प्रेम पंख ❤️... भाग 13

आमच्या आकाशने चांगलं पॉश ऑफिस सोडून सिक युनिट नीट करायला घेतल आहे",.. राहुल सर आकाश कौतुक करत होते


प्रेम पंख ❤️... भाग 13

©️®️शिल्पा सुतार
........

आकाश केबिनमध्ये डोकं धरून बसलेला होता,

अविनाश आत मध्ये आले,.. "काय झालं आहे आकाश? काही प्रॉब्लेम आहे का? ",

" आत्ताच पप्पांचा फोन आला होता मला रात्री तिकडे डिनरला बोलवलं आहे, रितिका आणि तिच्या घरचे येणार आहेत",.. आकाश

"अरे वा छान बातमी दिली आकाश, तुझा बघायचा कार्यक्रम आहे तर",.. अविनाश जीजू मुद्दामून चिडवत होते

"जीजू प्लीज ",.. आकाश

" काय झालं आकाश चांगली आहे रितिका ",.. अविनाश

" पण मला एवढ्यात लग्न करायचं नाही, आता ते लोक जेवायला येतात म्हणजे काहीतरी डिस्कशन होईलच",.. आकाश

"केव्हा ना केव्हाच लग्न करायचं आहे ना तुला, काय हरकत आहे ",. अविनाश

"मला नको वाटत आहे हे , ठीक आहे बघतो जावून, मी लवकर निघतो आज ",.. आकाश

" ठीक आहे मी सांभाळेल इथलं",.. अविनाश

अविनाश बाहेर आले, समोर अदिती काम करत होती, तिला बघून त्यांना खूप हसू आलं, म्हणून जायचं नसेल आकाशला डिनरला, जाऊ दे पण तो सांगत नाही तोपर्यंत आपण कसं विचारणार, त्यांनी आत मध्ये केबिनमध्ये येऊन पूनमला फोन लावला,.." आकाशला आज डिनरला बोलवलं आहे घरी, रितीका आणि तिच्या घरचे येणार आहेत",..

"आकाश काय म्हटला मग?",.. पूनम

"काही नाही चिडलेला आहे तो",.. अविनाश

"अदिती बद्दल काही बोलला का?",.. पूनम

"नाही काहीच बोलणं झालं नाही",.. अविनाश

"जावू दे करेल तो बरोबर, आपण विचारल तरी सांगणार नाही ",.. पूनम

" दोघी आजी निघाल्या का ?",.. अविनाश

"निघतील आता, तयारी सुरू आहे ",.. पूनम

दोघ बराच वेळ बोलत होते.....

आजींचा फोन आला आकाशच्या फोन वर,.. "आम्ही निघतो मामा कडे जायला ",

" नीट जा खूप उत्साहात वावरू नका दोघींनी, काळजी घ्या आणि लवकर या मला करमणार नाही इथे ",.. आकाश

" हो आम्ही येवू लवकर",.. आजी

" फोन करा पोहोचल्या की ",.. आकाश

हो..

लंच ब्रेक झाला, अदिती डब्बा घेवून सगळ्यां सोबत जेवायला गेली, यशही सोबत होता, सगळेजण एकमेकाची चौकशी करत होते, कुठे राहतात मेन गाव कुठे? घरी कोण कोण आहे? अदिती ऑफिसमध्ये आल्यामुळे सगळ्यांना एकच उत्साह वाटत होता, यश आणि आदिती सगळ्यांना खूप आवडले, ऑफिसच्या समोरच एक छोटं हॉटेल होतं, सगळेजण जेवल्यानंतर तिथे चहा घ्यायला गेले,
लंच ब्रेक संपून दहा मिनिट झाले तरी कोणी आल नाही, आकाश आतून बघत होता, अदिती सगळ्यांसोबत मस्त एंजॉय करत होती, त्याला खूप राग आला, आकाशने शिपाई काकांना आत बोलवलं,.. "सगळे ऑफिस मधले मुल मुली कुठे आहेत? ",

"साहेब ते अजून चहाच्या टपरीवर आहेत",.. काका

"ते आले की त्यांना बाहेर थांबायला सांगा, आत घेवू नका ",.. आकाश

"ठिक आहे साहेब ",.. काका

सगळे पाच मिनिटात आले, त्यांना आत घेतल नाही

"काय झालं काका?",..

"तुम्ही लेट आहात, लंच ब्रेक केव्हाचा संपला, साहेब चिडले आहेत, इथे थांबा",.. काका

लंच ब्रेक संपून पंधरा मिनिट होवुन गेले होते, बापरे आपल्या लक्ष्यात आल नाही

"आता काय होईल?",.. अदिती

" याला काय अर्थ आहे? थोड फार इकडे तिकडे होणारच, आम्ही ऑफिस संपल्यावर एक्स्ट्रा थांबतो तेव्हा चालत का यांना? ",..

सगळे चिडले होते

अदितीला माहिती होत माझा राग काढतोय हा आकाश या मुलांवर, काय होईल आता काढुन टाकतील का आम्हाला? बर होईल दुसरी नौकरी शोधू, काय बोर होत इथे, हे बाकीचे छान आहेत पण, अस माझ्या मुळे त्यांना शिक्षा नको व्हायला, आकाश जास्त करतो

अविनाश बाहेर आले,.." काय करताय इथे? काम नाहीत का?, चला आत",

"आम्हाला शिक्षा झाली आहे" ,..

"ओह... कोणी केली",.. अविनाश

आकाश सर...

"अदिती आत चल",.. अविनाश

"थांबा,.. आत यायच नाही, इथे सगळ्यांना सारखे नियम, किती वाजले? कश्याला येतात इथे तुम्ही सगळे? काम बाजूला नुसते बोलत बसले काल पासुन सगळे ",.. आकाश

सॉरी सर..... सॉरी सर, आम्ही आत टाइम वर लक्ष ठेवू, एक चान्स द्या, सगळे बोलत होते

"चालणार नाही अस आज हाफ डे लागेल ",.. आकाश

नको सर सॉरी,

काही काहीना खरच पगार पुरत नव्हता, इथे ही रहायच त्यात घरी पैसे पाठवायचे, त्यात विनाकारण अस हाफ डे, पैसे कट केले तर कस होईल, अदिती ही काळजीत होती

"अर्धा तास काम जास्त आज सगळ्यांनी चला आत",.. आकाश

सगळे सॉरी बोलून आत येत होते, अदितीचा नंबर आला, आकाश आत निघून गेला,

"या पुढे अशी चूक नको मुलांनो, आकाश चिडला तर काही खर नाही ",.. अविनाश

सगळे आत आले ते आकाश वर चिडलेले होते, लगेच कामाला सुरुवात झाली,

सगळे छान अदितीशी बोलत होते, तिच्या आजुबाजुला होते, हेच जिवावर आल होत आकाशला, तो केबिन मधुन बघत होता काल पासून

जे सहा वाजता घरी जाणार होते त्यांना सगळ्यांना आज कंपल्सरी साडेसहा पर्यंत थांबायचं होतं, साडेसहा झाले तरी बरंच काम बाकी होतं,

"अदिती तु जा घरी, उद्या करु आपण काम ",.. रोहन

ती यश कडे बघत होती,.. "झालं का काम यश?",

तो बिझी होता... पंधरा मिनिटं

" ठीक आहे आपण सोबतच निघू",.. अदिती

सात वाजता ते दोघं निघाले, खूप अंधार झालेला होता बाहेर, लगेच दहा मिनिटात आकाश निघाला घरी जायला,.. "जीजू मी जातो रात्री उशिरा येईल घरी, तुम्ही पण निघा",.

"हो मी बाकीचे मुलं गेले की निघतो",.. अविनाश

"आणि प्लीज घरी गेल्यावर घरच्यांना कोणाला काही सांगू नका की मी तिकडे रितिकाच्या घरच्यांसोबत डिनर पार्टीत आहे, नाहीतर पुनम आणि विकी माझा जीव घेतील, चिडवतील ते, एक मला अजिबात इंटरेस्ट नाही या डिनर पार्टीत",.. आकाश

" ठीक आहे नाही बोलणार मी",... अविनाशने आधीच पूनमला सांगितल होती ही बातमी, त्याने आकाशला सांगितल नाही

बस स्टॉप वर अदिती यश सोबत उभी होती, ते दोघ खूप बोलत होते, अदितीच्या सामानाची बॅग यश कडे होती, अजून बस मिळालेली नव्हती. आकाशने घड्याळ्यात बघितलं सव्वासात होऊन गेले होते, तो निघाला ऑफिस मधुन थोड बाजुला कार मधे बसला होता तो, बस येई पर्यंत थांबणार होता तो , आज त्याला राहुल सरांकडे जायचं होतं, काही घाई नव्हती, आणि बस नाही आली तर तर अदितीला ती जिथे रहाते तिथे सोडून देवू असा विचार करत होता तो

जरा वेळाने बस मिळाली,

आकाश ही निघाला

आठ वाजेपर्यंत अदिती रूमवर आली

"काय ग अदिती आज इतका उशीर झाला?, खूप काम होतं का?",.. अनु

"हो ग.. ऐक ना.. कॉलेजमधला आकाश तो आहे आमचा बॉस",.. अदिती

"ओह माय गॉड, काही बोलली का तू त्याच्याशी? , तुला तर चांगलं झालं आता ओळखीचाच बॉस",.. अनु

"नाही ग तुला माहिती आहे ना काय झाल होत ते",.. अदिती

" एका वर्षा पुर्वीच का ",.. अनु

हो

"मग ते अजून थोडी धरून ठेवणार आहे आकाश",.. अनु

" आकाश माझ्याशी बोलला नाही आज ही, तो अजूनही राग धरून आहे आणि आज त्याने माझ्या वरचा सगळा राग इतरांवर काढला, सगळ्या टीमला खूप रागवलं, आम्हाला बाहेर उभा केलं होतं",.. अदिती

" काय आहे हे शाळेसारख ",.. अनु

" हो अग खुप कडक वातावरण आहे, ऑफिस मधे ही एकमेकांशी बोलायच नाही, आम्ही लंच ब्रेक मध्ये सगळे चहा प्यायला गेलो होतो, तिथेच बोलत बसलो , सगळे ओळख करत होते माझ्याशी तर उशीर झाला, त्यामुळे अर्धा तास जास्त काम करावं लागलं, नाही तर हाफ डे लागणार होता",.. अदिती

" असा काय करतो आहे आकाश? ",.. अनु

"माहिती नाही सारखा चिडलेला होता तो आज, यंग टीम आहे, सगळे बरोबरीचे त्या मुळे ओरडत असेल अस, मी तर आता असं ठरवलं आहे की कामाशी काम ठेवायचं तो आकाश ओळखीचा आहे हे विसरून जायचं, प्रॅक्टिकल राहायचं, आज मी त्याच्याशी बोलली तर त्याने मला सांगितलं की मला पर्सनल गोष्टी सांगायच्या नाहीत, खूपच फटकून बोलला तो माझ्याशी, कामाशी काम ठेवा मिस अदिती अस सांगितल",.. अदिती

"बापरे एवढ प्रक्टिकल, अगदी ओळखत नाही अस करतो तो ",.. अनु

" उगीच बोलायला गेली मी त्याच्याशी, मलाच काही काम नाही, वाटलं की त्याने जो गैरसमज करून घेतला आहे तो एकदा बोलून दूर करू, मग नाही बोलला तो तरी काही हरकत नाही",.. अदिती

" नाही बोलला ना तो तुझ्याशी, आता टेंशन घेवू नकोस, असेल अजूनही राग त्याच्या मनात ",.. अनु

" माहिती नाही अस का वागला आकाश, तो सौरभ त्याच्याशी कधीची बोलली नाही मी, त्याच्या वरून झाल होत ना सगळ" ,.. अदिती

" अजून लक्ष्यात आहे त्या आकाश ला म्हणजे तो तुझा विचार करतो नेहमी ",.. अनु

" अस काही नाही खूप ओरडला तो आज मला",..अदिती

"मुद्दाम रागात आहे अस दाखवत असेल तो",.. अनु

"मला नाही वाटत अस असेल अनु तो सिरियस आहे ऑफिस कामात, खरच त्याला नसेल बोलायचं जुन्या विषयांवर मीच नव्हतं बोलायला पाहिजे",.. अदिती

" एवढ सगळ झाल म्हणुन तुला आज यायला उशीर झाला का?",.. अनु

"हो नशीब यश तरी असतो सोबत तो चांगला आहे",.. अदिती

"चल जेवून घे आणि आराम कर",.. अनु

" घरी पण फोन करायचा आहे दोन दिवस झाले बोलली नाही",.. अदिती ने घरी फोन लावला,

आई बाबा अमित मजेत होते अमितची परीक्षा सुरू होती,.. " नीट अभ्यास कर अमित",

हो ताई,..

ती बाबांशी बराच वेळ बोलत होती
...

रितिका आणि तिच्या घरचे राहुल सरांच्या बंगल्यावर पोहचले,

" घर सापडायला काही त्रास झाला नाही ना",.. राहुल सर

"नाही या एरियात सगळ्यात छान आणि मोठा बंगला तुमचाच आहे, लगेच सापडला",..

सगळे आत मध्ये आले, रितिकाने आज चुडीदार घातला होता, ती खूप छान दिसत होती, तिने केस मोकळे सोडले होते, ती आणि तिची आई जाऊन मोना मॅडमला भेटल्या

राहुल सर रितिकाचे वडील गप्पा मारत बसले, सगळ्यांनी आत जाऊन बंगला बघितला,

" आकाश का नाही आला अजून मोना? जरा फोन करून बघ",.. राहुल सर

मोना मॅडमने फोन लावला, आकाशने फोन उचलला... " हो येतो आहे मी दहा मिनिटात रस्त्यातच आहे",..

आकाश बंगल्यावर आला, रितीकाचे घरचे आलेले होते आतून बोलण्याचे गप्पांचे आवाज येत होते,

तो आत गेला, सगळे त्याच्या कडे बघत होते, रितीका खुश होती, मी आलो जरा फ्रेश होऊन, आकाश आत गेला,

तो पाच दहा मिनिटांनी बाहेर येऊन बसला, रितिका तिचे आई-बाबा सगळे आकाश कडेच बघत होते, नेहमीप्रमाणे आकाश खूप छान दिसत होता, रितिकाच्या आई वडिलांच्या चेहऱ्यावरून स्पष्ट दिसत होतं, त्यांना आकाश पसंत आहे

"काय चाललं आहे का आकाश?",.. त्यांनी बोलायला सुरुवात केली

"नेहमीच काम",.. आकाश त्याच्या कंपनी बद्दल माहिती देत होता

" आमच्या आकाशने चांगलं पॉश ऑफिस सोडून सिक युनिट नीट करायला घेतल आहे",.. राहुल सर आकाश कौतुक करत होते

"खूप छान आकाश याला म्हणतात हिम्मत, काही तरी करून दाखवायच आहे तुला , तू नक्की सक्सेसफुल होशील",.. रितीकाचे पप्पा खुश होते

"घरातले बाकीचे कुठे आहेत म्हणजे तुमच्या आई वगैरे तुमच्या सोबत आहेत म्हणून विचारलं ",..

" तिघं मुल आणि दोघी आजी दुसऱ्या घरात राहतात पूर्वीपासून, आम्ही दोघं इकडे रहातो, आता तुम्ही आल्यामुळे आकाश इकडे आलेला आहे, सगळं आधी स्पष्ट सांगितलेलं बरं, पूनमच लग्न झालेला आहे तिने कॉलेजमधल्या मुलासोबतच लव्ह मॅरेज केलं",.. राहुल सर

" आकाश रितिकाला आपलं घर दाखव",.. मोना मॅडम

रितिका उठली आकाशलाही उठावंच लागलं..

🎭 Series Post

View all