प्रेम पंख ❤️... भाग 33

चल इकडे ये तू ही आकाश , अस छान रहा दोघांनी, दोघी आजी कौतुक करत होत्या, आकाश अदिती एन्जॉय करत होते,



प्रेम पंख ❤️... भाग 33

©️®️शिल्पा सुतार
........

आजींनी राहुल सरांना फोन लावला, त्या विचारत होत्या.. काय झालं आहे? , राहुल सर सांगत होते...

" तू आकाशला असं घराबाहेर काढलं हे आम्हाला मान्य नाही, तुला राग आला असेल तर त्याला तुझ्या ऑफिस मध्ये नको येऊ देऊ, पण हे घर आमचं आहे, असं काय तो एकटा दुसरीकडे राहतो, आम्हाला हे मान्य नाही",.. आजी

"आकाश घरी येऊ शकत नाही, तो ऐकत नाही माझ ",..राहुल सर

"मग आम्ही दोघी औषध गोळ्या घेणार नाही, जेवणार नाही जोपर्यंत आकाश इकडे येणार नाही तोपर्यंत आमच्याशी बोलायचं नाही कोणी",.. आजी

"काय अस आई, ठीक आहे मग त्याला येऊ द्या तुमच्याकडे, पण माझ्याशी तरी आता त्याचा काही संबंध नाही",.. राहुल सर

" असं काय करतोस राहुल? चांगली मुलगी आहे अदिती, खूप हुशार आहे ती, आपला आकाश खुश राहील तिच्यासोबत, सगळ येत तिला ऑफिस काम पुढे जाऊन सगळा बिजनेस सांभाळू शकते ती आणि गरीब श्रीमंत असं काही नसतं, प्रेम आहे आकाशच तिच्या वर, आपला मुलगा सुखी रहायला हवा ",.. आजी

राहुल सर काही म्हटले नाही, मोना मॅडम ही त्यांना समजवण्याचा खूप प्रयत्न करत होत्या,

" आजी मी जाते आहे आकाश कडे ",.. पुनम

" आम्ही ही येतो, बरेच दिवस झाले त्याला बघितल नाही ",.. आजी

" आजी नाही आम्ही शॉपिंगला जातो मग येतांना घेवून येवू आकाश अदितीला",.. पुनम

नक्की ना.. आजी ऐकत नव्हत्या

हो..

पूनम अविनाश सोबत निघाले,

"येतांना ऑफिसला येशील का तू पूनम?",.. अविनाश

" हो, आकाश अदितीला घेवून येईन",... पुनम

"तेच बर होईल",... अविनाश

" तिथे तो अदितीच्या घरी रहातो",.. पूनम

"ते आकाशने घेतल घर रेंटने",.. अविनाश

" हो समजल ते मला",.. पूनम

" पण छान आहे जोडी ",.. अविनाश

" आता होईल लग्न",.. पुनम

"हो आणि ते त्यांच प्रायव्हेट लाइफ आहे आपण मधे मधे नको करायला",.. अविनाश

बरोबर

पूनम आकाशच्या घरी आली , अविनाश ऑफिसला गेले थोड्या वेळाने, अनु पण आली होती, अदिती किचनमध्ये काम करत होती, अनु आत मध्ये आली,.. "खूप छान घर आहे हे अदिती, तू इथे आली होती का डायरेक राहायला",..

हो..

"आकाश सोबत का?",.. अनु

हो..

अनु हसत होती... "ओह माय गॉड म्हणजे तुम्ही लिव इन रिलेशनशिप मध्ये आहात का?",

"अनु काय हे? ",.. अदिती

"मग काय सांग? ",.. अनु

अदिती हसत होती.. "काहीही बोलतेस तू अनु, माझा नवरा आहे आकाश, आणि आमचं अजून असं काही नाही",

"मग काय आहे?, आकाश जेंटलमॅन आहे वाटत ",.. अनु

"हळू बोल, आकाशची बहीण बाहेर बसली आहे, आपण मजा करतो, त्यांना खरं वाटायचं",.. अदिती

"लग्नाचा मुहूर्त ठरला का नाही अजून?, आटपा आता ",.. अनु अजूनही हसत होती

" चूप ग तू अनु,... आज करेल मी बाबांना फोन",.. अदिती

" खूप बदलणार आपल आयुष्य आता अदिती ",.. अनु

हो ना..

" तू तरी आकाशला ओळखतेस, सुहीत अनोळखी माझ्या साठी ",.. अनु

" रोज बोलत जा फोन वर नाही तर भेटत जा, आणि आकाश ओळखीचा म्हणजे काय? मला ही तेवढीच धड धड होत आकाशचा आणि माझा विचार केला की ",.. अदिती

" पण तरी तुम्ही सोबत आहात ना इथे, सांगा ना थोड ",.. अनु

" तू गेलीस अनु थांब जरा ",.. अदिती

आकाश आत आला,.." झाल नाही का अजून अदिती? आटोप, निघू या आता आपण, काय झालं अनु का हसते तू? ",

अनु अदिती हसत होत्या,.. काही नाही निघू या आपण.

त्यांच्या नेहमीच्या ठरलेल्या दुकानात सगळे गेले, खूप सुंदर साड्या दाखवत होते, पुनम साड्या बघत होती, अदिती अनु गप्प होत्या,

"किती सुंदर साड्या आहेत अनु ",.. अदिती

" हो ना मला सगळ्या आवडल्या, किम्मत बघ",.. अनु

" घ्यायचा नाहीत का साड्या तुम्हाला अदिती अनु, या अशा पुढे",.. पूनमने दोन-तीन साड्या काढल्या, दोन सारखे शालू काढले, खूप सुंदर होते शालू, हळदीसाठी साडी लागेल तुला अदिती, नंतर पूजेसाठीही, इतर वेळी घालायच्या ही साड्या लागतील, छान चॉईस होती तिची,

" एवढ्या साड्या पसंत केल्या तुम्ही दीदी ",.. अदिती

" कमीच आहेत या ",.. पूनम

पुनमच्या साड्या घेऊन झाल्या, लगेच तिथेच ओळखीने ब्लाउज शिवायला टाकले, एक शालू त्यांनी अनुला दिला

" मी नाही घेऊ शकत पूनम दीदी",.. अनु

"हा तुला घ्यावा लागेल अनु माझ्या कडून, तुझ्यासाठी एक घेतला आहे आणि एक अदितीसाठी",.. पूनम

"घे अनु आकाश आग्रह करत होता",.. तिच्यासाठी ही ब्लाउज शिवायला टाकला,

"अदिती एवढी महाग साडी, उगीच आली मी तुमच्यासोबत",.. अनु

"असू दे गं लग्न आहे तुझं पण लगेच, माहिती आहे तुम्ही छान घ्याल बस्ता, ही पण साडी नेस एखाद्या कार्यक्रमाला",.. अदिती

" एखाद्या कार्यक्रमाला म्हणजे काय? एवढा सुंदर शालू आहे मी लग्नात नेसेन",.. अनु

ते दागिने घ्यायला आले, अदिती साठी मोठ मंगळसूत्र, छोट मंगळसूत्र, बांगड्या, कानातले, नेकलेस बरेच काही पुनम घेत होती

" आकाश इकडे ये, किती दागिने घेतले आहे पूनम दीदीने",.. अदिती

" असू दे ग",.. आकाश

" खूप बिल होईल आपलं",.. अदिती

" असू दे ती देईल, पैसे आहेत, तिच्याकडे मोठ कार्ड असत, पप्पांची लडकी आहे ती",.. पूनम

"राहुल सर विचारणार नाही का एवढा खर्च का केला?",.. आकाश

"नाही विचारत पप्पा त्यांना लक्षातच येत नाही खर्च झाला आहे",.. आकाश

चांगला आहे यांच , इथे आपल्याला किती काळजी असते पैशाची,.. अदिती विचार करत होती

खरेदी करून सगळे हॉटेलमध्ये गेले, जेवण झालं,

"मी निघते आता, पूनम दीदी तुम्हाला याव लागेल माझ्या लग्नाला",.. अनु

" नक्की येईन तुमच्या गावाला येणार आहोत ना आम्ही अदिती कडे",.. पुनम

"फोन करते मी तुम्हाला नंतर",. अनु

हो.

अनु तिच्या रूमवर गेली, आकाश अदिती पूनम घरी आले

" काय ठरलं मग तुमचं पुढे? अजून एक गोष्ट आहे आकाश, दोघी आजींना सगळं समजलं आहे, आज आजीने पप्पांना फोन केला होता, आकाश तुला घरी यायच आहे आता ",..पूनम

अदिती आकाश कडे बघत होती, हा चालला जाईल का इथून? , नाही,.. मी काय करू इथे याच्या शिवाय, पूनम समोर काही बोलता येत नव्हत, तिला कसतरी होत होतं, डोळ्यात पाणी आलं तिच्या, आकाश नको म्हण प्लीज , आकाशला ते समजल, पूनमही बघत होती अदिती कडे.

"अदिती काय झाल? , तू ही येणार आहे घरी आमच्या सोबत, तुला एकट नाही सोडणार कोणी,.. रिलॅक्स ",.. पूनम

अदितीला बर वाटल, ती पटकन किचन मधे गेली, पाणी पील तिने,

"बघ आकाश जा ",.. पूनम

आकाश आत आला,.. "काय अस अदिती? का रडते आहेस? मी तुला कधी एकट सोडणार नाही" ,

अदिती अजून गप्प होती, तिने पुढे येवून आकाशला मिठी मारली,

" चल आता बाहेर दीदी एकटी आहे, त्रास का करून घेते",.. आकाश

अदिती आकाश बाहेर येवून बसले,

"अदिती आकाश तुम्हाला दोघांना घरी घेऊन यायला सांगितलं आहे आजीने, जर तुम्ही दोघ नाही आले तर दोघी आजी इकडे येतील",...पूनम

पूनमने अदितीच नाव मुद्दाम आधी घेतल, अदिती आता खुश होती

" पण मी कसं येणार तिकडे? पप्पांनी नाही सांगितलं आहे" ,... आकाश

"तेच सांगते ना, आजी बोलली आहे पप्पांशी ",. पुनम

" ठीक आहे जाऊया",.. आकाश

" अदिती तू तुझ्या बाबांना फोन करून मुहूर्त काढला का ते विचार ना आणि ते जर इकडे आले आपल्याकडे उद्या तर बरं होईल आपण लग्न ठरवून घेऊ ना",.. पूनम

"हो मी विचारते बाबांना त्यांनी मुहूर्त काढला का",.. अदिती

" हो ते बरं होईल जर तुझे आई बाबा इकडे आले तर आपण सगळेजण व्यवस्थित बसून ठरवून घेऊ मुहूर्त बघु",.. आकाश

" मग तुला तुझ्या आई बाबांसोबत जायचं असेल तर जाता येईल अदिती ",.. पूनम

अदिती आकाश कडे बघत होती,

" चालेल अदिती तु जा तुझ्या आई बाबांसोबत गावाला",.. आकाश

बापरे इकडे तर खूप प्रेम आहे यांच एकमेकांवर, अगदी एकमेकांना विचारल्या शिवाय काहीही करत नाही हे दोघ,... पूनम हसत होती

अदितीने फोन लावला,.." बाबा मुहूर्त काढला का? काय ठरलं आहे पुढच्या कार्यक्रमाच",..

" हो मुहूर्त काढला आहे पुढच्या दहा दिवसानंतरचा मुहूर्त आहे" ,... बाबा

" तुम्हाला उद्या इकडे येता येईल का? पूनम दीदी म्हणत आहेत की तुम्ही इकडे आले तर आपण सगळे एकत्र बसून लग्नाचे ठरवून घेऊ आणि मग मी तुमच्यासोबत गावाला येईल, माझं आणि आकाशचही हेच म्हणणं आहे",.. अदिती

" हो चालेल ना काही हरकत नाही थांब तुझ्या आईशी बोल",.. बाबा

" आई उद्या तू आणि बाबा इकडे येता का?, टॅक्सीने या डायरेक्ट पत्त्यावर, इकडे सगळं ठरवून घेऊ, मग मी तुमच्यासोबत वापस येईल",.. अदिती

" चालेल ना काही हरकत नाही आम्ही येतो ",.. आई

" अमितच काय? ",.. अदिती

" त्याला शेजारी काकांकडे ठेवू एक दिवस, त्याला एवढा प्रवास झेपणार नाही",.. आई

" ठीक आहे मी पत्ता पाठवते ",.. अदिती

संध्याकाळी पूनम आकाश अदिती घरी निघाले, केलेली खरेदी पूनमने सोबत घेतली होती, मी घेवून येईन ब्लाऊज वगैरे,

हो दीदी.

" आकाश मी माझी बॅग घेऊ का उद्या मला आई सोबत जायचं आहे",... अदिती खूप खुश होती घरी जायचं होतं म्हणून

"नको घेऊ बॅग घरून निघाले की आधी इकडे येवू, इथून कपडे घे आणि मग जा, मी पण येईल सोबत",.. आकाश

अदितीने तिचे एका दिवसाचे कपडे घेतले, आकाशने त्याची बॅग घेतली, आधी ते फॅक्टरीत गेले, अविनाश विकी दोघेही काम करत होते, खूपच दमले होते ते, सेकंड लॉटच काम जोरात सुरू होतं, काय करू काय नको असं झालं होतं, रोज दहा वाजता घरी जात होते अविनाश विकी, आकाशही दुरून सपोर्ट करत होता, राहुल सर एकदाही आले नव्हते कंपनीत,

आकाश अदिती पूनम आल्यामुळे अविनाश विकी खुश होते, त्यांनी सगळ्यांसाठी चहा मागवला, अदिती पूनम केबिन मध्ये बसलेल्या होत्या, विकी त्यांच्या सोबत होता, किती काम झालं ते आकाश बघत होता, तो आल्यामुळे बरेचसे मुलं खुश होते,

"कोणीही घरी गेलं नाही वाटतं",.. आकाश

"जाऊ शकत नाही खूप काम बाकी आहे",.. सुरेश

"सर तुम्ही रोज येत जा ना, आता छान वाटत आम्हाला तुम्ही आले तर ",.. रोहित

"हो येईल मी ",.. आकाश... आता काय सांगणार या लोकांना.

काय काय झालं, काय काय करायचं आहे ते सगळं आकाश बघत होता, काम नीट झाला आहे की नाही ते सांगत होता, अजून काय करायला पाहिजे ते बघत होता, आकाशने एकदा ऑर्डर डोळ्याखालून घातली म्हणून अविनाश आणि विकी जरा खुश होते, आकाश तसा खूपच हुशार होता, त्याला बरोबर माहिती असायचं परफेक्ट काम आणि रिक्वायरमेंट, नुसतं फोनवरून तो काय बरोबर ते सांगत होता.

सगळ्या मुलांना समजलं अदिती आली आहे, ते येऊन भेटत होते, पुनम असल्यामुळे जास्त बोलत नव्हते, अदिती पूनम बाहेर आल्या, पुनम अविनाश सोबत बोलत होते, अदिती मुलांशी बोलत होती

"कुठे गेली होती तू अदिती नौकरी सोडली का? आणि आकाश सरांबरोबर आली का आता? ",.. सुरेश

"हो सुरेश",.. अदिती

"नक्की काय सुरू आहे तुमचं?, लग्नाला बोलवा आम्हाला ",.. सुरेश

अदिती काही बोलली नाही, ती हसत होती, ती वर्कशॉप वर आली, आकाश काम करत होता,

"आत मध्ये जाऊन बस अदिती किती आवाज येतो आहे इथे",.. आकाश

" येऊ दे आवाज छान वाटतं इथे",.. अदिती

" हो ना मला पण तेच वाटत आहे, पप्पांचा राग लवकर जायला पाहिजे, मी असं ह्या फॅक्टरी पासून अजून लांब राहू शकत नाही, मला हेच काम आवडतं",.. आकाश

"होईल सगळं नीट तु मधून मधून बोलत रहा सरांशी",.. अदिती

सगळे घरी यायला निघाले विकी पूनम आणि अदितीशी खूप बोलत होता, आकाश अविनाश ऑफिसच्या कामाबद्दल बोलत होते, आकाश सोबत असल्यामुळे अविनाश खूप खुश होते,

सगळे घरी आले दोघी आजी समोर बसलेल्या होत्या, आकाश पटकन पुढे जाऊन दोघींना भेटला, दोघी आजी खुश होत्या,

सगळे सोफ्यावर बसले होते, सगळ्यांच्या चेहऱ्यावर वेगळाच आनंद होता

आजींनी आदिती आकाशला जवळ बोलवलं,.. "काय मग लग्न करायच का तुम्हाला? मग आम्हाला नाही का सांगता येत, आम्ही आहोत ना, आता काय ठरलं आहे मग पुढे तुमचं? ",

"आजी तू म्हणशील तस करू",.. आकाश

"हो आता बरोबर बोलतो आहेस आकाश",... आजी

सगळे हसत होते

"आता इथेच राहायचं तुम्ही दोघांनी कुठे जायचं नाही आणि मला असं न विचारता तू कसा काय आकाश घर सोडून चालला गेला, या घरच्या बॉस आम्ही दोघी आहोत आम्हाला विचारल्याशिवाय काही करायचं नाही",.. आजी

"ठीक आहे आजी सॉरी, यापुढे असं करणार नाही",.. आकाश

"तुझ्या आई बाबांना सांगितलं का ग अदिती, नाहीतर फोन आण मी बोलतो त्यांच्याशी",.. आजी

आजी अदितीच्या आईशी बोलत होत्या

" हो येतो आहोत आम्ही उद्या",.. आई

" लवकर या सकाळी सगळं ठरवून घेऊ आपण ",.. आजी

" हो मग नंतर आम्ही अदितीला घेऊन जाऊ",.. आई

" ठीक आहे, उद्या येणार आहेत तुझे आई बाबा, नंतर जा तू त्यांच्या सोबत अदिती",.. आजी

हो

" चला आटपा जेवायला बसू",.. आजी

विकी आत गेला,

आकाश अदिती अजूनही जवळ बसुन होते, अविनाश पूनम हसत होते, काही खरं नाही यांच,

" अदिती जाशील ना आई बाबां कडे? विचारा हिला आधी, उगीच रडायची ही, तिला आता आकाशला सोडून कुठे जायच नाही",.. पूनम चिडवत होती

अदिती लाजली होती, आकाश हसत होता

दीदी..

"नका चिडवू अदितीला ये ग इकडे बाळा, अविनाश तुम्ही आवरून या" ,.. आजी

पूनम अविनाश आत गेले,

अदिती आजी जवळ होती, आकाश खुश ना आता,

हो.

चल इकडे ये तू ही आकाश , अस छान रहा दोघांनी, दोघी आजी कौतुक करत होत्या, आकाश अदिती एन्जॉय करत होते,

" आपले लव बर्ड्स खुश एकदम ",.. अविनाश

" अरे अविनाश मी नुसती म्हटल.. आकाश तू घरी चल तर अदिती रडायला लागली",.. पूनम

"बापरे तिला वाटल असेल आकाश चालला जाईल",..अविनाश

"हो तशी इनोसन्ट आहे ती",.. पूनम

जेवणाची वेळ झाली, सगळे छान जेवत होते, विकी अदितीशी बोलताना तिला सारखं अदिती म्हणत होता, आजी रागावल्या, वहिनी म्हण आता तिला, नावाने का हाक मारतो?

"आम्ही दोघं बरोबरीचे असू हो ना ग वहिनी",.. विकी

वहिनी हाक मारल्या मुळे अदिती लाजली होती, सगळे अदिती कडे बघत होते, फारच सुंदर दिसते आहे ही,

जेवण झाल्यावर पूनम सोबत अदिती काम करत होती, पूनमने बऱ्याच वेळा सांगितलं तू राहू दे पण तिने ऐकलं नाही,

"बराच वेळ झाला आहे आज आराम करायचा नाही का",.. आजी

विकी रूम मध्ये केव्हाच निघून गेला होता, तो सध्या ऑफिस कामामुळे थकत होता, दोघी आजी ही रूममध्ये गेल्या, झोपा तुम्ही ही, पूनम अविनाश आकाश अदिती बसलेले होते,

"आकाश या घराचे लोकेशन माझ्या वडिलांना पाठव, आणि पत्ताही पाठव",.. अदिती

आकाश अदितीने सांगितलेलं काम करत होता, दोघजण छान बोलत होते,

"चल अदिती आता गेस्ट रूम मध्ये जा, अजून तरी तुला या घरात आकाशच्या रूम मध्ये जाता येणार नाही",.. पूनम

" हो दीदी ती रूम ना",.. अदिती

पूनम हो म्हटली,

" मी जाते आराम करते आकाश",.. अदितीने तिची बॅग घेतली, ती आत मध्ये गेली,

"आकाश जा आता तुझ्या रूममध्ये, का रात्रभर असं सोफ्यावर बसून समोरच्या रूम कडे बघत राहणार",..अविनाश

आकाश अदिती गेली तिकडेच बघत होता, बऱ्याच दिवसांनी अविनाश लाईट मूडमध्ये होते, आकाश उठला रूममध्ये गेला

पूनम अविनाश हसत होते, आज छान वाटतं आहे घरात, एवढे दिवस आकाश नव्हता तर करमत नव्हतं, या दोघांचे नाव घ्यायला छान वाटतं....

🎭 Series Post

View all