प्रेम म्हणजे काय असतं

Love is love

प्रेम म्हणजे.....
रोज रात्री आकाशात तारा तूटतो का हे पाहणं असतं,
कारण त्या तुटणाऱ्‍या ताऱ्‍याकडे तो आपलाच व्हावा हे मागणं असतं.....
प्रेम म्हणजे.....
डोळे बंद केले की त्याचचं दिसणं असतं, तर डोळे उघडले की त्याचचं शोधणं असतं.....
प्रेम म्हणजे.....
एकांतात तर त्याची आठवण येतेच, पण चार चौघात सुद्धा त्याची आठवणं असतं
प्रेम म्हणजे.....
आपलं आकाशात उंच-उंच उडणं असूनही, नजरेचं तो खाली कुठे आहे हेच शोधणं असतं.....
प्रेम म्हणजे.....
प्रत्येक वेळी आपण शहाणे आहोत हे दाखवणं असतं,पण त्याच्या समोर वेडेपणांचे वागणं असतं.....
प्रेम म्हणजे.....
कधीही न आवडलेल्या गोंष्टीच तो भेटल्यावर त्याला आवडतात म्हणुन आवडणं असतं.....
प्रेम म्हणजे.....
त्याच्या गुणांवर तर भाळायचेच असतं,पण त्यापेक्षाही त्याच्यात असलेल्या दोषाचं स्वीकारणं असतं.....
प्रेम म्हणजे.....
त्याचं या जगातील अस्तित्व संपलय निव्वळ त्याला दिलेल्या वचनामुळे डोळ्यात अश्रू असून सुद्धा ओठावर हसणं असतं...........