प्रेम पंख ❤️... भाग 7

अगं दीदी ती तशीच आहे खूप साधी आहे, हुशार आहे तिच अभ्यासावरच लक्ष असतं, तिचे माझे वैचारिक मत खूप जुळतात,


प्रेम पंख ❤️... भाग 7

©️®️शिल्पा सुतार
........

अदितीच्या शेजारी राहणारा सौरभने याच वर्षी कॉलेजला ऍडमिशन घेतली होती, खूप हुशार होता तो, तो नेहमी आदिती आणि ग्रुपच्या सोबत असायचा, त्याने बघितल पार्ट टाईम जॉब करून अदिती तिचा खर्च स्वतः करते आहे ,.. "अदिती तू कसा जॉब करते तसा मला पण हवा आहे, घरी सपोर्ट होईल तेवढाच ",

अदिती त्याला ऑफिसमध्ये घेऊन गेली, हुशार सौरभ सरांना आवडला, सौरभला तिथे जॉब मिळाला आता अदिती सौरभ एकाच ऑफिसमध्ये होते, सोबत जात होते, वापस येत होते, बऱ्याच वेळा ते दोघे बोलत बाहेर थांबायचे,

आकाश कधीपासून बघत होता, कोण आहे हा मुलगा? आता हल्ली त्याला सौरभचा खूप राग येत होता

सौरभशी बोलून आदिती निघाली, समोर आकाश उभा होता,.. "कुठे गेली होती अदिती?" ,

"हाय आकाश मी ऑफिसला गेली होती",.. अदिती

"बरेच नवीन फ्रेंड्स मिळालेले दिसता आहेत तुला",.. आकाश

"नाही तेच आहेत माझे मित्र",..अदिती

"हा कोण आहे जो रोज तुझ्यासोबत असतो ",..आकाश

अदितीला आश्चर्य वाटलं,.." तो सौरभ आहे आमच्या गावचा आहे, काय झालं आकाश ?",.

"काही नाही अदिती, अस विचारल, तुझ्या ऑफिस मध्ये आहे का हा? ",.. आकाश

" हो, फर्स्ट इयरला आहे ",.. अदिती

काय झालं आहे आकाशला काय माहिती? उगाच चिडचिड करतो आहे,

कॉलेज मध्ये आता सिलॅबस खूप फास्ट कम्प्लीट करत होते, त्यामुळे खूप अभ्यास करावा लागत होता, त्यातच आदिती प्रिया मनीषा बिझी होत्या

दोन-तीन दिवस झाले अदिती बघत होती सौरभ तिच्याशी नीट बोलत नव्हता, तो आधीच ऑफिसला निघून जात होता आणि घरी येतानाही तो त्याचा त्याचा येत होता,

आज दोघं सोबतच निघाले,.. "सौरभ काय झाला आहे? तू माझ्याशी का नाही बोलत?, राग आला का? ",

"काही नाही अदिती",. सौरभ

"नीट सांग सौरभ",.. अदिती

"हे बघ अदिती माझ हे फर्स्ट इयर आहे मला अजून बरंच शिकायचं आणि या इंडस्ट्रीत काम करायचं आहे",. सौरभ

"काय झालं आहे? काही प्रॉब्लेम आहे का? ",.. अदिती

"हो तू माझ्याशी बोलते म्हणून तुझ्या मित्रमंडळींना आवडत नाही, ते मला ओरडले की मी तुझ्याशी जास्त बोलताना दिसलो तर माझं इथे जगणं मुश्किल करून टाकतील, पुढे शिक्षण झाल्यावर काम लवकर मिळणार नाही मला ",.. सौरभ

" कोण बोललं तुला असं तुला तर माहिती आहे ना की माझ्या सगळ्या मैत्रिणी किती साध्या आहे ",.. अदिती

" आकाश बोलला मला",.. सौरभ

" कधी? का अस बोलला तो? ",.. अदिती

" दोन दिवसापुर्वी ",.. सौरभ

"काय हे असं, तू त्याचा ऐकू नको, एवढा चिडका नाही तो आकाश चांगला मुलगा आहे आणि आपण दोघं अगदीच बहीण भावंडांसारखे आहोत तू मला माझा भाऊ अमित सारखा आहे",.. अदिती

" हो मला माहिती आहे ते अदिती पण बाकीच्यांना कोण सांगणार",.. सौरभ

" आपण का लक्ष द्यायचं दुसऱ्यांकडे ",.. अदिती

" नाही अदिती मला एकट सोड मला नाही जमणार तुझ्याशी बोलायला, मला माझं काम करू दे ",.. सौरभ

" ठीक आहे सौरभ मी तुला डिस्टर्ब करणार नाही, काही लागलं तर निसंकोचपणे सांग ",.. सौरभशी बोलून अदिती ऑफिस मधुन घरी येत होती, तिला समोर आकाश दिसला, खूपच चिडली होती ती, जाऊदे याच्याशी बोलण्यात काही अर्थ नाही, आकाश तिला आवाज देत होता, तिने आकाशकडे दुर्लक्ष केलं ती होस्टेलला निघून आली

असा आठवडा गेला आज आकाश मुद्दाम थांबला होता अदिती आली रात्री, त्याने हाक मारली, अदिती.. अदिती ती थांबली नाही

आकाश पळत पुढे आला,.. "काय झालं अदिती तू माझ्याशी का नाही बोलत",

"काय करणार बोलून आकाश, मला जावु दे",. अदिती

"काय झालं नीट सांग मी रोज ऑफिसहून तुझ्यासाठी एवढ्या लांब येतो तु बोलत नाही माझ्याशी",. आकाश

"का येतो मी सांगितल का? ",.. अदिती

"अस का बोलतेस चिडलीस का",.. आकाश

"तू सौरभला काय बोललास? तो माझ्याशी बोलला तर तू त्याचं जीवन मुश्किल करून टाकशील अस, काय असं आकाश? तो शेजारी रहातो आमच्या, लहान आहे तो, का अस केल, त्याला काय वाटेल माझ्या आणि तुझ्या बद्दल",.. अदिती

" पण ते खर आहे ना" ,.. आकाश

" काय खर आहे आकाश",.. अदिती

आपण दोघ...

काय?

" अदिती मला तू आवडते, मला राग येतो कोणी तुझ्याशी बोलल तर, मला तुझ्या सोबत रहायच आहे अदिती, आय लव यु, मी तुला हे आता सांगणार नव्हतो पण आता बोलाव लागल ",.. आकाश

" हे शक्य नाही आकाश, तू माझ्याशी इतक्या दिवस या साठी बोलत होता का? , मला वाटल होता तू वेगळा मुलगा आहेस, या पुढे बोलू नकोस माझ्याशी ",.. अदिती तिथून निघून जात होती आकाश ने तिचा हात धरला,... अदिती प्लीज थांब अस करु नकोस,

अदिती ने हात सोडवून घेतला ती निघून गेली

आकाश बराच वेळ तिथे कट्ट्यावर बसून होता

होस्टेल वर येवुन अदिती एकदम शांत बसली होती, प्रिया मनीषा रुपा खूप गडबड करत होत्या, पण अदितीला जस काही काही ऐकु येत नव्हत, काय बोलला आकाश अस, जावू दे लक्ष नको द्यायला, ती मुलींमध्ये मिसळली, सगळ्या जेवायला गेल्या खूप बोलत होत्या सगळ्या, आता खूप मैत्री झाली होती त्यांच्यात, छान वातावरण होत होस्टेलच
....

आकाश घरी आली, खाली जेवणाची तयारी सुरू होती, तो डायरेक्ट रूम मध्ये निघून गेला, दादी नानी एकमेकींकडे बघत होत्या,.. "काय झालं याला काय माहिती?",

"थकला असेल तो, आपण सांगायचं का राहुलला की याचं ट्रेनिंग पुरे झालं, बहुतेक हा खूप थकून जातो आहे आता हल्ली",.. दादी

"तो कॉलेजला कशाला जातो काय माहिती ऑफिस मधून सरळ घरी यायचं ना त्याने" ,.. नानी

पूनम ऐकत होती सगळं,.. "थांबा मी जाऊन बघते कोणीच काळजी करू नका",..

" हो नाही तरी तो आमच्याशी कोणाशी बोलणारच नाही, पूनम तुला सगळं सांगतो तो",.. दादी

पुनम आकाशाच्या रूम मध्ये आली, तो सोफ्यावर बसून टीव्ही बघत होता, कपडेही बदलले नव्हते अजून, त्याच्यावरूनच कळत होतं की तो अस्वस्थ आहे

" काय झालं आहे आकाश एकदम गप्प शांत वेगळाच वाटतो आहेस तू ",.. पूनम

" काही नाही झालं दीदी काय सांगणार आहे आता तुला मी ",.. आकाश

"काय झालं आहे, पप्पा काही बोलले का",.. पूनम

"नाही पप्पांची माझी तर भेटही नाही आणि ते मला काही बोलत नाही तुला माहिती आहे",.. आकाश

"मग काय झालं आहे सांगण्यासारखा आहे का मला? नाहीतर घे तू तुझा वेळ",.. पूनम

पुनम रूम मधून जात होती

" दीदी बस ना पाच मिनिट माझ्याजवळ",.. आकाश

पुनम बसली, दोघ शांत होते , त्याला छान वाटत होतं तिच्यासोबत,

" चल जेवून घे ",.. पूनम

" मला काही खायची इच्छा नाही",.. आकाश

" असं कसं चालेल, दादी नानी दोघं काळजी करत आहे तुझी, थोडं तरी खाऊन घे आणि मग नंतर तुला काही वाटलं तर मला सांग काय झालं आहे ते ",.. पूनम

" ठीक आहे",.. आकाश आवरायला आत मध्ये गेला तो कपडे बदलून खाली जेवायला गेला, सगळ्यांबरोबर जेवताना छान वाटलं त्याला, विकी खूप जोक करत होता, खूप हसवत होता सगळ्यांना, हसत खेळत वातावरण होतं,

आकाशचा फोन आला तो बाजूला जावून फोन वर बोलत होता

दादी नानी पूनम कडेच बघत होत्या... "काय झालं आहे याला? ",..

पूनमने हळूच सांगितलं,.. "नाही माहिती काही सांगितलं नाही त्याने",

"ठीक आहे जाऊ द्या ऑफिसमध्ये झालं असेल काही, सांगेल नंतर, उगाच आता बळजबरी नको करायला",.. नानी

बरोबर आहे.. दादी

अदिती अभ्यास करत होती, पण तिच अभ्यासात मनच नव्हतं, सारखं आकाश काय म्हटलं तेच आठवत होतं, अजून तर आपल्या शिक्षण झालं नाही, त्यानंतर नोकरी करायची आहे, घरची परिस्थिती किती वाईट आहे, अमित अजून शिकतो आहे, बाबांचं दुकानाचं ही जेमतेमच आहे, माझा उद्देश काय होता की शिकून चांगल्या पगाराची नोकरी लागली पाहिजे, म्हणजे घरी अमितच्या शिक्षणाला वगैरे हातभार लावता येईल, तेच बरोबर आहे, आता आपण कोणाचा विचार करायचा नाही, आपल्या अभ्यासावर लक्ष केंद्रित करायला हव जास्त मार्क मिळाले पाहिजेत, यापुढे आकाश दिसला तरी लक्ष द्यायच नाही, कुठल्या भानगडीत पडायचं नाही,
....

आकाश रूम मध्ये आला त्याला झोप येत नव्हती, सारखा अदीतीचा चेहरा डोळ्यासमोर येत होता, मी काय वाईट केलं अदिती अशी करते मला, मला ती आवडते मला आदिती सोबतच राहायचं आहे, पण ते तिला समजत नाही तर काय करणार

खालचा आवरून पुनम रूम मध्ये आली,.. "काय झालं आकाश काही बोलणार का आता",.

"काही विशेष नाही दीदी मला एक मुलगी आवडते, आमच्या कॉलेजमध्ये आहे ती",.. आकाश

"अरे वाह मग, काय झालं पुढे",.. पूनम

"मी आज तिला विचारलं, पण ती विशेष काही बोलली नाही, छान साधी मुलगी आहे, खूप हुशार आहे",.. आकाश

"काय नाव आहे तिचं",.. पूनम

" तिचं नाव आदिती आहे, सेकंड इयरला आहे आता, माझ्यापेक्षा एका वर्षांनी लहान आहे ",.. आकाश

" माझ्या एवढ्या छान भावाला ती भाव देत नाही म्हणजे याला काय अर्थ आहे",.. पूनम

" अगं दीदी ती तशीच आहे खूप साधी आहे, हुशार आहे तिच अभ्यासावरच लक्ष असतं, तिचे माझे वैचारिक मत खूप जुळतात, तिच्याशी बोलताना एखादी काम करताना चांगलं वाटतं मला, मला ती आवडते आणि मला तिच्या सोबतच राहायचं आहे ",.. आकाश

" आता काय मग पुढे? परत एकदा बोलून बघ तिच्याशी",..पूनम

" हो मी प्रयत्न करणारच आहे",.. आकाश
...

कॅन्टीन मध्ये रितीका तिच्या फ्रेंड्स सोबत बसलेले होती

" तुला माहिती आहे का रितिका काल आकाश आणि आदिती खूप वेळ रात्री बोलत होते, मी तर अस ऐकल आहे आकाशने अदितीला प्रपोज केलं",..

खूप राग आला होता रितीकाला, काय करू काय नको असं तिला वाटत होतं, तिने रितेशला फोन लावला,.. "कुठे आहेस तू?, कॉलेजला येता येईल का आज मला भेटायला",

" मी ऑफिसला आहे, संध्याकाळी येतो",.. रितेश

" ठीक आहे",.. रितीका

रितिकाने भेटायला बोलावलं म्हणून रितेश खूप खुश होता, तो संध्याकाळी जाऊन रितिकाला भेटला,

कस काय बोलावं आता याच्याशी? यालाच डायरेक्ट सांगितल की मला आकाश हवा आहे, आकाश आणि अदिती मध्ये गैरसमज झाले पाहिजे तर हा ऐकणार नाही, याला माझ्याशी लग्न करायचं आहे, प्रेमानेच बोलते थोड

" कसा आहे रितेश तू? आजकाल मला भेटायला येत नाही",..

"तुला मला भेटायचं नसतं रितिका",.. रितेश

"नाही असं काही नाही रितेश, तू एक खूप चांगला मुलगा आहेस",.. रितिका

रितेश खूप खुश होता, बऱ्याच वेळा ते दोघं बोलत होते,

"माझा एक काम करतील करशील का रितेश?",.. रितिका

" हो सांग ना",..रितेश

" मला असं समजलं आहे की आकाशने अदिती ला प्रपोज केलं",.. रितिका

" आपल्याला काय करायचं आहे मग त्याच्याशी",.. रितेश

" मला अदितीचा बदला घ्यायचा आहे, मागच्या वर्षी किती त्रास दिला तिच्या ग्रुपने आणि तिने मिळून मला, आठवत ना, किती रडवल होत ",.. रितिका

" हो बरोबर आहे",.. रितेश

" तू मदत करशील का? रितेश प्लीज? ",.. रितिका

" काय करायचं आहे ",. रितेश

" आकाशला भेटून सांग की अदिती तुझ्याबद्दलच कॅन्टीन मध्ये बोलत होती, तू प्रपोज केलं तिला आवडल नाही, म्हणत होती आकाश मागे लागला आहे, सगळ्यांना हसून सांगत होती की कस ती त्याच्याशी खोट खोट हसून शांत पणे बोलते आणि ते तिच्या गावचा तो मुलगा सौरभ तिच्या सोबत असतो त्याच्याबरोबरच तिच प्रेम प्रकरण सुरू आहे असं सांग, मला काहीही करून आदितीला धडा शिकवायला पाहिजे, आकाश तिच्यावर चिडला पाहिजे नाहीतर आकाश साठी ती मुलगी योग्य नाही, किती साधी आहे ती ",.. रितिका

"होते ही आहे ठीक आहे मी आकाशला भेटतो दोन-तीन दिवसात, आपल दोघांचं काय ठरतं आहे, माझ्याबरोबर येणार का उद्या कॉफी प्यायला",. रितेश

"हो येईल रितेश हे आकाशचं काम आधी कर मग जावु आपण कॉफी साठी" ,.. आकाश च काम होईपर्यंत रितेशच मन सांभाळावं लागेल.. रितिका विचार करत होती

आकाश ट्रेनिंग मध्ये होता, राहुल सरांचा फोन आला आकाश लगेच ऑफिसमध्ये ये

आकाश मेन ऑफिस मध्ये गेला

" एक महत्त्वाच्या कामासाठी तुला उद्याच फॉरेनला जावं लागणार आहे त्याची तयारी कर, हे कन्फर्मेशन लेटर आहे, हे तुझं तिकीट बुकिंग वगैरे",.. राहुल सर

खूप मोठं काम करायची संधी आकाशला मिळाली होती तो खुश होता हे जर काम मला करता आलं तर पप्पांचा माझ्यावरचा विश्वास वाढणार आहे आणि मी इतके दिवसाचे ट्रेनिंग घेतलं त्याचाही उपयोग होणार आहे

" किती दिवस लागतील साधारणता मला तिकडे",.. आकाश

"सांगता येत नाही 15 दिवसाचं काम आहे ठीक आहे मी तयारी करतो तशी",.. खूप छान काम मिळालं होतं, पप्पांनी चांगली जबाबदारी टाकली आहे माझ्यावर, मी हे काम छान करणार..

🎭 Series Post

View all