प्रेम पंख ❤️... भाग 4

पार्टी झाली जेवण झालं, बरेचसे पाहुणे गेले होते आता घरचे लोक बाकी होते, मोना पूनम छान बोलत होत्या, आकाश एकटा मोबाईल मध्ये बघत होता,


प्रेम पंख ❤️... भाग 4

©️®️शिल्पा सुतार
........

दुसऱ्या दिवशी कॉलेजला जाता जाता परत सचिन भेटला, यावेळी तो अदितीशी कमी आणि प्रियाशी जास्त बोलत होता, प्रिया पण त्याच्याबरोबर रमली होती, अदिती मनीषा क्लासमध्ये आल्या, जरा वेळाने प्रिया आली, मॅडम आल्यामुळे लगेच शिकवायला सुरुवात झाली

लंच ब्रेक मध्ये मनीषा चांगली चिडवत होती प्रियाला,.. "काय चालला आहे प्रिया मॅडम? , काय म्हटला सचिन? ",..

"चांगला वाटतो आहे ग सचिन खूप",.. प्रिया

अदिती सगळं ऐकत होती, आज तिला पूर्ण चॅप्टर वाचून संपवायचाच होता, दिवसभर कॉलेज आणि संध्याकाळी जॉब यामधे ती थकून जात होती , अभ्यास करायला विशेष वेळ मिळत नव्हता, म्हणून तिने ठरवलं की आता जेव्हा वेळ मिळेल तेव्हा अभ्यास करायचा

" आमच्या सोबत चलते का कॅन्टीनमध्ये अदिती? ",.. प्रिया

" नाही.. मी येत नाही मी खाल्लं आहे, तुम्ही दोघी जाऊन या",.. अदिती

त्या दोघी कॅन्टीनमध्ये गेल्या, अदिती वर्गात वाचत बसली

जरा वेळाने वर्गात आकाश आणि त्याचे दोन तीन मित्र आले क्लासमध्ये, त्या बाजूला बसून रितिका आणि तिचा ग्रुप गप्पा मारत होते, आकाश अदिती कडे बघत होता

" हिच्याच ग्रुपने कंप्लेंट केली होती ना तुझी रितीका परत एकदा",.. आकाश

हो..

का अस करतात ह्या मुली , एक मिनिटात आलो मी" ,... आकाश अदिती बसली होती तिकडे गेला, ती वाचत होती खूप शांत आणि छान दिसत होती ती, व्यवस्थित अभ्यास करते वाटतं ही,.. "एक मिनिट.. अदिती ने वर बघितल,... रितिकाची कंप्लेंट परत कोणी केली? , तुला माहिती आहे का? अस कंप्लेंट करण्यामुळे रितिकाचं नुकसान होऊ शकतं, का करता तुम्ही मुली अस? ",..

अदिती गडबडून गेली,.. "तू माझ्याशी बोलतो आहेस का?",

"हो तुझ्या ग्रुप ने मॅडम ला सांगितल ना सगळ",.. आकाश

"नाही.. मला काहीच माहिती नाही, आमच्या ग्रुपने नाही केली कंप्लेंट ",.. अदिती

" मग कोणी केली कंप्लेंट? ",.. आकाश

अदिती घाबरली होती, ती बघत होती वर्गात रितिकाचा ग्रुप सोडून कोणी नव्हतं,..." मला नाही माहिती, मी काही बोलली नाही रितीकाला",

" रितिका इकडे ये",.. आकाश

रितिका आली

" हात मिळवा तुम्ही दोघी जणी, भांडू नका ",.. आकाश

रितिकने हात पुढे केला, आदितीने हात मिळवला,

" एकाच वर्गात आहात तर नीट रहा दोघी",.. आकाश रितिका आणि त्यांचा ग्रुप कॅन्टीन मध्ये जात होते, अदिती परत अभ्यासाला लागली

"काही काही लोक किती ओव्हर करताना, लंच ब्रेक मध्येही वाचत बसते, ही मुद्दाम करते",.. रितीका

"करू दे ना तिला अभ्यास, तुला काय प्रॉब्लेम आहे, डिस्टर्ब करू नका चला आपण इथून",.. आकाश

आकाशने अदितीची बाजू घेतल्यावर रितिकाला खूप राग आला, ते सगळे जण बाहेर गेले, जरा वेळाने मनीषा प्रिया आणि बाकीच्या आल्या, अदिती ने त्यांना सांगितल नाही आकाश येवून बोलला ते, जावू दे हा विषय इथेच थांबला पाहिजे..

आज सगळ्यांना हॉलमध्ये डान्सच्या प्रॅक्टिसला बोलवलं होतं, त्याच्याच बाजूला हॉलीबॉल क्लब होता, तिथेही प्रॅक्टिस सुरू होती मुलांची

अदिती अनु डान्स साठी गेल्या, पहिलाच डान्स बसत होता त्यांचा, खूप छान प्रॅक्टिस सुरू होती, हॉलीबॉल क्लबचे मुलं त्यांचं प्रॅक्टिस सोडून खिडकीतून इकडची डान्स प्रॅक्टिस बघत होते, किती छान सुरु आहे यांची प्रॅक्टिस, मुली सुंदर दिसता आहेत, मुल हसत होते,

आधी मुलींच्या ते लक्षात आलं नाही, नंतर एका मुलीने बघितलं तिने सगळ्यांना सांगितलं, सगळ्या मुली चिडल्या त्या मुलांशी भांडायला बाहेर आल्या ,... काय करताय तुम्ही इथे? , चोरून आत बघता का आत आमच्या कडे ? कंप्लेंट करायला पाहिजे यांची,

"तुमच्या मुळे आम्ही डिस्टर्ब होतो, म्हणुन आम्ही विचार केला लांबून गाणे ऐकण्यापेक्षा जवळ येऊनच गाणे ऐकू आणि डान्स प्रॅक्टिस बघू म्हणून आम्ही इथे थांबलो आहोत ",..

"तुमचे विचार काही बरोबर नाही वाटत आम्हाला, निघा इथून",.. मुली

"निघा म्हणजे काय? , एक तर तुम्ही मुली आम्हाला डिस्टर्ब करतात केव्हाच तेच तेच गाण सुरू आहे",..

"मग अवघड असतो डान्स, प्रॅक्टिस लागते ",..

" त्यात काय? ",.. मुल खूप खुश होते भांडतांना

" या आत नाचून दाखवा आम्ही सांगू त्या स्टेप्स वर",.. मुली

" ठीक आहे आम्ही नाचू, मग तुम्हाला ही आमच्या सोबत मॅच खेळावी लागेल ",.. मुल उत्साही होते, ही मॅच झाली तर मजा येईल,

त्या मुली जेव्हा मुलांशी भांडत होत्या तेवढ्यात आकाश आला, काय चाललय?... तो अदिती कडे बघत होता, ती बाजूला गप्प उभी होती, किती शांत आहे ही अस दाखवते आहे, ही मुलगी असते तिथे भांडण होतच, पण प्रत्येक गोष्ट वेगळी आहे या मुलीची,

अदितीला ते लक्षात आलं, आकाशला बघून ती घाबरली, हा मलाच बोलतो नेहमी, ति बाजूला जाऊन उभी राहिली, उगीच हा माझ्या वर आळ आणतो,

"शांततेत घ्या सगळ्यांनी, गर्ल्स प्लीज तुम्ही जा इथून, चला मुलांनो, तुम्ही का आले या बाजूला",.. आकाश

"हो ना नेहमीच आहे या मुलांच" ,.. मुली आत जात होत्या, आकाशच्या पाया जवळ अदितीचा रुमाल पडला होता, तो त्याने उचलला, आदिती ही पुढे आली रुमाल घ्यायला, आकाश बघत होता कोणाचा रुमाल आहे

" एक्सक्युज मी, मला तो रुमाल मिळेल का? ",.. अदिती

सॉरी.. आकाश ने तो रुमाल दिला

थॅन्क्स..

" एक मिनिट हॅलो मी आकाश",.

"मी अदिती",.. दोघांनी हात मिळवला

"आपण या आधी फक्त जिथे भांडण होईल तिथे भेटलो आहोत",.. आकाश

"हो ना आता ही तेच झाल ",.. अदिती

दोघ हसत होते,..

सी यू ..

या बाजूने मुल त्या बाजूने मुली त्या दोघांकडे बघत होत्या,

अदिती आत निघून गेली

आकाश ती गेली तिकडे बघत होता,

"काय सुरु आहे आकाश?",..

" अरे एकदम साधी शांत मुलगी आहे ही, इथे दिसली नाव माहिती नव्हत म्हणून बोललो",.. आकाश

हो का...

"चला प्रॅक्टिस ला",.. आकाश

आपण आपल्या प्रॅक्टिसची जागा बदलायला पाहिजे त्यासाठी मुलींनी कॉलेज ऑफिस मध्ये सांगितलं, पण कॉलेजने ठरवून दिलेल्या जागेतच आपल्या क्लब ची प्रॅक्टिस घ्यायची असं सांगितलं, त्या मुळेडान्स टीमचा नाईलाज झाला

" आज संध्याकाळी ही आहे आपली प्रॅक्टिस एवढ्या अर्ध्या तासात काहीच प्रॅक्टिस झाली नाही",..

"मला थांबता येणार नाही, माझा पार्ट टाइम जॉब असतो, मला पाच पर्यंत जावच लागेल तिकडे",.. अदिती

"चालेल मग तू पाच वाजता निघ, तो पर्यंत थांब",..

" ठीक आहे",.. पाच वाजेपर्यंत प्रॅक्टिस चालली, पाच दहा मिनिटे बाकी असतांना अदिती निघाली, ती पटकन बाहेर आली आणि भराभर गेटकडे निघाली बाहेर मुलं खेळत होते, आकाश होता त्यात त्यांनी बघितलं ही रोज घाईने संध्याकाळी कुठे जाते? ती तर होस्टेलला राहते ना?,

रात्री साडेसातला अदिती परत आली, सचिन आणि प्रिया बाहेर बोलत उभे होते, काय सुरू आहे या दोघांचं काय माहिती? जरा वेळाने प्रिया आत आली

"तुझ काय सुरु आहे प्रिया, तू आणि सचिन रोज भेटता आता हल्ली ",.. अदिती

"मला सचिन आवडतो, त्याला ही मी आवडते, आम्ही पुढे लग्न करणार आहोत" ,.. प्रिया

"एवढ्यात ठरवल ही लग्नाच",.. मनीषा

"त्याच नाही माहिती मी ठरवल आहे मला त्याच्या सोबत रहायच आहे",.. प्रिया

"काही खरं नाही हीच",.. अदिती
...

आकाश कॉलेज हून घरी जायला निघाला, छान कार होती त्याची महाग लेटेस्ट मॉडेल , जोरात गाडी चालवायची सवय होती त्याला, एकदम बंगल्याच्या गेट जवळ येऊन त्याने कारचा ब्रेक दाबला, वॉचमनने पळत येऊन दार उघडलं तितक्या स्पीडने आत मध्ये आकाश निघून गेला, अतिशय सुंदर मोठा बंगला होता त्यांचा, पुढे गार्डन, कार पार्किंगला सेपरेट जागा, स्विमिंग पूल, खूपच छान सगळ

आकाश घरी आला, दादी पुढे बसलेल्या होत्या ,.. "आकाश अरे आज ही काय उशीर केला, आपल्याला जायच ना तिकडे तुझ्या पप्पांकडे एनिवर्सरी साठी",.

"मी येणार नाही दादी माझी इच्छा नाही",.. आकाश

"अरे असा काय करतोस, जा तयार हो, घरच्या कार्यक्रमाला तरी येत जा जरा" ,..दादी

हो ना... नानी

"इतर कार्यक्रम असते तर ठीक होत, पण ते पप्पांची एनिवर्सरी नको वाटत मला दादी, नानी तू सांग ना, मला अशी शिक्षा नका देत जाऊ",.. आकाश

चल रे आकाश.. नानी

" अरे काय करायचं आहे तिकडे एवढ? चल ना, पार्टी आहे जरा वेळ थांबू जेवण करू आणि निघू, आटोप आपण निघत आहोत दहा मिनिटात ",.. दादी

" पुनम, अविनाश जीजू आणि विकी रेडी आहे का? ",.. आकाश

" हो असतील तयार ते, तू आधी तयार होऊन खाली ये",.. दादी

आकाश नाईलाजाने त्याच्या रूममध्ये गेला, तयार होऊन खाली आला, खाली सगळे त्याची वाट बघत होते, पूनम आणि अविनाश यांच लव मॅरेज होत , सध्या तरी अविनाश आकाश च्या पप्पां सोबत राहुल कारखानीस सोबत त्यांच्याच ऑफिसमध्ये काम करत होता, तो घर जावई होता, पण स्वभावाने चांगला होता, विकी त्याचा लहान भाऊ होता, दादी नानी एकत्र छान रहात होत्या दोघी मिळून मुलांना सांभाळत होत्या, त्या दोघींच खूप पटत होत, घराचा आधार होत्या त्या दोघी,

चला निघू या

या वेळी मोठी कार घेतली होती त्यांनी, कार मध्ये पुढे आकाश आणि अविनाश जीजू बसले, मागे दादी नानी होत्या बसलेल्या, विकी पूनम सगळ्यात मागे होते, सगळे घरी जात होते, हे त्यांचं दुसरं घर होतं, राहुल सर आणि सावत्र आई मोना दुसऱ्या घरात राहत होते, आकाशला त्याच्या या मम्मीचा खूप राग येत होता त्यांचं अजिबात पटत नव्हत म्हणून आजी सोबत हे मुलं दुसऱ्या घरात राहत होते

आकाश लहान होता तेव्हा त्याची आई एका आजारपणात वारली होती, तेव्हापासून तो या दोघी आजीं सोबतच होता, दिघी खूपच प्रेमळ होत्या ,

बिजनेस कामानिमित्त हाय फाय मोनाशी राहुल सरांची ओळख झाली होती, आता मोना त्या मुलांची आई होती, ती वागायला चांगली होती, पण आकाश ने अजूनही तिला मना पासून स्विकारल नव्हत, ती नेहमी मुलांशी बोलण्याचा त्यांना समजून घ्यायचा प्रयत्न करायची, पण आकाशनेच तिच्याबद्दल राग धरलेला होता, सावत्र आई वाईट आहे, तिच्याशी कधी नीटच बोलून बघितल नाही त्याला समजूनच घ्यायचं नव्हत कोणाला, नेहमी दुसर्‍या वर अविश्वास असायचा आकाशचा

सगळे मेन बंगल्यावर पोहोचले, सुंदर सजावट केलेली होती, बरेच गेस्ट आलेले होते पार्टी अगदी रंगात आलेली होती मुल आल्यामुळे राहुल सर पुढे आले मुलांना आणि आजींना प्रेमाने आत नेलं, मोना येऊन सगळ्यांना भेटली, साडीत खूप छान दिसत होती मोना, दोघी आजींची काळजी घेतली जात होती,

आकाश नुसताच बसून इकडे तिकडे बघत होता, पूनम पप्पां सोबत होती, अविनाश ला समजतच नव्हतं काय करावं? विकी पहिल्यापासूनच बोलका होता तो बऱ्याच पाहुण्यांशी बोलत होता

पार्टी झाली जेवण झालं, बरेचसे पाहुणे गेले होते आता घरचे लोक बाकी होते, मोना पूनम छान बोलत होत्या, आकाश एकटा मोबाईल मध्ये बघत होता, राहुल सर आले ते आकाश विकी शी बोलत होते, अविनाश जिजु बाजूला बसुन होते, आकाशला ते लक्ष्यात आल तो त्यांना बोलण्यात सामील करून घेत होता, पण राहुल सर अविनाश शी बोलत नव्हते, ते सगळे घरी आले, पूनम अविनाश रूम मध्ये गेले

"आजी पप्पा अस का वागतात जिजुं सोबत",.. आकाश

"काय झाल आता?",..दादी

"आज ही ते टाळत होते त्यांना, नेहमीच आहे, मला पूनम दीदी आणि जिजुंना कोणी अस केल तर अजिबात चालणार नाही, ते ही घरचे लोक आहेत",.. आकाश

"हो बरोबर आहे",.. विकी

"तुम्ही दोघ नीट रहा अविनाश सोबत, काळजी करू नका होईल नीट",.. नानी

"मी जेव्हा बिझनेस सांभाळेल ना तेव्हा जिजु माझ्या सोबत असतिल, खूप हुशार आहेत ते",.. आकाश विचार करत होता

दोन-तीन दिवस कॉलेजला सुट्ट्या होत्या आकाश मित्रांबरोबर पिकनिक प्लॅन करत होता, दुसर्‍या दिवशी तो त्याच्या ग्रुप सोबत पिकनिक ला निघून गेला
...

🎭 Series Post

View all