Login

प्रेम हे अंतिम

Marathi katha

आपण मागील भागात पाहिले की, कार्तिकला शेवटी परी भेटलीच नाही.. तो नाराज होऊन ऑफिसला गेला.. ऑफिसमध्ये मिटिंग झाली.. ऑफिस सुटल्यावर तो श्रेयसशी बोलत थांबला.. नंतर घरी आला तर त्याला शरयू दिसली.. आता पुढे..

"शरयू, तू इथे कशी??" कार्तिक

"मी माझ्या मैत्रीणीकडे आली आहे.. पण तू इथे काय करतोस??" शरयू

"मी माझ्याच घरात येणार ना.." कार्तिक हसत म्हणाला

"हे तुझे घर आहे! म्हणजे मनस्वी तुझी बहिण....." शरयू पुढे बोलणार इतक्यात मनस्वी आली..

"त्याची मी बालमैत्रीण.. पण तुम्ही कसे एकमेकांना ओळखता?" मनस्वी

"अगं, आम्ही एकाच ऑफिसमध्ये काम करतो.." शरयू

"काय?? भारीच की.." मनस्वी

"पण तुमची ओळख कधी झाली??" कार्तिक

"अरे, तू जसा माझा बालमित्र तशीच ही बालमैत्रीण.. मी क्लासला जात होते ना.. तेव्हा शरयू माझ्या सोबत होती.. परवाच आमची भेट झाली.. आईबाबांना विचारत होती.. म्हणून म्हटलं.. संध्याकाळी ये भेटू.. परत कधी भेट होईल काय माहित??" मनस्वी

"होईल ग.. लवकरच..." शरयू

"हो ग.." मनस्वी

मग सगळे जण जेवण करायला बसले.. जेवण करून झाल्यावर शिरीष काका, काकू, मनस्वी जायला निघाले.. ते जाताना कार्तिकच्या मनाची चलबिचलता सुरू होती.. पण मनातील शब्द ओठांवर आले नाहीत.. त्याला खूप वाईट वाटत होते.. हातातून वेळ निसटून जात होती पण तोंडातून शब्द फुटत नव्हते.. का कुणास ठाऊक? त्याला कसेतरीच होतं होते पण बोलवत देखील नव्हते..

कार्तिक आणि शरयू त्यांना सोडायला स्टेशनवर जातात.. थोड्या वेळात ट्रेन आली.. आणि ते तिघेही ट्रेनमध्ये जाऊन बसले..
"मिस यू कार्तिक.. मला तुझी खूप आठवण येईल.. तुला माझी आठवण आली की नक्की फोन कर.. आणि हो प्रेम हे हा लेख वाचायला विसरू नकोस.." मनस्वी असे म्हणताना कार्तिकचे डोळे भरून आले.. तो फक्त मानेनेच हो म्हणाला..

ट्रेन सुरू झाली.. तशी कार्तिकच्या मनामध्ये धडधड वाढत होती.. त्याची मनाची चलबिचलता आता आणखीनच वाढत होती.. आणि तो जात असलेल्या ट्रेनकडे फक्त बघत उभा राहिला.. बराच वेळ झाला तरी तो तसाच उभा होता..

"कार्तिक, निघूया का आपण?" शरयूने त्याला विचारले तेव्हा तो भानावर आला..

"हो, चल.." म्हणून कार्तिक आणि शरयू निघतात.. गाडीत बसल्यावर शरयू इकडचे तिकडचे बोलू लागली.. मग हळूहळू कार्तिक देखील बोलू लागला.. शरयूच्या घरापाशी ते आले.. आता शरयू गाडीतून उतरून जाणार इतक्यात कार्तिकला काहीतरी आठवले.. आणि त्याने शरयूला हाक मारली..

"काय रे कार्तिक? काही राहिलंय का??" शरयू

"नाही ग.. एक विचारायच होतं.." कार्तिक

"विचार ना.." शरयू

"तू सकाळी कोठे गेली होतीस??" कार्तिक

"अरे, ते सकाळी मी भावे नाट्यगृहात गेले होते.." शरयू

"काय??" कार्तिक एकदम ओरडला.. त्याला असे बघून शरयू दोन मिनिटं तशीच थांबली..

"इतकं ओरडायला काय झालं रे? तू पण तिथेच आला होतास का?? म्हणजे तुलाही आज उशीरच झाला होता ना ऑफिसला.." शरयू

"नाही ग.. माझ्या नशीबातच नव्हतं.. पण तू मला सांग.. तू परीला पाहिलेस ना.." कार्तिक

"म्हणजे??" शरयू

"अगं परीचा सत्कार होता ना.." कार्तिक

"हो..." शरयू

"मग परी दिसली ना तुला.." कार्तिक

"दिसली नाही तर भेटली.." शरयू

"कशी आहे ग ती?" कार्तिक

"कार्तिक, खरं सांग तुला काही माहीत नाही.. तू माझी चेष्टा तर करत नाहीस ना.." शरयू

"म्हणजे? मी का तुझी चेष्टा करेन? मला खरंच माहित नाही.. तू सांग ना कशी आहे परी?" कार्तिक

"अरे, आपली मनू तर परी आहे.. आणि हे तुला माहित देखील नाही.." शरयू

"काय????" कार्तिक परत ओरडतो.. "कसं शक्य आहे??"

"का शक्य नाही? ती असे काही लिहू शकत नाही का??" शरयू

"अगं, लिहू शकते पण मला कसं माहित नाही?" कार्तिक

"आता तो तुझा प्राॅब्लेम आहे.. पण मला माहित होतं.." शरयू

आता परी म्हणजेच मनस्वी आणि मनस्वी म्हणजेच परी हे कार्तिकला समजले होते.. आणि त्याच्या आनंदाला पारावार उरला नव्हता... तो खूपच खूश होता.. पण आता मनू गेली होती.. इथे असती तर पटकन तिच्याकडे गेलो असतो.. असा विचार त्याच्या मनात आला.. त्या विचारात असतानाच शरयू त्याला बोलावते..

"चल.. मी निघते.. बाय.. उद्या ऑफिसमध्ये भेटू.." असे म्हणून शरयू निघून गेली..

नंतर कार्तिक मनस्वीला फोन लावतो.. रिंग वाजल्या वाजल्या मनू फोन उचलते आणि "हॅलो इतक्यात आठवण झाली.. अजून मी पोहोचले देखील नाही.." असे म्हणून ती हसू लागली..

"तू मला सांगितले का नाहीस?" कार्तिक

"काय ते.." मनस्वी

"तूच परी आहेस आणि प्रेम हे हा लेखसुद्धा तूच लिहितेस ते.." कार्तिक

"मीच माझं कौतुक कसे करून घेऊ आणि मी सांगण्यापेक्षा तुला आपण होऊन कळाले तर तुला किती आनंद होतो हे मला जाणून घ्यायचे होते.." मनस्वी

"पण इतके दिवस मी तुझ्या प्रेमात किती तडफडत होतो? हे तुला दिसले नाही का?" कार्तिक

"दिसत तर होतेच रे.. म्हणून तर मी तुला कळेपर्यंत तशीच राहणार होते.. कारण मला माहित होतं की, तुला नक्की कधी ना कधी समजेलच की मीच परी आहे ते आणि मग तू आपोआप माझ्याकडे येशील.. म्हणून मी सांगितले नाही.. सॉरी.." मनस्वी

"म्हणजे तुझे देखील माझ्यावर प्रेम आहे.." कार्तिक

"हो.." मनस्वी

हे ऐकून कार्तिकला देखील खूप आनंद झाला.. शेवटी त्याला परी मिळाली म्हणून देखील आनंदाला पारावर उरला नाही..

"मग आपण कधी भेटायचं.." कार्तिक

"भेटू लवकरच.. मी माझ्या आई बाबांना घेऊन नक्की येईन.." मनस्वी

"तेव्हा मी तुला मागणी घालणार.. चालेल ना तुला.." कार्तिक

"हो नक्कीच.." मनस्वी

तर इथे कार्तिकला परी म्हणजेच मनस्वी मिळली..????
आवडल्यास कमेंट आणि लाईक करायला विसरू नका..
धन्यवाद.....
प्रियांका अभिनंदन पाटील. 

🎭 Series Post

View all