प्रेम पंख ❤️... भाग 27

आई बराच वेळ बोलत होती, सारखं अदितीला वाटत होतं की यांना आकाश बद्दल सांगून द्यावं, कसं सांगणार पण, तिला माहिती होत आपले आई बाबा समजून घेतील


प्रेम पंख ❤️... भाग 27

©️®️शिल्पा सुतार
........

संध्याकाळी अदिती रूम वर आली, आज अनु उशिरा येणार होती, भेटायला गेली होती ती सुहीतला, काय ठरवते ही काय माहिती? कधी येईल ही अनु?

अदिती खालून जेवून आली, तिने घरी फोन केला, ती बराच वेळ बाबा आई अमितशी बोलत होती

" बरं वाटतं आहे ना तुला अमित? ",.. अदिती

"हो ताई एकदम बरं वाटतं आहे",.. अमित

"वेळेवर गोळ्या औषध घेत रहा" ... अदिती

"ताई मी अभ्यास पण सुरू केला आहे, माझे मित्र मला सगळे नोट्स आणून देतात, 80% सिल्याबस मी कम्प्लीट केला आहे, अजून पुढच्या पंधरा दिवसात बराच अभ्यास होईल, परीक्षा द्यायला मी तयार आहे ",.. अमित

"खूप छान अमित तू मेहनती आहेस ",.. अदिती

बाबांनी फोन घेतला,.." अग पैशांचं काय करूया? ",..

" बाबा तुम्ही सध्या पैशाच टेन्शन घेऊ नका, तुमच्याजवळच राहू द्या, मी ऑफिसमध्ये विचारते आणि मग आपण ठरवू तोपर्यंत अमित साठी जर दवाखान्यात पैसे लागले तर त्यातूनच वापरा, उगाच विचार करत बसू नका",.. अदिती

" पण तुझ कर्ज कमी झाल तर बर होईल, दहा लाख आहेत ग, ऑफिस मधे भरून टाक पैसे ",. बाबा

" हो बाबा, मी सांगते",.. अदिती

आई बराच वेळ बोलत होती, सारखं अदितीला वाटत होतं की यांना आकाश बद्दल सांगून द्यावं, कसं सांगणार पण, तिला माहिती होत आपले आई बाबा समजून घेतील, काय करू?,.." आई मला तुला एक गोष्ट सांगायची आहे",

" बोल ना काय झालं अदिती? ",.. आई

"नंतर सांगेन पण मी जे सांगेल ते लगेच बाबांना सांगू नको",.. अदिती

"नाही सांगणार, काय झालं पण काही अडचण आहे का?",.. आई

"अडचण नाही ग काही, तू टेंशन घेऊ नको, मी करेन तुला नंतर फोन",.. अदिती

"ठीक आहे",.. आई

अदितीने फोन ठेवला खूप धडधड होत होती तिला, आई बाबांना सांगायच आहे मला सगळ.

" काय म्हणत होती अदिती? ",.. बाबा

अमित समोरच होता, नंतर सांगते,... आई बाबांकडे बघत होती.

जेवण झालं, अमित पुढे झोपला.

" काय ग काय म्हणत होती अदिती? ",.. बाबा

" ती म्हणत होती की तिला मला काहीतरी सांगायचं आहे, घाबरली होती ती जरा, काही प्रॉब्लेम असेल का हो? कोणाला पसंत केलं असेल का तिने, नक्की काय म्हणायच होत तिला? ",.. आई

"प्रॉब्लेम असता तर मला ही सांगितल असत तिने, म्हणजे तिने कोणाला तरी पसंत केल असेल, अस असेल तरी काही हरकत नाही, बघू तरी ती काय म्हणते आहे",.. बाबा

"तुम्हाला नाही सांगणार आहे ती फक्त मला सांगणार आहे",.. आई

"ठीक आहे काही हरकत नाही, नाहीतर मुलींना आई जवळची असते",... बाबा

" तिला असं वाटत असेल की बाबा काय म्हणतील म्हणून सांगत नसेल, पण माझ्यापेक्षा तुमचा स्वभाव जास्त चांगला आहे",.. आई

" असू दे ग लाजत असेल ती ",.. बाबा

"कोण असेल पण मुलगा? ",.. आई

" ते आता मला कसं माहिती असेल, कोणी ऑफिसचा किंवा कॉलेजचा असेल, बघू तरी ती नंतर काय सांगते ते",..बाबा

" मला टेन्शन आलं आहे ",.. आई

" यात टेन्शन घेण्यासारखं काही नाही, एक ना एक दिवस अदितीच लग्न होणारच आहे, उगाच एकटी राहण्यापेक्षा स्वतःच्या घरी राहिल",.. बाबा

हो बरोबर आहे
....

अनु आली, अदिती तिची वाट बघत होती... जेवून घे अनु

"मी डिनर करून आली",.. अनु

"काय ठरलं? कसे आहेत सुहीत? सांग अनु? ",.. अदिती घाई करत होती

हो ग थांब..

"एवढ दुपार ते रात्री पर्यंत कुठे फिरत होते तुम्ही?",. अदिती चिडवत होती

"अग आता चार वाजता भेटलो आम्ही, आणि आम्ही लग्न करायच ठरवल आहे",.. अनु

"अरे वा मजा आहे" ,.. अदिती

" आता रविवारी ठरवणार पुढचे कार्यक्रम डेट्स",.. अनु

" खूप छान अनु मी खुश आहे तुझ्या साठी, कसे आहेत सुहीत ",.. अदिती

" खूप चांगला आहे, समजूतदार आहे",.. अनु

" अरे वा म्हणजे खूप बोलण झालेल दिसतय तुमच ",.. अदिती

" चूप ग.... अनु लाजून बोलत होती... त्यांनी आधी एकदा दोनदा मला बघितला आहे एक-दोन लग्नात आणि इतर कार्यक्रमात ",.. अनु

" बापरे म्हणजे ते आधीपासून तुझ्या प्रेमात होते तर आणि आता मुद्दामून त्यांनी हे सगळं जुळवून आणलं तुझ्यासाठी ",.. अदिती

" हो असंच आहे पण मला नाही आठवत त्यांना बघितल्याच",.. अनु

" तुझं लक्ष असतं का कुठे अनु, छान झालं, खूप काळजी करणारा नवरा मिळाला तुला",.. अदिती

" तुमचं काय ठरतं आहे अदिती? आकाशने काही विचारलं की नाही तुला? कधी होकार देते आहे तू त्याला",.. अनु

अदिती काहीच म्हटली नाही, खोटं बोलण नको, नंतर सांगू हिला सावकाश, अनु केवळ आकाशच्या ऑफिस मध्ये काम करते म्हणून सांगता येत नाही, नाहीतर पहिल्यांदा हिला सांगितलं असत,

काय करू सांगून देऊ का माझ लग्न झालय ? नको पण गडबड व्हायची, सगळीकडे समजलं तर? थोडे दिवस आहे आता, सांगायचं आहे सगळ्यांना,

"हे बघ अदिती मला गिफ्ट मिळाल आहे",.. छान परफ्युम होत एका बॉक्समध्ये, कॅडबरी होती.

"अरे वा छान आहे ग सगळं",.. अनु तिला काढलेले फोटो दाखवत होती.

"मस्त अनु तू जाते आहे ना शनिवारी गावाला, मी पण दुसरीकडे राहायला जाईल तेव्हा , कारण तिकडचे हाऊस ओनर म्हणत आहेत की लवकर ताब्यात घ्या रूम नाही तर मिळणार नाही",.. अदिती

"चालेल काही हरकत नाही अदिती तु जा, एक बोलायच होत अदिती जर शक्य असेल तर आकाशला हो बोल, आधी पासून खूप प्रेम करतो तो तुझ्या वर",.. अनु

" आज एकदम आकाशची बाजू घेतेस तू ",.. अदिती

" माझ्या मैत्रिणीच चांगल होत असेल तर काय हरकत आहे",.. अनु

अदिती खुश होती

"म्हणजे आपण आता उद्याच्या दिवस सोबत आहोत, माझ्या पण लग्नाचं सांगता येत नाही, लवकर करणार आहोत आम्ही लग्न, आता केल नाही तर नंतर सहा महिन्यानंतरचा मुहूर्त आहे",.. अनु

" लवकर करून घ्या लग्न, मी तुझ्या साठी खुश आहे अनु ",.. अदिती

दोघी इमोशनल झाले होत्या, अदिती अनुच्या डोळ्यात पाणी होती

पुरे अनु मूड बदल... अदिती अनुला चिडवत होती,..." सुहितला घाई झालेली दिसते आहे",

" वेगळच आयुष्य सुरू झाला आहे ना आता आपलं ",.. अनु

हो ना...

" अनु मला तुला काही सांगायच आहे, आता नाही नंतर सांगेन मी तुला सगळं",. अदिती

" आकाशला होकार दिला ना तू खर सांग",.. अनु

"हो अनु पण अजून एक गोष्ट आहे, तू एवढच लक्षात ठेव की तुला माझ्याबद्दल काही समजलं तर गैरसमज करून घेऊ नको, मी सांगेन तुला नंतर सगळ",.. अदिती

" ठीक आहे तू तुझा वेळ घे अदिती तुला जेव्हा वाटेल तेव्हा आम्हाला सगळं सांग ",.. अनु

" ठीक आहे, खूप छान समजूतदार आहेस तू अनु खूप मिस करेन मी तुला ",.. अदिती

" मग आता काय मॅडम म्हणायच का आम्ही तुला? ",.. अनु

का?...

" आकाश साहेब तर तू मॅडम",.. अनु

"काहीही काय अनु, तुला काही सांगण गुन्हा आहे ",.. अदिती

" खरं आहे ते, सांग ना कस हो बोलली ते, काय म्हटला आकाश? , आनंदाने वेडा झाला असेल तो, काल त्यांच्या घरी गेली होती तेव्हा बोलली का तू आकाश सोबत?, काय सुरु आहे मॅडम? ",.. अनु

" अनु झोप आता",... अदिती

अनु खूप चिडवत होती

अदिती बाथरुम मधे निघून गेली, तिला खूप हसू येत होत

एक दोन दिवसात पहिली ऑर्डर जाणार होती, काम छान सुरु होत

शनिवारी ऑफिस झाल्यानंतर अनु गावाला निघून गेली, तोपर्यंत अदिती ऑफिसहुन आली नव्हती

" अदिती मी घरी निघते आहे",.. अनुने फोन केला, दोघी बर्‍याच वेळ बोलत होत्या, फोन ठेवल्यास अदितीच्या डोळ्यात पाणी होत, पटकन सावरल तिने, ती कामाला लागली.

चला बरं झालं अनु गेली गावाला, म्हणजे आता आपण आरामात आवरून निघू पी जी तुन, ती आकाशच्या केबिनमध्ये गेली,.. "आकाश मी आज सामान घेऊन शिफ्ट ठेवू का? तिकडची चावी कुठे आहे?",

"काय झालं अदिती? रडली का तू?",.. आकाश

" अनु नाही आहे, ती गेली गावाला तर मला रडू आल",.. अदिती

"बापरे किती तू इमोशनल, त्रास करून घेवू नकोस ",.. अनु

"अनु येण्या आधी मला येता येईल तिकडे नाहीतर तिने परत माझ्या रूमवर येण्याचा आग्रह केला तर मुश्किल होऊन जाईल",.. अदिती

"ठीक आहे तु जा पुढे पॅकिंग कर आणि तुझी पॅकिंग झाली की मला सांग मी येतो तुला घ्यायला, जास्त आहे का सामान?",.. आकाश

"नाही जास्त नाही पाच सहा बॅग असतील आणि थोडे इतर सामान",.. अदिती

"ठीक आहे तू तयार हो",.. आकाश

अदिती घरी गेली तिने सगळ पॅकिंग केलं, तिला खूपच इमोशनल वाटत होतं, जरा वेळाने तिने आकाशला फोन केला, आकाश अर्ध्या तासाने तिला घ्यायला आला, पी जी ऑफिस मधल्या फॉर्मॅलिटी पूर्ण करून अदिती आकाश सोबत निघाली,

दोघेजण फ्लॅटवर आले, सगळं सामान घेऊन वरती आले, खूपच सुंदर रंग दिला होता फ्लॅटला, खूप स्वच्छ छान वाटत होतं,

आकाशच्या त्या फ्लॅटच्या पेक्षा या फ्लॅटची डिझाईन थोडी वेगळी होती, दोन बाजूला दोन बेडरूम होते मध्ये हॉल किचन, बाल्कनी सुंदर घर होतं

अदितीला सुचतच नव्हतं काय करावं, ती सोफ्यावर बसलेली होती,

आकाश आवरत होता,

"अदिती ही या बाजूची बेड रूम तुझी चालेल ना",...

हो..

"ही या साईडची बेडरूम माझी",.. आकाश

"चल आत मी सामान आणून देतो",.. अदिती

आकाश सामान ठेवून गेला, अदिती काॅटवर बसुन होती, अजून कामाला सुरुवात केली नव्हती तिने ,

आकाश जरा वेळाने कॉफी घेवून आला, सामान तस होत, अदिती अजूनही बसलेली होती,.." काय झालं अदिती?",

"काही नाही आकाश, सुचत नाही मला काही",.. अदिती

" सामान लावून देवू का मी? तूला गिल्टी वाटत का?, अस आई बाबांना न सांगता तू माझ्या सोबत इकडे आली तर?
मोकळ सांग, रिलॅक्स रहा ग, काय करू या? तू कंफर्टेबल राहायला हव, नाही तर आता सांगते का तू तुझ्या घरी, जे होईल ते होईल, मी आहे डोन्ट वरी",.. आकाश समजवात होता

"नको आकाश मी सांगेन सावकाश ",.. अदिती

" मग काय करू या? , तुला आवडत नाही वाटत माझ्या सोबत अस इथे, एकदम वेगळीच गप्प झालीस तू ",.. आकाश

" नाही आकाश अस काही नाही, सॉरी मी आवरते, या पुढे नाही अस करणार मी ",.. अदिती उठली

इकडे ये अदिती, आकाशने तिला हलकी मिठी मारली,

रिलॅक्स होण्या ऐवजी अदिती अजून घाबरली होती, अदिती इट्स ओके, रिलॅक्स, अदिती आवरत होती, आकाश तिच्या कडे बघत होता, काही खरं नाही हीच, थोडा वेळ लागेल हिला, लांबून बोलू हिच्याशी, नाहीतर जायची परत पी जी त,... आकाश हसत होता.

" जेवायच काय आपल? ",.. आकाश

" मी करू का? ",.. अदिती

"तुला येतो का स्वयंपाक? ",.. आकाश

"नाही विशेष नाही, म्हणजे थोडा येतो पण तुला आवडेल की नाही माहिती नाही ",.. अदिती

"का नाही आवडणार, राहू दे पण, आज आरामात रहा",... आकाशला वाटल अदिती नर्व्हस आहे, उगीच आपल काम हिला नको.

"तुला येतो का स्वयंपाक आकाश?",.. अदिती

"नाही विशेष नाही",.. आकाश

"आता काय करू या?, मी करते खिचडी चालेल ना ",.. अदिती

" हो चल मी पण येतो मदतीला",.. आकाश

आकाशने फोन करून कुक आणि घर कामाला कोण आहे याची चौकशी केली, उद्या पासून त्या ताई येणार होत्या सकाळी

अदिती किचन मधे छान काम करत होती, येत तर खरी हिला सगळ, छान दिसते ही अशी काम करतांना

" आकाश तिखट किती हव?",.. अदिती

मीडियम..

स्वयंपाक झाला,.. चल आकाश, दोघ जेवायला बसले, छान चव आहे अदिती च्या हाताला,

दोघ गप्पा मारत होते, अदिती ठीक होती आता, छान वाटत आकाश सोबत, मित्र म्हणून खूप छान आहे हा, अदिती कडे बघून आकाशला रिलॅक्स वाटत होत

"तुझी रूम सेट केली का आकाश? ",.. अदिती

"माझ जास्त सामान नाही",.. आकाश

एक बॅग होती त्याची

" हो तुला तीन तीन घर",.. अदिती

अदिती इकडे ये, आकाशच्या रूम मध्ये अदिती गेली, खुर्ची वर बसली , आकाश काम करत होता.

"अदिती तू खूप छान स्वयंपाक करतेस, मग का बोलत होती काही येत नाही ते",.. आकाश

"कधीच स्वयंपाक केला नव्हता मी आकाश, म्हणून वाटल जमेल की नाही ",.. अदिती

"अनु सोबत राहायची तशी रहा इथे ही आरामात हे सगळ तुझ आणि माझ आहे टेंशन घेवू नकोस ",.. आकाश

"ठीक आहे, मी जाते,.. इथून कस जायच ऑफिसला मी",.. अदिती

"सोबत जावू या",.. आकाश

"पण तू उशिरा येतोस ऑफिस मधे, मला नऊ वाजेच्या आत ऑफिस मधे जाण कंपलसरी आहे, नाही तर माझा पेमेंट कट होईल, रोज आरामात नाही जाता येणार",.. अदिती

"उद्या मी पण येतो लवकर मग नंतर तू टॅक्सी ने जात जा ",.. आकाश

" ठीक आहे, उठ मग लवकर",.. अदिती

हो

अदिती तिच्या रूम मध्ये आली, ती सामान लावत होती, आवरून झाल, तिला झोप येत नव्हती, बोर होतय इथे, आकाश झोपला असेल का? , नको जायला तिकडे सारख,
अनु सोबत छान होत, झोप येत नसली की मी तिला त्रास द्यायची, उठ अनु बोल माझ्याशी, आकाश सोबत अस करता येणार नाही, त्याने थोड्या वेळा पूर्वी मला मिठी मारली, भीती वाटते मला त्याची , अस नको करायला, दार लावून घेवू का? , मला नाही वाटत तो येईल इकडे, त्याच्या वर अविश्वास दाखवल्या सारख होईल, आई बाबांना सांगायला हव लवकर, मला नाही आवडत अस, उद्या बोलते आईशी...

🎭 Series Post

View all