प्रेम पंख ❤️... भाग 8

आता कॅम्पस इंटरव्यू असेल त्यांचा, आपल्या कंपनीतुन टीम जाईलच कॉलेजमध्ये सिलेक्शन साठी , त्यांना सांगावं लागेल की आधी अदितीला घ्या,


प्रेम पंख ❤️... भाग 8

©️®️शिल्पा सुतार
........

अदिती जोरात अभ्यासाला लागलेली होती, मध्ये एक परीक्षा होवुन गेली, चांगले गेले पेपर, आज आकाशने ठरवलं होतं की अदितीशी बोलायचं तिला सांगू फॉरेनला जातो आहे ते, तिला बघायच होत जाण्या आधी एकदा , तसा त्यां दोघां मध्ये कोणताही वाद नव्हता, अदिती शांत स्वभावाची होती, तिच्या सोबत आकाश नीट वागत होता , त्यामुळे तसा काही प्रॉब्लेम नव्हता

अदिती ऑफिसहुन येत होती तिने समोर बघितल आकाश उभा होता,.. हाय अदिती

हॅलो आकाश

" अदिती मी ऑफिसच्या कामासाठी पंधरा दिवस फॉरेनला जातो आहे",.. आकाश

" अरे वा खूप छान आकाश कधी निघतो आहेस",.. अदिती

"उद्याच निघतो आहे तुला माहिती आहे अदिती पप्पांनी माझ्यावर हा खूप मोठा विश्वास टाकला आहे , मोठ महत्वाच काम आहे हे, मी पण व्यवस्थित काम करणार आहे",.. आकाश

" हो आकाश तू हुशारच आहेस, काय काम आहे तुझ्या ऑफिस मध्ये ",.. अदिती

आकाश सांगत होता फॅक्टरी ऑफिस बद्दल

"ऑल द बेस्ट नीट कर काम ",.. अदिती

आकाशने हात पुढे केला, दोघांनी हात मिळवले, आकाश खूप खुश होता, दोघं व्यवस्थित बोलत होते आधी सारखे यालाच समजूतदारपणा म्हणतात

" अदिती तू विचार केला का माझ्याबद्दल काही? , हे बघ आपल बरच पटत, चांगलं होईल आपलं एकमेकांसोबत, विचार कर, आपण चांगले फ्रेंड्स आहोत, चांगले लाइफ पार्टनर होवू शकतो ",.. आकाश

" मला एवढ्यात सांगता येणार नाही आकाश, मला माझ्या अभ्यासावर लक्ष केंद्रित करायचा आहे आणि माझ्या घरच्यांना माझ्या सपोर्टची गरज आहे, नौकरी करायची आहे मला, घरी विचाराव लागेल " ,... अदिती

"आपण बोलू नंतर या विषयावर अदिती, तू कसली काळजी करू नकोस, आज तुला बघायचं होतं म्हणून इकडे आलो मी, निघतो आता ",.. आकाश

अदिती हॉस्टेलवर आली, पंधरा दिवस आकाश नाही येणार आता इथे तिला मनातून वाईट वाटत होतं

आकाश तिथे मित्रांसोबत बोलत उभा होता, रितेश आला तो आकाशची वाट बघत होता

हाय रितेश..

" कसा आहेस आकाश, काय चाललं आहे, बर्‍याच दिवसांनी भेटलास ",..रितेश

" काही नाही ऑफिस सुरू आहे ट्रेनिंग सुरू आहे तुझं काय सुरू आहे",.. आकाश

"मी रितिकाला भेटायला आलो होतो",.. रितेश

"कशी आहे रितिका?",.. आकाश

" चांगली आहे मी आता बघितलं तुला अदितीशी बोलतांना चांगली मैत्री आहे वाटतं तुमची",.. रितेश

हो

"पण तुला माहिती आहे ना तिच आणि सौरभच प्रेम प्रकरण",.. रितेश

" नाही रे तसं काही नाही त्यांचं ते एका गावचे आहे ",..आकाश

"कुणी सांगितलं तुला? सगळ्यांना माहिती आहे, ते नेहमी सोबत असतात, खूप कंफर्टेबल दिसते अदिती त्याच्या सोबत, तूच येत नाही आता हल्ली कॉलेजला, संध्याकाळी येतो, मी असं पण ऐकलं आहे की तू अदितीला प्रपोज केलं",.. रितेश

"हो तिने वेळ मागितला आहे विचार करायला",.. आकाश

" हो माहिती आहे मला ती कॉलेज कॅन्टीन मध्ये सगळ्यांना सांगत होती तुझ्या बद्दल ",. रितेश

काय?

" आकाश कसा मागे मागे येतो माझ्या, तिच्या मैत्रिणी बोलत होत्या श्रीमंत मुलगा मिळाला लग्न करून घे, ती बोलली थोडे दिवस मैत्री करून पैसे काढून घेईल आणि लग्न तर मी सौरभशी करणार आहे",.. रितेश

" काहीही काय सांगतोस तू मला रितेश, अदिती अशी मुलगी नाही ",.. आकाश

"खरं आहे हे आकाश, तुला विचारायचं असेल तर रितिकाच्या मैत्रिणींना विचार, सगळ्यांनी ऐकलं आहे अदितीला असं बोलताना कॅन्टीनमध्ये, तुला नसेल ऐकायच माझ तर ठीक आहे, पुढे जावून त्रास नको व्हायला तुला म्हणून सांगितल, विचार कर ",..रितेश

आकाश खूपच हर्ट झाला होता, चल मी निघतो घरी आजी वाट बघत असेल, आकाश कार जवळ उभा होता, अदितीचाच विचार करत होता तो , अदितीला नाही आवडत का मी? का अशी बोलली असेल ती? तिला तो सौरभच आवडतो का?

माझ्याशी गोड बोलून ती पैसे काढणार होती , अस नसेल, काय सांगाव पण खर ही असेल, काय करू खूपच चिडला होता आकाश परिस्थिती वर, पण ती सौरभ सोबत इतके दिवस फिरत होती, कॅन्टीन मध्ये पण ती सगळ्यांसमोर अस बोलली असेल तर हा माझा अपमान आहे, नक्की काय खर आहे काय माहिती

तो अदितीच्या होस्टेल जवळ गेला त्याने तिला बाहेर बोलवलं, प्रिया मनीषा सोबत होत्या त्या बाजूला जावून उभ्या राहिल्या

"काय झालं आकाश?, तू अजून इथेच?तुला उशीर होतो ना? ",.. अदिती

"आज तू कॅन्टीन मध्ये माझ्या बद्दल बोलत होती का तुझ्या मैत्रिणी सोबत",.. आकाश

"तू चिडला आहेस का आकाश ",.. अदिती

"मी काय विचारतो आहे? तू आज सौरभ सोबत होतीस का? तू मला होकार दे किवा नकार दे अस सगळ्यां समोर गम्मत नको करत जावू माझी",.. आकाश

"काय झालं आकाश? , कोणी काही म्हटल का तुला?, मी काही केल नाही ",.. अदिती

" तुला काय वाटल मला समजणार नाही का? आज तुझ्या सोबत कॅन्टीन मध्ये सौरभ होता ना, तुम्ही सोबत आहात का? ",.. आकाश

" हो होता माझ्या सोबत सौरभ, पण काय झाल? ",.. अदिती

" तुम्ही माझ्या बद्दल बोलत होते ना ",.. आकाश

हो..

" का अस केल? ",.. आकाश

" अरे मी आकाश माझ्या ओळखीचा आहे हे सांगत होती",.. अदिती

"मला माहिती आहे तू काय सांगत होती ते ",..आकाश

आकाश रागाने निघाला तिथून

आकाश आकाश ऐक तरी...

"या पुढे माझ्याशी बोलू नको ,मी तुला एक हुशार छान शांत मुलगी समजत होतो पण तू ही अशी निघाली ",.. आकाश

" अशी म्हणजे?, आकाश मी काही केल नाही थांब काही तरी गैरसमज झाला आहे तुझा आकाश", .. अदिती

" तो निघून गेला",..

"काय झाल अदिती?",.. मनिषा

" कोणी काही तरी आकाशला काही तरी सांगितल मी त्याच्या बद्दल कॅन्टीन मध्ये बोलत होती अस ",.. अदिती

"काय पण?",.. मनिषा

"माहिती नाही हा आकाश ही ना का इतका चिडला, काय करू आता ",.. अदिती

" जावू दे उद्या बोल त्याच्याशी ",.. मनिषा

" तो फॉरेनला जातो पंधरा दिवस",.. अदिती

त्या तिघी आत आल्या, अदिती आकाशचा विचार करत होती, अस कोणी काय सांगितल याला? , मी सौरभ सोबत होती याचा राग आला का याला? की काय झाल? कोणी चुकीच काही सांगितल का याला माझ्या बद्दल? काय करू मी आता?

जावू दे जास्त विचार नको करायला, आकाश येईल पंधरा दिवसांनी तेव्हा बोलू,

घरी आल्यावर आकाश फॉरेनला जायची तयारी करत होता, सकाळी किती खुश होतो मी आणि आता केवढा धक्का बसला, काय खर आहे नक्की काही समजत नाही, अदिती अशी मुलगी नाही, पण बाकीचे म्हणता आहेत, त्यांनी ऐकल बोलल ते, जावू दे नाही तरी अदितीला माझ्या सोबत रहायच नाही, तिने नकार दिला मला, आता कामात लक्ष देवू, बाकी सगळ सोडा, ती आणि तो सौरभ काहीही करे ना,... तो फॉरेनला निघून गेला

अदिती आकाशचा विचार करत होती, याचा गैरसमज दूर व्हायला हवा होता, मला तर आता काही सुचत नाही कधी आकाश भेटेल आणि त्याला व्यवस्थित विचारेल की तुला कसला राग आला आहे अस झालं होतं तिला

आकाशचं काम व्यवस्थित सुरू होतं, खूप हुशार होता तो, त्यामुळे काहीही अडचण आली नाही, त्याच्या कामावर राहुल सर खूप खुश होते, पंधरा दिवस झाले, अजून थोडं काम वाढलं, आकाश तिकडेच राहिला, त्याला इकडे यायचं नव्हतं लवकर वापस,

अदितीच कॉलेज व्यवस्थित सुरू होतं, ती सारखी बघत होती दिसतो का आकाश? पण तिला त्यानंतर तो दिसला नाही

काय करावं? कोणाला विचारून बघावं? त्याचा फोन नंबर नाही, तो कुठे राहतो ते माहिती नाही, त्याचे मित्र आता कॉलेजला येत नाही

रितिकाला माहिती असेल का? जाऊदे कोण बोलेल तिच्याशी, ती नेहमी माझ्यावर चिडलेली असते, रितिकाने तर काही सांगितलं नसेल ना आकाशला माझ्या बद्दल, शक्यता आहे, पण आता जोपर्यंत आकाश भेटत नाही तोपर्यंत काही समजणार नाही,

थोडे दिवसांनी आकाश वापस आला, तो आता कॉलेजला येत नव्हता, त्याला अदितीची आठवण येत होती पण शक्य तितक कॉलेज पासून लांब थांबलेल बरं असा तर विचार तो करत होता आणि आता त्याच ट्रेनिंग ही संपल होत, त्याने तोट्यात असलेली कंपनी चालवायला घेतली होती , अविनाश जिजु तिकडे आकाशला जॉईन झाले, एक टीम मिळाली होती त्याला, खूप सिरियस झाला होता आकाश कामात, बॉस होता तो तिथला,

ऑफिसमध्ये फुल वेळ काम होत, काहीही करून ही कंपनी नीट करायची ही घाई होती त्याला, पप्पा खुश झाले पाहिजे माझ्या कामावर , संध्याकाळी ही वेळ नसायचा त्याला, ऑफिसमध्येच वेळ व्हायचा, तिथून तो घरी जायचा,

अदितीच आता कॉलेज संपल होत, प्रोजेक्ट सुरु होत, पुढच्या आठवड्यात कॅम्पस इंटरव्यू होणार होते त्या साठी सगळ्या अभ्यासाला लागल्या होत्या,

आकाश का येत नाही कॉलेजला? एकदा इथून जाण्याआधी त्याला भेटून गैरसमज दूर केले असते, खूप कसतरी वाटत आहे मला आकाशला भेटायच आहे मला ,

रितीका खूप खुश होती बरं झालं या दोघांचं काही ठरण्याआधीच ब्रेकअप झालं, तिचं आता शिक्षणही झालं होतं, घरचे आता तिच्यासाठी ही स्थळे बघत होते, ती घरी गेली, तिच्या मम्मीने विषय काढलाच की तुला कोणी मुलगा आवडतो का सांग नाहीतर आम्ही बघू का तुझ्यासाठी स्थळ

मी सांगते म्हणून रितिका रूम मध्ये निघून गेली, ती खूप खुश होती, खाली जेवायला आल्यानंतर तिने बाबांना आकाश बद्दल सांगितलं, मुळातच दोन श्रीमंत घराण्यांमध्ये लग्न होणार होत, घरचे पण खुशीत होते

" तुला नक्की आवडते ना आकाश",..

" हो पप्पा मला त्याच्याशीच लग्न करायचं आहे",.. रितीका

"ठीक आहे मी बघतो त्याच्या पप्पांशी बोलून",..

राहुल सरांनी आकाशला ऑफिसमध्ये बोलवून घेतलं इकड तिकडच्या ऑफिसच्या कामाच्या गप्पा झाल्यानंतर त्यांनी रितीका कडच स्थळ आल आहे तुझ्या साठी असं सांगितलं

रितिकाच नाव ऐकून आकाश गडबडला

" तु ओळखतो का हिला",.. राहुल सर

" हो ती आमच्या कॉलेजला माझ्यासोबतच होती शिकायला",.. आकाश

"चला बर झाल, तुझं काय म्हणणं आहे मग तुला हे स्थळ पसंत आहे का",.. राहुल सर

"पप्पा मला थोडा वेळ हवा आहे, मी आत्ताच काम सुरू केल, सहा महिने पण झाले नाही, थोडा वेळ हवा आहे, मला अजून काम शिकायचं आहे, अजून एक दोन वर्ष तरी मी लग्न करणार नाही ",.. आकाश

" पण ते चांगले लोक आहेत मोठ्या मोठ्या फॅक्टरी आहेत त्यांच्या, खूपच छान आहे त्यांचं आणि मुलगी पण एकुलती एक आहे, जरा विचार कर ",.. राहुल सर

" हो मी ओळखतो रितिकाला, मी विचार करून सांगतो आहे",.. आकाश

" ठीक आहे टेक युवर टाइम",.. राहुल सर

इतके दिवस जी गोष्ट आकाश विसरला होता ती आता त्याला एकदम आठवली... अदिती.... बरेच महिने झाले तिला बघितलं नाही, कुठे असेल ती? परीक्षा झाली असेल का तिची? ,

आता कॅम्पस इंटरव्यू असेल त्यांचा, आपल्या कंपनीतुन टीम जाईलच कॉलेजमध्ये सिलेक्शन साठी , त्यांना सांगावं लागेल की आधी अदितीला घ्या,

अरे पण मी कशाला तिच्या मागे मागे करतो आहे परत, इतके दिवस मी नव्हतो ती खुश असेल सौरभ सोबत, मी सोडणार नाही तिला, अदिती तुझ्यावर खूप प्रेम केल मी, माझी गम्मत करत होती का सगळ्यां समोर, आता बघू ना येऊ तर दे इकडे मग बघता येईल जरा तिच्याकडे, तिने मला असा धोका दिला

आकाशने मॅनेजरला आत बोलवलं , कॉलेजमध्ये कॅम्पस इंटरव्यू साठी कधी जात आहे आपली टीम?

त्यांनी डेट सांगितल्या

आकाशने अदितीच नाव दिलं.. ही मुलगी मला हवी आहे इथे एम्पलोइ म्हणून, कितीही पगार मागू दे, तिला घ्या, माझ नाव सांगू नका, हे काम झाल पाहिजे, ही मुलगी दुसरीकडे गेली तर बघा

ते हो म्हटले...

🎭 Series Post

View all