प्रेम पंख ❤️... भाग 12

याला काय अर्थ आहे आकाश ते काही लग्न जमवायला येत नाही सहज येत आहेत आपल्याकडे, आलेल्या गेस्ट शी आपण नीट वागायला पाहिजे


प्रेम पंख ❤️... भाग 12

©️®️शिल्पा सुतार
........

ऑफिस मधले मुलं ठरवून दिल्याप्रमाणे जो तो आपल रोजच काम करत होते, यश अदिती नुसते बसले होते,.. "काय आहे आपल्याला काम?",

"काय माहिती सर आले की सांगतील",.. यश

"तुला तरी मशीनच काम आहे मी काय करणार आहे",.. अदिती

"होना",.. 

"परत बोलायच नाही एकमेकांशी",.. अदिती

"काही विचार करूनच घेतलं असेल ना त्यांनी तुला मिळेल लवकर काम",.. यश


" आकाश सर कोण आहे काय माहिती? आज तरी दिसतील का ते? ",.. अदिती विचार करत होती

अविनाश जीजू आणि आकाश निघाले, खूप छान वाटत होत आकाशला, ते ऑफिस मध्ये आले, वाईट शर्ट पॅन्ट मध्ये आकाश छान दिसत होता, नॉर्मलच वागायचं आपण आता सगळ्यांसमोर, दोघं आत आले, तसे सगळे उठून उभे राहिले

गुड मॉर्निंग सर..

गुड मॉर्निंग..

अविनाश आत मध्ये गेले,

आकाश कडे अदिती बघतच राहिली, तिला खूप आनंद झाला होता,

आकाशने सगळ्यांना गुड मॉर्निंग केलं, तो आत मध्ये निघून गेला

अनु म्हणते तेच बरोबर आहे आकाशने मुद्दाम मला या ऑफिस मधे बोलवून घेतल असेल का? , एक तर त्याचा गैरसमज झालेला आहे, काही खरं नाही आता हा चांगलाच मला कामाला लावणार आहे, कॉलेज मधे ही किती चिडका होता हा, फर्स्ट इयरला किती बोलला होता मला, आताही बघितल तरी का त्याने माझ्याकडे, अगदी अनोळखी जसा, त्याला आधीपासून माहिती आहे म्हणजे मी इथे जॉईन झाली आहे, काल बघितलं असेल त्याने की त्याने मुद्दामूनच मला या ऑफिसमध्ये बोलवुन घेतलं आहे, जे असेल ते असेल, पण का अस केल असेल?, याला बदला घ्यायचा असेल, जावू दे आपण जास्त विचार नको करायला, पण आकाशला बघून छान वाटल

अविनाश सर बाहेर येऊन सगळ्यांना काम देत होते, जो तो आपल्या कामात बिझी होते, यशला बऱ्यापैकी वर्कशॉप वर काम होतं, बराच हुशार होता तो, दोन-चार लोकांना हाताशी धरून तो कामाला लागला,

"मी काय काम करू सर?",.. अदिती

"तुमचं काम अजून फिक्स नाही अदिती मी सांगतो थोड्या वेळाने" ,.. अविनाश

" आकाश अदितीला काय काम द्यायच",..

" हो आहेत खूप काम ",.. आकाश

" पाठवू का तिला आत ",.. अविनाश

" नको त्यांचा एक ग्रुप करावा लागेल, मी सांगतो ",.. आकाश

ठीक आहे.

" अदिती आपल्याला एक नवीन टेंडर भरायचा आहे एका ऑर्डर साठी , त्या साठी कॅल्क्युलेशन च काम तुम्हाला करावे लागेल",.. अविनाश

"मला यातलं काहीच माहिती नाही सर",.. अदिती

" मी सांगेन तुम्हाला",.. अविनाश

अदिती परत नुसतीच बसलेली होती, आकाश अजूनही बाहेर आलेला नव्हता, थोड्यावेळाने दोन मुलांना अदिती अविनाश यांना आत बोलवलं आकाश मेन खुर्चीवर बसलेला होता, तो तर असा दाखवत होता जसा तो अदीतीला ओळखतच नाही, एकदमच एटीट्यूड मध्ये होता तो,

मीटिंगला सुरुवात झाली, अदिती बाजूला चेअरवर बसलेली होती,

आपल्याला इंजीनियरिंग वर्क साठी एक ऑर्डर मिळू शकते त्यासाठी टेंडर भरायचा आहे, टेंडर जिंकणं आपल्या कंपनीसाठी खूप महत्त्वाचा आहे, त्या दृष्टीने काम असेल ते अविनाश सर तुम्हाला सगळ्यांना समजून सांगतील, व्यवस्थित हवा आहे कॅल्क्युलेशन, सगळे पेपर नीट तयार करा आणि टीमने काम करा, मला अजिबात चुका नको कामात, उशीर नको व्हायला, काही समजल नाही तर विचारा

ठीक आहे,

आकाश त्याच्या कामात बिझी झाला

तीघ बाहेर आली अविनाश जीजू आत मध्येच होते

" यांना टेंडरचा काम समजून सांगा जीजू, त्यांनी केलेले कॅल्क्युलेशन नीट बघा, नवीन आहेत ते, लगेच काम सुरू करा" ,.. आकाश

"दोघ मुलांना माहिती आहे हे काम अदिती नवीन आहे, पण हुशार वाटते मुलगी ",.. अविनाश

"तिला या मुलांकडून काम शिकायला सांगा" ,.. आकाश

ठीक आहे

अदिती विचार करत होती आता ही आकाशशी बोलायला चान्स मिळाला नाही, तो तर माझ्याकडे बघतच नाही तर काय काय बोलणार त्याच्याशी, जाऊदे, तो मला ओळखत नाही अस दाखवतो, मला खूप त्रास होतो आहे त्याच्या अश्या वागण्याचा, काय करू आत जावून बोलू का त्याच्याशी? पण काय काम काढून आत जावू,

आकाश केबिन बाहेर आला, तो वर्क शॉप कडे जात होता, अदिती तिथे उभी होती, ती त्याच्या कडे बघत होती, आकाशने तिच्या कडे बघितल

"आकाश एक मिनिट, हाय.. तू ओळखत नाही का मला? कसा आहेस तू?",.. अदिती

एक्सक्युज मी.. आकाश जात होता

"आकाश थांब.. का अस करतोस?",.. अदिती

आकाशने बघितल कोणी बघत तर नाही ना? सगळे बिझी होते.. बर झालं,... "कामाशी काम ठेवा मिस अदिती, इतर गोष्टी बोलायला मला वेळ नाही" ,

"आकाश मला ही नाही बोलायच इतर विषयांवर पण प्लीज एकदा ऐकुन घे आकाश , माझ्या मनावर एक वर्ष झाल ओझ आहे, मी काही नाही केल, गैरसमज दूर कर प्लीज, नीट मोकळ रहा ",.. अदिती

"तुमच्या पर्सनल गोष्टी इथे सांगू नका मिस अदिती , मला इंट्रेस्ट नाही",... आकाश

आकाश..

"सांगितल ना एकदा पर्सनल गोष्टी इथे नको, माझ्याशी कामा व्यतिरिक्त इतर गोष्टींवर बोलू नका, बी प्रोफेशनल, हे ऑफिस आहे, दिलेल काम करा ",... आकाश

"ठीक आहे, सॉरी सर... या पुढे कामा व्यतिरिक्त काहीही नाही बोलणार मी तुमच्याशी , तुम्हाला ऐकून घ्यायच नाही काही .... , माझ्या कडून आता तुम्हाला या पुढे काही त्रास होणार नाही",.. अदिती

आकाश वर्क मध्ये निघून गेला, अदितीला खूप कसतरी वाटत होत, उगीच बोलायला गेली मी याच्याशी, मागे लागल्या सारखी करते आहे का मी? , मूर्ख पणा झाला , या पुढे नाही बोलायच याच्याशी , का करतोय पण आकाश अस? जावू दे, मी पण आता अशी वागेन मी ओळखत नाही याला, कामाशी काम ठेवायला पाहीजे होत मी , त्याचा गैरसमज झाला असेल तर होवू दे, आय डोन्ट केयर

पण एकदा हा आकाश नीट बोलता असता तर जरा मनावरचा भार हलका झाला असता, एक वर्ष झालं तेच विचार करते आहे मी की काय झालं आहे आकाशला?

थोड्या वेळाने अविनाश जीजू काय काय काम करायचं ती सगळी माहिती देत होते, अदितीच लक्ष नव्हत, अदिती..... अदिती...

सर..

"कुठे लक्ष आहे अदिती",.. अविनाश

सॉरी सर

"सुरेश तुम्ही मॅनेजर आहात ना इथले, तुम्ही अदितीला काम समजावून सांगा",.. अविनाश

ठीक आहे सर

सुरेश, अदिती, रोहित, यांची टीम होती

प्रत्येकाने काय काय करायचं हे तिघांनी मिळून ठरवलं, आणि ते लगेच कामाला लागले

"कधीपर्यंत द्यायचं आहे हे सगळं कॅल्क्युलेशन करून",.. अदिती

"दोन दिवसात रेडी पाहिजे आपले सगळे रिपोर्ट",.. सुरेश

" सर मी केलेलं काम तुम्हाला दाखवते प्लीज तुम्ही बघून घ्या",.. अदिती

" हो तुम्ही काळजी करू नका अदिती, मला सुरेश बोला सर वगैरे नको",.. सुरेश

या पुढे या सुरेशशी आणि अविनाश सरांशी बोलत जावू
....

रितेश नुकताच ऑफिसला पोहोचला होता त्याने तिथून रितिकाला फोन केला,.. "काय ठरलं आहे रितिका तुझ? माझ्या बरोबर लग्न करायचा आहे की नाही तुला? ",

"मला आकाश बरोबर लग्न करायचा आहे, त्याला सारखं असं वाटतं आहे की मी तुझ्यासोबत आहे पण मी त्याला सांगितलं की आपल्या दोघांमध्ये तसं काही नाही",.. रितिका

"कधी सांगितले तू त्याला असं",.. रितेश

"कालच सांगितलं",.. रितिका

" मला सांगायचं ना मग तसं, मला काल रात्री फोन आला होता आकाशचा मी त्याला असं दाखवलं की आपल्यामध्ये अजूनही काहीतरी सुरू आहे ",.. रितेश

" का करतो आहेस तू रितेश अस? तू प्लीज एकदा फोन करून आकाशला सांगून दे की आपण दोघे फक्त मित्र आहोत",.. रितिका

रितिका हॉलमध्ये येऊन बसली,.." मम्मा पप्पा गेले का ऑफिसला? ",

" नाही आता जातील ते ",.. तिचे पप्पा खाली आले

" पप्पा तुम्ही बोलले का आकाशच्या घरच्यांशी ",.. रितिका

" मी काल परवाच केलेला त्यांना फोन",..

" मग त्यांचा काही रिप्लाय नाही आला का त्यांच्या बाजूने",.. रितिका

" आकाशला विचार करायला वेळ हवा आहे असं सांगत आहेत ते",..

"एक काम करा ना तुम्ही त्यांच्या घरी जाऊन बोलून घ्या ",.. रितिका

" चालेल असच करू, तू ही येशील का?",..

हो... रितीका लाजली होती

"मी फोन करून त्यांना विचारतो वेळ, आपण जाऊ त्यांच्या घरी संध्याकाळी भेटून तर येऊ",.. पप्पा

आता रितिकाला बरं वाटत होतं

रितेश विचार करत होता काय करावं या रितिकामुळे मी किती खोटं बोललो आकाशशी, त्याच आदिती बरोबर जे ठरत होतं ते पण मोडलं माझ्या मुळे, आता रितिका माझ्याशी लग्न करत नाही, त्या आकाशशी लग्न करायचं आहे तिला, पण रितिकाला अजून माहिती नाही मी कसा आहे, मी रितिकाचा प्लॅन फ्लॉप करेल मी, आकाशला सगळं सांगून देणार आहे, माझा वापर करून घेतला रितिकाने, मी तिला सोडणार नाही,

मीटिंग झाल्यानंतर आकाश त्याचं काम करत होता, समोर अदिती दिसत होती, ती तिच्या ग्रुप बरोबर बाहेर काम करत होती , यावेळी यश नव्हता तिच्यासोबत, तो वर्कशॉप वर काहीतरी मशीन बद्दल वर्कर्स कडून माहिती घेत होता, आता आकाशला खूप कसतरी वाटत होत, का केल अस मी थोड्या वेळा पूर्वी, अदिती किती छान बोलायला आली होती माझ्याशी, मी किती फटकून वागलो तिच्याशी, अपमान केला तिचा मी, रडवेली झाली होती ती, सॉरी अदिती,

जॉब सोडून तर जाणार नाही ना ती, तिने बॉन्ड तर साईन केला ना, मी का अस राग धरून बसलो आहे अस दाखवतो आहे तिला, खर तर मला तिचा राग नाही आला, की कस वागु तेच समजत नाही मला, बोलू का जावून, नको, आता ती बोलणार नाही माझ्याशी,

हुशार आहे अदिती पण, हे काम काही विशेष नाही तिच्या साठी एकदा व्यवस्थित समजवलं किती फटाफट करीन, सगळे कामाला लागले,

आधीच्या टेंडरचे कॅल्क्युलेशन कसे होते ती फाईल अविनाश सरांनी अदितीला आणून दिली, तिच रेफरन्स घेऊन पुढचं काम करत होती ती
.....

रितिकाच्या वडिलांनी राहुल सरांना फोन केला, ते दोघं बराच वेळ बोलत होते,.. "आज आम्हाला यायचं आहे संध्याकाळी तुमच्याकडे आकाशला भेटायला",..

"यु आर मोस्ट वेलकम, असं करा तुम्ही डिनर साठी या आमच्याकडे",.. राहुल सर

"नको डिनर वगैरे आम्ही भेटायला येऊ",..

"आम्हाला सगळ्यांना घरी जायला उशीर होतो आपण सगळे डिनर ला भेटू ",.. राहुल सर

"चालेल काही हरकत नाही ",.. ते निघाले, चांगले आहेत लोक,

राहुल सरांनी आकाशला फोन केला,.." आज संध्याकाळी लवकर निघ आणि इकडे घरी ये ",

" काही काम आहे का पप्पा? ",.. आकाश

" हो रितिका आणि रितिकाच्या घरचे आपल्याकडे डिनरला येणार आहेत",.. राहुल सर

आकाशला शॉक बसला,.. "पप्पा मला नाही जमणार यायला",

"याला काय अर्थ आहे आकाश ते काही लग्न जमवायला येत नाही सहज येत आहेत आपल्याकडे, आलेल्या गेस्ट शी आपण नीट वागायला पाहिजे त्यांचं स्वागत करायला पाहिजे",.. राहुल सरांनी बातमी लपवून ठेवली की ते आकाश साठी येत आहेत

" ठीक आहे मी येईल पप्पा आठ वाजेपर्यंत येतो, पूनम जिजु विकी त्यांना ही सांगू का? ",.. आकाश

" नको फक्त तू ये",.. राहुल सर

राहुल सरांनी मोना मॅडमला आत बोलवलं,." संध्याकाळी डिनर साठी पाहूणे येणार आहेत आपल्या कडे, ती मुलगी रितीका आकाश साठी सांगून आलेली आहे",

" अरे वाह खूप छान, काय बेत करू ",... मोना मॅडम खुश होत्या

तू ठरव

मोना मॅडमने घरी फोन लावला होता, त्या स्वयंपाक काय करायचा त्या सूचना कुकला देत होत्या, स्पेशल हव आजच डिनर, त्यांना माहिती नव्हत आकाशला रितिका आवडत नाही..

🎭 Series Post

View all