प्रेम पंख ❤️... भाग 18

जरा वेळाने राहुल सर ऑफिसमध्ये आले, सगळे आनंदात होते, त्यांनी मिठाई आणली होती, छान काम केलं आहे आकाश अविनाश तुम्ही, तुमची पहिली ऑर्डर छान कामाला लागा


प्रेम पंख ❤️... भाग 18

©️®️शिल्पा सुतार
........

अदिती बाहेर निघून गेली, तिच्या डोळ्यात पाणी होत, तिने कंट्रोल केल स्वतःला, सगळ्यांना समजल की अदितीला आकाश सरांनी खूप रागवल आहे, पण आता बोलणार कसं? कारण आकाश सरांची केबिन समोर होती, दुरूनच सुरेश विचारत होता काय झालं?.. अदितीने मानेनेच काही नाही सांगितलं

अदितीला खूपच राग आला होता आकाशचा, माझ्यामुळे यशच नुकसान नको व्हायला, काय करू कोणाशी जास्त बोलायला नको आपण, आपलं काम भलं न आपण भलं

यशने मोबाईल वरून मेसेज केला,.. "काय झालं अदिती?",

"काही नाही यश ",.. अदिती

"आकाश सर रागवले का? ",.. यश

"हो खूप",.. अदिती

"का पण, तू रडते का, मी येवू का तिकडे ",. यश

"माझ काम नीट नव्हत म्हणून रागवले, नको येवू तू इकडे , मी करते काम बाय",.. अदिती

लंच ब्रेक मध्ये सगळे अदितीच्या आजूबाजूला जमले होते, आदिती गप्प होती,

"काय झालं अदिती सांग ना, काय बोलले तुला सर ",.. यश

"काही नाही कामाबाबतीतच होतं, मी वर्क शॉप कडे नव्हत यायला हव, त्यांनी काम दिल होत मला, मी वेळेवर पूर्ण नाही केल, गप्पा मारत बसली, ओरडणारच ना मग ",.. अदिती

सगळे जेवत होते अदिती गप्प होती जेवण झाल्यावर ती तिच्या जागेवर निघून गेली, आज ती चहा घ्यायलाही गेली नाही,

तिचं काम पूर्ण झालं, आकाशच्या केबिनमध्ये ती गेली, केलेलं काम दाखवलं, अविनाश सर तिथे होते, अविनाश आकाश डिस्कस करत होते किती बॅलन्स आहे,

"एकदा समजावून सांग अदिती हा हिशोब कसा काय लागला? ",.. अविनाश

अदितीने बाहेर जाऊन फाईल आणल्या, ती त्यातून कुठला हिशोब कसा घेतला आहे ते समजावुन सांगत होती

" ठीक आहे तो पेपर तिथेच ठेवून बाकीच्या फाईल घेऊन जा",..अविनाश

अदिती बाहेर निघून गेली

"काय झालं हिला? एवढी गप्प, रडली का ही? ",.. अविनाश

आकाश काही बोलला नाही

" तू बोलला का हिला आकाश? ",.. अविनाश

"हो.. मी ओरडलो हिला",.आकाश

"काय? का पण? नको अस करत जावू ",..अविनाश

"नुसती मुलांसोबत गप्पा मारत बसते ती, तिला सांगितल काम पूर्ण कर ",.. आकाश

"खूप शांत झाली ही, नको बोलत जावू तिला ",.. अविनाश बाहेर गेले

आकाशला खूप कसंतरी वाटत होतं, उगाच ओरडलो अदितीला, किती गप्प बसून काम करते आहे, जाऊदे पण बरं झालं सारखं ती आणि तो यश बोलत असतात, मला नाही आवडत

" काय झालं अदिती ",.. अविनाश

" काही नाही सर",.. अदिती

" आकाशचा राग आला का? ",.. अविनाश

"नाही.. सर बरोबर बोलता आहेत, मी माझ काम सोडून इकडे तिकडे नको करायला",.. अदिती

"तू ठीक आहेस ना",.. अविनाश

हो

"मग काही प्रॉब्लेम नाही, कॅरी ऑन युवर वर्क",.. अविनाश

संध्याकाळ झाली, आदितीने शिपाई काकांना सगळ्या फाईल कपाटात ठेवायला सांगितल्या, आकाशला वाटलं होतं की अदिती फाईल घेऊन येईन मग तिच्याशी बोलता येईल

" या फाईल कुठे ठेवायच्या आहेत साहेब? ",.. काका केबिन मधे आले

"कुणी सांगितलं तुम्हाला हे काम काका ",.. आकाश

अदिती मॅडम

" त्यांनाच विचारा मग",.. आकाश

शिपाई काका बाहेर गेले,.. "मॅडम फाईल कुठल्या कपाटात ठेवायच्या",

अदिती बाकीच्या फाईल घेऊन आत मध्ये आली, ती आणि काका त्या फाईल कपाटात ठेवत होत्या, दोघे जात होते

" अदिती एक मिनिट ",.. आकाश

शिपाई काका गेले

"सॉरी अदिती उगीच चिडलो तुझ्यावर एवढं, नाही काढणार मी यशला ऑफिस मधून, तू काळजी करू नकोस, तू बोल सगळ्यांशी, प्लीज इतर वेळी कामाशी काम ठेवायच",.. आकाश

आदिती काही बोलली नाही, ती बाहेर निघून गेली, तिने तिच सामान घेतलं ती बस स्टॉप वर आली, आज यश सोबत नव्हता, यश बाहेर आला, आदिती जागेवर नव्हती त्याने बस स्टॉप वर बघितल, अदिती उभी होती तो पळत बाहेर गेला लांबूनच त्याने तिला थांब सांगितल,.." आज माझ्यासाठी का नाही थांबली अदिती? ",..

" अरे मला वाटलं तू काम करतो आहेस माझं काम झालं मग मी चालली होती घरी, असं काही नाही ना की रोज सोबतच घरी जायला पाहिजे",.. अदिती

" अरे पण आता विशेष काम नाही तर आपण जाऊ शकतो ना सोबत घरी ",.. यश

झालं म्हणजे आता जर हा आकाश आतून बघत असेल आमच्याकडे तर तो परत चिडेल

" काय झालं आहे आदिती खरं सांग? आज काय म्हटले तुला आकाश सर? जास्त बोलले का? ",.. यश

" ते सगळं कामाबाबतीतच होतं आणि त्यांचं बरोबर होतं माझं काम चुकलं होतं आणि उशीर होत होता, मी काम करायचं सोडून तुमच्या सगळ्यांशी बोलत होती, मला काही प्रॉब्लेम नाही",.. अदिती

"तू माझ्यापासून काहीतरी लपवते आहे अदिती ",.. यश

" नाही यश असं काही नाही ",.. अदिती

" एवढी का गप्प झाली आहे मग दुपारपासून ",.. यश

" काही नाही रे कामाची सवय नाही डोकं दुखतं माझं",.. अदिती

बस आली दोघेजण घरी गेले, रूम मध्ये गेल्यानंतरही अदिती बराच वेळ नुसतीच कॉटवर लोळून होती, काही खरं नाही माझं, हा आकाश जास्तच करतो, खूप पझेसिव्ह आहे तो, माझ्यामुळे यशच नुकसान नको व्हायला

अनु आली,.. "अरे वा आज लवकर सुटका झाली तुझी ऑफिस मधून",

" अनु मला मेन ऑफिस मध्ये यायचं आहे, तू मागे बोलली होती ना की तू रिक्वेस्ट करशील, तू बोलली का तिथल्या मॅनेजर शी, ट्रान्सफर होईल का? ",.. अदिती

"कसला खडूस आहे तो मॅनेजर खूप बोलतो तो आम्हाला, काही येऊ नको मेन ब्रांचला" ,.. अनु

"काय झालं?",.. अदिती

"अजिबात शांती नाही ग, आम्ही काहीही काम केल तरी ओरडतात, आम्हाला खूप बोलतात ते सर, तुला काय प्रॉब्लेम आहे तिकडे, आकाश आहे तुझ्या सोबत? ",..अनु

" आकाशही इकडे खूप रागवतो मला, कंटाळा येतो ग ऑफिसमध्ये, सारखं आपल तो म्हणेल तेच करावं लागतं, याच्याशी बोलू नको त्याच्याशी बोलु नको अस करतो तो",.. अदिती

" का अस करतो तो? ",.. अनु

" माहिती नाही बहुतेक सगळ्यांना ओरडत असेल, मला जास्त राग आला, असा राग नको धरायला कामाशी काम ठेवायला हव मी ही",.. अदिती

" आमची ही परिस्थिती तीच आहे बहुतेक हेच प्रॅक्टिकल लाईफ आहे",.. अनु

" काय करावं आता",.. अदिती

" काही नाही जिथे आहे तिथेच नीट काम करा, बाॅन्ड ही साईन करून ठेवला आपण तीन वर्षाचा ",.. अनु

हो ना..

" आकाश जास्त बोलला का तुला ",.. अनु

" हो खूप बोलला तो मला, ऑफिसमध्ये काम करायला येते की गप्पा मारायला वगैरे खूपच, कोणाशीच बोलायचं नाही का ऑफिसमध्ये? कामच करत रहायच मला नाही आवडत तिकडे ",.. अदिती

"तू कुणाशी बोलत होती",.. अनु

"यश शी बोलत होती ",.. अदिती

" म्हणजे तू यश शी बोलली की आकाशला राग येतो",.. अनु

" हो काल तेच संगत होती ना मी तुला, चांगला आहे ग यश, त्याच्याशी बोलायला काय प्रॉब्लेम आहे, एवढं चिडण्यासारखं काय आहे त्यात, त्या यशला मी काय सांगणार आहे आता की माझ्याशी बोलू नको, साधा आहे ग तो, त्याला जॉब वरून काढेन नाहीतर हा आकाश ",.. अदिती

" अग अस काही करणार नाही आकाश, तुला घाबरवायला बोलत असेल ",.. अनु

" का पण अस, मी सहज बोलते यश सोबत, जावू दे मी आता सगळ्यांशीच कमी बोलणार आहे म्हणजे फक्त यश शी बोलत नाही असं वाटणार नाही ",..अदिती

" काय सुरू आहे तुमचं हे असं? ",. अनु

" मलाही माहिती नाही काय चालू आहे",.. अदिती

घरून फोन आला अमित बराच वेळ बोलत होता, आई-बाबांशी बोलल्यानंतर अदितीला बरं वाटलं,

" आपण दोन दिवस घरी जायच का अनु? ",.. अदिती

" अजून नीट महिना झाला नाही इकडे येवून, पगार झाला नाही, कस जाणार अदिती? परत सुट्टी होईल एका दिवसाची",.. अनु

" ठीक आहे, जावू दे, आई बाबांची खूप आठवण येते आहे पण ",.. अदिती

आकाश अविनाश घरी आले आकाश आजींशी फोनवर बोलत होता, अविनाश पुनम रूम मध्ये आले

"काय म्हणत ऑफिसचं वातावरण? कशी आहे अदिती? ",..पूनम

" अदिती तर खूप छान आहे, खूप हुशार आहे ती मनमिळाऊ आहे, पण हे आपले आकाश साहेबच तिच्यावर आज खूप चिडले होते",.. अविनाश

"चक्क आकाश तिच्यावर चिडला",.. पूनम

"हो खूपच बोलला तिला, बिचारी गप्प बसून काम करत होती, बहुतेक रडली असेल",.. अविनाश

" काय झालं होतं एवढं?, आकाश किती चांगला आहे, का बोलला ",.. पूनम

" ऑफिस मधे चालत ग थोडफार, खूप स्ट्रेस असतो, निघतो कधी कधी राग कोणावर, त्यात अदिती ऑफिस मधल्या बाकीच्या मुलांशी बोलली की याला राग येतो ",.. अविनाश

" बापरे, अस आहे का, मला तर म्हटला होता आकाश की मला तिच्याशी काही लग्न करायचं नाही मग का असं करतो, याला ती आवडते म्हणजे ",.. पूनम

" करायचं असेल त्याला लग्न तिच्याशी पण आपल्याला सांगत नसेल",.. अविनाश

" बरोबर आहे, नक्की काय चाललं आहे आकाशच माहिती नाही",.. पूनम

सगळ्यांचे जेवण झाल, कोणीच काही म्हटलं नाही, आकाशने लवकरच वरती जाऊन झोपून घेतलं,

मध्ये दोन-तीन दिवस गेले, अदिती तिच्या तिच्या कामात होती, तिने ऑफिसमध्ये सगळ्यांशी बोलणं एकदम कमी करून टाकलं होतं, ती तिच्या जागेवरच बसून राहायची, कंटाळा आला तर थोड्यावेळ बाहेर जाऊन बसत होती एकटी, अजिबात ऑफिस मधल्या मुलांशी जास्त बोलायचं नाही अस ठरवल होत तिने

यश सुरेश रोहित सगळे विचारत होते काय झालं अदिती? , तिने सांगितल नाही,

आकाश बघत होता, शांत झाला होता तो जरा,

आज टेंडरचा रिझल्ट लागणार होता दुपारी तीन वाजता, ऑफिस मध्ये सगळे टेन्शनमध्ये होते, काय होईल काय माहिती? आज जवळपास सगळ्यांचं काम दुपारनंतर बंद होतं, अविनाश सर आकाश दोघं टेन्शनमध्ये होते, राहुल सरांचा सकाळपासून बऱ्याच वेळा फोन येऊन गेला होता, काय होत काय माहिती?

जरा वेळाने फोन आला, आकाश खूप खुश होता त्याने आधी अविनाशला बातमी सांगितली, राहुल सरांना फोन केला तो बाहेर आला, सगळे गोळा झाले,

"अदिती सुरेश रोहित खूप छान काम केल तुम्ही, टेंडर आपल्यालाच मिळाल आहे, अभिनंदन" ,.. आकाश

सगळे आनंदात होते,

"आता आपली जबाबदारी खूप वाढली आहे, खूप काम कराव लागेल सगळ्यांना",.. आकाश

अविनाश सरांना तर खूप आनंद झाला होता, त्यांना अजिबात मेन ऑफिसला वापस जायचं नव्हतं, इथल काम वाढलं बर झाल

सगळे येउन आकाश आणि अविनाश सरांना काँग्रॅच्युलेशन करत होते, आकाश अदितीची वाट बघत होता, ती आत आली नाही, आकाशशी बोलायच नाही या पुढे, कामाशी काम ठेवू, ती अविनाश सरांशी बोलत होती बर्‍याच वेळ

शेवटी आकाशने अदितीला आत बोलवलं,.. "आदिती रागावली का तू अजून? ",

"नाही सर काय झालं ",.. अदिती

"आज मी खूप खुश आहे अदिती, आपल्याला आपल पहिल टेंडर मिळाल, ते ही तुझ्या मुळे, छान सुरुवात झाली आपली " ,.. आकाश

अदिती समजली काय म्हणतोय हा, आपली ऑर्डर म्हणजे काय?, जावू दे करू दे याला मागे मागे, आपण कामाशी काम ठेवू,.... खूप अभिनंदन सर

" अदिती माझ्या मनात काही नाही, सॉरी, उगीच चिडलो मी असा नाही, तु अशी गप्प बसू नको ",.. आकाश

" मी जावू का सर?", ... अदिती बाहेर आली

सगळे शॉप मधे जमले होते

" आज आपण सगळ्यांनी छान एन्जॉय करू उद्यापासून काम आहे उद्यापासून मिटींगला सुरू होतील",.. अविनाश

जरा वेळाने राहुल सर ऑफिसमध्ये आले, सगळे आनंदात होते, त्यांनी मिठाई आणली होती, छान काम केलं आहे आकाश अविनाश तुम्ही, तुमची पहिली ऑर्डर छान कामाला लागा, मी खूप हॅप्पी आहे तुमच्यासाठी, त्यांनी वर्कशॉप मध्ये चक्कर मारली, स्वच्छ आणि छान वाटतं आहे तुमच वर्कशॉप, सगळ्यांना येऊन भेटत होते, ते अदिती जवळ आले,.. "तू एकटी मुलगी आहेस ना इथे? " ,

हो सर..

" छान काम करते आहेस तू सगळे काळजी घेतात ना तुझी",.. राहुल सर

हो सर काहीच प्रॉब्लेम नाही ",.. बोलू का मेन ऑफिसच, नको जावू दे आकाश सोडणार नाही मला इथून, उगीच सर विचारतील काय प्रोब्लेम आहे इथे",..

"काही लागलं तर सांग",.. राहुल सर

हो सर..

राहुल सर आकाशच्या केबिन मध्ये येऊन बसले

" अरे त्या रितिकाच्या वडिलांचा खूप फोन येतो आहे काय सांगायचं आहे त्यांना ",.. राहुल सर

" पप्पा आज नको ना तो विषय ",.. आकाश

" अरे पण केव्हा ना केव्हा सांगावच लागेल",... राहुल सर

" माझा नकार आहे त्यांना स्पष्ट सांगून द्या की आकाश नाही म्हटला, मी बघीन मग काय करायचं ते नाही तर त्यांना मला फोन करायला सांगा, तुम्ही यात पडू नका ",.. आकाश

"ठीक आहे मी सांगून देतो त्यांना",.. राहुल सर

जरा वेळाने मोना मॅडम आल्या, त्या येऊन सगळ्यांना भेटल्या, बऱ्याच वेळ त्या अदितीशी बोलत होत्या,

बाहेरून चहा नाश्ता आला सगळे बाहेर छान बोलत होते अदिती पण त्यांच्या तर रमली, तिथूनच राहुल सर मोना मॅडम घरी गेले

आकाश आत मध्ये काय काय काम करायचं त्याची लिस्ट करत होता, सुरेश सोबत होता,

"लगेच कामाला लागावं लागेल, जी ऑर्डर मिळाली आहे त्याचा शेड्युल येईल त्याप्रमाणे भरपूर काम असेल आता सुरेश, तुम्ही लक्ष द्या ",.. आकाश

हो सर...

"अविनाश सर कुठे आहेत? ",... आकाश

"ते शॉप मध्ये आहेत",.. सुरेश

अदिती यश घरी यायला निघाले, यश चल,

"तू जा अदिती ",.. यश

" काय झालं? आता चल ना",.. अदिती

दोघ बस स्टॉप वर आले , यश गप्प होता,.." यश आता काय झालं तुला? ",

" काही नाही तू का बोलत नाही हे माहिती आहे मला , आपण नको सोबत यायला माझ्या मुळे तुला ओरडले सर ",.. यश

" कोणी सांगितल?, काहीही तुझ यश",.. अदिती

"हो अस आहे मला सुरेश सांगत होता ",.. यश

"नाही यश अस काही नाही",.. अदिती

"उद्या पासून तू तुझी ये अदिती, आपण सोबत घरी नको जायला ",.. यश

" काय अस यश? हे ऑफिस बोर झाल आहे आता, जा नको बोलू ",.. अदिती

अदिती रूम आली, तिचा चेहरा उतरला होता,

" आता आज काय झाल अदिती? ",.. अनु

" काही नाही यश रुसला आता ",.. अदिती

" कोणी ना कोणी रुसायला हव का रोज ",.. अनु

" हो तस आहे माझ एक झाल की एक ",.. अदिती

" त्याला समजल बहुतेक आकाश चिडला आहे ",.. अनु

" हो समजल, तो आता माझ्या सोबत येणार नाही घरी येतांना ",.. अदिती

जावू दे..

"हो ना कोणा कोणाच टेंशन घेवु आता मी",.. अदिती

काम झाल, अविनाश आकाश घरी यायला निघाले, ते कार मधे बसत होते, कोणी तरी शॉपच्या दिशेने दगड फेकला, तो तिथे पत्राला लागला, तिथून आतल्या काचेला लागला, मोठा आवाज झाला, आकाश अविनाश घाबरले, सिक्युरिटी गार्ड पळत आले, बाहेर जावुन बघितल कोणी नव्हत.







🎭 Series Post

View all