प्रेम पंख ❤️... भाग 9

आकाश... कुठे आहेस तू? , कधी पासून भेटलाच नाही, रागवून निघून गेला तो माझ्या आयुष्यातून, सौरभ वर चिडलेला होता तो तेव्हा,प्रेम पंख ❤️... भाग 9

©️®️शिल्पा सुतार
........

आकाश घरी आला, दोघी आजी सोफ्यावर बसलेल्या होत्या, पूनम अविनाश होते, विकी हसून बघत होता,

"आकाश जेवून घे चल",. दादी

"त्याच पोट भरल असेल",.विकी

"का भरल असेल माझ पोट?", ..आकाश

"आम्हाला समजल एक स्थळ आलं आहे तुला लग्नासाठी, पप्पा आजीला सांगत होते, कोण आहे मुलगी? तुझ्या सोबतच होती ना ती कॉलेजला, तू ओळखतोस ना तिला? ",.. विकी

"हो तिचं नाव रितिका आहे" ,.. आकाश

"काय ठरवलं मग पुढे तू? ",.. विकी

"अजून काहीही ठरलं नाही, मला एवढ्यात लग्न करायच नाही ",.. आकाश

पूनम आकाश कडे बघत होती,.. चला जेवायला,

" आमच जेवण झालं आहे, चल तू जेवून घे, किती उशीर होतो तुला यायला ",.पूनम

आकाश जेवायला टेबल कडे गेला, पूनम त्याच्या मागे गेली,

" दीदी तू बस मी घेतो जेवण ",.. आकाश

"तू खरच लग्नाला होकार देणार आहेस का आकाश? ",.. पूनम

"हो देऊ शकतो मी होकार, काही प्रॉब्लेम नाही दीदी, का काय झालं?",.. आकाश

"अदितीचं काय झालं काही समजलं का?",.. पूनम

"काही नाही ती आहे कॉलेजमध्ये, झाली असेल परीक्षा तिची ",.. आकाश

" तुला तिच्याशी लग्न नाही करायचं का?",.. पूनम

"नाही तिचं दुसऱ्यावर प्रेम आहे उगाच तिच्या मागे मागे करण्यात काही अर्थ नाही ",.. आकाश

" कोणी सांगितलं तुला तू स्वतः बघितलं का त्यांना ",..पूनम

"नाही मी बघितल नाही पण माझे मित्र त्या दोघांना रोज बघतात, अदितीच नाही मन माझ्यासोबत राहायचं ",.. आकाश

" एकदा बोलून तरी बघ तिच्याशी",.. पूनम

" काही गरज नाही आहे दीदी, मला आता ऑफिस मधे लक्ष द्यायच आहे ",.. आकाश

" ठीक आहे ते ऑफिसच काम महत्त्वाच आहे त्या सोबत स्वतः कडे लक्ष दे आकाश , मग तू पप्पा सांगतील तिकडे लग्न करणार आहे का",.. पूनम

" सांगता येत नाही होकार देऊ शकतो मी",.. आकाश

"तू असा स्वतःला शिक्षा नाही करून घेऊ शकत आकाश, तू एकदा जाऊन व्यवस्थित आधी बोलून घे ना अदितीशी",.. पूनम

" नाही दीदी मी नाही जाणार तिच्याशी बोलायला बऱ्याच वेळा बोलून झालं आहे, ती बरीच कारण देत होती की तिच्या घरच्यांना तिची गरज आहे, बरेच काम आहेत वगैरे वगैरे",.. आकाश

" अरे मग असतात जबाबदाऱ्या एखाद्यावर, तीच घरची मोठी असेल तर तिला वाटत असेल की नोकरी करून घरच्यांना सपोर्ट करावा",.. पूनम

" हे बघ दीदी तू मला तिच्याबद्दल काही सांगू नको",.. आकाश

" ठीक आहे तू शांत हो ",.. पूनम

जेवण झालं, आकाश रूम मध्ये आला, रितीकाच स्थळ कस काय आल मला? ती तर रितेश सोबत आहे ना, काय प्रकार आहे हा, त्या दोघांनी घरी सांगितल की नाही, म्हणून मी पप्पांना काही सांगितल नाही, उद्या रितेशशी बोलून बघू आपण, त्याला माहिती आहे की नाही हे,

अदिती होईल का जॉईन आपल्या कंपनीत? , नक्की ती आहे का सौरभ सोबत? , पण मला राग आला आहे तिचा, समजेल तरी नक्की काय आहे ते तीच आणि सौरभच?

आज अदितीचा कॅम्पस इंटरव्यू होता, बऱ्याच मोठमोठ्या कंपनीकडून लोक आलेले होते इंटरव्यू साठी, अदिती तयार होती, छान कॉटनचा कुर्ता तिने घातला होता, प्रिया मनीषा अनु ही तयार होत्या, हुशार मुलांचा आधी होता इंटरव्यू त्यात अदितीचा नंबर होता,

आकाशच्या कंपनीतनं लोक आलेले होते, एक एक इंटरव्यू सुरू होता, अदितीला खूप धडधड होत होती, खूप छान झाला तिचा इंटरव्यू, त्यांनी काय काम असेल किती दिवस ट्रेनिंग असेल, त्या नंतर खर काम सुरू होईल, सगळी माहिती दिली

"तुम्ही जरा वेळ बाहेर बसा मग आपण ठरवू",..

अदिती बाहेर जाऊन बसली, अनुचा इंटरव्यू झाला, प्रिया मनीषा सगळ्यांचे इंटरव्यू झाले, अनु आणि अदितीला आकाशच्या कंपनीकडून होकार आला

प्रिया मनीषा यांना दुसरीकडे जॉब मिळाला, जरा वेळाने अदितीला आत बोलवलं, तिला पेमेंट किती आहे ते सगळं सांगितलं,

" काय काय काम असेल",.. अदिती

त्यांनी सांगितलं आणि एक बॉण्ड वर सही करायला सांगितली, तीन वर्षाचा जर हा बॉण्ड साईन केला तर पगार दुप्पट होणार होता, काय करावं? करावा का बॉन्स साईन, पण आधीच कंपनी बघायला मिळालं असती तर बर झाल असत, काम कस आहे काय माहिती, नंतर साइन केल असत तर बरं झालं असतं ",.. आदिती विचार करत होती, तिने थोडा वेळ मागितला विचार करण्यासाठी, ती अनु बाहेर येऊन बसल्या

" काय करू या अनु तीन वर्ष एका कंपनीत नौकरी करावी लागेल ",.. अदिती

" पण पगार जास्त आहे आपला फायदा होऊ शकतो, घरी जास्त पैसे पाठवता येतील ",.. अनु

" हो फायदा तर खूपच होणार आहे आपला यामुळे, काय करूया कंपनीचे नाव तर खूप छान आहे",.. त्यांनी अजून एक दोन जणांना विचारलं सगळ्यांनी सांगितलं कंपनी खूप चांगली आहे ही.

मॅनेजरच्या फोनवर आकाशचा फोन येत होता

" काय झालं झालं का इंटरव्यू? ",.. आकाश

" अदितीचा झाला आहे इंटरव्यू आणि तिच्यापुढे आम्ही बोॅंडची अट टाकली आहे, तिने जरा वेळ मागितला आहे विचार करायला",.. मॅनेजर

"किती पेमेंट ठरला आहे",.. आकाश

"असा पंचवीस हजार आहे बाकीच्यांना, जो बोंड साईन करेल त्याला पन्नास हजार आहे",... मॅनेजर

" ठीक आहे आदिती जर नकार देत असली तर थोडा पगार वाढवा",.. आकाश

" ठीक आहे सर",.. मॅनेजर

आदितीला आत मध्ये बोलवलं.." काय ठरलं आहे मग तुमच?, तुमचा नकार असेल तर तस कळवा म्हणजे आम्हाला बाकीचे कॅंडिडेट घ्यायला बरे ",

अदिती विचार करत होती

" काय विचार करता आहात तुम्ही मिस अदिती? कंपनी छान आहे मोठी आहे तुम्हाला भरपूर शिकता येईल तिथे, पगारात तर अजून वाढु शकत नाही पण तुम्हाला बोनस मिळेल आत्ता ऑफर लेटर मध्ये तसे लिहून देतो",.. मॅनेजर

" चालेल हरकत नाही मी तयार आहे जॉईन व्हायला",.. अदिती

त्यांनी फॉरमॅलिटी पूर्ण केल्या,.." तुम्ही तुमचे डॉक्युमेंट सबमिट करा, मग तुम्हाला ऑफर लेटर मिळेल",

ठीक आहे..

" एक तारखेपासून तुम्ही जॉईन व्हा तसा तुम्हाला ऑफिस मधून ई-मेल येईल",.. मॅनेजर

" ठीक आहे थँक्यू सर ",.. अनुला ही नोकरी लागली अदिती अनु सोबत होत्या, त्यामुळे त्या दोघींना खूप छान वाटत होतं

आकाशचा फोन आला मॅनेजर सरांनी अदितीचं काम झालं अस त्याला सांगितलं... चला बरं झालं, आता मजा येईल, खूप हुशार आहे अदिती, इथे कर म्हणा काम,

राहुल सरांचा फोन आला,.." तू काय ठरवलं आहेस लग्नाबद्दल आकाश?, काल मी तुला सांगितलं होतं ना रितिका बद्दल",

"मी विचार करतो आहे पप्पा मला थोडा वेळ द्या",. आकाश

"ठीक आहे पण लवकर विचार कर, त्या लोकांचा आज ही फोन आला होता परत",.. राहुल सर

"ठीक आहे पप्पा ",.. आकाश

राहुल सरांनी फोन ठेवला, आकाशने रितेशला फोन लावला, रितेश ऑफिसमध्ये होता,.. " काय म्हणतो आहेस आकाश कसा आहेस",..

" मी मजेत आहे ",. आकाश

" आज कशी काय आठवण काढली ",.. रितेश

" अरे मला तुझ्याशी महत्वाचं बोलायचं आहे, मला रितिकाच्या घरून लग्नासाठी स्थळ आल आहे म्हणूनच मी तुला फोन केला, तुम्ही दोघांनी घरी सांगितलं आहे की नाही, तुम्ही दोघ सोबत आहात ना, तुम्हाला लग्न करायचं आहे ना?",.. आकाश

रितेशला समजलं की आकाशला माहिती नाही आम्ही दोघं सोबत नाही ते, तरी त्याने काही सांगितलं नाही,.." आकाश मी तुला नंतर फोन करतो थोडा मीटिंगमध्ये आहे मी नंतर बोलतो",.. रितेशने फोन ठेवून दिला

काय चाललं आहे नक्की रितिकाचं? ती मलाही होकार देत नाही आणि आता आकाशच्या घरी कस काय स्थळ घेऊन गेली, त्याने रितिकाला फोन लावला,.. "काय करते आहे रितिका?",

"काही नाही रुटीन सुरू आहे, तू कसा आहेस रितेश ",.. रितीका

" ठीक आहे मी, तुझा काय विचार आहे माझ्याशी लग्न करायच की नाही तुला रितीका, किती वेळा विचारल मी तुला, प्लीज माझा विचार कर ",.. रितेश

" माझा असा काहीही विचार नाही रितेश, तुला माहिती आहे मी तुला बऱ्याच वेळा नकार दिला आहे",.. रितिका

" समजलं ते मला म्हणूनच तू स्थळ घेऊन आकाश कडे गेली होती ना ",.. रितेश

" तुला कसं समजलं? आकाशचा फोन आला होता का? ",.. रितिका

"हो.. त्याला नाही माहिती की आपल्या दोघांमध्ये काही नाही तो विचारत होता तुम्ही दोघांनी घरी सांगितलं नाही का",.. रितेश

" त्याला सांगून दे मग तू की आमच्या तसं काही नव्हतं मला आकाशशी लग्न करायचं आहे",.. रितिका

" तू असं नाही करू शकत रितिका",.. रितेश

" का नाही करू शकत? आपल्यात तसं काही नाही रितेश, मी माझ्या आयुष्याचा निर्णय घेऊ शकते आणि यापुढे तु मला फोन नाही केला तरी चालेल",.. रितिका ने फोन ठेवून दिला
.......

आज होस्टेलवर सगळे खूप खुश होते, बऱ्याच जणींना जॉब मिळाला होता पण आता कॉलेज लाईफ होस्टेल लाईफ संपलं सगळे वेगळे होणार हे पण वाईट वाटत होतं, दुसऱ्या दिवशी सगळे सामान पॅक करत होते,

ऑफिस ऍड्रेसच्या जवळच एका पेइंग गेस्ट बिल्डिंगमध्ये आदिती अनु शिफ्ट झाल्या, त्यांनी हॉस्टेलवरून त्यांच सामान तिकडे शिफ्ट केल आणि त्या घरी गावाला गेल्या, एकदा ऑफिस सुरू झालं की परत जाता येणार नाही, आता वेळ आहे आठ दहा दिवस तर घरी आल्या होत्या त्या

आदिती आल्यामुळे आई-बाबा अमित खूप खुश होते, अमितनेही आता पुढचं ऍडमिशन घेतलं होतं कॉलेजला,

"ताई तुझ ऑफिसच काम झाल बर झाल ",.. अमित

"हो ना, मलाही बर वाटत आहे",.. नोकरी कशी लागली याबद्दल सगळं अदिती त्यांना सांगत होती,

दुकानही आता बऱ्यापैकी चालत होतं, दुकानातही तिने बऱ्याच आयडिया सांगितल्या, चार-पाच दिवस राहणार होती ती, आईला खूप आनंद झाला होता,

" आई बाबा आता अजिबात कसली काळजी करायची नाही, अमितच चांगल शिक्षण व्हायला पाहिजे",.. अदिती

"तुझ्या मुळे हे शक्य होईल बेटा",.. बाबा

"आई बाबा तुमच्या सपोर्ट आणि आशिर्वाद मुळे शक्य झाल हे ",.. अदिती

"तिकडे राहण्याची सोय केली का ग",.आई

" हो आम्ही ऑफिस जवळच रूम बघितलेली आहे",.. अदिती

अदितीच्या सगळ्या मैत्रिणी तिला भेटायला आल्या होत्या, त्यांनी एक छान छोटस गेट-टुगेदरही केलं, काही जणींच लग्न झाल होते, काहीच ठरलं होत, वयाच्या किती वेगळया टप्यात आलो ना आपण,

"तू कधी करतेस लग्न अदिती ",.. मैत्रिणी विचारात होत्या

" माहिती नाही ग ",.. अदिती

आकाश... कुठे आहेस तू? , कधी पासून भेटलाच नाही, रागवून निघून गेला तो माझ्या आयुष्यातून, सौरभ वर चिडलेला होता तो तेव्हा, एकदा भेटायच होत मला आकाश, मी कधी माझ्या लग्नाचा विचार केला नाही, काय होणार आहे माझ्या आयुष्यात काय माहिती, आकाश कुठे भेटेल, एकदा बोलायच होत त्याच्याशी, एकदा माझ्या कडून सांगायच आहे त्याला सत्य, गैरसमज नको वाटतो

प्रियानेही सचिन बद्दल घरी सांगितलं त्यांचंही लग्न जमलं होतं, प्रिया ही जॉब करणार होती सचिनही चांगल्या कंपनीत लागला होता

सुट्टी संपली अदिती प्रिया वापस आल्या अनु पण वापस आली होती,..

अदिती एक दोन दिवसात ऑफिस मध्ये जॉईन होणार होती, आकाशला खूप बरं वाटत होतं, मला नक्की हवं काय आहे? अदितीचं खरंच नक्की सौरभ सोबत काही आहे का? आता ऑफिसला जॉईन झाली की समजलेच, तिला माहिती असेल का हे माझं ऑफिस आहे ते? मी का तिचा एवढा विचार करत आहे,

आकाश घरी आला त्याने पूनमला सांगितलं नाही पण आज खरच त्याला मनातनं बरं वाटत होतं, सगळं काय आहे ते नक्की? अदितीचा विचार करत होता तो पूर्ण वेळ.

🎭 Series Post

View all