प्रेम पंख ❤️... भाग 19

बाबा तुम्ही कोणत्याही गोष्टीच टेंशन घेऊ नका, जे आपल्याला नशिबात आहे ते कोणी हिरावून घेणार नाही, आपल्या मालकीची शेती राहील ना आपल्या कडे



प्रेम पंख ❤️... भाग 19

©️®️शिल्पा सुतार
........

आकाशने राहुल सरांना फोन केला, पोलिसांना फोन केला, थोड्या वेळाने पोलिस आले ते पाहणी करत होते,.. "कोणी केल हे काही अंदाज?",

"नाही सांगता येणार" ,.. आकाश

राहुल सर आले,.. "कधी झाल हे? नशिब कोणाला लागलं नाही" ,

थोडी काच फुटली होती, अविनाश माहिती देत होते,

"आकाश अविनाश तुम्ही काळजी घ्या, याची नीट चौकशी करा इंस्पेक्टर साहेब, सिक्युरिटी वाढवा",.. राहुल सर

"सी सी टी व्ही फुटेज चेक करा",.. इंस्पेक्टर

आकाश अविनाश राहुल सर आत मधे गेले

एका गाडीतून दोन मुल खाली उतरले, त्यांनी आत दगड फेकला एवढ दिसल,

" कोण आहेत हे मुल?",.. राहुल सर

"ओळखीचे नाही कोणी ",.. आकाश

गाडी नंबर लिहून घेतला, आम्ही करतो चौकशी

आकाश अविनाश घरी निघाले,.. "घरी काही नको सांगायला पूनम काळजी करेल",

"हो बरोबर जिजु",. आकाश

आकाश खूप काळजीत होता,.." नक्की हे काम निशांतच असेल, त्याला आपल्याला टेंडर मिळाल्याचा त्रास झाला असेल, पण हे आता प्रूव्ह कस करणार? आपल्याला सावध रहाव लागेल ",

रीतीका घरात डायनिंग टेबल वर बसलेली होती,.." पप्पा तुम्ही बोलले का आकाशच्या घरच्यांशी?",

"नाही अजून बोलू का मी त्यांच्याशी ",..

" हो बोलायला हव ना आपल्या बाजूने ",.. रीतीका

" मला वाटतय त्यांचा नकार आहे, ते त्या दिवशी काहीही बोलले नाही ",..

" \"कारण काय पण नकार द्यायला" ,.. रीतीका

"माहिती नाही ",..

" पप्पा तुम्ही असू द्या मीच बोलते आता आकाशशी",.. रीतीका, उद्या फोन करते त्याला,

दुसर्‍या दिवशी सगळ्यांना समजल फॅक्टरी वर कोणी तरी दगड फेकला, सुरेश रोहित यश अदिती सगळे बघत होते काय झालं ते, कोणी केल हे?

आकाश अविनाश आले, सगळे आत आले, कामाला सुरुवात झाली, काच बसवायच्या कामाला सुरुवात झाली होती, थोड्या वेळाने आकाश अविनाश सुरेश ऑर्डर आली त्या कंपनीत मीटिंगला गेले, आॅफीसची सिक्युरिटी वाढवली होती,

"कोणालाही विनाकारण आत येवू देवू नका, कोणीही समोर चहा घ्यायला जावू नका",.. आकाश

हो सर.. सगळे काळजीत होते

मीटिंग छान झाली, काय ऑर्डर असेल पुढे काय काम असतिल छान समजल, अर्ध काम या फॅक्टरीत होणार होत, अर्ध काम दुसर्‍या फॅक्टरीत तिकडे आता रोज जाव लागणार होत, ते सिक युनिट ही नीट करून घ्याव लागेल

सगळ्या कामात आता आकाश खूपच बिझी झाला होता, अदितीला बरं वाटत होतं, आकाशचे लक्ष आता माझ्यावरुन जरा इतर कामात तरी गेलं, दुपारी मोठी मिटींग होती ऑफिसमध्ये, अदिती होती त्या मीटिंगमध्ये, चार वाजता राहुल सर ऑफिसमध्ये आले

अदितीला हिशोबाचं फाईल घेऊन आत बोलवल, आदिती सगळं प्रेझेंटेशन करत होती, खूप छान झाला आहे रिपोर्ट,. "तू एकटीने सगळं केलं का हे काम?",..

"हो सर",.. अदिती

"हे काम चार-पाच लोकांच आहे, एवढ्या थोड्या वेळात संपवलं म्हणजे खूपच हुशार दिसते आहेस तू, ठीक आहे तुझं काम झालं आहे",.. राहुल सर

अदिती बाहेर गेली

आकाश अविनाश त्यांच्याशी राहुल सर बजेट बद्दल डिस्कस करत होते, इथलं बजेटचं काम झालं असेल तर थोडे दिवस अदितीला मेन ऑफिसला पाठवा, तिकडेही खूप अकाउंटच काम पेंडींग आहे, तिचं काम छान दिसत आहे, तिच्याबरोबर बाकीची लोक काम करतील, व्यवस्थित काम होईल, आणि त्या दुसर्‍या फॅक्टरीचा काय हिशोब आहे एकदा बघून घ्या, बंद आहे ती कंपनी तिथला वर्क शॉप लागेल आपल्याला, तो ही खर्च हिशोबात धरा,

"हो तिकडे ही काम सुरू झाल आहे ",.. अविनाश

आकाशचा चेहरा बदलला होता, काहीही सांगा पण अदितीला नको होत तिकडे बोलवायला, पप्पांना काय बोलणार पण, अविनाश आकाश कडे बघत होता, झाल आकाशचा मूड गेला आता

" ठीक आहे पप्पा तुम्ही सांगा कधीपासून पाठवायच अदितीला तिकडे",.. आकाश

" रेग्युलर अकाऊंटच काम होत नीट मेन ऑफिस मध्ये, पण ओल्ड अकाऊंट अस नीट व्हायला हव, अदिती लकी आहे तिने काम केल एवढी मोठी ऑर्डर आली",.. राहुल सर

आकाश खुश होता खरच मला अदिती लकी आहे, ती आली आणि किती कामाने वेग पकडला, मला ही छान वाटत ऑफिस मध्ये

अविनाश बाहेर आले,

राहुल सर कामा संदर्भात बोलत होते, आकाश लिहून घेत होता,

संध्याकाळी यश त्याचा एकटा घरी निघून गेला, जरा वेळाने अदिती निघाली, खूपच एकटं वाटत होतं तिला बस स्टॉप वर, काय करणार पण, इथे प्रत्येकालाच राग येतो, आधी आकाशला राग आला, मग यशला राग आला, माझ्या रागाचं काय? मला राग येऊ शकत नाही का? बाॅन्ड साईन केला आहे ना जाऊदे, गरज आपल्याला आहे, जास्त विचार करण्यात अर्थ नाही, यश वर घरी जाण्यासाठी अवलंबून नको रहायला, त्याचा आपला तसा काहीही संबंध नाही, जावू आपण आपल आपल,

राहुल सर म्हणत होते की तिकडे अकाउंट ठीक करायच आहे, बरं होईल थोडे दिवस तिकडे जावे लागेल तर, बघू आता पूर्ण दिवसच तिकडे जायचं की मधला थोडा वेळ ईकडे यायच

अदिती रूम वर आली अनुला ती ऑफिस मध्ये काय काय झालं ते सांगत होती,.. "मला काही वेळेस मेन ब्रांचला थोडे दिवस यावे लागणार आहे" ,.. अनु आणि तिला खूप आनंद झाला होता

" आकाश ठीक आहे का ग आता? ",.. अनु

" हो आता तो बिझी झाला आहे त्यामुळे बरं आहे नाहीतर उगीच त्रास देत राहतो, ऑफिस मधे चिडतो सगळ्यांवर ",.. अदिती

कठिण आहे..

" घरी कधी जायचं आहे आपण",.. अदिती

" माहिती नाही यावेळी काय झालं आहे तुला अदिती? कॉलेजमध्ये काय आपण दोन दोन महिने घरी जायचो नाही",.. अनु

"ऑफिसमध्ये बोर होत, कोणी सोबत नाही, तू नाही प्रिया नाही मनीषा नाही, नुसतं आपलं प्रॅक्टिकल लाईफ असं वाटत आहे की मी खूप दोन वर्षे झाले घरी गेली नाही, कॉलेजला होतो तेच बर होत ",.. अदिती

" हो बरोबर आहे असंच वाटतं आहे घरच्यांची आठवण येते गं खूप ",.. अनु

अविनाश घरी आले दोघी आजी घरी आलेल्या होत्या, विकी पूनम खुश होत्या

" आकाश कुठे आहे? ",.. आजी

" आज त्याला खूप काम होतं त्यामुळे तो तिकडेच फ्लॅटवर राहणार आहे ",.. अविनाश

" काय झालं",.. आजी

" नवीन ऑर्डर मिळाली आहे ना तर त्याला तिकडे राहुल सरांनी बोलवून घेतलं मीटिंग साठी, मी घरी आलो",.. अविनाश

आकाश फ्लॅट वर आला रात्री बराच वेळ काम सुरू होत आकाशच, त्याला निशांतचा फोन आला, अभिनंदन आकाश

थॅन्क्स निशांत

"सुरु झाल का काम ऑर्डरच",. निशांत

नाही अजून..

" जमणार नाही तुम्हाला, ऑर्डर मोठी आहे, त्यात तुला अजिबात कामाचा अनुभव नाही, मला अस वाटत तुम्ही नका घेवू ही ऑर्डर आम्हाला द्या",.. निशांत

म्हणजे काय?

"तुम्ही आम्हाला पास ऑन करा ऑर्डर, मी देतो तुम्हाला ऑर्डरच्या प्रॉफिट एवढे पैसे ",.. निशांत

" काही गरज नाही निशांत, पैसे नको मला काम करायच आहे, तुझे काय उद्योग सुरू आहेत ते माहिती आहे मला, आमच नाव घ्यायच नाही, अश्या भरपूर ऑर्डर हॅन्डल केल्या आहेत आम्ही आधी ",.. आकाश

" आमच्या कडे या ऑर्डर ची पूर्ण तयारी होती, फास्ट पूर्ण करावी लागते ऑर्डर नाही तरी शिक्षा होते ",. निशांत

"माहिती आहे आम्हाला थँक्स फॉर दी अपडेट ",.. आकाश

निशांतने फोन ठेवला,

" आगावू दिसतोय हा निशांत, मुद्दाम त्रास देईल आता आपल्याला, गुंड आहे हा ",.. आकाश विचार करत होता

काम खूप जोरात सुरू झालं होतं अदिती पण बाकीच्या सगळ्या मुलांना मदत करत होती

अदितीला मेन ऑफिसला पाठवायला सांगितल, आकाश नव्हता ऑफिस मध्ये तो दुसर्‍या फॅक्टरी गेलेला होता, आदिती तीच सामान घेवून मेन ऑफिसला गेली, राहुल सरांनी मॅनेजरला आत बोलवलं, हिला जून अकाऊंटच काम छान जमत , अदिती तुम्ही तुमच्या सोबत कोण हव ते घ्या, काम सुरू करा आठवड्यातून तीन दिवस इकडे येत जा, म्हणजे तिकडेच काम थांबणार नाही

" ठीक आहे सर",.. अदिती

अनु हवी मला सोबत,

"ठीक आहे मिस अनु तुम्ही अदिती येतील तेव्हा त्यांच्या सोबत काम करा ",.. मॅनेजर

त्यांनी अदितीला बसायच टेबल, फाइल सगळ दाखवल

आकाश वापस आला, अदिती जागेवर नव्हती, अविनाश सर आत आले ते त्या फॅक्टरी बद्दल विचारत होते, मीटिंग झाली,.." जिजु आदिती कुठे आहे", ?

" तिला राहुल सरांनी मेन ऑफिस मध्ये बोलवलं आज ",.. अविनाश

" किती दिवस?, इथल्या कामाच की होईल मग? ",.. आकाश

"ते मला काय माहिती",.. अविनाश बाहेर गेले

"काय हे अस किती बोर होत इथे, काहीही करून अदिती परत इकडे यायला हवी",.. आकाश

त्यांनी मेन ऑफिस मधे फोन लावला, मॅनेजर होते

" अदिती आली का तिकडे? कोणी बोलावलं तिला तिकडे? इकडच्या कामाच काय? एवढ मोठ ऑफिस आहे ते, चांगले काम करणारे नाहीत का तिकडे कोणी ? ",.. आकाश

राहुल सरांनी सांगितल,

" ठीक आहे आहे ते काम पूर्ण करू घ्या, अदिती जे काम करते आहे त्या साठी दुसर्‍याला घ्या अदितीला दोन दिवसात इकडे पाठवा, दुसर्‍या फॅक्टरीच ही काम आहे इकडे ",.. आकाश

हो सर

अदिती अनु खूप खुश होत्या, जोरात काम सुरू झाल त्यांच, अजून एक प्रीती त्यांच्या सोबत होती, त्यांनी काम वाटून घेतल, सगळ्याच हुशार त्या ,

" खूप छान वाटतय आज अनु तुझ्या सोबत, इथे आधी कोण होत अकाऊंट सांभाळायला काय माहिती? किती चुका आहेत कामात ",.. अदिती

हो ना

"हे जून अकाऊंट कोणी नीट करत नाही चालू हिशोब बघायला बरेच लोक आहेत",.. प्रिति

"किचकट आहे हे काम पण इंटरेस्टिंग आहे",... अदिती

अदिती ऑफिस मधे नव्हती तर सगळ्यांना बोर होतं होत, बरेच मुल सुरेशला विचारात होते अदिती कुठे आहे? , यश बघत होता, आदितीची ट्रान्सफर झाल की काय, त्याने बाकीच्या मुलांना विचारल,.. आदिती मेन ब्रँचला गेली काम होत थोड

राहुल सरांनी आकाशला बोलवलं मीटिंग साठी, तो खूप खुश होता, ऑफिस मध्ये पोहोचला, केबिन मधे मीटिंग सुरू होती, मीटिंग झाली, अदिती कुठे असेल? , राहुल सर खूप बोलत होते, त्यांनी ऑर्डर साठी शेड्यूल्ड छान सेट करून दिल,.. "लागा आता जोरात कामाला काळजी करू नका",

"हो पप्पा, निशांतचा धमकीचा फोन आला होता म्हणत होता ऑर्डर आम्हाला द्या",.. आकाश

"मुद्दाम करतात हे असे लोक, आपण व्यवस्थित करू हे काम आपल्या साठी काही हे नवीन नाही, या पेक्षा मोठ्या मोठ्या ऑर्डर आपण कायम पूर्ण करतो" ,.. राहुल सर

आकाश बाहेर आला, आदिती कुठे आहे? विचारणार कोणाला पण, अनु दिसत नाही, मॅनेजर समोर आले,

" आमच्या ऑफिसची अदिती कुठे आहे? थोड काम होत तिच्याकडे",.. आकाश

सर तिकडे..

आकाश आत गेला, अदिती, अनु, प्रीती तिघी काम करत होत्या

" हाय सर तिघी उभ्या राहिल्या",

"बसा.. काय अस? झाल का काम अदिती?, अस मला न विचारता तूम्ही इकडे आल्या कश्या?, आपल्या ऑफिसच्या कामाच काय? ",.. आकाश

"अविनाश सरांना सांगितल येतांना, मेन ऑफिस मधून फोन आला होता ..",.. अदिती

" लवकर करा हे काम आपल्या ऑफिस मधे या एक दोन दिवसात " ,.. आकाश

मॅनेजर आत आले

"अदिती या दोघींना काम दाखवून द्या, दोन दिवसात तिकडे जॉईन व्हा ",.. आकाश

" हो सर मी लक्ष देतो",.. मॅनेजर

" चहा घ्यायचा का अदिती अनु? ",.. आकाश

" ही प्रीती आहे ",.. अनु

हाय प्रीती

हॅलो सर

" नको आम्ही काम करतो आहोत ",.. अदिती

" चला जावू.. येवू दहा मिनिटात",.. आकाश

" नाही, इथले सर ओरडतील ",.. अदिती

आकाश हसत होता,.." ठीक आहे, तुला यायच नाही माझ्या सोबत अदिती, काही करू शकत नाही मी, बघ अनु जरा ",

आकाश निघाला, तो चिडला होता, अनु प्रीती.. अदिती कडे बघत होत्या

"काय आहे? काम करा ग, नका काहीही विचार करू",.. अदिती

संध्याकाळी त्या घरी यायला निघाल्या, खूप छान वाटत आज अदिती तू आहे सोबत तर, प्रीती गेली बस स्टॉप वर

" चल आज पाणी पुरी खाऊ मस्त ",.. दोघी एन्जॉय करत होत्या

"आकाश चांगलाच मागे लागलाय तुझ्या",.. अनु

"हो मग काय करू मी आता, अस करतो तो सारख मागे मागे ",.. अदिती

किती क्यूट..

"क्यूट काय त्यात अनु, मला टेंशन येत ग, सगळे बघतात इथे ही मॅनेजर सर बघत होते, त्यांनी राहुल सरांना सांगितल तर जाईल माझी नौकरी",.. अदिती

" पण त्यांचा विरोध असेल कश्या वरून",.. अनु

" टीव्हीत बघतो ना आपण ते घरच्यांनी श्रीमंत स्थळ बघितल असत, हीरो गरीब मुलीशी लग्न करतो त्या टाइप",.. अदिती

" तू काहीही विचार करतेस अदिती ",.. अनु

" मला नको आहे हे अस, थोडे दिवस नीट काम करायच आहे ",.. अदिती

घरून मिस कॉल आलेला होता, रूम वर गेल्यावर अदितीने घरी फोन केला

"आज उशीर झाला का घरी यायला अदिती? ",.. बाबा

" हो बाबा अनु सोबत होती मी मेन ब्रँचला",.. अदिती

" उद्या कोर्टाची तारीख आहे, शेतीसाठी, बहुतेक ती केस आपण हरू, ",...( त्यांच्या चुलत भावाने मोठा वाटा मागत केस केली होती)

"बाबा तुम्ही कोणत्याही गोष्टीच टेंशन घेऊ नका, जे आपल्याला नशिबात आहे ते कोणी हिरावून घेणार नाही, आपल्या मालकीची शेती राहील ना आपल्या कडे? ",..अदिती

" हो ती राहील ",.. बाबा

" ठीक आहे मग अजिबात काळजी करू नका, काळजी केल्याने काय होणार आहे? उगीच तब्येतीवर परिणाम नका करून घेवू नका, एक तर मी तिथे नाही, आई अमित काळजीत राहतात, अस करु नका, आई अमित कसे आहेत",.. अदिती

"ठीक आहेत ते, नाही करणार मी काळजी",.. बाबांनी फोन ठेवला, आता अदीतीला खूप काळजी वाटत होती, दिवसेंदिवस शेती लहानच होत चालली, घर खर्च वाढत चालला आहे, मी अमित दोघे मोठे होत आहोत, अमितच्या शिक्षणाचा खर्च आहे, कसं होणार सगळं?

आई-बाबांचही वय होत चाललं आहे, त्यांच्याकडे लक्ष द्यावे लागेल, बाबा आता हल्ली छोट्या छोट्या गोष्टीच खूप टेन्शन घेतात, आता तर तिला खूपच घरी जावं असं वाटत होतं,

"काय झालं ग अदिती घरी काही टेन्शन आहे का?",.. अनु

"हो ग तेच प्रॉपर्टी मॅटर",.. अदिती

"शेताच काय झालं नक्की?",.. अनु

"माझ्या आजोबांचं मोठं शेत होतं त्यात चुलत काका म्हणताहेत की ते त्यांनी त्यांच्या वडिलांकडून चालवायला घेतलं होतं, आमचं वापस करा, त्यासाठी त्यांनी कोर्टात धाव घेतली, बहुतेक आम्ही बहुतेक ती केस हरू, ते शेत त्यांचं होतं त्यामुळे बाबांना टेन्शन आलं आहे, घरच उत्पन्न दिवसेंदिवस कमी होत चाललं आहे ग, काय करू एक एक प्रॉब्लेम आहे, माझ काही इथे असं खूप विशेष छान सुरू नाही, आई बाबा काळजीत असतात",.. अदिती

" सगळीकडे सारखीच परिस्थिती आहे गं, तू नको जास्त विचार करू",.. अनु

🎭 Series Post

View all