प्रेम पंख ❤️... भाग 28

अशा प्रकारेच आपल्याला पुढची सगळी ऑर्डर कम्प्लीट करायची आहे, पुढच्या लॉटची सबमिशन डेट लवकरच मिळेल तरी आपल्याला काम सुरू ठेवायला पाहिजेप्रेम पंख ❤️... भाग 28

©️®️शिल्पा सुतार
........

रविवार पूर्ण घर आवरण्यात गेला

आकाश उशिरा उठला, अदितीने त्याला दोन तीनदा आवाज दिला ,..

"अदिती मला घरी जाव लागेल आजीचा सकाळपासून दोन-तीनदा फोन येऊन गेला",.. आकाश

अदिती त्याच्या कडे बघत होती... "ठिक आहे जा तू आकाश, मी काय करू इथे पूर्ण दिवस?",

"तू चलतेस का घरी?",.. आकाश

"नाही मी थांबते इकडे, सारख नको मी तिकडे यायला,",.. अदिती

"ठीक आहे मी जमलो तर येतो संध्याकाळी, उद्या नाही तरी ऑर्डर सबमिट करायची आहे तर सकाळी लवकरच जावं लागेल, थोडं काम आहे असं सांगून निघतो ",.. आकाश

" आकाश मी आज आईला सगळं सांगणार आहे, मला नाही आवडत अस त्यांच्या पासून लपून ठेवायला ",... अदिती

" चालेल ना",.. आकाश

"असं सांगते की आपण दोघांनी एकमेकाला पसंत केल आहे, सांगणार नाही की रजिस्टर लग्न झालं आहे",..अदिती

" चालेल काही हरकत नाही सांगून दे तुझ्या घरच्यांना, त्यांना भेटायला यायचं असेल तर मी तयार आहे",.. आकाश

आकाश घरी गेला, खूपच एकटं वाटत होतं एवढ्या मोठ्या घरात अदितीला, तिने पूर्ण घर फिरून बघितलं, छानच होतं घर आजूबाजूचा परिसर

फोन करावा लागेल घरी, तिने फोन लावला,

"\"बोल ग अदिती काय करते आहेस? काय सांगणार होतीस तू मला?",.. आई

"बाबा आणि अमित कुठे आहेत",.. अदिती

" बाबा दुकानात गेले आहेत आणि अमित अभ्यास करतो आहे, काय झालं आहे तुला त्यांना काही सांगायचं नाही का? ",.. आई

" असं नाही आई, त्यांना सांगायचं आहे पण मलाच माझं समजत नाही काय करू म्हणून मी मला वाटल आधी तुझ्याशी बोलाव ",.. आई

" बरं काय झालं? ते तरी सांग",.. आई

" आई आमच्या ऑफिसमधले आकाश आणि मी आम्ही एकमेकांना पसंत केलं आहे, आम्हाला लग्न करायचं आहे",.. अदिती एका दमात बोलली

" हे तेच सर आहेत ना ज्यांनी आपल्याला मदत केली आता, तुझे बॉस ",.. आई

" हो आकाश पहिल्यापासून माझ्यासोबत होता कॉलेजमध्ये आणि आता त्यांच्या ऑफिसमध्ये मी काम करत आहे, त्यांना पूर्वीपासून माझ्यासोबत राहायचं होतं आणि आता मलाही ते पसंत आहेत",.. अदिती

" ते लोक खूप श्रीमंत आहेत ना, त्यांच्या घरच्यांना चालणार आहे का आपण असं मध्यमवर्गीय लोक",.. आई

" त्यांच्या घरच्यांचं माहिती नाही काही, पण आकाशला काही प्रॉब्लेम नाही उलट मी नाहीच म्हणत होती त्याला, त्यानेच माझ्याशी ओळख वाढवली, काय करूया आता?,.. अदिती

"तु आधी हे सगळं तुझ्या बाबांना सांग, आकाशला सांग की त्यांच्या घरी त्यांनी सगळं सांगावं आणि मग आपण दोघी बाजूने तुमचं लग्न ठरवून घेऊ",.. आई

" चालेल आई तुला काही प्रॉब्लेम नाही ना",.. अदिती

"नाही ग मला कशाला असेल काही प्रॉब्लेम",.. आई

अदितीच्या मनावरचं बरंच मोठं ओझ हलकं झालं होतं

" कधी ठरलं तुमच्या दोघांचं",.. आई

" आत्ताच गावाला आली मी त्याच्या आधी",.. अदिती

" काही हरकत नाही, काळजी करत बसू नको आपल्या घरी चांगलं वातावरण आहे, तुला माहिती आहे प्रश्न आपल्या घरून नाहीच आहे, त्यांच्याच घरून येऊ शकतो",.. आई

"हो आई बरोबर आहे ते लोक श्रीमंत, माहिती नाही आता काय होईल",.. अदिती

" आकाश आणि तू ठाम असतिल तर काळजी करण्यासारखं काही कारण नाही",.. आई

" हो बाबा आले की त्यांना फोन करायला सांग, बोलते मी त्यांच्याशी ",... अदिती

ठीक आहे..

अदितीने आकाशला फोन केला,.." मी घरी सगळं सांगितलं आहे आईला की आपण दोघांनी एकमेकांना पसंत केलं आहे",..

"हो का पसंत केल का आपण? मला तर नाही सांगितल तू अजून काही अदिती, आता पहिल्यांदा ऐकतो आहे मी हे, मीच पसंत केल तुला, तू काही बोलत नाही ",.. आकाश

" आकाश प्लीज थांब ना ",.. अदिती खूप हसत होती

" बर सांग काय बोलण झाल",.. आकाश

"की आपल्याला लग्न करायच आहे, दुपारी मी बाबांशी बोलणार आहे",.. अदिती

" चला चांगलं झालं, म्हणजे तुझा होकार आहे तर, नीट बोलून घे घरच्यांशी , आमच्याकडे कधी सांगूया",.. आकाश

"मला भिती वाटते राहुल सरांची",.. अदिती

"हो ना.. हे जरा ऑर्डर्स काम होऊ दे मग मी पण विचार करतो",.. आकाश

ठीक आहे

"काय म्हटल्या काकू? ",.. आकाश

"आई म्हटली की दोघी घरी तुम्ही सांगा मग लग्न ठरवून घेऊ",.. अदिती

" चला ठीक आहे, नाहीतर आपल्याला वैदिक पद्धतीने लग्न करायचं होतं",.. आकाश

दुपारी बाबांचा फोन आला, बहुतेक त्यांना आईने सगळं सांगितलेलं होतं,.. "काय म्हणणं आहे तुझं बेटा? ",

" बाबा आमच्या ऑफिस मधले आकाश आणि मला लग्न करायचं आहे",.. अदिती

" काही हरकत नाही बेटा पण ते खूपच श्रीमंत अन आपण गरीब आहोत प्रॉब्लेम तर येणार नाही ना काही? ",..बाबा

" त्यांच्याकडूनच मागणी आली आहे बाबा, आकाशनेच मला लग्नासाठी विचारलं आणि मला कॉलेज पासूनच आकाश आवडतो, मी पण होकार दिला आहे",.. अदिती

" काही हरकत नाही तू विचार केला असशील तर योग्य केला असशील, आम्हाला दोघांना तुझं चांगलं व्हावं एवढीच इच्छा आहे",.. बाबा

" बाबा पण माहिती नाही आता त्यांच्या घरचे कसे रिऍक्ट होतील ",.. अदिती

" काळजी करू नको होईल सगळं चांगलं, बोलतील थोडाफार ऐकून घ्यायचं",.. बाबा

" तुम्ही आणि आई नाही बोलले मला काही",.. अदिती

" आमचा विश्वास आहे तुझ्यावर, तुझ्या हातून नेहमी चांगलेच काम होतं आमची काही हरकत नाही",.. बाबा

" बाबा मी खूप खुश आहे, बाबा मला माफ करा मी आईला आधी सांगितलं मला माहिती होतं तुमच्या बाजूने काही प्रॉब्लेम नसेल, तरी मला आईशी आधी बोलायचं होतं",.. अदिती

" काही हरकत नाही बेटा काळजी करू नकोस, आकाश त्यांच्या घरी बोलल्यानंतर सांग मग पुढे काय करायचं ते आपण ठरवू",.. बाबा

" हो बाबा",.. अदितीला बाबांशी बोलून छान वाटत होतं

संध्याकाळी उशिरा आकाश वापस आला, अदिती खुश होती, आता बर वाटतय हा आला तर...

" कसं काय सोडलं तुला घरच्यांनी? ",.. अदिती

" सोडल म्हणजे? बायको साठी आलो कसातरी मी, काय करणार बायको एवढ लग्नाच ठरवते आहे, आलो पटकन ",..आकाश

पुरे.... अदिती हसत होती, आकाश तिच्या कडे बघत होता,

" मित्रांकडे पार्टी आहे त्यानंतर मी फ्लॅटवरच राहणार आहे असं सांगून निघालो",.. आकाश

"तू आज घरी नव्हता तर मला खूप कंटाळा आला",.. अदिती

" मला पण तुझी आठवण येत होती",.. आकाश

दोघ बराच वेळ बोलत होते,

"सांग ना अदिती आपण एकमेकांना पसंत केल म्हणजे? ",.. आकाश

अदिती लाजली होती,

" तुला काही बोलायच आहे का माझ्याशी अदिती?, फोन वर छान मोकळ बोलते तू , समोर काय होत? ",.. आकाश

आकाश...

"ठीक आहे, अजून किती वाट बघावी लागणार होकार साठी काय माहिती?,.. जेवायला काय आहे अदिती",.. आकाश

" काही विशेष नाही, तू नव्हता तर मी काही केल नाही थांब मॅगी करते",.. अदिती

" तू जेवणार नव्हती का? ",.. आकाश

" नाही कंटाळा आला होता ",. अदिती

याला काय अर्थ आहे, आकाशने बाहेरून जेवण मागवल, अदितीने ताट घेतले, दोघांचं जेवण झालं, नंतर आकाश पिक्चर बघत होता,

"तुला आवडतात का पिक्चर आकाश? ",.. अदिती

" हो बऱ्याच वेळा बघतो मी, तू अदिती?",.. आकाश

"नाही विशेष आवड नाही, कधी बघितलाच नाही आरामात बसून टीव्ही",.. अदिती

"ये मग आता बघ जरा वेळ",. आकाश

आदिती बसली, तिला करमत नव्हतं, पिक्चरही बोर होता, झोप येत होती,

"मी जाते झोपते",.. अदिती

"ठीक आहे ",.. आकाश

अदितीने झोपून घेतलं, सकाळी अदिती उठली, बेल वाजत होती, तिने दार उघडल, बाई आल्या होत्या कामाला,

" तुम्हाला सांगितल का कामाच? ",.. अदिती

हो..

त्या कामाला लागल्या,.. भाज्या आहेत ना सगळ्या? ताई काय भाजी करू?

अदितीने सांगितलं... बरं झालं पण या बाई आल्या, मलाही अजून विशेष स्वयंपाक येत नाही, उशीर लागतो खूप कामाला, अदिती सोफ्यावर बसली होती, ती वाकून बघत होती आकाश उठला नाही वाटत अजून, ती फ्रेश होवुन आली, त्या ताईंचा स्वयंपाक झाला होता, चहा नाश्ता रेडी होता, त्या गेल्या, अदिती आकाशच्या रूम जवळ जावून आवाज देत होती.. आकाश... आकाश उठ, तो उठत नव्हता, काय करू आत जावू का?.. नको, आकाश उशीर होतो आहे, आठ वाजले, ती आत गेली आकाश झोपलेला होता, आकाश.... तो दचकला,... काय झालं अदिती?

बाहेर ये,

का पण?

"ऑफिसला जायचं आहे ना?",.. अदिती

"हो वेळ आहे ना, येतो पाच मिनिटात, झोपू दे" ,.. आकाश

"नाही आता उठ मला उशीर होतो आहे",... अदितीला आकाश खूप इनोसंट वाटत होता, तो आवरून बाहेर आला, अदितीने त्याला चहा नाश्ता दिला,

"आल्या होत्या का बाई स्वयंपाकाला?",.. आकाश

हो.. आटोप आकाश

"काय घाई आहे अदिती? , तुझा बॉस अजून इथे बसला आहे, काळजी करू नकोस",.. आकाश

"माझा बॉस घरी वेगळा वागतो, ऑफिस मध्ये स्ट्रिक्ट आहे, मला पंचिंग असत बाबा, रीपोर्ट मेन ऑफिसला जातो, तिथून पेमेंट होतात आमच, तुझ बर आहे",.. अदिती

"काय बर आहे?",.. आकाश

तू ओनर..

"मग तू पण आहे की आता ओनर",.. आकाश अदिती कडे हसून बघत होता

"आकाश वेळ आहे त्या गोष्टीला, अजून घरी सांगितलं नाही तू, आटोप पटापट खा, मी डबे भरते",..अदिती

" अदिती तू घरात वेगळी वाटते आहे",...आकाश

अदिती किचन आवरत होती,.." तू का करते आहेस साफसफाई?",

"त्या ताई उद्या पासून करणार आहेत, लवकर येतील त्या उद्या, तू आजच्या दिवस तुझी रूम आवरून घे",.. अदिती

" स्वच्छच आहे माझी रूम",.. आकाश

अदितीला हसू आलं, सगळे बॉईज सारखेच आहेत, अमित ही असाच करतो,

आकाश अदिती निघाले,.. "अदिती एक सांग तुला घरी काही पैसे पाठवायचे आहेत का? ",

" नाही आकाश, या महिन्यात नाही ",.. अदिती

" तू एवढ पेमेंटच टेंशन का घेते? ",.. आकाश

" आकाश त्या पेमेंट मध्ये मला इथे राहायच असत, त्यात घरी मदत करायची असते, त्यात अमितच कॉलेज, त्यात सेविंग हव थोड",.. अदिती

" तुला पैसे हवे का अदिती ?",.. आकाश

" आधीच तुझे खूप पैसे माझ्या कडे आहेत, ते परत घे, आता ते ट्रेकिंग वाले देतील पैसे, वापस घ्यावे लागतील तुला, माझे बाबा सारखे बोलत आहे की ऑफिसमध्ये पैसे भरून टाक, मला त्यांचं ऐकावं लागेल",.. अदिती

" थोडे पैसे राहू दे त्यांना अमितच्या ट्रीटमेंट साठी लागतील",.. आकाश

हो..

" बाकीचे सेविंग अकाउंट मध्ये टाक ते पैसे तुझ्या घरी पैसे पाठवत जा त्यातून",.. आकाश

अदिती आकाश कडे बघत होती, चांगला आहे हा, प्रत्येक गोष्टीचा उत्तर असतं याच्याकडे.

आकाश अदिती ऑफिस मध्ये आले, विशेष कोणी आलं नव्हतं

" बघितलं का आदिती अजून कोणी आलं नाही, तू एवढी घाई करते, झोपू दिल नाही ",.. आकाश

अदिती हसत होती, आम्ही अस येतो रोज लवकर, किती घाबरून काम करतो , ती आत जाऊन बसली, तिने कामाला सुरुवात केली,
आकाश शॉप फ्लोअर वर काहीतरी करत होता,

"आज लवकर आला का आकाश?",.. अविनाश

हो जीजू...

ऑर्डर रेडी होती, बाहेर गाडी आलेली होती त्यात सगळे लिस्ट प्रमाणे व्यवस्थित सामान भरण सुरू होत, आकाश लक्ष देत होता,

" आपण दोघे जावू या जीजू गाडी सोबत ",.. आकाश

"हो पण आत्ता नाही संध्याकाळी सबमिट करायची आहे ऑर्डर",.. अविनाश

लंच टाईम मध्ये अविनाश सरांनी घरून डबा आणला होता, त्यामुळे आता आकाशकडे दोन दोन डबे झाले होते आणि अदिती कडे ही दोन डबे झाले होते, कारण पूनमने सुद्धा अदितीचा डबा दिला होता,

" काय करूया आता? ",.. आकाश

"असू दे मी आता हा एक डबा रात्री घरी खाईन ",.. अदिती

संध्याकाळ झाली अदिती घरी निघाली,.. "आकाश तू केव्हा येतो आहेस घरी? ",..

"मला उशीर होईल, आता ही ऑर्डर तिकडे पोहोचवायची आहे, मी करतो तुला फोन",.. आकाश

अदिती घरी निघून आली, तिला आज घरी यायला बराच वेळ झाला, कारण बस स्टॉप पासून तिला बरं चालावं लागलं, घरी आल्यावरही ती बराच वेळ नुसती बसून होती, काहीही करायचं नव्हतं, दुपारचा डबा होता जेवायला, कोणीही बोलायला नव्हतं, सोसायटीत लोक ओळखीचे नव्हते

अनू आली असेल का? फोन करून बघावा का? नको पण तिने परत इकडे यायचा आग्रह केला तर? एक एकच टेन्शन आहे, तेवढ्यात अनुचा फोन आला

"लागलं का ग तुझा सामान? कधी झाली शिफ्ट अदिती ",.. अनु

"शनिवारीच आली मी इकडे, तू जाऊन आली का घरी काय ठरलं",.. अदिती

"एका महिन्यानंतर लग्नाचा मुहूर्त आहे, मी सुट्टी घेणार आहे पंधरा दिवस",.. अनु खूप बोलत होती, खूप खुश होती ती, तिच्याशी बोलून अदितीला खूप छान वाटत होतं,

आता बराच वेळ झाला होता, आकाश अजूनही आला नव्हता, काय करू फोन करून बघू का? नको पण त्याच्यासोबत अविनाश सर असतील

आकाश अविनाश पहिला लाॅट घेऊन कंपनीत गेले, बराच वेळ गेला तिथे, रात्र झाली होती

" मी तिकडे फ्लॅटवर जातो",.. आकाश

"का रे आकाश? आता झाला आहे ना काम, घरी चल",.. आकाश अविनाश सरांसोबत घरी गेला, त्याला काही बोलता आलं नाही, त्याला अदितीची काळजी वाटत होती,

अदितीने जेवून घेतलं,

आकाशचा फोन आला,.. "मी इकडे घरी आलो आहे, अविनाश सरांसमोर मी काही बोलू शकलो नाही, मला असं वाटतं मी पण लवकर घरी सांगून द्यावं, हे असं मलाही आवडत नाही",..

अदिती काही बोलली, ती नाराज होती, जरा वेळ तिने टीव्ही बघितला, काय करणार आहे मी एकटी इकडे? तिने झोपून घेतलं, झोप येत नव्हती तिला

सकाळी त्या ताई कामाला आल्या, त्यांच्याकडून अदितीने थोडासा स्वयंपाक करून घेतला, बहुतेक मला इथे एकटीला राहायचं आहे, जाऊदे आता जास्त विचार करायचा नाही,

अदिती ऑफिसला आली, ती तिच्या कामात बिझी होती, जरा वेळाने आकाश अविनाश आले, आकाश तिच्याकडे बघत होता, अदिती कामात होती, आकाशला समजलं अदितीला राग आला आहे.

जरा वेळाने अविनाश सर आकाश दोघं बाहेर आले सगळ्यांना समोर बोलवलं, पूर्ण टीम जमा झाली, खूप छान काम करतो आहे आपण, काल पहिला लॉट सक्सेसफुली सबमिट केला,

सगळे टाळ्या वाजवत होते

" अशा प्रकारेच आपल्याला पुढची सगळी ऑर्डर कम्प्लीट करायची आहे, पुढच्या लॉटची सबमिशन डेट लवकरच मिळेल तरी आपल्याला काम सुरू ठेवायला पाहिजे",.. अविनाश

सगळ्या ऑफिसमध्ये एकच उत्साह होता, लंच ब्रेक मध्ये आकाश अदितीचा डबा घेऊन आला, अदिती तिचं काम करत होती,

"राग आला आहे का अदिती? ",.. आकाश

" नाही आकाश",.. अदिती

" हा घे तुझा डबा",.. आकाश

" नको आहे मला",.. अदिती

" काय झालं? ",.. आकाश

" कुठे काय? , मी आणला आहे माझ्या घरून डबा यापुढे माझा डबा आणू नको",.. अदिती रागात होती, आता का बोलतो हा माझ्याशी?

आकाश हसत होता, तुझ्या घरून म्हणजे अदिती? बाजूची खुर्ची ओढून तो अदिती जवळ बसला,

"आकाश इथे बसू नको, तुझ्या जागेवर जा, इथले सर डेंजर आहेत, मी जर कोणाशी बोलतांना दिसली तर ते चिडतात",.. अदिती

"बापरे असं आहे का? काही खर नाही माझ , हा डब्बा घे अदिती आणि माझ्याशी हसून बोल तरच मी जाईन इथून ",..आकाश

" मी घेणार नाही डबा",.. अदिती

"काय झालं कंटाळली आहेस का तू? ",.. आकाश

"नाही मला काम करू दे आकाश, उगाच माझं काम नाही झालं तर परत ओरडा बसेल",.. अदिती

" बापरे डेंजर दिसत आहे तुमचे साहेब, अदिती प्लीज राग सोड ना, चल माझ्या सोबत जेवायला, सांगू आपण अविनाश जिजुंना",.. आकाश

नको आकाश, तु जा,... अविनाश सर बोलवत होते, तिथेच डबा ठेवून आकाश आत मध्ये चालला गेला,

आज अदिती सोबत घरी जाऊ, चिडली आहे ती.

🎭 Series Post

View all