प्रेम... मुलाच्या नजरेतून...

Prem....

         प्रेम मुलाच्या नजरेतून....                                                                                                "अस तिने हसावं आणि मी फसाव" "आयुष्यभर तिला नजरेत कैद करून घ्यावे" कोणत्याही मुलाची एकच मनीषा असते की त्याला जशी ती हवी आहे तशी ती मिळावी. काळजी करणारी, प्रेमाने बोलणारी, कधीतरी रागवणारी आणि मन समजून घेणारी. काय हवं असत एका माणसाला आयुष्यात..? जर एक व्यक्तीत पूर्ण आयुष्य असेल तर....माझ्या साठी तर ती एक व्यक्ती माझं पूर्ण आयुष्य असेल, जर समोरील व्यक्ती इतके प्रेम असेल तर कोणालाही कोणाचीही आवश्यकता भासणार नाही.                                                                                                            प्रेमात धुळीतून ढगात पोहचविण्याची ताकत असते आणि ती खूप कमी जणांना अनुभवायला मिळते कारण आज काल खर प्रेम हे जगातून संपत चाललं आहे त्याचाही जागा कपट, क्रोध, हिंसा, विश्वासघात यांनी घेतली आहे. खर हे परिपक्व होण्यासाठी वेळ द्यावा लागतो पण आज काल 2-3 महिन्यावर हे प्रेम आले आहे, हे प्रेम नसून फक्त समोरच्या व्यक्ती चे आकर्षण असते. खरं प्रेम हे कशालाच बांधील नसते, ना पैशाला, ना जातीला आणि ना आकर्षणाला. प्रेम स्वतःमधेच एक न सुटणारा प्रश्न आहे त्याचे उत्तर फक्त अनुभवता येते, कदाचित लोक ते उत्तर शब्दात मांडण्याचा प्रयत्न करतील पण येणारा अनुभव आणि मांडणी यात साम्य नसणार हे मात्र नक्की... माझं मन कधी कधी खूप व्याकुळ होत आणि अस वाटलं की कोणापुढे तरी व्यक्त व्हावं, अन् मोकळं व्हावं. प्रत्येकाला कोण ना कोण तरी हवं असत ज्याच्या सोबत व्यक्त होता येईल आणि असा व्यक्ती असणे हे खूप भाग्याचे असते कारण प्रत्येकाच्या जीवनात दुःखाचे भले मोठमोठे डोंगर असतात आणि ते प्रत्येकाला एकटे सर करणे शक्य नाही...काही लोक निभावून नेहतात पण काही लोक संकट झेलून, अपमान सहन करून करून आणि इच्छा मारून मारून मनातून मरून जातात अश्या वेळी त्याच्या सोबती खूप महत्त्वाची भूमिका पार पाडतो.                                                                                             मी पण प्रेम काय हे सांगण्याचा एक अयशस्वी प्रयत्न करत आहे. प्रेमाचा अनुभव हा अद्वितीय असतो हे मात्र नक्की...