प्रेम पंख ❤️... भाग 20

बरं झालं अदिती तू आलीस, किती बोर झालं होतं आम्हाला इकडे",.. ते हसून तिच्याशी गप्पा मारत होते, बाकीचे मुलं पण बोलत होते,


प्रेम पंख ❤️... भाग 20

©️®️शिल्पा सुतार
........

आकाश अविनाश दोघांचं काम झालं होतं,.. "तू गेला होता ना आकाश मेन ऑफिसला",

हो..

" अदिती भेटली का तिकडे? ती या ऑफिसमध्ये नाही तर बोर होत आहे ",.. अविनाश

" नाही भेटली अदिती, मी काही तिला भेटायला गेलो नव्हतो",.. आकाश खोट बोलला

" घरी येतो आहेस ना आज तू ? आजी आलेल्या आहेत, काल त्या विचारात होत्या ",.. अविनाश

"हो येतो आहे चला निघू आपण",.. आकाश

अदितीचा डेस्क रिकामा होता, फार बोर होत आहे अदिती इथे नाही तर, तिला आपण इथे बोलवून घेऊ, आज अजिबातच करमले नाही ऑफिसमध्ये, ती माझ्याशी बोलत नाही, आज विचारल चहा घ्यायला जावू या तर नकार दिला तिने, काय कराव आता, रात्री बोलू तिच्याशी फोन वर... आकाश विचार करत होता.

आकाश अविनाश घरी आले, दादी आलेल्या होत्या,

"नानी कुठे आहेत?",.. आकाश

"त्या थोडे दिवसांनी येणार आहे, इथे पुनम एकटी होती म्हणून मी निघून आली",.. आजी

आकाश आजी जवळ बराच वेळ बसून होता, त्या तिकडच्या गमती जमती सांगत होत्या, सगळे रमले होते,.. "आजी तू आली तर खूपच छान वाटत आहे, नाहीतर कंटाळा आला होता घरात",.. आकाश

" हो ना मी तर दिवस रात्र एकटी होती",.. पूनम

" काय सुरु तुमची दोघांचं खूपच बिझी झाले वाटतं तुम्ही",.. आजी

"हो टेंडर मिळालं मोठी ऑर्डर आहे काम सुरू झालं आहे",.. आकाश

"छान बरं झालं तुम्हा दोघांना तेच हवं होतं ना",.. आजी

" हो.. मला मेन ऑफिस मधे वापस जायच नाही",.. अविनाश

सगळे हसत होते.

जेवण झाल.

आकाश रूम मध्ये आला ,त्याच्या फोनवर रितिकाचा मिस कॉल होता ,काय कटकट आहे आता ही, आधीच हिने अदितीला काही कमी त्रास दिला नाही, माझाही गैरसमज झाला हिच्यामुळे, आता का फोन करते आहे ही,... परत रितिकाचा फोन आला ,..बोल रितिका

"तू तर अजिबातच माझ्याशी बोलत नाही आकाश" ,..रितिका

" काही काम नाही आहे तुझ्याशी तर काय बोलणार",..आकाश

" तू काय ठरवलं आहेस आपल्याबद्दल ",..रितिका

"कसलं? आपल्या बद्दल म्हणजे? ",.. आकाश

" तू लग्नाला तयार आहेस का?, आम्ही तुमच्या घरी आलो होतो त्या नंतर काही बोलण झाल नाही आपल ",.. रितिका

"मी तुला तेव्हा पण सांगितलं होतं की मला लग्न करायचं नाही एवढ्यात",.. आकाश

" मग तू थोडे दिवसांनी लग्न करशील का माझ्याशी? ",.. रितिका

" नाही रितिका माझ्या भरोशावर राहू नको",.. आकाश

" काय प्रॉब्लेम आहे सांगता येईल का आकाश, प्लीज अस करु नकोस ? ",.. रितिका

" मला असं वाटतं आपण नको बोलायला या विषयावर",.. आकाश

" हे असं चालणार नाही आकाश, तुला माझ्याशी व्यवस्थित बोलव लागेल ",.. रितिका

"बळजबरी आहे का? ",.. आकाश

" हो बळजबरी आहे मला पहिल्यापासून तू आवडतो मला तुझ्या सोबत राहायचं आहे, काय हरकत आहे",.. रितिका

" लग्न माझं पण आहे रितिका आणि माझ मत तुला विचारात घ्याव लागेल, मला तुझ्याशी लग्न करायचं नाही स्पष्ट सांगतो, यापुढे माझ्या मागे मागे करायचं नाही",.. आकाश

" आकाश का असं करतो आहेस? , तुझ्या आयुष्यात कोणी आहे का दुसरं? ",.. रितिका

" तुला काय करायचं आहे त्याच्याशी?",.. आकाश

"असं नको बोलू आकाश",.. रितिका

" हे बघ रितिका तू मला यापुढे फोन करू नको मी आमच्या घरी स्पष्ट सांगितलं आहे की मला तुझ्याशी लग्न करायचं नाही ",.. आकाश

" ठीक आहे हे फिक्स आहे का तुझं? मी पण बघते मग तू काय करतो",.. रितिकाने रागाने फोन ठेवून दिला,

काय एक एक प्रॉब्लेम आहे, तिकडे तो निशांत, ही रितिका आणि अदिती तर बोलायलाच तयार नाही

त्याने अदितीला फोन लावला, अदिती आधीच घरच्यांच्या काळजीत होती, त्यात आकाशचा फोन बघून तिला टेंशन आल, आता काय आहे याचं? , मला अजिबात आकाशशी बोलायचं मन नाही, माहिती आहे काय बोलेल तो, तिने फोन उचलला, हॅलो आकाश,

"झालं का जेवण अदिती? ",.. आकाश

"हो झालं, इथे खाली मेस मध्ये जेवावं लागत",... अदिती

"चांगल असत का जेवण?",.. आकाश

"ठीक असत घरच्या सारख नसत",. अदिती

"उद्या येणार का तू ऑफिसमध्ये",.. आकाश

"हो जाणार आहे मी ऑफिसमध्ये तिकडे मेन ब्रांचला",.. अदिती

"तू इकडे ऑफिसमध्ये नाही तर करमत नाही मला अदिती, प्लीज अस करु नकोस ऑफिस मधे वापस ये लवकर ",..आकाश

बापरे हा काय असं बोलतो आहे..

"मला तुझ्याशी बोलायचं आहे थोडं अदिती, असं आपण ऑफिस मधे भेटलो की तू माझ्याशी बोलत नाही, मला तुझ्याशी लग्न करायचा आहे, मी सिरीयस आहे, ऐकते ना तू अदिती, मला एकदा भेटायला ये ",.. आकाश

अदिती काही म्हटली नाही,..

" हे असं दरवेळी काही न बोलून होणार नाही अदिती, मी जे बोलतो आहे त्याचं व्यवस्थित उत्तर दे, मोकळ बोल माझ्याशी, माझ्यासाठी तुझ उत्तर महत्वाच आहे ",.. आकाश

अदिती टेंशन मधे होती

" काय झालं अदिती?, काही प्रॉब्लेम आहे का?, अजिबात काही बोलत नाहीस तू ",.. आकाश

"काही नाही आकाश, बोलू आपण नंतर ",..आदितीने फोन ठेवून दिला, तिला टेंशन आल होत, काय कराव आकाशच?

" काय झालं अदिती ",.अनु

" काही नाही ग घरच्यांचा एक चाललेल आहे, आकाशच दुसरं सुरू असतं ",..अदिती

"काय झालं पण ?, काय म्हटला आकाश? ",.. अनु

"काही नाही.. मी झोपते आता ",.. अदिती

" अदिती आकाश प्रेम करतो ना तुझ्या वर ",.. अनु

हो अनु

"विचार कर त्याचा",.. अनु

अदिती लाजली होती

" एक मिनिट ओह माय गॉड बघू चेहरा ",.. अदिती

चूप ग अनु..

आकाश रूम मधे फेर्‍या मारत होता,..... अदितीशी एकदा नीट बोलावच लागेल, ती हो बोलत असेल तर लग्न करून घेवू, हे रितीकाच्या घरचे काही चांगले लोक नाहीत, उगीच माझ्यावर दबाव आणता आहेत ते लग्नाचा, अदिती काही बोलत नाही, जाऊ दे , थोडा वेळ लागेल तिला,

दुसऱ्या दिवशी नाश्त्याच्या टेबलवर आजी बसलेल्या होत्या, पूनम आली

"आकाश कुठे गेला आज? आवरल नाही का? त्याला ऑफिसला जायच नाही का?",..

"काय माहिती आज अजून खाली आला नाही तो ",.. आजी

पूनम आत मध्ये आली, अविनाश तयार होत होते

" काय झालं पूनम?" ,..

"आकाश अजून खाली आला नाही , ऑफिसमध्ये जायचं नाही का आकाशला? अजुन खाली आला नाही तो, सगळे ठीक आहे ना तिकडे? ",.. पूनम

" राहुल सरांनी अदितीला मेन ऑफिसमध्ये कामासाठी बोलवुन घेतलं आहे, त्यामुळे पुढचे दोन तीन दिवस ती तिकडेच असणार आहे",.. अविनाश

"म्हणून हा असं हळूहळू आवरतो आहे का?",..पूनम

"माहिती नाही ग थकला असेल तो खूप, धावपळ होते आहे त्याची नवीन ऑर्डर आहे ",.. अविनाश

" पप्पा तुझ्यावर जबाबदारी नाही देत का काही? ",.. पूनम

" नाही ते सगळं आकाशला सांगतात, आकाशला मीटिंगला बोलवतात, मी शॉप फ्लोअर वगैरे सगळं सांभाळतो, आकाश सांगेल ते काम करतो",.. अविनाश पुनम दोघेही शांत होते, दोघांना वाईट वाटत होतं, अजूनही पप्पांनी आपलं लग्न एक्सेप्ट केलेलं नाही म्हणजे.

" जाऊ दे आपणच इथे नव्हतं राहायला पाहिजे ",.. अविनाश

" आपण जातच होतो ना लग्ना नंतर इथून पण हे आजी आणि आकाश विकी जाऊ देत नाही ",.. पूनम

" एकदा बोलून बघू का मी आजीशी",.. अविनाश

"ठीक आहे, अविनाश तू ही दुसरीकडे जॉब बघ",.. पूनम

आकाश आत येत होता,.. "चला नाश्त्याला दीदी जीजू, एक मिनिट काय झालं आहे जीजू? दुसरीकडे जॉब म्हणजे काय? सॉरी पण मला तुमचं थोडं बोलण ऐकू आलं, काही प्रॉब्लेम आहे का? कोणी काही बोललं का तुम्हाला? तुम्हाला माहिती आहे ना मला तुमच्या सोबतीची किती गरज आहे, हे असं काय चाललं आहे दीदी? काय झालं आहे ",..

" काही नाही आकाश ",.. अविनाश

" आम्ही इथे नव्हत राहायला पाहिजे आकाश, पप्पा अजूनही अविनाश वर विश्वास ठेवत नाही, त्यांना घरच्यासारखं ट्रीट करत नाही",.. पूनम

" अरे असं काही नाही दीदी, अविनाश जिजू माझ्यासाठी कंपनीसाठी किती महत्त्वाचे आहे तुला नाही माहिती आणि यापुढे असा विचार करायचा नाही, एक तर मम्मी पण नाही, त्यात तू पण दीदी असं केलं तर आम्ही कुठे जाणार, आजीला ही तुझी गरज आहे, तुम्ही दोघे खूप महत्त्वाचे आहात आमच्यासाठी, मी बाहेर वाट बघतो आहे, चला नाश्त्याला, यापुढे असा विचार करू नका ",.. आकाश नाश्त्याला गेला

आजी समोर बसली होती,.." काय रे आकाश काय झालं?",

" काही नाही ",.. आकाश

पप्पा पण का असं करतात काय माहिती? किती हुशार आहे अविनाश जिजू, ते जर ऑफिसमध्ये नसले तर मी कसं काम करणार आहे, आणि स्वभावाने किती चांगले आहेत ते, आज सांगतोच पप्पांना की अविनाश जिजूंना ही जरा जबाबदारी देत जा

दीदी माझ्या साठी खूप महत्त्वाची आहे, अगदी प्रेमळ जोडी आहे ही, ती या घरातुन चालली गेली तर मी काय करणार आहे

जवळच जायचं होतं मेन ऑफिसमध्ये म्हणून आदिती आणि अनु आरामात निघाल्या

" छान वाटतं आहे गं अनु इथे जवळच ऑफिस आहे तर हे रोज बसने जाणं म्हणजे कंटाळा आहे, आधी तरी यश सोबत असायचा आता तर मी एकटीच",.. अदिती

"तुला जर कायम इकडे काम मिळालं तर बरं होईल अदिती",.. अनु

"मला नाही वाटत असं काही होईल",.. अदिती

"हो मलाही तसंच वाटतं आहे आकाश एवढे दिवस थांबणार नाही",.. अनु

" तुझं काय ग सारखं त्या आकाशचं चालू असतं ",.. अदिती

" मग तुला काय म्हणायचं होतं ",.. अनु

" तुमच्या दोघींना बहुतेक हे काम दाखवून दिलं की मला परत आमच्या ऑफिसमध्ये जावं लागेल",.. अदिती

" हो ना मग तेच होईल, आकाशच्या ऑफिसमध्ये तुला जावंच लागेल ",.. अनु हसत होती

ऑफिसचं काम सुरू झालं

आकाश अविनाश निघाले,.. "जीजू सॉरी तुम्ही मनात काही आणू नका, काय झालं आहे?",

" आकाश प्लीज, सॉरी का बोलतोस, आम्हाला कोणाचाच राग नाही, तुला माहिती आहे मी घर जावई म्हणून इथे राहतो, आहे ते खरं आम्हाला दोघांनाही आवडत नाही पण केवळ तू विकी आणि आजींसाठी आम्ही इथे राहतो",.. अविनाश

"मी बोलतो पप्पांशी जीजू",.. आकाश

"नको आकाश काहीच बोलू नको माझी काही तक्रार नाही",.. अविनाश

लंच ब्रेक मध्ये अदितीने फोन बघितला तिच्या वडिलांचा मिस कॉल आलेला होता, अदितीने फोन लावला

" आपण केस हरलो अदिती ",.. बाबा

" तुम्ही ठीक आहात ना बाबा ",.. अदिती

"हो मी ठीक आहे ",.. बाबा

" काळजी करू नका मी करते संध्याकाळी फोन ",.. अदिती

"हो मी एकदम ठीक आहे तू काळजी करू नको, फक्त केसचा निकाल तुला कळवायचा होता म्हणून फोन केला होता",.. बाबा

"आई ठीक आहे ना",.. अदिती

"हो सगळे ठीक आहे, अमित उद्या पिकनिकला जाणार आहे",.. बाबा

कुठे?

"त्याच्या कॉलेजतर्फे कुठेतरी पिकनिक आहे, ट्रेकिंग का काय ते, येईल संध्याकाळी तो वापस ",. बाबा

" ठीक आहे",.. बाबा

चार वाजता मॅनेजर आले,.." अदिती तुम्ही अनु आणि प्रीतीला सगळं काम समजून सांगा आणि उद्यापासून तुम्ही त्या ऑफिसला तिकडे जा, इकडे यायची गरज नाही, जर काही अडलं तर विचारतील या मुली तुम्हाला",

"ठीक आहे सर",.. अदिती अनु आणि प्रीतीला पुढे काय काय करायचं आहे ते सांगत होती, तशी विशेष गरज नव्हती, कालपासून सगळ्यांना माहिती होतं, काय काय करायचं

अविनाश आकाश खूप कामात होते, आकाश अदितीला मिस करत होता, तो ऑर्डरच्या कामात होता

अदिती अनु घरी आल्या, आज आकाश अजिबात आला नाही मेन ऑफिसला राग आला का त्याला? आला असेल जावू दे, उद्या पासून जाणार आहोत तिकडे आकाशच्या ऑफिसला,

आकाश अविनाश यांना घरी जायला वेळ झाला खूप काम होत

सकाळी अदिती ऑफिसला आली, तिला ऑफिस मधे बघून सगळे खुश होते, यश अजूनही बोलत नव्हता तिच्याशी, जरा वेळाने आकाश अविनाश आले, अदिती समोर काम करत होती, ती उठून उभी राहिली, आकाश केबिनमध्ये निघून गेला, त्याला बर वाटत होत,

अविनाश सर आदिती जवळ आले,.. "बरं झालं अदिती तू आलीस, किती बोर झालं होतं आम्हाला इकडे",.. ते हसून तिच्याशी गप्पा मारत होते, बाकीचे मुलं पण बोलत होते, खूप चांगले आहेत इथले लोक अदिती विचार करत होती

आज ही महत्त्वाची मीटिंग होती, त्याने त्या मीटिंगसाठी या अविनाश सरांना जायला सांगितलं अविनाश सर, सुरेश मिटिंगला गेले

अदिती कामात होती तिचा फोन वाजत होता, घरून फोन होता, उचलू का फोन नाही तर ऑफिसमध्ये ओरडतील, ती फोन घेऊन बाहेर गेली... बोला बाबा

"हे बघ अदिती तू घाबरू नको, अमित पिकनिकला गेला होता तिकडे त्याचा एक्सीडेंट झाला आहे",.. बाबा

अदितीने खालीच बसून घेतलं

अदिती.. अदिती

तिच्या डोळ्यात पाणी होत, एक तर ती घरच्यांना मिस करत होती, त्यात हे अस झाल तर त्रास होतो

"अदिती तू ठीक आहेस ना",.. बाबा

" हो बाबा, काय झालं आहे नक्की? नीट सांगा? तुम्ही आणि आई ठीक आहात ना? ",.. अदिती

"अजून काहीच माहिती नाही ते लोक अमितला घेऊन येत आहेत, ट्रेकिंगला गेले होते तर वरून पडला तो पायाला जास्त लागला आहे, तो आला की लगेच त्याला ऍडमिट करतो आणि मी फोन करतो",.. बाबा

"ठीक आहे बाबा",.. काय करू मी घरी जायला निघू का लगेच? काही सुचत नाहीये, किती लागल आहे अमितला माहिती नाही, आज संध्याकाळी जाते मी घरी,

अदिती कशीतरी आत आली ती, काम करत होती, अनुला सांगू का? नको पण उगाच तिच्याशी बोलताना रडू येईल, काही सुचत नव्हतं तिला, जरा वेळाने परत बाबांचा फोन आला

" अमित आला आहे पायाला बरच लागला आहे लगेच ऑपरेशन करायची गरज आहे",.. बाबा

"डॉक्टर काय म्हटले",.. अदिती

" घे डॉक्टरांशीच बोल",..

"हॅलो डॉक्टर कसा आहे अमित?",.. अदिती

"बरच लागला आहे पायाला ऑपरेशन करावे लागेल, ऑपरेशन साठी साधारण दहा लाख रुपये लागतील, मोठे ऑपरेशन आहे तुम्ही शक्य तेवढे लवकर पैसे भरा ",.. डॉक्टर

" मी करते डॉक्टर पैशाची व्यवस्था तुम्ही ऑपरेशनला सुरुवात करा",.. अदिती

" असं लगेच नाही करता येणार ऑपरेशन, आधी औषध गोळ्या द्याव्या लागतील, टेस्ट आहेत, उद्या सकाळी होईल ऑपरेशन, त्याआधी जर तुम्ही पैशाची व्यवस्था केली तर बरं होईल ",.. डॉक्टर

"ठीक आहे मी बघते ",.. त्यांनी बाबांकडे फोन दिला

" दहा लाख रुपये लागतील अदिती काय करूया? मी बघतो कोणाशी मदत मिळते का? शेत विकु या का? ",.. बाबा खूप काळजीत होते

" लगेच होईल का तो व्यवहार बाबा? ",.. अदिती

नाही होणार..

मग कस होईल?

" आधी उधार घेवू पैसे, मग शेत विकून वापस करावे लागतील पैसे",.. बाबा

" मी पण इथे ऑफिसमध्ये विचारते पैशाचं, तुम्ही काळजी करू नका मी येते संध्याकाळच्या गाडीने घरी",.. अदिती

ठीक आहे...

🎭 Series Post

View all