©️®️शिल्पा सुतार
........
........
आकाशने सांगितलेल्या ठिकाणी रितेश आला, दोघं भेटले, आत मध्ये गेले, जेवणाची ऑर्डर दिली,
"तुला माहिती आहे का रितेश काल रितिका माझ्या घरी तिच्या आई-वडिलांना घेऊन आली होती",.. आकाश
"तू लग्न करतो आहेस का तिच्याशी? ",.. रितेश
"नाही.. काहीही काय, मला थोडा वेळ हवा आहे, मला एक गोष्ट अजूनही समजलं नाही, तुम्ही दोघं कॉलेजमध्ये सोबत होते तरी रितिकाला माझ्याशी लग्न का करायचं आहे? ",..आकाश
" खरं सांगू का आकाश रितिका आणि मी कधी सोबत नव्हतो, मला रितिका आवडते पण तिला मी आवडत नाही, बऱ्याच वेळा मी तिला प्रपोज केल आहे, ती नकार देते, तिला नेहमी तुझ्या सोबतच राहायचं होतं",.. रितेश
" पण मग मला तुम्ही दोघांनी असं का सांगितलं की तुम्ही दोघं सोबत आहात?",.. आकाश
" काय माहिती? रितिका असंच करत होती",.. रितेश गप्प झाला
" रितेश नीट सांग, मला समजायला हव सगळ, रितेश प्लीज ",.. आकाश
" जो कोणी तुझ्यासोबत असायच, किंवा तुला जी कोणी आवडायची, तिला तुझ्या आयुष्यातुन घालवण्यासाठी ती असं करत असावी, अदितीच्या बाबतीतही असंच केलं होतं रितीकाने",.. रितेश
" म्हणजे काय? काय केलं तुम्ही अदिती बाबतीत? ",..आकाश
" तिचं आणि सौरभच काही नव्हतं, ते कधी सोबतही राहत नव्हते, कधी तरी ऑफिस हून सोबत यायचे फक्त , तरी मुद्दामून ते सोबत आहेत आणि आम्ही सगळ्यांनी ते कॅन्टीन मध्ये तुझ्या बाबतच बोलत होते असं तुला खोटं सांगितलं, गैरसमज पसरवला ",.. रितेश
आकाश आश्चर्यचकित झाला होता,.. "काय बोलतो आहेस तू रितेश? नक्की सांग काय झालं होतं?",
" तुला आदिती पसंत होती, तुम्ही दोघं संध्याकाळी बोलत होते, तू तिला लग्नाच विचारणार होता हे रितिकाला समजलं होतं, तिला खूप राग आला होता अदितीचा, तिने मला फोन करून कॉलेजला बोलवून घेतलं आणि तुला भेटून असं सांगायला सांगितलं की आदिती आणि सौरभ रोज सोबत असतात आणि अदिती असं बोलली की मी आकाशशी मैत्री करून पैसे काढून घेईल आणि लग्न सौरभशी करेल, त्यात तू शॉर्ट टेम्पर्ड असल्यामुळे तू लगेच मी जे म्हणतो ते ऐकलं आणि अदिती वर संशय घेतला आणि तू तिच्याशी असलेल तुझं नातं तोडलं ",.. रितेश
आकाश एकदम गप्प बसला होता,.." मी शॉर्ट टेम्पर्ड नाही रितेश, एवढ आहे की मित्रांवर विश्वास ठेवला, का केलंस तू रितेश असं? ओह माय गॉड केवढी मोठी चूक केली मी, तेव्हा मला वाटत होत अस नसेल, पण वाटल अदिती सौरभ एकत्र आहेत का त्रास द्या त्यांना, म्हणून मी बाजूला निघून गेलो",..
" आय एम सॉरी आकाश तेव्हा मला वाटलं मी रितिकाला मदत केली तर ती मला हो बोलेल, माझ्याशी लग्न करेल, मी केवळ रितिका साठी हे असं केलं होतं",.. रितेश
" तुला माहिती आहे का तुझा असं करण्यामुळे माझं किती नुकसान झालं आहे, किती गैरसमज करून घेतला होता मी, कितीतरी वेळा अदितीने माझ्याशी बोलण्याचा प्रयत्न केला, मला समजून सांगण्याचा प्रयत्न केला, पण तुम्ही शाळेपासूनचे माझे मित्र मैत्रिणी कॉलेज पर्यंत सोबत होते, तुमच्यावर मी विश्वास ठेवला तुम्ही माझ्या विश्वासाला तडा दिला, मला यापुढे अजिबात तुझ्याशी किंवा रितिकाशी अजिबात बोलायचं नाही ",.. आकाश
" आय एम सॉरी आकाश मी वाटलं तर अदितीला भेटायला तयार आहे, तिची माफी मागतो मी ",.. रितेश
" कुठे आहे अदिती? ",.. आकाशने सांगितलं नाही कि अदिती माझ्यासोबत ऑफिस मध्ये काम करते, नाहीतर परत हे लोक काहीतरी कुचापती काढून तिला माझ्यापासून दूर नेतील, खूप मोठी चूक झाली आहे माझी, मी थोडं तरी अदिती वर विश्वास ठेवायला पाहिजे होता, पण मी पण माझ्या डोळ्याने बऱ्याच वेळा सौरभ अदितीला सोबत बघितलं होतं त्यामुळे मी आधीच चिडलेलं होतो, त्यात रितिका आणि रितेशने असं केल्यामुळे पूर्णच फसलो मी त्यांच्या जाळ्यात, आता काय कराव?
जेवण झालं ते दोघं निघाले,
"आकाश सॉरी, मला तुझ्या सोबत फ्युचर मध्ये सुद्धा बोलायला आवडेल",.. रितेश
"नो प्रॉब्लेम फ्रॉम माय साईड रितेश, मी बघतो कसा सॉल्व करायचा हा प्रॉब्लेम, भेटू आपण नंतर, आता फक्त एकच काम कर प्लीज तू मला हे सगळं सत्य सांगितलं आहे हे रितिकाला सांगू नको",.. आकाश
"नाही सांगणार मी आता तिच्याशी बोलणारच नाही, तुला जर माझ्या मदतीची काही गरज वाटली तर मला बोलव, मी अदितीची माफी मागायला तयार आहे",.. रितेश
" तशी काही गरज पडणार नाही पण काही वाटलं तर सांगतो मी",... आकाश
आकाश ऑफिस मध्ये आला, त्याला खूपच कसंतरी वाटत होतं की किती मूर्खपणा केला मी, माझंच प्रेम कमकुवत होतं, मी अदितीवर विश्वास टाकण्याच्या ऐवजी या रितेश आणि रितिका वर विश्वास टाकला, फार मोठी चुकी केली मी, त्यात काल अजून तिच्याशी फटकून वागलो मी, मला नाही वाटत आता लवकर अदिती मला हो म्हणेल, किंवा बोलेल ही माझ्याशी, खूप हर्ट झाली ती, काय करू मी?, मला अदिती हवी आहे.
समोरच अदिती काम करत होती, तिला बघून छान वाटत होत, आकाश आल्या मुळे सगळे उभे राहिले, अदिती आकाश कडे बघत होती, तो तिच्या कडे,
"मी आल्यावर सारख उभ रहायची गरज नाही, रिलॅक्स",.. आकाश
ओके सर.. बाकीचे कामाला लागले, आकाश अजून तिथून इकडे तिकडे बघत होता, मागू का अदितीची माफी, नको कोणी ऐकल तर, थोड थोड बोलू रोज
"अदिती जेवण झाल का?",.. आकाश
अदिती आश्चर्याने बघत होती,.. "मी? अस विचारल तिने? ",
" हो तूच ",.. आकाश
" झाल सर ",.. अदिती
"काम झाल का टेंडरच?",.. आकाश
"सुरू आहे सर",.. अदिती
"थोड्यावेळाने दाखवा मला काय काय काम केले ते",.. आकाश
म्हणजे अदिती आत येईल केबिन मधे आकाश खुश होता, बर झाल हिला हे काम दिल,
आकाशाच्या केबिन मध्ये जायच म्हणजे अदितीच्या अंगावर काटा आला होता, काय बोलणार त्या आकाशशी, किती अकडतो तो, उगीच ओरडेल, काम ही करेक्ट आहे की नाही काय माहीती, पहिल्यांदा एवढ कॅलकुलेशन केल, आकाश समोर बोलायचा काॅन्फिड्न्स नाही मला आता, सुरेशलाच बोलायला लावू याच्याशी
" आज चहा घ्यायला नाही गेले तुम्ही मुल? ",.. आकाश
"नाही सर घाबरले सगळे ",.. अदिती
ठीक आहे... हसतच आकाश केबिन मध्ये गेला, बराच वेळ तो नुसताच बसलेला होता, केबिन मधून अदिती काय काय करते तेच बघत होता,
एक वर्ष असच घालवल मी, आता पर्यंत अदिती हो बोलली असती मला, खूप छान मैत्री होती आमची कॉलेज मध्ये असतांना, एकमेकांशी बोलून समाधान वाटायच, साधी सरळ हुशार मुलगी आहे ही, आता वेळ घालवायचा नाही
आता बर बोलतो हा आकाश इकड तिकडच , मी बोलली तर म्हणे कामाशी काम ठेवा मिस अदिती, चांगल आहे याला रुल्स वेगळे आम्हाला वेगळे, नशिब चांगल आहे याच मालक आहे, आम्ही काय करा काम, रागवल तर बोलणे ऐकून घ्या, त्यांनी बोललं तर बोलायचं नाही तर गप्प बसायचं,... अदिती मनातल्या मनात चिडली होती
"काय म्हणत होते आकाश सर?, तुझ्याशी बोलत होते ना ",.. रोहित
"हो.. जेवण झालं का ते विचारात होते ",.. अदिती
का??
"काय माहिती? काही काम असेल ",.. अदिती
याला काय सांगणार आता आकाश बद्दल
अविनाश जीजू आत मध्ये आले,.. "भेटला का तुझा मित्र?",
"हो झाल काम ",.. आकाश
"कुठपर्यंत आल टेंडरचा काम, तुम्ही जेवले का जिजू? ",.. आकाश
"हो झाल जेवण, ते सांगायला आलो होतो आता घ्यायची का मीटिंग की थोड्यावेळाने, बरच काम झाल आहे, एकदा बघून घे तू, काही चेंजेस असतिल तर आहे वेळ आपल्या कडे ",.. अविनाश
"चालेल बोलवा त्यांना आत मध्ये",... आकाश
शिपाई काकांनी बाहेर जाऊन निरोप दिला
" सुरेश तु काम झाल आहे ते दाखव, तु आपल्या टीमचा लीडर आहेस",.. रोहित अदिती रिक्वेस्ट करत होते
सुरेशने होकार दिला
सुरेश अदिती रोहित जेवढं काम झालं आहे ते घेऊन आत आले, आकाश समोर बसलेला होत, तो या तिघांकडे बघत होता, अविनाश बाजूच्या खुर्चीवर बसलेले होते, त्यांच्या बाजूला आदिती बसली, समोरच्या दोन खुर्च्यांवर सुरेश आणि रोहित बसले,
जेवढं काम झालं आहे ते सुरेश दाखवत होता,
"एकदम व्यवस्थित चालल आहे काम, काही प्रॉब्लेम नाही" ,.. आकाशने थोडे बदल सुचवले ते अदितीने लिहून घेतले,
" दरवेळी एवढ व्यवस्थित काम करूनही आपण टेंडर जिंकत नाही, कोणाकडे काही आयडिया असेल तर सांगा",.. आकाश
"काय प्रॉब्लेम येतो दरवेळी? ",.. रोहित विचारत होता
" समोरचे लोक आपल्यापेक्षा थोडी किंमत कमी लावून टेंडर जिंकतात",.. अविनाश
" म्हणजे आपली माहिती कोणीतरी त्यांना पोहोचवत आहे",.. अदिती
" बरोबर बोलत आहात तुम्ही अदिती",.. आकाश,
अदिती आकाश कडे बघत होती, तो तिच्या कडे बघत होता,
" हीच माहिती आपल्याला लिक होऊ द्यायची नाही अदिती ",.. अविनाश
" पण ही माहिती कोण देत आहे दुसर्यांना",.. सुरेश
" बहुतेक टेंडर भरण्याच्या इथे लोक असतात ते सगळी माहिती नीट लिहिली की नाही ते बघतात आणि गुपचूप फोटो काढून घेतात",.. अविनाश
"माझ्या कडे एक आयडिया आहे ",.. अदिती
बोला अदिती..
" एक काम करता येईल सर आपल्याला, आपण दोन प्रकारचे कॅल्क्युलेशन करू तिथे सबमिट करण्याच्या आधी आपण जे कॅल्क्युलेशन दुसऱ्याला समजायला पाहिजे असं हातात देवू त्यांनी चेक केल की ओरीजनल फाईल पटकन सबमिट करू",.. अदिती
सगळे ऐकत होते
" ठीक आहे ना हे अस? ",.. अदिती
" हो ही आयडिया बरोबर आहे यावेळी ट्राय करून बघू",..आकाश
" टेंडर भरण्यासाठी तुम्हीच जाणार आहात ना आकाश सर",.. रोहित
" हो मी आणि अविनाश सर जाणार आहोत ",.. आकाश
" आम्ही ही आयडिया लक्षात ठेवु",.. अविनाश
" ठीक आहे मग हे महत्त्वाचं काम झाल्यानंतर फेक कॅल्क्युलेशन सुद्धा तयार करून घ्या. दोन कॉपी करून मला द्या आणि आज या मीटिंगमध्ये काय बोलणं झालं आहे हे आपल्या पाच लोकांव्यतिरिक्त दुसऱ्याला कोणाला कळता कामा नये",.. आकाश
ठीक आहे..
मीटिंग छान झाली होती, अविनाशला काम होत ते लगेच उठून गेले, सुरेश काहीतरी लिहीत होता, रोहित उठला सुरेश रोहित बाहेर गेले, अदिती उठली, ती बाहेर जात होती, आकाश तिच्या कडे बघत होता, बोलू का हिच्याशी?
" खूप छान काम सुरू हे टेंडरच अदिती वेल डन",.. आकाश
"थॅक्यु यू सर",.. अदिती बाहेर निघून गेली
"विशेष काही बोलली नाही अदिती, रोज बोलाव लागेल हिच्याशी" ,.. आकाश
आज काम करता करता खूप उशीर झाला, यश थांबला होता, आकाश बाहेर आला,... यश तुम्ही नीघा,
"सर अदिती एकटी राहील, इंडस्ट्रियल एरिया आहे, ती एकटी कशी घरी जाईल, सामसूम आहे इकडे ",.. यश
"आम्ही आहोत सोडून देवू अदितीला ",.. आकाश
ठिक आहे, अदिती मी निघतो,... यश बाहेर उभा होता
"यश प्लीज थांब ना, मी कशी जाऊ घरी?",.. अदितीला माहिती नव्हत आकाश यश सोबत उभा आहे, ती आतून बाहेर पळत आली,.. यश काय अस करतोस?
आकाशला बघून ती गप्प झाली
" मी सोडून देईन तुम्हाला मिस अदिती, यशच काम झाल तो किती वेळ इथे थांबेन",.. आकाश
ठीक आहे
यश अदिती कडे बघत होता, ती आत निघून गेली
या आकाश सोबत घरी जायला किती बोर होईल, किती काम बाकी आहे सुरेश, रोहित,
"अजून दोन तीन तास",..
बापरे.. अदितीने अनुला मेसेज केला,.." मला खूप उशीर
होईल महत्वाच काम सुरू आहे ",
होईल महत्वाच काम सुरू आहे ",
" येशील कशी ",.. अनु
"आॅफिसच्या गाडीने येईन काळजी करू नकोस",.. अदिती
अदिती कामाला लागली, आता अविनाश आकाश त्या तिघां सोबत काम करत होते, बराच उशीर झाला, ऑफिस मध्ये जेवण आल त्यांनी जेवण केल, पूनमचा फोन येत होता, अविनाश फोन वर बोलायला बाहेर गेले, आकाश तिथे बसला होता, अदिती रोहित सोबत काम करत होती, ती अजिबात एक शब्दही कामा व्यतिरिक्त इतर आकाशशी बोलली नाही,
टेंडर साठीच काम झाल होत जे पेपर सबमिट करायचे होते ती फाईल रेडी होती, दुसरी फाइल सुरुवातीला द्यायची ती पण रेडी होती
"खूप छान काम झाल टीम आपल, आपण उद्या सकाळी एकदा परत कॅल्क्युलेशन बघून घेवू सबमिट करण्या आधी",. आकाश
येस सर
वेल डन टीम थँक्स..
"चला निघू आता",.. अविनाश
सुरेश रोहित मोटर सायकल वर जाणार होते
आकाश अविनाश अदिती राहिले आता, अविनाश सकाळी वेगळया कार ने आले होते,.." मी निघतो आकाश तू अदितीला सोडून ये ",
ठीक आहे..
अदितीला काही सुचत नव्हत, आकाश खुश होता, तिने तीच सामान घेतल,
आकाशने कारचा दरवाजा उघडला, अदिती आत बसली, काय बोलणार आहे मी आकाशशी? अविनाश सर हवे होते सोबत, ते छान आहेत, शांत.. प्रेमळ
आकाश ड्रायविंग सीट वर येवुन बसला, तो अदिती कडे बघत होता, अदितीने त्याच्या कडे बघितल
"कुठे जायचं? .. कुठे राहतेस तू पत्ता सांग",.. आकाश
"ओह.. मेन ब्रँच जवळ",. अदिती
म्हणजे?
"तुमच ऑफिस, राहुल सरांच्या ऑफिस कडे चला, त्या बस स्टॉप जवळ, मी जाईन तिथून",.. अदिती
ते दोघ निघाले, बहुतेक त्या मेन ब्रँचला ही आधी जॉईन झाल्यामुळे तिथे घर घेतल असेल
" कोणा सोबत राहतेस तू अदिती तिथे? ",.. आकाश
"पि जी आहे, अनु सोबत",.. अदिती
"अनु आहे का आपल्या ऑफिस मधे? ",.. आकाश
हो सर..
बोलू का अदितीशी? आज चांगला चान्स आहे, ऑफिसमध्ये अजिबात बोलता येत नाही काही आणि तशी काही अदिती मला परकी नाही, पहिल्यापासून ओळखतो मी तिला, माझ प्रेम आहे तिच्या वर, आता सौरभचा गैरसमज दूर झाला आहे, घरचे लग्नाची घाई करत आहेत लग्न करायचं आहे तर अदितीशी नाही तर नाही , काय म्हणेल ही काय माहिती?