प्रेम पंख ❤️... भाग 24

दोघं हसत होते,.. "म्हणून म्हणत होतो आम्ही तुला नको येऊ ऑफिसला, समजलं ना आता किती काम असतं, याला वाटलं असेल पिक्चर सारखं मस्त एसी ऑफिस असेल,



प्रेम पंख ❤️... भाग 24

©️®️शिल्पा सुतार
........

आकाश अविनाश घरी आले, आज नानी सुद्धा घरी आलेल्या होत्या, आकाश खूपच खुश होता, नानी खूप सामान घेऊन आल्या होत्या, सगळे खाऊ खात होते,

"लहानपणीची आठवण येते ना असा खाऊ दिसला तर",.. विकी

हो ना

" उद्या माझी परीक्षा संपणार आहे मी ऑफिसला येऊ का?",.. विकी

"ये ना काही हरकत नाही",..अविनाश

आकाशला विशेष आवडलं नाही,.. "विकी तू आधी पप्पांना भेट, ते तुला कुठलं काम देतात ते कर तू आणि कामाची एवढी घाई का करते आहेस तू ?, तुला अजून पोस्ट ग्रॅज्युएशन करायचा आहे ना?",

"हो पण सुट्टीत करू शकतो मी काम ",... विकी उत्साही होता, घरात सगळे ऑफिसला जात होते त्याला ही अस झाल होत कधी मी काम करू,

" ठीक आहे उद्या आमच्या सोबत ये, नंतर मेन ऑफिसला जा",. आकाश

अदिती ऑफिसमध्ये आली, काय करू आज बोलून बघू का आकाशशी?, खरंतर तिला आकाश सोबत राहण्यात काही प्रॉब्लेम नव्हता, फक्त अनुच वाईट वाटत होतं म्हणून तिला काही सुचत नव्हतं. नको पण जावू दे आता आकाश च मन जपू या, आपण अनु सोबत राहण्या साठी आकाश ला नकार दिला आणि अनु लग्न करून निघून गेली तर, एक तर तिच्या घरचे स्थळ बघत आहेत,

जरा वेळाने आकाश अविनाश आले, आज विकीपण आला होता ऑफिसला, तो सगळीकडे फिरून ऑफिस बघत होता, सगळ्यांशी ओळख करून घेत होता, अदिती बसलेली होती,.. "तू एकटी मुलगी आहेस काय इथे?",

"हो आधीपासून मी एकटीच आहे",.. अदिती

"काय काम करते आहेस तू?, किती फाईल त्या ",.. विकी

"हिशोबाचं काम माझ्याकडे असतं, तु नवीन ऑफिसमध्ये जॉईन झाला आहेस का?",.. अदिती

"नाही मी आकाशचा भाऊ आहे विकी" ,..

"अच्छा म्हणजे आमचे नवीन बॉस का?",.. अदिती

" नाही ग काही येत नाही मला अजून",.. विकी

" येईल की मग कॉलेजला आहात का सर तुम्ही? ",.. अदिती

"अग अहो वगैरे काय म्हणतेस विकी म्हण मला ",.. विकी

" नाही नको विकी सर ",.. अदिती

दोघेजण खूप जुनी ओळख असल्यासारखे बोलत होते, चांगला आहे स्वभाव विकीचा, यांच्या घरात सगळे चांगले दिसत आहेत, आकाशच फक्त सिरीयस आणि चिडका आहे वाटत , अदिती तिचं तिचं हसत होती,

वर्कशॉप वर काम जोरात सुरू होतं , त्यांनी दिलेल सॅम्पल करेक्ट होते, कंपनी कडून पुढच्या ऑर्डरच्या डेट्स आल्या होत्या, लगेच काम सुरू होणार होतं, त्यामुळे आकाश घाईत होता,

शॉप मध्ये छोटीशी पूजा होती, आकाश अविनाश विकी बाकीचे मुलं मशीन जवळ उभे होते,

"कसली वाट बघतो आहे आकाश?",.. अविनाश

" अदिती कुठे आहे?",.. आकाश

"हो बोलवलं आहे तिला" ,.. अविनाश

अदिती ऑफिसमध्ये बसलेली होती, शॉप फ्लोअरमध्ये ती आली,

"अदिती मशीनची पूजा कर, आज पासून आपली ऑर्डर सुरू होणार आहे" ,... आकाश

अदितीने मशीनची पूजा केली, हार फुल घातले, सगळ्यांनी टाळ्या वाजवल्या, आकाशने नारळ फोडलं, अविनाश सर सगळ्यांना पेढे वाटत होते,

" चला आता काम सुरू करा",.. आकाश

अविनाश विकी आत आले, आकाश अदिती सोबत होता, दोघ खूप बोलत होते, अदिती प्रसादाच नारळ शिपाई काका कडे देत होती, पाय नको लागायला

हो बरोबर.. दोघ आवरत होते तिथल

विकी अविनाश कडे बघत होता,.. "जीजु अदिती ओळखीची आहे का आकाशच्या?" ,

"माहिती नाही मला, मी आत जातो मीटिंग आहे एक",.. अविनाश

"आकाश अदिती तुम्ही ओळखतात का एकमेकांना?",.. विकी त्यांच्या कडे गेला

"हो म्हणजे एका ऑफिस मधे आहोत ना आम्ही",.. अदिती

"नाही तुमची केमिस्ट्री खूप छान आहे",.. विकी

म्हणजे?... दोघ हसत होते, आकाश विकी केबिन मध्ये गेले

अदिती कामाला लागली

जरा वेळाने अमितचा मेसेज आला, त्याने ट्रेकिंग वाल्या ग्रुपचे सगळे डिटेल्स दिले,.. "ठीक आहे मी बोलते त्यांच्याशी,.. आकाश बिझी आहे वाटतं त्याला सगळं सांगायचं आहे",.

आज विकी सोबत असल्यामुळे आकाशला अदितीशी विशेष बोलताच आलं नव्हतं, एक तर त्याला समजल होत आकाश अदिती खूप एकत्र राहतात, त्या मुळे आकाश जास्त बोलत नव्हता, जरा वेळाने विकी मेन ऑफिसला चालला गेला, अविनाश सर ऑर्डरच्या कामातच बिझी होते

अदिती आकाशच्या केबिनमध्ये केली,.. "आकाश मला बोलायचं आहे थोडं, हे ट्रेकिंग ग्रुपचे डिटेल्स",

" ठीक आहे मी बोलतो त्यांच्याशी, आकाशाने थोडी माहिती घेतली अदिती कडून ",. आकाश

"अजून एक हे तुझं क्रेडिट कार्ड, लागलं नाही",.. अदिती

"राहू दे अदिती तुझ्या कडे" ,.. आकाश

"नको असू दे, घे परत आणि पैसे पण उरले आहेत ते तुझ्या अकाउंट वर परत कसे पाठवू?",.. अदिती

"राहू दे तुझ्याजवळ पैसे, परत करू नको",.. आकाश

"नाही आकाश एवढे जास्त पैसे मी ठेवणार नाही",.. अदिती

"आता ते काही माझे पैसे नाही ते आपले पैसे आहेत",.. आकाश

"ठीक आहे.. ते आपले पैसे तू तुझ्या जवळ घेतो का? ",.. अदिती हसत होती

" नाही राहू दे माझ्या बायको जवळ, एफ डी कर त्या पैशाची अमित साठी, नंतर कामा येतील",.. आकाश

आकाश अदितीला बायको म्हटला म्हणून ती लाजली होती,... मी जाते,

एक मिनिट अदिती... आकाश तिच्या कडे बघत होता,.." घरी कधी सांगायच अदिती? ",

" अजून नाही आकाश आई बाबा अमितच्या टेंशन मधे आहेत ",.. अदिती

" विचार कर पण यावर",.. आकाश

हो..

अविनाशला आकाशशी काम होतं, पण अदिती आत मध्ये बोलत होती म्हणून ते आत गेले नाही, त्यांच्या केबिनमध्ये चालले गेले, जरा वेळाने अदिती बाहेर काम करताना दिसली, मग ते आकाशला बोलवायला गेले, आकाश अविनाश शॉप फ्लोअर वर गेले, बराच वेळ त्यांचं काम सुरू होतं, जेवणाची वेळ झाली, आज आकाशने अदितीचा डबा स्वतः बाहेर आणून दिला, सुरेश बघत होता त्याने दुर्लक्ष केलं, आकाश सरांना अदिती आवडते वाटतं, चांगलीच आहे अदिती

विकीला सुट्टीत दुसर्‍या फॅक्टरी कडे लक्ष द्यायच काम दिल राहुल सरांनी

"तिकडे काही नाही पप्पा, मी काय करणार तिकडे? , हे मेन ऑफिस आकाशची फॅक्टरी किती छान आहे, अस काही तरी द्या",.. विकी

"ती फॅक्टरी नीट करायच काम करायच आहे तुला विकी, आकाशने करून घेतली ती फॅक्टरी नीट, सहा महिने काम करत होता तो, त्याला तिकडे पाठवल तेव्हा काही नव्हत तिकडे ",.. राहुल सर

कठीण आहे,

" असच असत अॅक्चुल काम काही ते टीव्ही सारख फक्त एसी ऑफिस मधे नसत काम अजून विचार कर, नाही तर नंतर जॉईन हो शिक्षण झाल्यावर ",.. राहुल सर

" मी आता थोडे दिवस करतो मदत नंतर कॉलेज सुरू झाल की बंद करेल काम ",.. विकी

" ठीक आहे",... राहुल सर हसत होते

"मला टीम मिळेल का?",.. विकी

" हो घेवून जा लोक, तिकडे ही ऑर्डरच काम आहे, मदत होईल आकाशला, त्या ऑफिस मधे बस तू" ,.. राहुल सर

ठीक आहे..

विकीने आकाशला फोन करून फॅक्टरीच काम मिळाल्याच सांगितल, आकाश हसत होता, कर आता काम, तुला खूप हौस होती ना,

"तुझ्या कडे जिजू आहेत इकडे कोणी नाही",.. विकी

"कर थोडे दिवस काम ",.. आकाश

अविनाश जिजु हसत होते,.." आपण बोलत होतो विकीला इकडे येवू नको, त्याला हौस होती" ,

हो ना..

जेवणानंतर आकाशने ट्रेकिंग ग्रुपला मेल केला, तुमच्या विरोधात पोलिसात कंप्लेंट दाखल केली आहे, तिकडे हॉस्पिटलमध्ये किती त्रास झाला अमितला तुम्ही कोणी आले नाही मदतीला, खर्च करायला पैसे नव्हते कसे तरी उभे केले त्याच्या आई बाबांनी, किती हा निष्काळजीपणा अमितचा खूप नुकसान झाले आहे, याला जबाबदार तुम्ही आहात, त्यांची फॅमिली हा खर्च करू शकत नाही तरी तुम्ही मदत करायला पुढे आले नाही, या एक्सीडेंट ला कोण जबाबदार आहे? अमितला दवाखान्यात ऍडमिट केलं तेव्हाच तुमच्यावर पोलीस केस झालेली आहे आणि आता आम्ही कोर्टातही जाणार आहोत

जरा वेळाने त्या लोकांचा फोन आला, बराच वेळ ते लोक बोलत होते, हॉस्पिटलच्या बिलाचे पूर्ण पैसे त्यांनी द्यायचं मान्य केलं, अदितीच्या फॅमिलीला अजून थोडी मदत द्यायचं हे मान्य केलं

" ठीक आहे, त्याची पुढची ट्रीटमेंट बाकी आहे त्याचा खर्च द्या, जेव्हा तुम्ही हे सगळे पैसे द्याल तेव्हा आम्ही ती केस मागे घेऊ",.. आकाश

आकाश बाहेर येऊन अदितीला सगळं सांगत होता,

"खूप छान झालं आहे हे आकाश, माझ्या बाबांना खूप मदत होईल या गोष्टीची, तू ही खूप मदत केलीस ",.. दोघ छान बोलत होते तिथेच

अदिती खुश होती आकाश तू खूप छान आहेस

" अरे मग ते माझ्या सासरचे लोक आहेत, बघायला नको का त्यांच्या कडे",.. आकाश हसत होता

" खूप चांगला आहे हा आकाश मला खूप आधार होतो आहे याचा",.. अदिती बिझी झाली

जरा वेळाने अदितीने घरी फोन करून ट्रेकिंग ग्रुप ने काय काय सांगितलं ते सांगितलं,.." ते लोक कॉन्टॅक्ट करतील तुम्हाला बाबा, त्यांनी सांगितलेली तेवढी रक्कम तुमच्या खात्यावर जमा झाली तर लगेच सांगा",

" माझ्या खात्यावर कशाला देत आहे ते पैसे अदिती?, तुझ्या कडे घे ते पैसे आणि लगेच ऑफिसमध्ये भरून टाक",.. बाबा

"बाबा मी भरेल ते पैसे इकडे, पण आधी राहू द्या तुमच्या खात्यावर येऊ द्या तीच प्रोसिजर असते ",.. अदिती

" ठीक आहे मी पैसे जमा झाले की त्यांचा फोन आला की सांगतो खूप छान झाला आहे हे काम",.. बाबा

" आकाश सरांनी केलं हे काम",.. अदिती ,

"मोठ्या लोकांचं लवकर काम होतं, तुझ्या साहेबांना माझे धन्यवाद सांग, एकदा हे काम झालं की मी स्वतः त्यांना फोन करून आभार मानेन",.. बाबा

आकाशने ही काम खूप सहज करून टाकलं होतं, अदिती खुश होती, बरीच मदत होईल हे पैसे मिळाले तर, अमितची काळजी राहणार नाही, बराच वेळ ती आकाशचा विचार करत होती,
....

आकाश अविनाश घरी आले, विकी खूप थकून आजी जवळ बसुन जेवत होता, अगदी लहान वाटत होता तो,

दोघं हसत होते,.. "म्हणून म्हणत होतो आम्ही तुला नको येऊ ऑफिसला, समजलं ना आता किती काम असतं, याला वाटलं असेल पिक्चर सारखं मस्त एसी ऑफिस असेल, खाली गालिचा असेल, समोर पाच सहा फोन असतिल आणि तिथे थोडसं काहीतरी एक दोन पेपर वर सह्या केल्या की घरी यायचं",.. आकाश चिडवत होता

"नाही अस काही नाही, आजी सांग ना यांना... मला वाटलं नव्हतं पण ती फॅक्टरी खूपच खराब आहे",.. विकी

" इकडची फॅक्टरी आधी अशीच होती आम्ही सहा महिने काम केलं आहे त्याच्यावर तेव्हा बसण्यालायक झाली",.. आकाश

"मला पण तुझ्यासारखी ऑफिसची टीम हवी, सगळे लोक छान आहेत तुझ्या कडे, सुरेश यश रोहित अदिती ",.. विकी

"ती टीम पप्पांनी दिली आहे आम्हाला, फक्त मी अविनाश जीजूंना इकडे घेतलं",.. आकाश

"जीजू तुम्ही माझ्या फॅक्टरी या ना",.. विकी

"नाही जीजु माझ्या कडे राहतील",.. आकाश

"हो येईन मी, विशेष लांब नाही आहे ती फॅक्टरी, इकडचं काम थोडं कमी झालं की येईल तुझ्या कडे, नाही तरी त्या फॅक्टरीत पुढचा लॉट सुरू होणार आहे तेव्हा तिकडेच यायचं आहे ",.. अविनाश

" बरं होईल तोपर्यंत माझं कॉलेज सुरू होऊन जाईल",.. विकी

"तुझं कॉलेज सुरू होईपर्यंत ती कंपनी साफसफाई करून सगळे मशीन नीट करून ठेव ",.. आकाशने त्याला काम सांगितलं

ठीक आहे

" आम्ही पण येतो आता सगळ्या ऑफिसमध्ये",.. दोघी आजी पुनम बोलत होत्या, सदोदित ऑफिसचाच विषय असतो

" मग काय बोलणार आहे अजून? तुम्ही सांगा? ",.. आकाश

" आमच्या आयुष्यात काही नाही दुसर",.. अविनाश हसत होते

" होवू शकत विशेष, आकाश लग्न कर तू , पुनम आणि अविनाश पुढचा विचार करा, आमच्याही काही अपेक्षा आहेत, नातवंड हवे आम्हाला ",.. आजी

अविनाश पूनम लाजले,..

"माझ्या लग्नाचा काय?, मला कोणी आग्रह करत नाही ",.. विकी

" तुला वेळ आहे",.. आजी

सगळे हसत होते

" आजी आज आकाशच्या ऑफिस मध्ये ऑर्डरच काम सुरू झाल , आज ऑफिसमध्ये पूजा होती, अदितीने पूजा केली",.. विकी

दोघी आजी पूनम आकाश अविनाश कडे बघत होत्या,

" कोण आहे अदिती? ",.. आजी विचारत होत्या

" ऑफिसमधले एकुलती एक मुलगी, छान आहे ती खूप ",.. अविनाश

" बरं झालं मग तिच्या हातून केली पूजा, भरभराट होईल ",.. आजी

विकी फारच माहिती देत होता आजीला ऑफिस बद्दल

अविनाश जीजू फ्रेश व्हायला आत निघून गेले, पुनम त्यांच्या मागे गेली.

मी पण येतो फ्रेश होऊन, आकाशही आत गेला

" पूनम आजी काय म्हणताय करायचा का विचार?" ,.. अविनाश

" अविनाश पण आपल ठरलं ना आपण अजून सेटल नाही",.. पूनम

"अस कोणी कधी सेटल नसत पूनम, विचार करायला काय हरकत आहे ",.. अविनाश

पूनम लाजली होती,

"आकाश अदितीच काय सुरु आहे?",.. पूनम

"काही नाही खूप पटत त्यांच, छान आहे जोडी ",.. अविनाश

" काही बोलला का आकाश?",.. पूनम

"नाही सांगितल अजून काही त्याने ",.. अविनाश

" अदिती बोलते का आकाशशी ऑफिस मध्ये? ",.. पूनम

" हो मग हा आकाश तिच्या मागे मागे असतो, तो छोटा डब्बा तिला देतो तो लंच टाइम मध्ये ",.. अविनाश

" चांगल आहे ती पीजीत रहाते ना" ,.. पूनम

हो..

दोघ बाहेर आले जेवायला, आकाश आजीं सोबत बोलत बसला होता. चला जेवून घ्या.


.....

🎭 Series Post

View all