Login

प्रेम करावे शतदा

प्रेम करावे शतादा
*प्रेम करावे शतदा*

तार छेडता मनाची
सूर निघावे मधुर,
नाद गुंजूनी अंतरी
भावनांना यावा पूर.

मन गुंतते मनात
श्वास रोखूनिया स्थिर,
बंध जुळूनी अतूट
ओढ लागावी अधीर.

साद घालुनी प्रेमाला
स्वीकारावे अलवार,
हात धरुनी हक्काने
द्यावा जीवना आकार.

मनी भयाचे मळभ
उगी वाटावी का खंत?
जिथे असे सुरुवात
तिथे असणार अंत.

घ्यावे जगुनी स्वच्छंदी
जन्म असे हा एकदा,
जीव लावूनी जीवास
प्रेम करावे शतदा.
-------------
©®सौ. वनिता गणेश शिंदे