प्रेम पंख ❤️... भाग 30

तो तिच्या रूममध्ये गेला, अदिती शांत झोपलेली होती, छान दिसते ही अशी झोपलेली, उगीच टेन्शन घेते ही, आकाश तिच्याजवळ बसला, आधी अस कधीच त्याने अदितीला जवळून बघितलं नव्हतं


प्रेम पंख ❤️... भाग 30

©️®️शिल्पा सुतार
........

अदिती घरी आली, तिला टेन्शन आलेलं होतं,.." काय झालं आहे आकाश?, कुठे गेला होता तू? ",

" काही नाही.. पप्पांना आपल्याबद्दल समजलं, त्या निशांतने त्यांना आपले फोटो पाठवून दिले आणि पप्पांना नाही आवडल आपण सोबत आहोत ते, त्यांनी मला घराबाहेर आणि ऑफिस बाहेर काढलं आहे ",.. आकाश

अदितीने सोफ्यावर बसून घेतलं,.. "का पण? तू बोलला का त्यांच्याशी, त्यांना मी पसंत नाही का?",..

"अस नाही अदिती, चिडले आहेत ते होईल ठीक ",.. आकाश

" मी तुमच्या ऑफिस मधे काम करते म्हणून त्यांना आवडल नसेल, आकाश म्हणून मी तुला हो म्हणत नव्हते, खूप फरक आहे दोन कुटुंबात तुम्ही श्रीमंत आम्ही गरीब, आता काय करू या? आपल लग्न झाल आहे हे समजल का त्यांना?",.. अदिती

"ते नाही सांगितल ",.. आकाश

" माझ काही खर नाही आकाश मला खूप ओरडतील राहुल सर ",.. अदिती

" आता कुठे जायच आहे ऑफिसला, आपल्याला काढून टाकल ना त्यांनी ",.. आकाश

"मला पण नोकरीवरनं काढलं का? काय करूया आता? ते मला बॅड सर्टिफिकेट तर नाही देणार ना? यापुढे मला जॉब लागेल का आता? ",.. अदिती रडायला लागली

" अरे बापरे अदिती तू एवढ टेन्शन का घेते आहेस? , मी आहे ना करू आपण सगळं, रडू नको ",.. आकाश उठून तिच्या जवळ येऊन बसला, तिचा हात हातात घेतला, काळजी करू नको अदिती, होईल नीट, अदिती अजूनही रडत होती, आकाशने तिला जवळ घेतल, तो ही गप्प बसुन होता,

" तुला खूप बोलले का राहुल सर ",.. अदिती

हो..

" आता काय करू या?",.. अदिती

" माहिती नाही काही",.. आकाश

" माझा विश्वास आहे तुझ्यावर आकाश, पण मला टेन्शन येत आहे",.. अदिती

"टेन्शन तर येणारच अदिती",.. आकाश

"आता काय करूया आकाश? माझ्या घरी जायचं का गावाला? ",.. अदिती

"थांब जरा संध्याकाळी अविनाश जिजू आणि पूनम दीदी येणार आहेत मग ठरवु, माझ्याकडे आता काहीच पैसे नाहीत अदिती",.. आकाश

"तुझे पैसे आहेत ना माझ्याकडे तेवढे पुरतील, तोपर्यंत जॉब मिळेल काळजी करू नकोस आकाश, जॉबच बघाव लागेल आकाश, मला इंटरव्यूचा एक्सपीरियंस नाही, डायरेक्ट याच कंपनीत नोकरी लागली होती मला, काय करूया ",.. अदिती

" अदिती थांब तू एवढं पॅनिक होवु नको, करू आपण दोघं पण जॉब, जरा एक-दोन दिवसाचा वेळ दे मला विचार करायला",.. आकाश

"चल जेवून घे",.. अदिती

"मला नाही खायचं काही",.. आकाश

"आता असं जेवण सोडून काही होणार आहे का?",.. अदिती

दोघं उठले जेवून घेतलं, आकाश विचार करत होता काय करता येईल, पप्पा का चिडलेत इतकं? पुढे काय होईल आता? अदिती म्हणते आहे तसं तिच्या गावी जाऊन तिच्या घरच्यांना भेटून येऊ,

आकाशने पूनमला फोन केला, तिला सगळं सांगितलं, तिला धक्का बसला होता, पूनमने अविनाशला फोन केला, आज संध्याकाळी जाऊ आपण तिकडे

" तू इकडे फॅक्टरीत ये इथून जवळच आहे त्यांच घर",.. अविनाश

"ठीक आहे अविनाश",.. पूनम

दोघी आजींना काही माहिती नव्हतं.

दुपारी जरा वेळ आकाश झोपला होता, अदिती त्याच्याजवळ बसूनच विचार करत होती काय कराव, आता पुढे नोकरी कुठे शोधावी? आई-बाबांना सांगायला पाहिजे हे सगळं, ती हळूच उठून तिच्या रूममध्ये गेली, तिने दार लोटून घेतलं, बाबांना फोन लावला सगळं सांगितलं

"आता काय होईल बाबा पुढे? ",.. अदिती

"तुम्ही दोघांनी काय ठरवलं आहे, इकडे घरी निघून या नाहीतर",.. बाबा

"हो आज संध्याकाळी आकाशची बहिण येणार आहे मग ठरवू आम्ही काय करायचं ते",.. अदिती

"आकाश कुठे आहे? ",.. बाबा

"इथेच आहे तो माझ्यासोबत तिकडे पुढे झोपलेला आहे",.. अदिती

"काळजी करू नको इकडे या",.. बाबा

" बाबा माझा जॉब गेला ",.. अदिती

" जाऊदे गेला तर बरेच जॉब मिळतील अजून ",.. बाबा

" मला टेन्शन येत आहे ",.. अदिती

" त्यात टेन्शन घेण्यासारखं काही नाही, तू हुशार आहेस चौकशी कर जॉब ची, नाव नोंदव प्लेसमेंट सर्विस मध्ये, लगेच मिळेल जॉब थोडं फार इकडे तिकडे होईल, पेमेंट कमी जास्त पण बसून राहणार नाहीस तू मला माहिती आहे",.. बाबा

" आकाशला अजिबात सवय नाही आहे अशी जॉब वगैरे करायची, त्याला त्रास नको व्हायला बाबा",.. अदिती

" काही नाही होणार अदिती उगीच काळजी करत बसू नको",.. बाबा

अदितीला खूप रडायला आलं, बाबा तिला समजावत होते,

" काही चुकीचं केलं आहे का मी बाबा? मी आवडत नाही त्या लोकांना",.. अदिती

" उगीच विचार करत बसू नको अदिती, तुला ज्याच्या सोबत राहायचं आहे त्या आकाशचा काही म्हणणं नाही तर बाकीच्या लोकांचं पण विरोध लवकरच मावळेल",.. बाबा

"पण मला या गोष्टीचा विचार करून खूप त्रास होतो आहे की माझ्यामुळे आकाशला त्याच्या वडिलांनी घराबाहेर काढलं, मी सांगू का आकाशला की तू तुझ्या घरी वापस जा, आपण नको सोबत राहायला",.. अदिती

" ते तुझे एकटीच आयुष्य आहे का अदिती? तुझ्यासोबत आकाशही आयुष्य आहे, दोघांनी मिळून निर्णय घ्यायचा असतो ना, जे काही सुख दुःख असतं ते दोघांनी वाटून घ्यायचं, असं हार मानून चालणार नाही, बरेच प्रसंग येतात आयुष्यात घाबरून जायचं नाही त्याला धीराने तोंड द्यायचं",.. बाबा बरच समजून सांगत होते,

अदितीला आता पटलं जे होईल ते होईल घाबरून जायचं नाही, जास्तीत जास्त काय होईल घरी वापस जावं लागेल आणि थोडे दिवस तिथे थांबू तिथून जॉब इंटरव्यू देऊ लागेल नोकरी , आकाशला नाही लागली नोकरी तरी मी करेल नोकरी,

" बाबा मी करते तुम्हाला नंतर फोन",.. अदिती

"काळजी करू नकोस बेटा",.. बाबा

हो बाबा...

संध्याकाळी पूनम ऑफिसमध्ये आली, अविनाश विकी काम करत होते,

आकाश सर ऑफिसमध्ये नाही, अदिती नाही, काय झालं आहे काही माहिती नाही, बरेच मुले एकमेकांशी बोलत होते

पुनम अविनाश आकाशने दिलेल्या पत्त्यावर आले, दोघ येऊन बसले, आकाश समोर बसला होता, अदिती चहा करत होती

" कोणाचं घर आहे हे?",.. पुनम विचारत होती

अदिती रहाते इथे, अदिती चहा घेऊन आली, तिने सगळ्यांना चहा दिला, तिचा चेहरा उतरलेला होता, बहुतेक रडली असेल ती, ती आकाश जवळ बसली होती

"अदिती आकाश काय म्हणण आहे तुमच?",.. पूनम

"आम्हाला सोबत रहायच आहे लग्न करायच आहे",.. आकाश

" खूप आनंदाची गोष्ट आहे ही, का एवढे शांत बसले तुम्ही? आम्ही दोघ आहोत सोबत",.. पूनम

"दीदी पण लग्न करण म्हणजे मोठी जबाबदारी त्यात मला असा जॉब नाही काही नाही, काय करणार आम्ही दोघ? ",.. आकाश

" आम्ही आहोत ना, तू कशाला काळजी करतोस, मी बोलू का पप्पांशी? ",.. पूनम

" हो बोलून बघ, घरात ऑफिस मधे वापस नाही घेतल तरी चालेल पण राग सोडा म्हणा ",.. आकाश

" आता पुढे काय ठरवल तुम्ही? ",.. पूनम

" काहीच माहिती नाही ",.. आकाश

" अदिती तू घरी सांगितल का? ",.. पूनम

" हो आमच्या घरी काही प्रॉब्लेम नाही, आज ही बोलली मी बाबांशी ते म्हणता आहेत घरी निघून या, आकाश आपण जावु या का माझ्या घरी ",. अदिती

" हो जावू या, ठरवू आपण तू काळजी करू नकोस अदिती",.. आकाश

" लग्न करून घ्या आधी, तुझे आई बाबा काय म्हणतात तस ठरवु",.. आकाश अदिती लाजले होते, अविनाश हसत होते

" कधी पासून सोबत आहात तुम्ही दोघ? , सांगितल नाही आम्हाला काही ",.. पूनम

" मी सांगणार होतो घरी दीदी, तेवढ्यात त्या निशांत ने गोंधळ घातला ",.. आकाश

" खूप छान आहे अदिती, मी खुश आहे, कॉलेज पासून सोबत आहात का तुम्ही? ",.. पूनम

"नाही आता च ठरलं आमच",.. आकाश

"अदिती काय झालं एकदम गप्प ",.. पूनम

" तिचा जॉब गेला तर रडते आहे ती सकाळ पासून",.. आकाश

"जावू दे गेला तर जॉब आकाश सारखा छान नवरा मिळाला तुला",.. पूनम

आता अदिती ही हसत होती.

" तुम्ही जेवून जा जिजु दीदी ",.. आकाश

" तुला येतो अदिती स्वयंपाक? ",.. पूनम

" हो थोडा थोडा येतो, भाजी पोळी करू का की खिचडी? ",.. अदिती

" खिचडी कर गरम छान लागते",.. पूनम

" मी करु का मदत अदिती? ",.. पूनम अदिती आत गेल्या, अविनाश गप्प बसले होते,.. राहुल सर चिडले का खूप ?

" हो जिजु पप्पा माझ्या वर चिडले आहेत , खूप बोलले मला पप्पा",.. आकाश

"त्यांना आमच्या लग्नाची आठवण आली असेल ",.. अविनाश

"नाही तुमचा विषय नाही निघाला ",.. आकाश मुद्दाम खोट बोलला

" अस शक्य नाही, आमच्या वरचा राग अजून गेला नाही त्यांचा ",.. अविनाश

"जीजू पप्पांना अदिती आवडत नाही, खूप बोलले कि ती पैशासाठी माझ्या मागे आहे आणि जर आता मला नोकरी नाही तर ती मला सोडून जाईल आणि त्यांना अजिबात मान्य नाही सामान्य घरातली अदिती",.. आकाश हळूच सांगत होता

अविनाश सरांच्या चेहर्‍यावर दुःख होत.. " जसं त्यांना मी आवडत नाही तसंच अदितीचं होईल",..

"आता नाही मी अजिबातच तुम्हाला दोघांना त्रास होऊ देणार नाही ",.. आकाश

आकाशच्या फोनवर मोना मॅडमचा फोन येत होता,.." कुठे आहेस आकाश तू? ",

" मी इकडे आपला फ्लॅट आहे ना त्याच बिल्डिंग मध्ये आहे",.. आकाश

"तुझं लोकेशन पाठव मी येते",.. मोना मॅडम

आकाश खाली जाऊन मोना मॅडमला घेऊन आला, त्या आत येऊन बसल्या,

अदिती पुनम किचन मधुन बाहेर आल्या, पुनम येऊन भेटली, अदिती घाबरून लांब उभी होती

"इकडे ये अदिती, घाबरून जाऊ नको, माझा मला काही प्रॉब्लेम नाही तुमच्या लग्नाचा, छान आहे अदिती, चांगला आहे तुमचा जोडा, सुखाने राहाल तुम्ही एकमेका सोबत",..मोना मॅडम

"काही बोलले का नंतर पप्पा?",.. आकाश

"नाही राहुल चिडचिड करत होता उगाच, काही गरज नव्हती एवढं घरा बाहेर वगैरे काढायची",..मोना मॅडम

" आता काय ठरवलं आहे तुम्ही पुढे? ",..

" माहिती नाही आता तरी मी आधी अदितीच्या सोबत तिच्या घरी जाणार आहे, मग लग्नाचं काहीतरी ठरवून घेऊ तिचे आई वडील म्हणतात त्याप्रमाणे आता लग्न करून घेणार आहोत आम्ही, तुम्ही बोलून बघितलं का पप्पांशी",.. आकाश

" हो मी बोलली त्यांना काही ऐकायचं नाही, खूप रागात आहे राहुल",.. मोना मॅडम

"स्टेटस पैसा कधीपासून त्यांना एवढा मोठा वाटायला लागलं त्यांना, का असं करत आहेत पप्पा",.. आकाश

"माहिती नाही कदाचित तू स्वतः सांगितलं नाही आकाश अदिती बद्दल, बाहेरून कळलं म्हणून तर राग आला नसेल राहुलला",.. मोना

"काय करू मग मी बोलून बघू का? माफी मागू का त्यांची? , मी सांगणारच होतो घरी पण त्या निशांत आधीच फोटो काढून सगळीकडे पाठवून दिले, आमचं एवढ्याच सांगायचं ठरलं नव्हतं, थोडे दिवसांनी मी सांगणार होतो, जरा गडबड झाली आहे निशांतने मुद्दामून केल आहे हे, त्याला वाटलं की मला पप्पा घराबाहेर काढतील मग ऑर्डरचा प्रॉब्लेम येईल, सेकंड लॉट जाणं महत्त्वाचं आहे जीजू",.. आकाश

" हो बरोबर आहे हाच प्लॅन आहे त्याचा, पण राहुलने तरी कशाला डोक्यात राग घालून घ्यावा, मुलांचे लग्न कधी ना कधी तर होणारच आहे आणि कसली कमी आहे आपल्याकडे राहतील सगळे आनंदात",.. मोना मॅडम

बराच वेळ सगळे बोलत होते मोना मॅडमने आकाशला एक बॅग दिली

" काय आहे यात?",.. आकाश

" असू दे तुला कामा येतील, अदिती आहे सोबत ",.. मोना मॅडम

बॅगमध्ये भरपूर पैसे होते

" एक मिनिट मम्मी, थॅंक्स... आकाश

"आकाश ठीक आहे मी तुम्हा मुलांना एकट सोडणार नाही ",.. मोना मॅडम

"तुम्ही मला माफ करा मम्मी, मी नेहमी तुमच्याबद्दल गैरसमज करून घेतला होता, मला वाटायचं की तुमच आमच्यावर अजिबात प्रेम नाही, मी नेहमी फटकून वागलो तुमच्याशी",.. आकाश

" काही हरकत नाही आकाश तुम्ही मुलं मोठे असताना मी राहुलच्या आयुष्यात आली तसं वाटणारच तुम्हाला, पण मला नेहमी तुमच्या सगळ्यांविषयी प्रेमच वाटतं आणि अजून काही हव असेल तर केव्हाही फोन कर ",.. मोना मॅडम

अदिती ने पुढे येऊन त्यांना जेवायला थांबायचा आग्रह केला, जेवून जा ना आकाशही आग्रह करत होता, त्यांनी थोडं खाल्लं, बाकीचे सगळे जेवत होते, तुम्ही बसा सगळे आरामात मी निघते,

अदिती पुढे आली,..

" छान रहा ग टेन्शन घेऊ नका अदिती आकाश, तुमच्या लग्नाचं काही ठरलं तर मला सांगा, मी येईल",.. मोना मॅडम

"ठीक आहे ",..

मोना मॅडम गेल्या

"छान वाटतं आहे ना आज मम्मीला भेटून",.. आकाश

"हो माझं आणि त्यांचं तर पटत पूर्वीपासून",.. पूनम

अदिती सगळ्यां मधे खूप गप्प होती, ऐकत होती ती काय काय सुरू आहे, डेंजर आहे यांच्या घरचे, आपल्याकडे तर काहीच प्रॉब्लेम नाही, अस छोटसं छान सुटसुटीत घर आहे, आई बाबा मी आणि अमित, आई-बाबा खूप प्रेम करतात आमच्यावर आणि आम्ही ते जे सांगतील ते सगळं ऐकतो, खरंतर मध्यमवर्गीय घरात काही प्रॉब्लेम नसतोच, आपण इथे यांच्याकडे असंच सगळं व्यवस्थित करू, पण सगळे खूपच चिडके आहे त्यांच्याकडे,

"चल आकाश चलतो का घरी",.. पूनम

"नाही मी नाही येणार उगाच पप्पांना समजलं तर प्रॉब्लेम येईल",.. आकाश

"मग कुठे राहतो आहेस तू?, इथे आदिती जवळच का?",.. पूनम

हो..

" आम्ही निघतो आता तुमच्या दोघांचं लग्नाचं काय ठरतं आहे ते सांगा आणि कुठल्याही गोष्टीशी काळजी करू नका",.. पूनम

"मी तुला फोन करेल आकाश ऑर्डरच्या कामासाठी",.. अविनाश

" ठीक आहे जीजू, दीदी माझे कपडे पाठवून दे उद्या",.. आकाश

हो

ते दोघं गेले हे घरी अदिती अजूनही शांत बसूनच होती

" काय झालं आहे अदिती? तू खूपच गप्प आहे",.. आकाश

" मी जाऊन झोपते आकाश ",.. अदिती

" काळजी करू नको होईल सगळं ठीक",.. आकाश

अदिती आत मध्ये गेली, आकाश बाहेरच बसून काम करत होता, तो विकीला सगळी माहिती देत होता ऑर्डर बद्दल, दुपारी झोपल्यामुळे त्याला झोप येत नव्हती, काम करून झालं, तो अदितीचा विचार करत होता, अदितीने खूपच टेन्शन घेतलं आहे,

तो तिच्या रूममध्ये गेला, अदिती शांत झोपलेली होती, छान दिसते ही अशी झोपलेली, उगीच टेन्शन घेते ही, आकाश तिच्याजवळ बसला, आधी अस कधीच त्याने अदितीला जवळून बघितलं नव्हतं, तिच्या डोक्यावरून हात फिरवला, एवढ्या लहान वयात खूप टेन्शन आहे हिला, नेहमी पैशाची चिंता असते , खूपच काम केलं आहे अदितीने, घरच्यांना नीट सांभाळल आहे, मध्येच अमितचा एक्सीडेंट झाला, तेव्हाही पैशाचं चिंता होती, मला होकार दिला तिने त्या टेन्शनमध्ये, आता थोडं चांगलं होत होतं तर पप्पांच्या मुळे अजून डिस्टर्ब झाली ही, काळजी करते ही खूप, टेंशन घेते, गोड दिसते पण अशी झोपलेली,

काय करावं? मी हिला रिलॅक्स ठेवणार आहे, करू होईल काहीतरी, आता तर पैशाचाही प्रॉब्लेम नाही, मम्मी पूनम दीदी अविनाश जीजू मदत करायला तयार आहेत, मी पण बघतो काही करता येईल का? जॉब नाही तर स्वतःचा बिजनेस, छोट्यातून सुरुवात करावी लागेल पण मी हार मानणार नाही, अदिती तू काळजी करू नको, आपण खूप सुखात राहु,

खूप सुंदर आहे ही, आकाश तिच्या कडे बघत बसला, नको इथे थांबायला आपल्या रूम मध्ये जावू, ही बायको आहे माझी, जवळ गेलो तरी काही म्हणणार नाही ती, नको पण.. थोडे दिवस अजून, तो रूम मध्ये आला.

🎭 Series Post

View all