प्रेम पंख ❤️... भाग 22

आकाश खुश होता, अदिती येत आहे, कधी उद्या ऑफिस मध्ये जावू अदितीला बघु अस झाल होत त्याला. त्याने फोन लावला,


प्रेम पंख ❤️... भाग 22

©️®️शिल्पा सुतार
........

सकाळी लवकर अमितच ऑपरेशन होत, आई बाबा अदिती हॉस्पिटल मध्ये होते, अनुचा मेसेज येवून गेला,

थोड्यावेळाने आकाशचा मेसेज आला,.. "कसा आहे अमित? केव्हा सुरू होणार आहे ऑपरेशन, तू पण काळजी घे अदिती, खूप टेन्शन घेतलं आहेस कालपासून",

आकाशचा मेसेज बघून अदितीला खूप छान वाटलं,.. "आता ऑपरेशन साठी नेलं आहे सर",..

"अदिती आता आपण ऑफिसमध्ये आहोत का? आपण दोघं असतांना तरी आकाश म्हण ना मला, तुला राग आला ना माझा ",.. आकाश

" ठीक आहे, कसला राग आकाश? ",.. अदिती

" तू एवढे टेन्शनमध्ये होती आणि मी तू माझ्याशी लग्न करावं म्हणून हटून बसलो होतो",.. आकाश

" नाही आकाश तुला काय माहिती माझा हा प्रॉब्लेम होता, मी काल खूपच इमोशनल होती, मला कोणाशी काहीही बोलावस वाटत नव्हत, मला राग नाही आला",.. अदिती

अदितीच्या मैत्रिणी भेटायला येत होत्या, सगळे होते आजुबाजूला, एवढ्या सगळ्यात सुध्दा अदितीला आकाशचा विचार करून छान वाटत होत, वेगळीच अशी गोड फिलींग होती ती,

ऑपरेशन सक्सेस फुल झाल, दोन तीन फॅक्चर होते, काळजी घ्यावी लागणार होती, पुढे ही बराच खर्च होता,

बरीच धावपळ झाली, अदिती असल्यामुळे आणि सगळी व्यवस्था नीट असल्यामुळे आई बाबांना बर वाटत होत

"अदिती सगळ सांभाळून घेते",.. बाबा

"हो ना खूप काळजी घेते आपली",.. आई

"हुशार आहे अदिती, मोठी झाली आपली मुलगी",.. बाबा

"लग्नाच बघाव लागेल हिच्या",.. आई

"त्या आधी थोडी पैशाची जमवाजमव करू, हा खर्च ही तिलाच नको",.. बाबा

हो..

"मी हे झाल की आपल शेत नवीन प्रकारच्या शेतीच्या टेस्टिंग साठी देणार आहे चालवायला, ते लोक योग्य मार्गदर्शन करतात चांगल उत्पन्न आल यातून तर बर होईल",... बाबा

" हो हे पैसे ही वापस करायचे आहेत आपल्याला ",.. आई
.....

आकाश खुश होता, आज अदिती खूप छान आणि शांतपणे बोलली माझ्याशी, खूपच चांगलं वाटतं आहे मला , पुनम वरती बोलवायला आली आकाश सोफ्यावर शांतपणे बसलेला होता,

" काय झालं आहे आकाश? एकदम खुश आहेस",.. पूनम

" दीदी ये ना ",.. आकाश

" ऑफिसला जायचं नाही का? सगळे वाट बघत आहेत",.. पूनम

" हो चल झाल आहे आवरून ",.. आकाश

"कोणाशी बोलत होता फोनवर? ",.. पूनम

"अदितीला केला होता फोन, ती गावी गेली आहे, तिच्या भावाचा एक्सीडेंट झाला आहे ",.. आकाश

"बापरे.. कसा आहे तो आता? ",.. पूनम

" ठीक आहे आता",.. आकाश

"ये खाली लवकर",.. पूनम

आकाश अविनाश पूनम विकी आजी नाश्ता करत होते, आकाश वेगळाच खुश होता खुप बडबड करत होता

काय झाल आहे याला? , मूड मध्ये आहे हा,... आजी पूनमला विचारात होती, पूनम ने काही नाही मानेने सांगितल

आकाश अविनाश दोघ ऑफिसला आले, आकाश ऑफिस कामा बद्दल ठरवत होता रस्त्याने, ड्रायव्हिंग करतांना चीड चीड नव्हती आज त्याची, अविनाश सरांनाही बदल जाणवला,

अदिती जागेवर नव्हती

"अदिती कुठे गेली? , आज का नाही आली सुरेश?" ,.. अविनाश विचारात होते

"माहिती नाही ती आली नाही आज", ...सुरेश

" काल उशिरा पर्यंत काम करत होती अदिती, ती टेंशन मधे होती ",... शिपाई काका सांगत होते

"काय झालं असेल?, आकाशला माहिती असेल ",.. अविनाश

"आकाश अदिती नाही आली का आज? ",.. अविनाश

"नाही ती घरी गेली आहे, तिच्या भावाचा एक्सीडेंट झाला आहे ",.. आकाश

" जास्त लागल का? कसा आहे तो? ",.. अविनाश

" आज ऑपरेशन होत, बरच लागल आहे, झाल असेल ऑपरेशन आता पर्यंत, मी सकाळी केला होता मेसेज",.. आकाश

" ठीक आहे, कधी येईल अदिती?",.. अविनाश

" माहिती नाही तशी तीन दिवसाची सुट्टी घेतली आहे तिने, बहुतेक सोमवारी येईल",.. आकाश

" काल खुप काम होत का तिला? , उशिरा पर्यंत थांबली होती का ती?, काका सांगत होते ",.. अविनाश

" नाही थोड्या वेळाने गेली ती, बहुतेक काम पूर्ण करून गेली असेल ",.. आकाश

आकाशला बरच माहिती आहे काय काय झाल तिकडे, खुश ही आहे हा काल पासुन आणि अदिती ही काल उशिरा घरी गेली, नक्की काय सुरु आहे? , छान आहे अदिती, जावू दे, ऑर्डरच्या कामात ते दोघ बिझी झाले
.....

रितीकाच्या घरी पप्पा मम्मी समोर बसलेले होते, रितीका गप्प होती,

" का त्रास करून घेते रितीका जावू दे ना आपण अजून चांगले स्थळ बघू तुझ्या साठी, नाही म्हणतो आकाश तर जावू दे",..

"नाही पप्पा फक्त आणि फक्त आकाश",.. रितीका

"हा काय हट्ट आहे तुझा, समजवून सांग हिला ",.. बाबा चिडले होते

ते ऑफिस मध्ये आले, त्यांनी राहुल सरांना फोन लावला
,.." त्या दिवसा नंतर आपल बोलण झाल नाही, आकाश तुम्ही सगळे कसे आहात, पुढे काय ठरलं?, आमच्या कडच्या प्रपोझलचा विचार केला का तुम्ही? ",..

" नाही म्हणतोय आकाश, बिझी आहे तो सध्या ",.. राहुल सर

" मुल ओळखतात एकमेकांना पूर्वी पासून",..

" मला अस वाटतय बळजबरी करायला काय अर्थ आहे? ",.. राहुल सर

" बरोबर आहे, मी बोलून बघतो रितीकाशी",..

" सॉरी... प्लीज समजून सांगा तिला ",.. राहुल सर

हो

त्यांनी घरी फोन करून सांगितलं तिकडनं नकार आला आहे, रितिकाची आई रितिकाच्या रूम मध्ये गेली,.." काय चाललं आहे रितिका तुझं? जो मुलगा आत्ताच तुला नाही म्हणतो , त्याला नाही रहायच तुझ्या सोबत, तो आयुष्यभर काय तुला साथ देणार आहे? का असा हट्टीपणा करते, ज्या लोकांना आपण हव असतो त्यांच्यासोबत राहावं नेहमी, असतील आकाशचे वेगळे काही प्लॅन, अशाप्रकारे बळजबरी नातं जोडून उपयोग नाही",

"ठीक आहे आई तू म्हणते तसं, यापुढे आकाशचा विषय नाही काढणार मी ",.. रितीका रडत होती,

आई तिला समजावत होती.. " छान तुला आवडतं ते कर ऑफिस जॉईन कर पॉझिटिव्ह राहा",..
.....

आज ऑर्डर साठी फर्स्ट सॅम्पल घेवून जायच होत, ते ओके झाल्यावर पुढच काम सुरू होणार होत, आकाश अविनाश खूप बिझी होते, राहुल सरांनी दोन तीनदा विचारल होत सकाळ पासून, दुपारनंतर सॅम्पल रेडी झालं आकाश अविनाश ऑफिसमध्ये पोहोचले तिथून, त्यांना निशांत बाहेर पडताना दिसला,

"हा बघितला का इथे आला असेल भांडण लावायला, आपल्याला त्रास देईल हा ",..अविनाश

"पण एवढ्या मोठ्या फॅक्टरी त्याला विचारतील का लोक? ",.. आकाश

" काही सांगता येत नाही, काय करावे?",..अविनाश

" आपण नियमाप्रमाणे जाऊ, त्यांनी दिलेल्या डिटेल्स प्रमाणे आपलं सॅम्पल असतील तर कोणी काही बोलू शकत नाही आणि निशांत जास्तीत जास्त तिथल्या एखाद्या मॅनेजरला फोडण्याचा प्रयत्न करेल, काही होणार नाही त्याने, आपलं काम व्यवस्थित आहे ",.. आकाश कॉन्फिडंट होता

दोघे आत मध्ये गेले सॅम्पल सबमिट केलं
.....

अमितला आता ऑपरेशन थिएटर बाहेर आणल होतं, आज दिवसभर त्याला काहीही खायला द्यायचं नव्हतं, संध्याकाळी डॉक्टर सांगतील त्याप्रमाणे आहार होता, आई बाबा आदिती हॉस्पिटलमध्येच होते,

अनुचा फोन येऊन गेला होता,.. " सुट्टी घेतली आहे का ऑफिस मधुन अदिती",..

"हो अनु तीन दिवस घेतली सुट्टी",.. अदिती

"तुझं चांगलं आहे अदिती, थोडं केबिनमध्ये जाऊन हसलं की लगेच सुट्टी मिळते तुला" ,.. अनु

म्हणजे??

" तुझा बॉस आकाश आहे अदिती ",.. अनु चिडवत होती

अदितीला आकाशची परत आठवण आली, तिला छान हसू येत होतं,.. "काहीही काय बोलत राहते ग तू अनु? ",.. मुद्दामच अदिती तिला रागवली

" मला माहिती आहे सगळं, तु नुसत आकाश कडे बघितल असेल, त्याने लगेच सुट्टी दिली, टॅक्सी बूक करून दिली ",.. अनु

माझ्या बद्दल काय माहिती आहे हिला, सुट्टी आणि पैशासाठी मला काय काय करावे लागल, दिवस भर पैसे मिळतील की नाही याच टेंशन होत, त्यात आकाश लग्ना साठी आग्रही होता, जाऊदे पण चांगला आहे आकाश, मला आवडतो तो, एवढच होत की आधी माझ्यात हिम्मत नव्हती त्याला होकार द्यायची, मला उगाच वाटत होतं की खूप फरक आहे दोन फॅमिलींमध्ये म्हणून मी लांब होती, झालं आता लग्न जे होईल ते होईल, आता मी नीट वागणार आहे,

दुपारी अमितला भेटायला जाऊ देत होते, एक एक करून आई बाबा अदिती भेटून आले, तो छान बोलत होता, बराच आराम पडला होता त्याला,

"आता एकदम बर वाटेल अमित तुला, छान जेवायच आणि व्यवस्थित औषध घ्यायच",.. अदिती

"ताई मी अभ्यास ही सुरू करेन ",.. अमित

"हो आधी तब्येत सांभाळ ",.. अदिती

आकाशने ऑफिसमध्ये आल्यानंतर अदितीला फोन लावला, आकाशच्या फोन बघून अदिती बाहेर गेली

" कसा आहे अमित आता?",.. आकाश

"ऑपरेशन व्यवस्थित झालं, बोलतो आहे व्यवस्थित सगळ्यांशी तो, मला आज बर वाटत आहे त्याच्या कडे बघून, आकाश थँक्यू खूप मदत झाली, नाही तर आम्ही काय केल असत? माझ्या साठी अमित ठीक होण खूप महत्त्वाच होत, तू माझी चिंता दूर केली ",.. अदिती

" अदिती अमितची काळजी घे , आज मला खूप छान वाटतं आहे, आज आपण ऑर्डरच फर्स्ट सॅम्पल सबमिट केल ",.. आकाश

" अरे वाह कामाला सुरुवात झाली का?, छान होईल सगळं ",.. अदिती

हो अदिती... अविनाश आत मध्ये आले, आदिती अविनाश जीजूंशी बोल

" काय झालं अदिती? कसा आहे तुझा भाऊ? ",.. अविनाश

" ठीक आहे आता तो अविनाश सर, ट्रेकिंगला गेला होता तो तिकडे काहीतरी गडबड झाली, वरून खाली पडला तो, बघणार आहे मी चौकशी करणार आहे, किती हा निष्काळजीपणा त्या ग्रुपचा, माझ्या भावाचं खूप नुकसान झालं, त्याला माहिती नव्हतं की त्याचा दोर कच्चा आहे",...अदिती

" काळजी घे",... अविनाश

हो सर...

त्यांनी फोन आकाश कडे दिला, आकाश त्यांच्याकडे बघत होता

" जातो मी, जरा वेळाने येतो",.. अविनाश जीजू बाहेर गेले

आकाश हसत होता

" काय झालं आकाश? ",.. अदिती

" माहिती नाही जीजूंना काही कळलं का? ",.. आकाश

" का काही बोलले का ते सर ",.. अदिती

" तसं नाही पण चिडवल्यासारखा चेहरा वाटत होता, तू काळजी घे अदिती, मी जरा कामात आहे, कधी येतेस तू? ",.. आकाश

" मी तीन दिवस सुट्टी घेतली होती, उद्या पर्यंत, वाटत एक दोन दिवस लागतील अजून इथे, माझी सुट्टी वाढवणार का आकाश? ",... अदिती

" सोमवारी ये हरकत नाही",.. आकाश

" ठीक आहे तो पर्यंत अमितला बहुतेक घरी सोडतील, ऑपरेशन होवुन पाच दिवस होतील ",.. अदिती

आता अमितला फार बर वाटत होत, तीन दिवस झाले होते, जनरल वॉर्ड मध्ये शिफ्ट केल होत त्याला , दोन दिवसानी सोडून देवू घरी याला, चांगली प्रगती आहे

ठीक आहे डॉक्टर...

" बाबा मी रविवार संध्याकाळी जाईल वापस, सोमवारी सकाळी ऑफिस मधे जॉईन होईल ",.. अदिती

" ठीक आहे तुझी पण एक आठवडा सुट्टी झाली",.. बाबा

आई बाबा आत काही तरी बोलत होते, आई कपाट उघडून काही तरी देत होती

"काय चाललय आई बाबा? मी येवू का आत एक मिनिट",.. अदिती

"आई दागिने का काढले बाहेर? , आत ठेव ",.. अदिती

" अग हे देवून टाकू, तू पैसे घेवुन जा सोबत",.. आई

" आता नाही आई, मी सांगेन लागले तर आणि मी सांगितल्या शिवाय शेत दागिने विकणे अस करु नका प्लीज",.. अदिती

"पण तू पैसे कसे वापस करणार ",.. बाबा

" एवढे लागले नाहीत बाबा इथे, थोडे पैसे देते तुमच्या कडे अमितच्या पुढच्या ट्रीटमेंट साठी लागतील, बाकीचे वापस करते ऑफिस मधे आणि ठरल्या प्रमाणे मला बोनस ही मिळेल चांगला, तो पूर्ण जमा करेल कंपनी मधे, पगार होईल आता माझा, ते ही पैसे पाठवते ",.. अदिती

" नको अदिती तुझ्या पगाराचे पैसे नको पाठवू, तू तिकडे कशी रहाते तुझ तुला माहिती असू दे ",.. बाबा

" नाही मी ठीक आहे, पैसे पाठवते मी अमितच्या शिक्षणा साठी कामा येतील, तिकडे नाही साठवता येणार उगीच खर्च होतील ",.. अदिती

अमित ठीक होता, आज त्याला घरी सोडल, काय काय काळजी घ्यायची, औषध कसे घ्यायचे नीट समजून सांगितल, तो घरी आल्यावर सगळे खुश होते, खूप मोठ संकट होत ते टळल ते बर झाल

" मी निघते उद्या अमित खूप सुट्ट्या झाल्या ",.. अदिती

हो ताई..

" मी येते आहे आज संध्याकाळी तिकडे आकाश",.. अदितीने मेसेज केला

"मी येऊ का तुला घ्यायला तिकडे? ",.. आकाश

"नको तीन तासाचा रस्ता आहे, बाबा येतील स्टँड वर सोडायला, मी येईन माझी माझी, उद्या भेटू ऑफिस मध्ये",.. अदिती

ठीक आहे..

आकाश खुश होता, अदिती येत आहे, कधी उद्या ऑफिस मध्ये जावू अदितीला बघु अस झाल होत त्याला. त्याने फोन लावला, माझा फ्लॅट आहे त्या सोसायटीत मला एक टु बिएचके घर हव आहे मला,

हो सर मिळुन जाईल

फूल फर्निश्ड हवा फ्लॅट,

ओके सर...




🎭 Series Post

View all