प्रेम पंख ❤️... भाग 17

ऑफिसमध्ये कशाला येतेस तू अदिती? काम करायला ना? , सदोदित त्या यश सोबत गप्पा मारत असते, तुला तुझ्या कामाशी काम नाही ठेवता येत का?


प्रेम पंख ❤️... भाग 17

©️®️शिल्पा सुतार
........

आकाश जेवत होता त्याचा मूड ऑफ़ होता

"काय झाल आकाश?",.. अविनाश

"काही नाही जिजू",.. आकाश

"चेहरा का अस करुन घेतला आहेस, राहुल सर काही बोलले का? ",.. अविनाश

" नाही.. मीटिंग चांगली झाली तिकडे ",.. आकाश

"मग काय झाल? ",.. अविनाश

" काही नाही थकलो आहे मी",.. आकाश

"घरी जातो का तू, जा आराम कर, मी आहे इथे, नाहीतरी टेंडरच काम झाल आहे आता दोन तीन दिवस आराम आहे",.. अविनाश

" नाही मी ठीक आहे, खूप काम बाकी आहे, वर्क शॉप नीट करून घेवू, जर टेंडर जिंकलो तर खूप धावपळ होईल सगळ्या ऑर्डरची आणि कामाची ही",.. आकाश

" बरोबर बोलतो आहेस तू सगळ्या मशीन नीट आहे का बघून घेऊ",.. अविनाश

"आपल्या कंपनीच्या बॅलन्स शीट मधे किती प्रॉफिट अँड लॉस आहे हे सगळ काम अदितीला देऊन टाका, किती पैसे लागतील पुढे तसं आपल्याला राहुल सरांना सांगावं लागणार आहे, त्यांनी अल्टिमेटम दिलं आहे की जर अजूनही सहा महिने हे युनिट असंच लॉस मध्ये चालू राहिलं तर हे सगळं बंद करून आपल्याला मेन ब्रांचला जावं लागेल",.. आकाश

" बापरे नको इथेच भरपूर काम करून हे युनिट आपण नीट करू व त्यासाठी मी खूप मेहनत करेन, हे टेंडर जिंकणं आणि ऑर्डर मिळण खूप महत्त्वाचा आहे",.. अविनाश

"ऑफिस मधल्या मुलांची जरा वेळाने मीटिंग घ्या तुम्ही आणि सगळ्यांना वर्कशॉप मध्ये कामाला लावा",.. आकाश

ठीक आहे

ऑफिसमधले बरेच बॉईज इंजिनियर होते त्या सगळ्यांची मीटिंग अविनाश सरांबरोबर सुरू झाली, अदितीला आकाशने आत मध्ये बोलवलं

अदिती समोर येऊन बसली,.. हॅलो सर

आकाश तिच्या कडे बघत होता,.." हाय अदिती.. संपला का लंच ब्रेक? ",

हो सर..

अच्छा म्हणजे याला मी इतर मुलांसोबत आरामात बसुन जेवत होते, याचा राग आला आहे, तिला हसू आल

"आपल्या कंपनीच्या प्रॉफिट अँड लॉस अकाउंटचं सगळं काम तुला कराव लागणार आहे अदिती" ,.. आकाश

आकाशने बऱ्याच फाईल कपाटातून बाहेर काढल्या,.. "पूर्ण काम बाकी आहे, आधी कंप्यूटर मध्ये सगळ्या एन्ट्री घ्याव्या लागतील, म्हणजे तुला सारखं सारखं तेच काम करायला नको, त्या एन्ट्री करण्याआधी जरा एवढ्या दोन-तीन महिन्यात काय हिशोब आहे कंपनीचा तो या पेपरमध्ये बघून लावता आला तर तो थोडासा लावून घे, तिकडे राहुल सरांना रिपोर्ट द्यायचा आहे ",.. आकाश

" हो सर ",.. विचारू का याला का जेवला का तो? नको पर्सनल गोष्टी नको विचारायला, जेवढं काम दिलं आहे तेवढं करा, नसेल जेवला तर खाईन काहीतरी, उगीच काळजी दाखवायची गरज नाही.

" जुने रेकॉर्ड आहेत हॅण्डल विथ केअर, एकही कागद हरवायला नको",.. आकाश

" ओके सर",.. अदिती

आकाशने शिपाई काकांना बोलवलं,.. "या सगळ्या फाईल अदितीच्या टेबलवर ठेवा",

"एवढ्या फाईल? मॅडम तुम्हाला खूप काम आहे आता",.. काका अदितीशी हसून बोलत होते

अदिती छान हसत होती त्यांच्याशी

सगळेच अदितीशी व्यवस्थित बोलता आहेत, मला मात्र तिच्याशी बोलायला मिळत नाही, आकाशला परत राग आला होता, काका फाइल घेवून गेले

अदितीने बघितलं त्याचं चेहरा परत उतरला होता,

"काय झालं सर चेहरा का उतरला? ",.. अदिती

" तुला समजत का माझा मूड गेला तर",.. आकाश

"हो चेहर्‍यावर स्पष्ट दिसत, खूप टेंशन आहे का ऑफिस मधे? ",.. अदिती

"बरीच काळजी आहे तुला माझी",.. आकाश तिच्याकडे बघत होता,

अदिती उठून जात होती, याच्याशी बोलायला नको काही,

" एक मिनिट अदिती, तू काही विचार केला का आपल्याबद्दल, मी काल जे बोललो होतो तुझ्याशी , मी सिरीयस आहे ",.. आकाश

" नाही सर मला हे जमणार नाही ",.. अदिती

"काय प्रॉब्लेम आहे",.. आकाश

अदिती काही म्हटली नाही

"अदिती सांग आधी",.. आकाश

एवढं सोपं आहे का आकाश सोबत राहण, त्याच्या घरचे ऑफिसचे लोक काय म्हणतील? , श्रीमंत लोक हे, मला, माझ्या घरच्यांना त्रास झाला तर, नको आपण गरीब, मला शक्य नाही, मी अजून लग्नचा विचार केला नाही, घरच्यांना अमितला गरज आहे माझी, नकोच हे, आकाश उगीच मागे लागला आहे,

"काय विचार करते आहे अदिती",.. आकाश

"सर आपण या विषयावर नको बोलू या",.. अदिती

"मग काय करूया? मला राहायचं आहे तुझ्यासोबत अदिती",.. आकाश

" ते शक्य नाही",. अदिती

का पण?

अविनाश सर आत येताना त्यांना दिसले अदिती उठली बाहेर गेली

हिशोबाचं काम मिळालं होत, तिने ते काम करायला घेतलं

मला मेन ब्रांचला ट्रान्सफर मिळाली तर बरं होईल, कोणाला सांगता येईल पण हे ट्रान्सफरच, इथे नकोच या आकाश समोर, राहुल सर जर कधी भेटले तर बोलता येईल त्यांच्याशी, अनु सोबतच ठीक आहे मी, इथे सगळे मुलं आहेत आणि हा आकाश मी कोणाशी बोलली तरी याला राग येतो, परत बाकीचे बघता आहेत हा माझ्या मागे मागे करतो

सगळे लोक वर्कशॉप मध्ये काम करत होते, अदितीला हे अकाउंट काम करून करून खूप बोर झालं ती त्या मुलांबरोबर चहा घ्यायला तिकडे गेली होती, अविनाश सर तिथे होते खूप छान बोलत होते ते सगळे, खूपच माहिती होती त्यांना प्रत्येक मशीन बद्दल.

"सर तुम्ही इंजिनियर आहात का?",.. अदिती

हो..

"खूप हुशार आहात तुम्ही ",.. अदिती

" तुलाच वाटलं आहे तस अदिती",.. सगळे हसत होते

अविनाश सरांशी सगळे मोकळेपणाने बोलू शकत होते

" अदिती जा तुझं तुझं काम कर नाहीतर काही खरं नाही, ओरडतील तुला उगीच साहेब " ,.. अविनाश

" आकाश सर आले",.. अदिती दचकली, सगळे मुल हसत होते,

" अति करताय तुम्ही सगळे आकाश सर चांगले आहेत",.. अदिती

अविनाश अदिती कडे बघत होते,.. अदिती जागेवर चालली गेली,

अदितीला आवडतो वाटत आकाश

अदिती काम करत होती साडेसहा वाजले, सगळे घरी जात होते

"अदिती घरी जाण्याच्या आधी फाईल व्यवस्थित कपाटात ठेवून द्या तिथेच बाहेर सोडून जाऊ नका",.. अविनाश

"ठीक आहे सर",.. अदिती फाईल घेऊन आत मध्ये गेली, आकाश काहीतरी काम करत होता,

"या फाईल कुठल्या कपाटात ठेवू",.. अदिती

आकाशने कपाट दाखवलं, अदिती फाईल आत मध्ये ठेवत होती,

मदत करू का हिला, ठेवता येतात का फाईल,.." अदिती मी येवू का",

" नाही ठेवल्या फाईल सर",.. अदिती

" शिपाई काका कुठे गेले?",.. आकाश

"माहिती नाही",.. अदिती

मागून यश बाकीच्या फाईल घेऊन आला, त्याच्याकडून अदिती फाईल घेत होती,.. "तू सरक अदिती मी पटकन ठेवतो फाईल कपाटात",..

"अरे कशाला यश मी करते ना माझं काम",.. अदिती

"मी आहे ना",. यश

दोघेजण बोलत होते

" झालं का तुमचं दोघांचं काम? मला डिस्टर्ब होत आहे",.. आकाश

" सॉरी सर.. दोघेजण पटकन बाहेर निघून गेले, दोघांनी सामान घेतलं आणि ते बस स्टॉप कडे निघाले

" हे आकाश सर नेहमीच चिडलेले असतात का",.. यश

"नाही चांगले आहेत ते खूप, काय माहिती आता का असं करतात",.. आकाश

"अदितीला सगळ्यांशी हसून प्रेमाने बोलायचं असतं फक्त मी तिला विचारलं की ति नकार देते, नेहमी कारण सांगते",.. आकाश

"निघू या का आकाश",.. अविनाश

"हो जिजु पाच मिनिट ",.. आकाश

अविनाश आकाश घरी आले, आकाश त्याचे रूममधून निघून गेला

" काय झालं आहे आकाशला?",.. पूनम

"माहिती नाही ऑफिस कामाचं टेन्शन असेल काही सांगितलं नाही त्याने",.. अविनाश

आकाश त्याच्या रूममध्ये नुसता बसलेला होता, अदितीचा काय प्रॉब्लेम आहे काय माहिती? का नकार देते ती मला सारखा, एकदा बोलून बघू का तिच्याशी, विचारतो घरी टेन्शन आहे का?

आकाशने तिला फोन लावला, अदिती नुकतीच रूम मध्ये आलेली होती, तिला वाटलं काही ऑफिसमध्ये प्रॉब्लेम झाला का परत माझ्या कामात,

बोला सर..

"अदिती तुझा काय प्रॉब्लेम आहे, तुला काही मदत लागते आहे का ",.. आकाश

"काय झालं सर?",.. अदिती

"तू नेहमी कोणत्या टेंशन मधे असते",.. आकाश

"अस काही नाही सर",.. अदिती

"घरी सगळे ठीक आहेत ना? तुझ्या भावाला घ्यायची आहे का शहरात ऍडमिशन, शिकतो ना तो",.. आकाश

" नाही सर त्याने घेतला आहे तिकडे ऍडमिशन, व्यवस्थित सुरू आहे त्याचं कॉलेज, शहरातल्या कॉलेजमध्ये पुढच्या शिक्षणासाठी येईल तो ",.. अदिती

" तू म्हणत असशील तर मी सांगून बघू का कॉलेजमध्ये माझ्या ओळखीचे आहे तिकडे लोकं ",.. आकाश

" यावर्षी तरी काही प्रॉब्लेम नाही",.. अदिती

"मग कसल टेंशन घेते तू ",.. आकाश

" मी ठीक आहे सर ",. अदिती

" नाही तू ठीक नाहीस जेव्हा मी तुला आपल्याबद्दल विचारतो तेव्हा तू टेन्शनमध्ये असते, तू स्वतःच्या आयुष्याचा निर्णय घेत नाही, मला तुला हे सांगायचं आहे की तू एकटी नाही मी तुझ्यासोबत आहे",.. आकाश

अनु बघत होते अदिती कडे, हाताने विचारत होती कोणाचा फोन आहे?

अदितीने सांगितलं नाही

अनु तिच्या मागे येऊन फोन ऐकण्याचा प्रयत्न करत होती

आकाश एक मिनिट,.." अनु काय आहे हे? ",

" आकाश आहे का बोला बोला ",.. अनु

" हॅलो आकाश आपण नंतर बोलू मी आत्ताच रूमवर आली आहे",.. अदिती

" ठीक आहे अदिती पण मला तुझ्या सोबत रहायच आहे, तुला काही प्रॉब्लेम असेल तर तो आपण मिळून सोडवू",.. आकाश

ठीक आहे सर..

"काय म्हणत होता ग आकाश",.. अनु

" तू कोणाला सांगणार नाहीस ना",.. अदिती

नाही

"आकाशने मला परत एकदा प्रपोज केल आहे",.. अदिती

"काय सांगते आहेस तू लग्न करून घे त्याच्याशी",.. अनु

"काहीही काय बोलते तू अनु आता तू बघते आहे ना ते लोक कुठे आम्ही लोक कुठे, त्यांच्या घरी कोण आहे ते माहिती नाही आमच्या घरी किती प्रॉब्लेम आहेत आई-बाबांना काही माहिती नाही मी असं करणार नाही",.. अदिती

" अरे पण तू आकाशला होकार देऊन काही चुकी थोडी करते आहेस, चांगला मुलगा आहे तो, विचार कर काय म्हणत होता तो ",.. अनु

" तो चांगला आहे ग, मीच साधी आहे त्याच्या कंपॅरिझन मध्ये, म्हणत होता की घरी काही प्रॉब्लेम असेल तर सोडवू आपण, अमितला शहरात ॲडमिशन घ्यायची आहे का? मी बोलतो माझी ओळख आहे कॉलेजमध्ये, अरे पण हा जरी बोलला कॉलेजमध्ये तरी एवढी फी आम्ही कशी भरणार? ",.. अदिती

हो

" इथे एवढा खर्च होतो आहे, घरी किती पैसे पाठवणार आहे मी माहिती नाही, अमित इकडे आला तर माझा पगार आमच्या दोघांनाच लागून जाईल, घरून पैसे घ्यावे लागतील अजून, नाही होणार त्यापेक्षा ग्रॅज्युएशन पर्यंतचे शिक्षण गावीच झालं म्हणजे बर, नंतर माझे पण थोडे पैसे साठतील, मग त्याला इकडे करता येईल पोस्ट ग्रॅज्युएशन, बाबांच दुकान विशेष चालत नाही, शेती थोडीशी आहे त्याच विशेष उत्पन्न नाही ग, बाबा काळजीत असतात, निदान अमितच शिक्षण होई पर्यंत तरी लग्न नको करायला अस मला वाटत",.. अदिती

"बरोबर आहे हे पण आकाश खूप काळजी घेतो तुझी",.. अनु

"हो पण तो मदत करेल अशी आशा का ठेवायची, आपण आपली जबाबदारी घ्यायला हवी, आणि आकाश चिडका आहे, आत्ता संध्याकाळी चिडला होता तो माझ्यावर, नुसतं त्याच्या केबिनमध्ये फाईल ठेवायला गेलो तर त्याला डिस्टर्ब झाल, कधी नीट बोलतो तर कधी चिडतो, काय माहिती असं का करतो? मी आता त्याचा अजिबात विचारच करणार नाही, तो आकाश कधी काय करेल काही सांगता येत नाही आणि त्याला खूपच जास्त राग येतो",.. अदिती

"अग तु हो बोलत नाही म्हणून चिडत असेल तो",.. अनु

" की मी यशशी बोलतांना दिसली की चिडतो",.. अदिती

" हे काय नवीन ",.. अनु

" हो अग अस सुरू आहे ऑफिस मधे ",.. अदिती

आकाश जेवायला खाली आला, विकी अविनाश पूनम छान बोलत होते

" काय झालं आहे आकाश? आज ऑफिस मधे दमलास तू खूप ",.. पूनम

" थोडं काम होत, आजी कधी येणार आहे",.. आकाश

" पुढच्या आठवड्यात येणार आहेत त्या दोघी",.. पूनम

" तुझी परीक्षा झाली का विकी ",.. आकाश

" नाही एक दोन पेपर बाकी आहेत",.. विकी

जेवण झालं मी आराम करतो जरा थकलो आहे आकाश रूम मधे निघून गेला

सकाळी अदिती ऑफिसला आली, तिच अकाउंटचा काम सुरू झालं, आकाश अविनाश आले होते ते बिझी होते,

वर्कशॉप मध्ये खूप काम सुरू होतं, आता सगळे मुलं वर्कशॉप मध्येच होते, ऑफिसमध्ये अदिती एकटी बसून काम करत होती, फाईल मधल्याकडे एन्ट्री घेऊन घेऊन तिचं डोकं दुखत होतं,

"सकाळी सकाळी काम जोरात सुरू आहे तुझ अदिती" ,.. सुरेश

"हो ना सरांना लगेच हवा रीपोर्ट",.. अदिती

"आम्ही सगळे चहा घेतो आहोत वर्कशॉप मधे, तू येते का अदिती पाच मिनिट",.. सुरेश

"हो मी येते",.. अदिती वर्कशॉप मध्ये गेली, सगळेजण छान बोलत होते, चहा घेऊन झाला तरी त्यांच्या गप्पा सुरू होत्या, जो तो आपल मशीन छान हे सांगत होत,

"तू कुठल्या मशीनवर काम करतो आहेस यश",.. अदिती

" इकडे ये आदिती तुला माझी मशीन दाखवतो, किती छान केली आहे मी सकाळपासून",.. यश

अदिती त्याच्यासोबत तिकडे मशीनवर गेली,.. खूपच छान , किती मोठ आहे हे मशीन, त्याच्यावर काय काम असतं हे यश तिला सांगत होता

ते दोघे बोलत असतांना आकाश मध्ये आला, आदिती वर्कशॉप कडे गेलेली आकाशने बघितलं होतं

" झालं का तुमचं काम अदिती? काय करत आहात तुम्ही इथे? मला असं वाटतं की तुम्हाला ऑफिस काम नको आहे, तुम्हालाही वर्कशॉप मधले एखादा मशीन देतो मी नीट करायला",.. आकाश

सॉरी सर

"सर अदितीची काही चुकी नाही मीच तिला बोलवलं इकडे",.. यश

"यश मधे मधे बोलू नका",.. आकाश

" अदिती मी तुम्हाला कालच सांगितलं होतं की मला प्रॉफिट अँड लॉसचा हिशोब हवा आहे, तिकडे मेन ऑफिसला द्यायचा आहे झालं का ते काम? ",.. आकाश चिडला होता

" करते आहे सर फक्त अर्धा तास ",.. अदिती

" माझ्या केबिन मध्ये या लगेच आत्ता जेवढं काम झालं आहे ते घेऊन या",.. आकाश

अदिती आत मध्ये गेली, जे काम झालं आहे ते दाखवलं, बरेच काम झालं होतं, थोडंच बाकी होतं

" कधी होणार आहे हे काम अदिती? ",.. आकाश

" आता करते सर लगेच अर्ध्या तासात",.. अदिती

" ऑफिसमध्ये कशाला येतेस तू अदिती? काम करायला ना? , सदोदित त्या यश सोबत गप्पा मारत असते, तुला तुझ्या कामाशी काम नाही ठेवता येत का? ",.. आकाश

"हिशोब बघून बघून माझं डोकं दुखत होतं, म्हणून मी तिकडे वर्कशॉप मध्ये चहा घ्यायला गेली होती, असं काय करतो आहेस का आकाश... सॉरी आकाश सर, मी सहजच बघायला गेली होती, नुसता यश नाही सगळ्यांशी बोलत होती मी ",.. अदिती वैतागली होती

" यशशी सारख बोलण गरजेच आहे का? ऑफिसच्या वेळेत ते ही, मला चालणार नाही ",.. आकाश

" मित्र आहे तो माझा, मी मला हवं तसंच राहणार, ज्याच्याशी हवं त्याच्याशी बोलणार, दरवेळी आकाश सर तुम्ही म्हणतात तसंच होणार नाही, ऑफिसच्या कामापुरतं ठीक आहे, मी ऐकणार नाही, यश सोबत मी बोलणार",.. अदितीही चिडली होती

" तुझ्या मित्राला ठेवायचं ना या फॅक्टरीत? काय करायचं आहे त्याचं तूच सांग, त्याला कुठेच जॉब मिळणार नाही अस बघेन मी",. आकाश

" म्हणजे?.. सर प्लीज तुम्ही माझा राग यश वर काढू नका, सॉरी मी यापुढे कामाशी काम ठेवीन, एक्स्ट्रा बोलणार नाही कोणाशीच, लंच ब्रेक मध्ये बोलेल फक्त, यशला काढू नका त्याच्या करियर वर परिणाम होईल",.. अदितीने माघार घेतली.


🎭 Series Post

View all