प्रेम पंख ❤️... भाग 31

पप्पा मला माफ करा, मी काल व्यवस्थित वागलो नाही तुमच्याशी, मी तुम्हाला या आधीच हे सगळं सांगायला पाहिजे होतं माझ्या आणि अदितीच्या बाबतीत


प्रेम पंख ❤️... भाग 31

©️®️शिल्पा सुतार
........

अदिती सकाळी उठली, कुठे जायची घाई नव्हती, स्वयंपाकाला ताई आल्या, अदिती तिच्या रूममध्येच होती, आकाश उठलेला होता, आज काय झालं अजून अदिती उठली नाही? , तो परत तिच्या रूममध्ये आला,.. "काय झालं अदिती आज उठायचं नाही का?",

"उठते आहे",.. अदिती

" त्या ताईंनी चहा केला आहे चल घेऊन घे चहा",.. आकाश

"आकाश त्या ताईंना कामाला नाही सांगून दे ना, मी करेन स्वयंपाक",.. अदिती

"काय झालं तुला नाही आवडत का त्यांच्या हातचा स्वयंपाक?",.. आकाश

"नाही पण तेवढेच आपले पैसे वाचतील",.. अदिती

"एवढी काळजी करण्यासारखी परिस्थिती नाही आपली अदिती, जास्त विचार करू नकोस ",.. आकाश

"अरे पण आता आपल्याला कधी जॉब मिळेल हे माहिती नाही पैसे जपून वापरायला पाहिजे",.. अदितीला पूर्वी पासून सवय होती काटकसर करायची

" ते सगळं ठीक आहे पण येऊ दे त्यांना एक वेळ कामाला संध्याकाळी तर पडतच काम",.. आकाश

अदिती बाहेर येऊन बसली, काय करायचं आहे आता? कोणी आहे का ओळखीचं? तेच विचारती करत होती ती, कॉलेजला असताना ती ऑफिसमध्ये काम करत होती त्या सरांशी तिची ओळख होती, त्यांचे बरेच बिजनेस होते तेव्हा ते अदितीला जास्त पगार देऊ शकत नव्हते म्हणून अदितीने आकाशची कंपनी जॉईन केली होती, पण आता परिस्थिती बदलली आहे, त्यांचा बिझनेस चांगला चालत होता, जे देतील ते, काय करू विचारून बघू का त्यांना? आकाशला समजलं तर त्याला वाटेल मी खूपच काळजीत आहे, पण असं नाही आहे, ओळखीने लगेच मिळाला जॉब तर काही हरकत नाही.

आकाश चहा घेऊन आला, तो अदिती जवळ बसला, त्याने अदितीचा हात हातात घेतला,.. "अदिती काल मम्मीने दिले आहेत आपल्याला पैसे, हे घे नीट ठेव, यात आपण आरामात वर्ष दोन वर्ष राहू शकतो, पण तस आपण नाही करणार काही, मी विचार करतो आहे काम करायचा",.

"आकाश तुला सवय नाही",.. अदिती

"अस काही नाही मी आजही 12 तास काम करू शकतो सकाळी 7 la जावु शकतो ऑफिस मधे, पैसे नीट ठेव",.. आकाश

" तुझ्या कडे ठेव आकाश, मला टेंशन येत पैसे सोबत असले की ",.. अदिती

" एक प्रॉमीस कर टेंशन घेणार नाहीस मग ",.. आकाश

नाही..

"आकाश मला तुला एक गोष्ट विचारायची आहे, म्हणजे मी काही खूप टेन्शन घेत नाही, पण कॉलेजला असताना मी जॉब करायची संध्याकाळी तुला माहिती आहे ना, ते सर माझ्या ओळखीचे आहेत त्यांचे बरेच ऑफिस आहेत, त्यांना विचारून बघू का मी जॉब साठी?, मागे पण त्यांनी मला फोन केला होता, जॉईन होशील का इकडे विचारात होते, तेव्हा मी सांगितलं की मी तुझ्या कंपनीत जॉईन झाले तेव्हा ते बोलले होते काही लागलं तर सांग ",.. अदिती

" तुला विचारायचं तर विचार त्यांना अदिती, तुझ्या करमणुकीसाठी तू करू शकते हा जॉब, पण टेन्शन घेऊ नकोस पैसे आहेत आपल्याकडे ",.. आकाश

" ठीक आहे मग मी विचारून बघते, मला बरं वाटेल थोडं काही काम असलं तर ",.. अदिती

चालेल..

जरा वेळाने अदितीने त्या सरांना फोन केला,.. "त्यांनी दुपारनंतर इंटरव्यूला बोलावलं, तशी तू ओळखीचीच आहेस अदिती, तरी एक फॉर्मॅलिटी म्हणून तुला इकडे यावे लागेल",..

" डॉक्युमेंट्स वगैरे काही लागतील का सर ",. अदिती

"हो लास्ट इयरच्या मार्कशीटची झेरॉक्स, वर्क एक्स्पिरियन्स सर्टिफिकेट असेल तर घेऊन ये, तसं मी ओळखतोस तुला आणि तुझं काम ही चांगलं आहे",.. सर

" थँक्यू सर पण वर्क एक्स्पिरियन्स सर्टिफिकेट नाही माझ्या कडे ",.. अदिती

" काही हरकत नाही तू ये मग बोलू ",.. सर

" आकाश त्या सरांनी मला दुपारी बोलवलं आहे तिकडे भेटायला मी जाऊ का? ",... अदिती

" जाऊन ये ना आदिती, हे बघ तू खुश राहणार असेल तर तुला आवडतं ते काम तू कर, अजिबात विचार करू नको कसला आणि एक सांगतो जर ते ऑफिसला जॉईन व्हायचं सांगत असतील तर पुढच्या पंधरा दिवसाची डेट घेशील का? ",.. आकाश

" का बरं ",.. अदिती

" तेवढ्या वेळात आपण तुझ्या घरी जाऊन येऊ आणि वैदिक पद्धतीने लग्न करून घेऊ म्हणजे आपल्याला व्यवस्थित इथे सोबत राहता येईल, मला तुझ्या सोबत रहायच आहे अदिती, हे अस किती दिवस दूर दूर रहाणार, तू तिकडे मी इकडे",.. आकाश

अदिती आकाश कडे बघत होती, आकाश अदिती कडे बघत होता, अदिती एकदम लाजली ती आत जात होती, आकाशने पुढे होऊन तिचा हात धरला तिला जवळ ओढून मिठी मारली,.." चालेल ना आदिती करायचं ना वैदिक पद्धतीने लग्न, म्हणजे मग आपल्यालाही लग्न झाल्यासारखं वाटेल ",..

हो...

" एवढी का घाबरलीस" ,.. आकाश

"नाही काही नाही",.. अदिती

"फक्त पंधरा दिवस आता",.. आकाश

पुरे आकाश..

"बाकीचे विचार करत असतिल आकाश तिकडे थांबला अदिती कडे ",.. आकाश

अदिती हसत होती. हो ना

" काय करताय हे काय माहिती?",.. आकाश

" मी आत जाते, आज तू सकाळी सकाळी एकदम मूड मध्ये आहेस",.. अदिती

" खुश रहायला हव, इतक छान आपण सोबत आहोत का दुःखी रहा",.. आकाश

बरोबर आहे..

"काय काय घ्यायचं तुला साड्या दागिने? आपण जाऊ शॉपिंगला",.. आकाश

"नाही आकाश मला काही नको, खर्च नको करायला फक्त एक छोट मंगळसूत्र घे ",.. अदिती

" लग्नासाठी साडी नको का?, तू एवढ्यात एकदाही साडी नेसली नाही ना, कॉलेजच्या सारी डे ला नेसली होती एकदा, सुंदर दिसत होतीस ",.. आकाश

" तुला लक्ष्यात होत आकाश, साडी हवी पण खूप महाग नको ",.. अदिती

" ठीक आहे, बायको म्हणेल ते, जावु आपण शॉपिंगला",.. आकाश

अदिती आत मध्ये आली, तिला तिच्या मार्कशीटची झेरॉक्स शोधायची होती, खूपच आनंद झाला होता तिला, सकाळी अगदी कशातच काही नाही असं वाटत होतं, आता तिच्या हातात जॉब होता आणि आकाशनेही वैदिक पद्धतीने लग्नाच विचारलं होतं, तेच बरोबर आहे, पूजा करून घेऊ व्यवस्थित, पण नंतर आकाश माझ्या जवळ येईल, ओह माय गॉड, विचार करून अदितीला हसायला येत होत, छान वाटत त्याच्या जवळ पण, मला आवडतो तो, छान आहे आकाश,

आकाश काही तरी विचारायला आत आला, अदिती एकटी हसत होती,.. "काय झालं अदिती मला सांग? ",

"काही नाही आकाश",.. अदिती

"पटकन सांग",.. आकाश

"काही नाही",.. अदिती बाहेर जात होती आकाश मधे आला

\"मी हे दार लावून घेइन तुला जावू देणार नाही मग सांगू नको मला, पटकन सांग",.. आकाश

अदिती अजून हसत होती,.. अरे अस काय , जावू दे

"तू माझा विचार करत होती ना माझ्या मिठीत छान वाटल ना ",.. अदिती

आकाश

" तुला मला काही सांगायच का? ",.. आकाश

" आकाश मला तु खुप आवडतो",.. अदिती

अजून..

" अजून काही नाही ",.. आकाश

इतकच?

" मला उशीर होतो सरक ",.. अदिती

" दुपारी जायच ना तुला, पटकन होकार दे",.. आकाश

" आकाश जावू दे ",.. अदिती

आकाशला फोन येत होता ठीक आहे नंतर बघतो तुझ्या कडे,

अविनाश विकी आकाशचा कॉन्फरन्स कॉल सुरू होता, ऑर्डर साठी बराच वेळ त्यांचं काम सुरू होतं

दुपारी जेवण करून अदिती इंटरव्यूला निघाली

" टॅक्सीने जा अदिती, ऑल द बेस्ट ",..आकाश

थॅन्क्स..

" कुठे गेली अदिती?",.. अविनाश

"इंटरव्यूला गेली",. आकाश

"अरे होईल ठीक इकडे, काळजी करू नका तुम्ही दोघांनी",.. अविनाश

"जावू द्या जिजु अदितीच मन रमेल थोड, तिच्या कामात बिझी राहील ती, नाहीतर उगीच त्रास करून घेते",.. आकाश

"ठीक आहे ना ती ",.. अविनाश

" हो पप्पांना अदिती आवडत नाही याचा त्रास होतो तिला",.. आकाश

होणारच.. तिघ परत कामाला लागले

अदिती ऑफिसमध्ये पोहोचली, सगळे ओळखीचेच होते तिच्या, त्या सरांच्या दुसऱ्या ऑफिसमध्ये तिला काम करायच होतं, ते या अदितीच्या घरापासून पुष्कळ जवळ होतं, इंटरव्यू कॉलेज जवळच्या ऑफिस मध्ये होता, सर आणि अदिती बराच वेळ बोलत होते,

"आधीचा जॉब सोडायचं काय कारण आहे अदिती ",.. सर

" सर थोड्या पर्सनल रिझनमुळे सध्या तो जॉब मला सोडावा लागला, अजून वर्क एक्सपिरीयन्स सर्टिफिकेट मिळालं नाही, बहुतेक मिळणारही नाही जर तुम्हाला काही अडचण असेल तर तुम्ही मला नकार ही देऊ शकता",.. अदिती

" नाही काही प्रॉब्लेम नाही अदिती, तू जॉईन होऊ शकते इकडे ",.. सर

" सर मी पंधरा दिवसांनी जॉईन होईल",.. अदिती

" काही विशेष कारण त्या ऑफिसमध्ये जाते आहेस का तू अजून? ",.. सर

" नाही सर माझं लग्न आहे आता",.. अदिती

" अरे वा खूप अभिनंदन कोण आहे मुलगा? ",.. सर

अदितीने आकाश बद्दल सांगितलं

" यांच्या ऑफिसमध्ये तू काम करत होती ना",.. सर

"हो आकाश माझ्यासोबत कॉलेज पासून होता",.. अदिती

त्या सरांनी आणखी काही विचारलं नाही,

" हे बघ अदिती आता पहिले दोन दिवस ये थोडं काम समजून घे नंतर सुट्टी घे पुढच्या पंधरा दिवसासाठी, थोड्या फॉर्मलिटीज आहेत त्या पूर्ण होतील, जॉईन होऊन जा ",..सर

"चालेल सर काही हरकत नाही",.. अदिती एच आर मध्ये आली, ऑफिसची वेळ पेमेंट सगळे डिस्कस करून घेतल, अदिती काही म्हटली नाही, जे देतील ते, आधी पेक्षा पाच दहा हजाराने जास्तच पेमेंट होता, अदिती खुश होती उद्या येते मी ऑफिसला,

जॉइनिंग लेटर मिळालं," उद्या सकाळी नऊ वाजता तुम्ही जॉईन व्हा अदिती",.. त्या मॅडमने सांगितलं

अदिती घरी आली आकाशला सगळं सांगत होती ती जॉबच

" बघ लागला ना जॉब, हुशार आहेस तू अदिती, उगाच काळजी करत होती, 24 तासाच्या आत तुला पुढची नोकरी लागली आणि बघ पेमेंट ही जास्त दिला त्यांनी",.. आकाश

" मला सुरुवातीला दोन दिवस यायला सांगितला आहे त्यांनी आणि त्यानंतर ते बोलले की पंधरा दिवस सुट्टी घे",.. अदिती

"चालेल हरकत नाही त्यानंतर आपण पुढे काय करायचं ते ठरवू ",.. आकाश

" काही बोलणं झालं का राहुल सरांशी",.. अदिती

नाही

" तो कॉन्फरन्स कॉल कोणाचा होता? ",.. अदिती

" अविनाश जीजू आणि विकीचा",.. आकाश

" कसं सुरू आहे ऑर्डरचं काम? ",.. अदिती

" सुरुवात झाली आहे कामाला बघू काय होतं ते",.. आकाश

अदितीने तिच्या बाबांना फोन करून जॉब मिळाल्याचे सांगितलं," आधी जिथे मी जुना जॉब करत होती ना त्यांच्याच नवीन ऑफिसमध्ये हे काम आहे",..

" बाबा सगळे डिटेल्स विचारत होते, इकडे कधी येता आहात घरी",..

" पुढच्या आठवड्यात येऊ आम्ही",.. अदिती

आकाश फोन मागत होता अदितीने त्याच्याकडे फोन दिला,.." मी आकाश बोलतो आहे बाबा, याआधी आपण कधीच बोललो नाही,

"काल अदितीने सांगितलं मला काय झालं ते, कसलीच काळजी करू नका पुढच्या आठवड्यात या तुम्ही आमच्याकडे मग आपण ठरवून घेऊ इथे लग्न वगैरे करून टाका, मी मुहूर्त बघून ठेवू का? ",.. बाबा

"हो येतो आम्ही, चालेल बघुन ठेवा मुहूर्त, अमित कसा आहे? ",.. आकाश

" चांगला आहे तो परीक्षा जवळ आली आहे अभ्यास करतो आहे",.. बाबा

बराच वेळ दोघे शांतपणे बोलत होते, अदितीला चांगलं वाटलं

जरा वेळाने पूनम दीदीचा पण फोन आला होता ती आकाशशी बराच वेळ बोलत होती

" दीदी अदितीला घेऊन शॉपिंगला जाणार का तू? लग्नासाठी दागिने आणि साड्या घ्याव्या लागतील, मी गेलो असतो पण अदिती सगळं घ्यायला नाही म्हणते आहे",.. आकाश

"ठीक आहे उद्या येते मग मी",.. पूनम

"नाही दोन दिवस नाही जमणार तिला जॉब मिळाला आहे सॅटर्डे संडेला शॉपिंग करू, मग आम्ही तिच्या गावी जाणार आहोत तिथे काय ठरतं तसं मी कळवतो तुम्हाला लोकांना, तुम्ही सगळे तिकडे या",.. आकाश

" हो चालेल",.. पूनम

संध्याकाळपर्यंत आकाश कामच करत होता,

" काय करतो आहे आकाश, बिझी एकदम ",.. अदिती

" हिशोब करतो आहे, मला ना स्वतःचा बिझनेस सुरु करायचा आहे, किती पैसे लागतात काय तू बघायची ना हिशोबाचं काम, या ऑर्डर साठी किती पैसे लागले आपल्याला",.. आकाश

अदिती हिशोब सांगत होती

" जर थोड्यातून सुरुवात केली तर किती खर्च येईल? छोट्या छोट्या ऑर्डर घ्यायच्या आधी",.. दोघेजण हिशोब करत होते

" ऑफिस फॅक्टरी त्याचा पण खर्च येईल ",.. अदिती

" माझ्या एका मित्राच सिक युनिट आहे ते मला चालवायला घेता येईल नाही तरी ते बंदच आहे त्या बदल्यात मी त्याला दर महिन्याला भाडं देऊन टाकेल आता दुपारीच झालं आहे माझं त्याच्याशी बोलणं आता फक्त बघावं लागेल की कसलं काम करायचं आणि ऑर्डर कसल्या मिळू शकतात, मशीन खूप महाग आहेत, सध्या घेण परवडणार नाही",.. आकाश

"त्यांच्या फॅक्टरीमध्ये असतील ना मशीन? कसल्या आहेत त्या , नीट करून त्याच्यातच काही करता येईल का?",.. अदिती

"बघाव लागेल",.. आकाश

"एकदा तिकडे जावून प्रत्यक्षात बघून घे",.. अदिती

"उद्या तू ऑफिसला गेली की मी तिकडे जाऊन येईल",.. आकाश

"काही बोलणं झालं का राहुल सरांशी? ",.. अदिती

नाही

" तू काल म्हणत होता ना की तू त्यांची माफी मागणार आहेस ",. आकाश

हो

" मग जमलं तर फोन करून दे तुझे वडील आहेत ते, तुझं काम आहे माफी मागणं, शांत समजूतदार पणे बोल अजिबात एक ही शब्द उलट बोलू नकोस ",.. आकाश

आकाश फोन घेऊन त्याच्या रूममध्ये निघून गेला तिथून त्याने राहुल सरांना फोन लावला, बराच बराच वेळ रिंग वाजत होती, नंतर त्यांनी फोन उचलला, काही बोलले नाहीत ते.

" पप्पा मला माफ करा, मी काल व्यवस्थित वागलो नाही तुमच्याशी, मी तुम्हाला या आधीच हे सगळं सांगायला पाहिजे होतं माझ्या आणि अदितीच्या बाबतीत, मी सांगणारच होतो थोडे दिवसांनी त्या आधीच निशांतने तुम्हाला फोटो पाठवून दिले, प्लीज राग धरू नका. मी नाही राहू शकत असं, तुम्ही बोला माझ्याशी, वाटलं तर घरात घेऊ नका फॅक्टरीत घेऊ नका पण माझ्याशी बोलणं टाळू नका, प्लीज बोला ना माझ्याशी पप्पा, तुम्ही मला महत्त्वाचे आहात, माझे इन्स्पिरेशन आहात पप्पा",.. आकाश

राहुल सर ऐकत होते ते काहीच बोलले नाही त्यांनी फोन ठेवून दिला

आकाश बाहेर आला

" काय झालं आकाश?" ,.. अदिती

" काही बोलले नाही पप्पा माझ्याशी अदिती",.. आकाश

" असू दे पण तू जे बोलला ते ऐकून घेतलं ना ",. अदिती

हो

" पडेल मग फरक तू काळजी करू नकोस",.. अदिती

"अदिती तू खूप समजूतदार आहेस हुशार आहेस",..आकाश

" हो का माझी तारीफ कर अजून",.. अदिती

"तू खूप सुंदर दिसते झोपलेली",... आकाश

"काय... कधी बघितलं?, तू माझ्या रूम मध्ये का आलास? ",.. अदितीने त्याला उशी फेकून मारली,

" काल रात्री आलो होतो मी तुझ्या रूममध्ये",.. अदिती आकाशकडे आश्चर्याने बघत होती

मग..

" मग काही नाही बराच वेळ तुझ्याकडे बघत होतो, मी जर मी तुझ्याजवळ आलो असतो तर?",.. आकाश

" तर काय करणार ",.. अदिती

" अरे मी उगीच चान्स सोडला, आता येवु का ? ",.. आकाश उठून आला

अदिती हसत होती,.." आकाश पुरे मी घाबरत नाही" ,

हो का..

"आकाश तू जॉब शोध लवकर ",.. अदिती

का?

" अस काही काम नाही तुला तर उगीच मला त्रास देतोस",.. अदिती

"काम असल की ही देईन त्रास मी तुला, लग्न होवू दे दाखवतो तुला ",.. आकाश

अदिती हसत होती.. दोघ बराच वेळ बोलत होते, त्यांचं नातं आता अजूनच छान होत चाललं होतं, अदिती आकाश खुश होते.








🎭 Series Post

View all