प्रेम पंख ❤️... भाग 25

आदिती बघत होती आकाश अविनाश घरात वेगळेच वाटत होते, एकदम रिलॅक्स, पूनम म्हणेल ते सगळं ते दोघेजण ऐकत होते,



प्रेम पंख ❤️... भाग 25

©️®️शिल्पा सुतार
........

अदिती रूम वर आली, अनु आलेली होती घरच्यांशी ती फोन वर बोलत होती, फोन झाला अजून बाल्कनीत होती ती

"काय ग अनु?, काय झालं?",.. अदिती

ती लाजलेली होती

"काय चाललय मॅडम?, गालावर का बर गुलाब फुललेले आहेत",.. अदिती

"अग आईचा फोन होता, पाहुणे येताय बघायला रविवारी, मला शनिवारी घरी जायच आहे",.. अनु

"अरे वा तरीच एवढी खुश आहे कोण आहे मुलगा?",.. अदिती

हे बघ..

"फोन वर मुलाची पूर्ण माहिती आलेली होती",.. अनु

"अनु मुलगा याच शहरात रहातो, सुहीत नाव छान आहे ग ",.. अदिती

" हो ना मला नौकरी सोडावी लागणार नाही, आणि तुला माहिती का दुपारी सुहीतचा फोन आला होता आम्ही उद्या भेटतो आहोत, लग्न ठरेल ना ग माझ? ",.. अनु

" नक्की ठरेल, खूप छान आहे स्थळ, हँडसम आहे मुलगा, तुला आवडला का?",.. अदिती

" हो आज फोन वर ही बोललो आम्ही",.. अनु

"प्रकरण बरच पुढे गेलेल दिसतय ",.. अदिती

दोघी खुश होत्या, अदिती अजून चौकशी करत होती, अनु खुश होती, एका गोष्टीच समाधान होत अनु एकटी रहाणार नाही, तीच ही लग्न होईल मी पण आकाश कडे जाईल रहायला, आकाशचा विचार करून अदिती लाजली होती, आज तो मला बायको म्हणाला, ओह माय गॉड खरच अस झालय

.....

ऑर्डर्स काम खूप जोरात सुरू होतं, पाहिजे तसं व्यवस्थित होत होतं, निशांत एका बाजूने सगळी चौकशी करत होता या कामाची, सगळच कसं व्यवस्थित होत आहे यांचं, अजिबातच काही प्रॉब्लेम नाही, त्याला वाटलं होतं निदान सॅम्पल तरी रिजेक्ट होईल, मग त्यांना नोटीस मिळेल, मग पहिला लॉटची ऑर्डर द्यायला त्यांना अडचणी येईल, पण असं काही झालं नाही, अगदीच पुढच्या दोन-तीन दिवसात पहिला लॉट कंपनीतुनं निघणार होता, सगळे दिवस रात्र मेहनत करत होते, खूप छान सुरु होत

निशांतने एक फोन केला,

ठीक आहे तुम्ही म्हणतात तसं करू आज.. समोरच्या लोकांनी सांगितल

रात्रीच ऑफिस मधे कोणी नव्हत , आता तिथे एक-दोन सेक्युरिटी गार्ड एक्स्ट्रा ठेवलेले होते, महत्वाच काम होत म्हणुन ही व्यवस्था होती, आकाश आणि अविनाशला घरी यायला रोजच उशीर होत होता, बऱ्याच वेळा आकाश फ्लॅटवर थांबत होता, अविनाश थोडं लवकर घरी जात होते, पुनम खूपच एकटी पडली होती म्हणून आकाशने त्यांना सांगितलं होतं आणि फ्लॅट मध्ये राहील तर आकाशला नंतर अदिती सोबतही राहता येणार होतं,

"काय झालं आहे आता हल्ली आकाश तिकडेच थांबतो फ्लॅट वर बर्‍याच वेळा ",.. पूनम

" हो खूपच काम आहे तो जर नाही थांबला तर मला थांबावं लागेल, तुझ्यासाठी लवकर येतो मी",.. अविनाश

" लवकर काय आता साडेनऊ झाले आहेत ",..पूनम

" आकाश रोज रात्री बारा पर्यंत असतो ऑफिस मधे",.. अविनाश

" बापरे काळजी घे म्हणा",.. पूनम

" मजा येते पण या ऑर्डरची, मस्त पूर्ण करणार आम्ही",..अविनाश

रात्री तीनच्या सुमारास सिक्युरिटी गार्डचा आकाशला फोन आला,.. "सर तुम्हाला येता येईल का इकडे पटकन, ऑफिसमध्ये चोरी झाली आहे",

"कशी काय? काय करत होते तुम्ही?, काय गेल चोरीला? ",.. आकाश

"आम्ही तर इथेच होतो गेटवर",.. सिक्युरिटी

"मग कशी काय चोरी झाली?",.. आकाश

" माहिती नाही आतून आवाज येत होता म्हणून जाऊन बघीतल एक सिक्युरिटी गार्ड बेशुद्ध होता जो आत बसतो तो",.. सिक्युरिटी

"ठीक आहे मी येतो लगेच, डॉक्टरांनी फोन करून बोलवुन घ्या ",.. आकाशने अविनाशला फोन केला सगळं सांगितलं

" काय काय चोरीला गेलं?, मी निघतो लगेच ",.. अविनाश ही लगेच निघाले, दोघे फॅक्टरीत आले, आकाशच्या केबिन मधलं कपाट उघडं होतं, त्यातले डिझाईनचे पेपर चोरीला गेले होते, इकडेही शॉप फ्लोर वर थोडे पार्ट आणि सॅम्पल सुद्धा चोरीला गेले होते,

"काय करावं आता दोन-तीन दिवसात ऑर्डर द्यायची आहे",.. आकाशला खूप टेन्शन आलं होतं,

"अजून काय काय चोरीला गेल" ,... अविनाश जीजू सगळीकडे फिरून बघत होते,

"जीजू बाकी काही नाही नवीन ऑर्डरच थोडं महत्त्वाचं सामान चोरीला गेल",.. आकाश

दोघांनी पोलीस कम्प्लेंट केली, सकाळी सांगू पप्पांना, तोपर्यंत राहुल सरांना समजलं, त्यांचा फोन आला,

"मागे कोणीतरी दगड फेकला होता त्याची पण चौकशी झाली नाही, आता ही चोरी झाली, ऑर्डर कम्प्लीट करायला किती अडचण येईल",..

" हो ना पप्पा मी आम्ही दोघे आहोत आता इथे लगेच लागतो कामाला",.. आकाश

ई-मेल मध्ये डिटेल्स होते, पेपर्स मिळतील, काही प्रॉब्लेम नव्हता पण सॅम्पल चोरीला गेल होत काय करावे विचार करत सकाळ झाली, सगळे ऑफिसला यायला लागले, आकाश अविनाशला एवढ्या लवकर ऑफिसमध्ये बघून सगळे आश्चर्यचकित झाले होते, त्यात आकाश टी-शर्ट आणि पॅन्ट मध्ये होता,

काय झालं आहे?.. सगळे विचारत होते,

रात्री चोरी झाली सगळीकडे पसरलं, सॅम्पल बनवण्यात जो एक्सपर्ट होता रोहित त्याला आकाश अविनाशने बोलवलं,.. लगेच तयार करता येईल का सॅम्पल? ,

"हो करता येईल ना, तीन-चार तास लागतील",.. रोहित

"चालेल मग लाग कामाला आम्ही पण आहोत तुझ्यासोबत",.. आकाश

"रात्रीच का नाही सांगितलं? मी आलो असतो तर आत्तापर्यंत काम झालं असतं, आता दोन दिवसात ऑर्डर द्यायचे आहे, मला पण टेन्शन आल आहे",.. रोहित

"करू आता दिवस रात्र काम, इथेच आहोत आपण",.. रोहित

रोहित कामाला लागला, त्याला काहीतरी थोड्या डिझाईन हव्या होत्या त्या आकाशने लॅपटॉप मधून त्याला दाखवल्या,

अदिती ऑफिस मध्ये आली, तिलाही चोरी झाली ते समजलं, ती लगेच शॉप फ्लोअर वर आली, आकाश तिथेच उभा होता, त्याला टी-शर्ट बघून तिला समजलं की हा रात्रभर इथेच आहे,

"आकाश काही खाल्लं की नाही सकाळपासून? जाऊन ये नाहीतर जरा वेळ घरी, मी आहे इथे ",.. अदिती

आकाश हसत होता,... "काळजी करू नकोस मी ठीक आहे, काम महत्वाच आहे, हा पहिला लॉट वेळेवर गेला पाहिजे तरच ठीक होईल, नाहीतर प्रॉब्लेम येईल",..

"ठीक आहे मी चहा नाश्ता बोलवते",.. अदिती

सगळे काम करत होते, मधेच इन्स्पेक्टर येऊन सगळी फॅक्टरी बघून गेले, जरा वेळाने राहुल सर आले जोरात काम सुरू होतं बघून त्यांना बरं वाटलं,.." मला असं वाटतं आहे हे काम निशांतच आहे",..

" हो ते तर समजलंच आहे आम्हाला, त्याच्याशिवाय कोणी एवढं खराब वागु शकत, सगळ्यात जास्त त्याला त्रास झाला आहे आपल्याला ऑर्डर मिळाली तर",.. आकाश

"काही मदत लागली तर सांगा",.. राहुल सर

"हो नक्की",.. आकाश

ते दोघ बोलत असतांना अदिती आत केबिन मधे आली, तिला माहिती नव्हत राहुल सर आले आहेत ते

सॉरी..

" बोला मिस अदिती काय काम होत ",.. राहुल सर

" काही नाही सर ते आकाश सर अविनाश सर यांच्या साठी ब्रेकफास्ट आला आहे ते सांगत होती",.. अदिती

ओके.. थँक्स

" चला पप्पा तुम्ही चहा घ्या",.. आकाश

"माझा झाला चहा नाश्ता, यू कॅरी ऑन मला खूप काम आहेत मी निघतो",.. राहुल सर

ते वापस केले, सगळ्यांसाठी चहा नाश्ता आला होता,

" चला आधी खाऊन घ्या मग कामाला लागा",.. अविनाश

अदिती काम करत होती, अदिती जवळ आकाश बसला होता,.." आकाश आत जा तुझ्या जागेवर, इथे नको बसू माझ्या जवळ ",

" बसू दे अदिती प्लीज ",.. आकाश

" कोणी बघेल",.. अदिती

बघु दे..

" आकाश मला राहुल सरांची खूप भीती वाटते आहे, काही वेगळं बोलली नाही ना मी त्यांच्या समोर ? ",. अदिती

"नाही अदिती, तू नाही सगळ्यांनाच त्यांची भीती वाटते मलाही भीती वाटते",.. आकाश

" अदिती घे तुझा नाश्ता",.. अविनाश

"मी खाऊन आली आहे मला नको नाश्ता सर ",.. अदिती

"गुपचूप खा",.. अविनाश आकाश आत मध्ये आले, त्यांचा चहा नाश्ता झाला,..

" हे काम चांगलच पुरणार आहे आपल्याला एक दोन दिवस, बरं झालं पण जास्तीचे पार्ट चोरले नाहीत",.. आकाश

"हो ना करू पण आपण, काळजी करू नको ",.. अविनाश

काम करत करत संध्याकाळ झाली होती, आदिती सुद्धा सगळ्यांसोबत काम करत होती, तिची खूप मदत होत होती,

" अदिती तू घरी जा ",.. आकाश

"नाही मी थांबते इथे मला पण मदत करायची आहे",.. अदिती

"अग पण आम्हाला पूर्ण रात्र होणार आहे",.. आकाश

"मी पण थांबणार इथेच माझी मदत नको आहे का तुम्हाला सगळ्यांना?, आकाश तू काय म्हटलं होतं ही आपली ऑर्डर आहे, मग मला पण काम करायचं आहे",.. अदिती

"ठीक आहे, अदिती अग पण तू काय करणार? उगीच दमशील",.. आकाश

" मी जाणार नाही घरी ",.. अदिती

आकाश जिथे जिथे जाईल तिकडे अदिती जात होती

" अदिती इकडे ये तू माझ्या मागे मागे का करते आहेस? ",.. आकाश

" अरे मी बघते तुला काही हव की नको ",.. अदिती

आकाश खुश होता,.." अविनाश सर बघतील, आत बस तू ",

" ठीक आहे मी ऑफिसच काम करते",.. अदिती

अदिती वरच काम करत होती, लॅपटॉप मधल डिझाईन देण, सगळं करेक्ट आहे की नाही बघण, किती पार्ट झाले किती नाही सगळं बघत होती, आता बराच वेळ झाला होता, अर्धे लोक घरी गेले होते, जेवण आल, सगळ्यांच जेवण झाल,

" चल आदिती मी तुला घरी सोडून येतो",.. आकाश

अदिती तयार होती, तेवढ्यात राहुल सरांचा फोन आला आकाश त्यांच्याशी डिटेल मध्ये बोलत होता, काय काय काम झालं काय काय नाही, अदिती तोपर्यंत अविनाश सर्वांना मदत करत होती

अदितीने अनुला सांगितलं तिला उशीर होईल ऑफिसमध्ये खूप काम आहे

" त्यांनी तुला संध्याकाळी सोडायला पाहिजे होत",.. अनु

"अगं ते म्हणत होते तु जा घरी, मीच थांबली",.. अदिती

"ओहो, आकाश ला सोडून यावास वाटत नव्हत का ",.. अनु

"अनु पुरे.... खूप काम आहे इकडे बाकी तर काम येत नाही पण कम्प्युटरची काम मी करते, परत ते काम उद्या सकाळ वर जातील, उशीर होईल ",..

" ठीक आहे रात्री येशील तर कोणा सोबत तरी ये नाहीतर सकाळी ये",.. अनु

ठीक आहे..

बरीच रात्र झाली होती तरीसुद्धा खूप काम बाकी होतं,

"आता उद्या करूया काम, चल अदिती मी तुला घरी सोडून देतो",.. आकाश

"त्या साईडला उलट जायला अर्धा तास लागेल, एवढ्या रात्री आकाश अदिती तुम्ही असे सोबत पी जी जवळ गेले तर वेगळ वाटेल, त्या पेक्षा अदिती तू आज आमच्या घरी चल, सकाळी यायच आहे ऑफिस मधे ",.. अविनाश सर आग्रह करत होते, त्यानिमित्ताने तुला पूनम दादी नानी यांना भेटता येईल

आकाशला आवडली ती आयडिया,.." चालते का घरी अदिती? ",..

चालेल... अदितीने अनुला मेसेज केला की ती आकाश कडे जाते आहे

कार मध्ये अविनाश सर अदितीला तिच्या घरच्यांबद्दल विचारत होते?.. "शाळा कॉलेज तुझं तिकडेच होतं का?",

"हो सर",.. अदिती

"एमबीए साठी इकडे आली होती मी",..

"आकाशच्या कॉलेजला ना",.. अविनाश

हो

"तुमची ओळख कशी झाली?",.. अविनाश

आकाश अदिती दोघ हसत होते,.. "ओळख अशी नाही पण ही रितीका सोबत होती म्हणून मी जायचो यांच्या क्लास मधे",

" हो आणि रितीका मुळे भांडण ही केल आम्ही खूप",.. अदिती

" बापरे इंटरेस्टिंग दिसते तुमची स्टोरी ",.. अविनाश

"आमची स्टोरी म्हणजे काय जिजु? ",.. आकाश

अदिती हसत होती

ते घरी आले, खूप छान मोठे घर होतं आकाशचं, गेटमधून गाडी आत आली, आत मधला लाईट चालू होता म्हणजे पूनम जागी होती अजून, आकाश अदिती अविनाश आत मध्ये आले,

"एवढा वेळ आज घरी यायला, मला वाटलं येता की नाही तुम्ही लोक?, काय झाल कंपनी मध्ये? का करतात लोक अशी चोरी, किती काम पडतय तुम्हाला आता",.. पूनम खूप बोलत होती

अविनाश आकाश सोबत अदिती होती

" कोण आहे ही, ये ग",.. पूनम

"ही अदिती आहे दीदी",.. आकाश

पूनम बघत होते, खूप सुंदर नाजूक होती अदिती, केस मोठे, बोलके डोळे, थोडी घाबरलेली होती ती, तिला वाटत होत राहुल सर असतिल घरी,

" तू खरच ऑफिस मधे काम करते का? किती छान आहे ही, लहान वाटते, बरं झालं तू आज इकडे आलीस",.. पूनम

"हो आणि हुशार आहे अदिती खूप कामात, ऑफिस मध्ये खूप काम होतं मग तिला घरी सोडण्यापेक्षा इकडे घेऊन आलो",.. अविनाश

"चांगलं केलं",.. पूनम

"अदिती ही आहे पूनम दीदी, माझी बहीण आणि अविनाश जिजूंची बायको ",.. आकाश

"कुठे राहतेस तू अदिती?",.. पूनम

" मेन ब्रांच जवळ एका पीजीत मॅडम ",.. अदिती

"मॅडम नको ग दीदी म्हण तू ही मला ",.. पूनम

ठीक आहे

"घरी कोण कोण आहे तुझ्या? ",.. पूनम

" मी माझे आई वडील आणि भाऊ ",.. अदिती

" त्याचा एक्सीडेंट झाला होता ना? कसा आहे तुझा भाऊ ?",.. पूनम

" आता अमित ठीक आहे, घरी सोडलं त्याला",... अदिती

" तुला बरच माहिती आहे पूनम ",.. अविनाश

" हो आकाशने सांगितल, तो तुझ्या बद्दल बोलत असतो घरात",..पूनम

दीदी काय? .... आकाश कडे सगळे बघत होते

" चला जेवायला बसा",.. पूनम

"आमच जेवण झाले आहे, ऑफिसमध्ये डिनर मागवलं होतं ",.. आकाश

"पुनम जेवली नसेल तू ",.. अविनाश

" का अशी करतेस दीदी? चला आम्ही पण खातो थोडं थोडं",.. आकाश

आदिती बघत होती आकाश अविनाश घरात वेगळेच वाटत होते, एकदम रिलॅक्स, पूनम म्हणेल ते सगळं ते दोघेजण ऐकत होते, जेवण झालं, अविनाश पूनम बोलत होते, आकाश अदिती सोफ्यावर येवून बसले,

" काय झालं अदिती एकदम गप्प झाली तू ",.. आकाश

" काही नाही.. सुचत नाही मला काही",.. अदिती

"टेंशन घेवु नको, कोणी काही बोलत नाही आमच्या कडे, खूप चांगले आहेत सगळे" ,.. आकाश

हो..

आराम कर आता अदिती,

दीदी आदितीला गेस्ट रूम दाखव,

" हो.. चला तुम्ही पण सगळ्यांनी झोपा खूप वेळ झाला आहे",.. पूनम

अदिती आकाश कडे बघत होती,.. गुड नाइट,

पुनम अदिती आत मध्ये गेल्या, आकाश तिथे उभा होता त्या दोघींकडे बघत , अविनाश त्याच्याकडे बघत होता,.. "आज आराम करायचा की नाही आकाश? ",

" हो मी जातो माझ्या रूममध्ये",.. आकाश आत मध्ये गेला, अविनाश हसत आत गेले.

🎭 Series Post

View all