोठ घर बांधायला सांगू तुझ्या बाबांना, ठीक आहे ",.. आकाश

" हो.. बाबा सारखं म्हणत आहेत ते ट्रेकिंग वाल्यांचे पैसे घ्या",.. अदिती

" हो माझं झालं बोलण मी त्यांना सांगितलं ते अमित साठी एफडी करून टाका काही प्रॉब्लेम नाही",.. आकाश

" बरोबर आहे आकाश तू खूपच करतो आहे माझ्या फॅमिली साठी ",.. अदिती

" आता ही माझी ही फॅमिली आहे ", ..आकाश

" झोप आता",.. अदिती

" हो.. नको जास्त गप्पा मारायला, झोपतो मी " ,.. आकाश

" काय झालं आता? ",.. अदिती

" तुझ्या गोड गप्पा मध्ये मी भान हरपुन जातो, नाही तर मग तुझ काही खर नाही ",.. आकाश अदिती जवळ आला

अदिती हसत होती... आकाश झोप.. तिने तिकडे तोंड करून झोपून घेतल, थोड्या वेळाने ती आकाशच्या बाहुपाशात होती आरामात झोपलेली होती.

सकाळी ते दोघे लवकर निघाले, आवरल, आईने चिवडा लाडू केलेले होते ते दिले सोबत, नाश्ता झाला, ते दोघ निघाले, अदितीच्या डोळ्यात पाणी होत, नीट जा, पोहोचले की फोन करा,

"तुम्ही सगळे या तिकडे रिसेप्शन साठी तस करतो मी फोन ",.. आकाश

हो..

दोघ घरी आले, अविनाश विकी ऑफिसमध्ये गेलेले होते, दोघी आजी पूनम घरी होत्या,

"अदिती तुझं सामान आकाशच्या रूम मध्ये शिफ्ट केला आहे जा जरा वेळ आराम करा आणि मग दुपारी जेवायला खाली या",.. पूनम

"मला ऑफिसमध्ये जायचं आहे तिसऱ्या लॉटचं काम सुरू झालं आहे नंतरही सुट्ट्या होतील आपल्या",.. आकाश

"चालेल आकाश तू जाऊन ये माझी सुट्टी आहे आठ दिवस",.. अदिती

" मला जेवायला दे अदिती",..आकाश

जेवण झालं, आकाश ऑफिसला निघून गेला, अदिती बराच वेळ दोघी आजी आणि पुनम यांची शी बोलत बसली होती, आकाश घरी नव्हता तर बोर होत होतं, ती अशी आरामात कधी राहिलीच नाही, कायम कॉलेज नंतर लगेच जॉब केला तिने

" अदिती जरा वेळ आराम कर चहाच्या वेळी खाली ये",.. पूनम

अदिती रूम मध्ये आली, खूप सुंदर रूम होती आकाशची, ती सगळीकडे बघत होती काय काय आहे, किती स्वच्छ आणि छान रूम आहे याची, मला नाही ठेवता येणार अशी, माझा सामान नेहमी पसरलेलं असतं, आकाशला आवडणार नाही, एक कपाट रिकाम होत त्यात तिने तिचा सामान ठेवलं आणि ती जरा वेळ झोपली, संध्याकाळी खाली आली

"काही करायचं आहे का",.. अदिती

"नाही आता हे लोक येईपर्यंत काही काम नाही",.. पूनम

आॅफिस मधे सगळ्यांना समजलं होतं आकाश अदितीच लग्न झालं, सगळे खुश होते,

"आम्हाला बोलावलं नाही लग्नाला, आदिती येणार नाही का आता ऑफिसला",.. सुरेश

" रिसेप्शन ठेवल आहे तेव्हा या सगळ्यांनी मी सांगतो",.. आकाश

सगळ्या ऑफिसमध्ये दोघी तिघी ब्रांचला मिठाई वाटली होती, अदितीला खूप काँग्रॅच्युलेशन्सचे मेसेजेस येत होते, बरेच जण विचारत होते कसं काय ठरलं तुमचं? सगळे आश्चर्य चकित झाले होते,

रितीकाला समजल होत आकाश अदितीच लग्न झाल, तिच्या घरचे विचारात होते, कोण आहे ही अदिती?

"आमच्या सोबत होती कॉलेज मध्ये",.. रितीका
.....

संध्याकाळी आकाश अविनाश विकी आले ऑफिसमधून, ते ऑफिसच्या गप्पा करत होते, पूनम अदिती कडे बघत होती,.. "रोजच आहे हे अस सारख काम काम,.. फ्रेश होऊन या जेवून घेऊ.. आटपा " ,

अदिती जेवणाची तयारी करत होती, सगळे जेवायला बसले.

"काय केल मग आज अदिती घरी? ",.. अविनाश

"काही नाही सर खूप शांत वाटत अस आरामात राहून",.. अदिती

"सर काय आता तू ही मला जिजुच म्हणत जा",.. अविनाश

"ठीक आहे, सवय झाली होती आधी ",.. अदिती

"आपल ऑफिस जॉईन करणार का की नवीन जॉब राहू देणार",.. अविनाश

"नवीन जॉब राहू देणार मला सोडता येणार नाही तो जॉब",.. अदिती

"हो जिजू आता नको अदिती तिकडे",.. आकाश

"काही लागल तर येईल मी तिकडे करेन मदत",..अदिती

ठीक आहे

जेवण झाल, आजी आकाश सोबत बोलत होत्या, विकी पूनम अदितीला मदत करत होता

किचन मध्ये अदिती काम करत होती, पूनम आली,.." अदिती तुझी आणि आकाशची बेड रूम सजवली नाही, आकाशला मी विचारल होत त्याने नाही सांगितल, त्याला अजिबात आवडत नाही म्हणून, नाही तर मला आहे हौस, छान नवीन आयुष्याला सुरुवात करा, आकाश खूप चांगला आहे, तू सुखी राहशील त्याच्या सोबत, जा आता आराम कर " ,

अदितीला खूप धड धड होत होतं, आकाश खूप चांगला आहे तरी तिला वाटत होतं इथेच काम लांबवाव, ती हॉल मधे आली, आकाश समोरून तिच्या कडे बघत होता,

" चल आता जा अदिती रूम मध्ये, पुरे झाल काम, जा आकाश हिला घेवून जा ",.. आजी

दोघ आत आले,

" आकाश तुझी रूम छान आहे ",.. अदिती

" तू लावला का तुझ सामान कपाटात ",.. आकाश

"हो खूप छान ठेवतो तू रूम",.. अदिती

"हो इथे पसारा करायचा नाही अजिबात",.. आकाश

"मला टेंशन आल आहे",.. अदिती

कसल?

" मी अजिबात नीट ठेवत नाही सामान ",.. अदिती

" अच्छा मला वाटल की.. आकाश तिच्या जवळ आला, तिला मिठीत घेतल, छान वाटत आता मला, दिवस भर तुझी आठवण येत होती, अदिती आता काय प्रॉब्लेम आहे? , चल आता आराम कर, किती इकड तिकडच बोलणार आहेस " ,... आकाश

कारण संपले होते सगळे, अदिती घाबरली होती, काय झालं, जास्त विचार करू नकोस, ये माझ्या जवळ, आकाशने लाइट आॅफ केले, तो अदिती जवळ येत होता,

सकाळी आकाश उठला, अदिती बाजूला झोपलेली होती, खूप खुश होता तो,.." उठायच नाही का आज अदिती? मला ऑफिसला जायच आहे" ,

अदिती उठली, आकाश तिच्या कडे बघत होता,.. "रिसेप्शन नंतर फिरायला जावू, मी आज बूकिंग करतो" ,

ठीक आहे,.. आटोप आकाश

"किती माझ्या कडे बघत बसणार अस ना अदिती",.. आकाश

अदिती हसत होती.. जा ना

नाश्ता झाला,

" आकाश तुला नसेल यायच तर थांब तू घरी, अजून विशेष काम नाही थर्ड लॉटच मी करेन मॅनेज",.. अविनाश

"नाही मी पुढच्या आठवड्यात घेतो सुट्टी, आम्ही फिरायला जाणार आहोत, तुम्ही याल का आमच्या सोबत आजी दीदी जिजु ",.. आकाश

हो येवु ना आम्ही, सगळे हसत होते,

"अदिती बघ बर आम्ही नाही तुझा नवराचा आम्हाला जबरदस्ती तुमच्या सोबत फिरायला घेऊन जात आहे",.. पूनम

" काही प्रॉब्लेम नाही दीदी",.. अदिती

" खूपच समजूतदार आहेत हे दोघं",.. पूनम

ठीक आहे आम्ही निघतो,

🎭 Series Post

View all