Feb 28, 2024
प्रेम

प्रेम हे बावरे! भाग - तीन.

Read Later
प्रेम हे बावरे! भाग - तीन.

प्रेम हे बावरे!

भाग -तीन.


त्यानेही पहिल्यांदा रात्रंदिवस एक करून अभ्यास केला. आणि खरंच आश्चर्य, एव्हरीबडी गेट शॉक्ड, निल्याभाई एकदम रॉक!
पंच्याहत्तर परसेन्टेज.


अनुराधा तर टॉपर होतीच. तिने बी.कॉमला ऍडमिशन केलं. तिथेही तो तिच्या मागोमाग आला.फायनल इयर अर्ध्यावर आले होते.

"राधा, आता तरी बोल ना. तू फर्स्ट क्लास म्हंटलंस मी डिस्टीन्क्शन मिळवलं आणखी काय हवंय?" निल विचारत होता.

"म्हणजे मी जे म्हणेल तेच करशील का तू?" ती.

"हो तू म्हणशील तेच. फुल एन फायनल." तो.

"ग्रॅज्युएशन नंतर एमबीए कर आणि कोणीतरी खूप मोठा हो."


"डन! पण तेव्हा लग्न करशील का माझ्याशी?" तो.

"लग्नाचं कुठे आलं मधेच? मी केव्हा म्हणाले असे?" ती आश्चर्याने म्हणाली.

"मग म्हण ना केव्हातरी." ती जायला वळली.

"राधा.."
त्याने जवळजवळ खेचलेच तिला. एक हात तिच्या कमरेभोवती आणि दुसऱ्या हातात तिचे हात."प्लीज बोल ना काही. तुला काहीच वाटत नाही का माझ्याविषयी?" तिच्या डोळ्यात डोळे घालून तो विचारत होता.

ती त्या शहारली स्पर्शाने. हृदय धडधडायला लागले.

"निल, प्लीज सोड मला. मला भीती वाटतेय." त्याची पकड ढिली झाली.

"राधा, प्रेम केलंय मी तुझ्यावर. तुझ्याशी कधी चुकीचं नाही वागलो. तरी भीती वाटावी तुला माझी?" डोळ्यात पाणी घेवून तो तिथून निघाला. अस्वस्थ मनाने दोन तासांनी तो घरी पोहचला.

आतून हसण्याचा आवाज कानी पडला.

"अरे कुठे होतास इतक्या वेळचा? आमच्या लहान मालकीणबाई आल्या आहेत घरी. ये तुला भेटवून देते." त्याची आई म्हणाली.

"राधा?" त्याच्या चेहऱ्यावर आश्चर्य होते.

"ही अनुबेबी. ज्यांच्याकडं मी कामाला जाते ना त्या साहेबांची भाची आहे." आई कौतुकाने सांगत होती.

"आई, अगं तुझी होणारी सुन आहे ती. माझी राधा." तो आईकडे बघत म्हणाला.

"काय? साहेबांच्या पोरीकडं वाकड्या नजरेनं पाहतोस? थांब चांगली हासडतेच तुला." ती मारायला धावली.

"काकी अगं, मलाही आवडतो तो." ती त्याच्याकडे पाहत म्हणाली.

"काय? "मायलेकं एकमेकांकडे पाहू लागले.

"मी निघते आता. उशीर होतोय. निल सोडशील मला?"
त्याला पुन्हा धक्का बसला.

"राधा तू आईसमोर काय बोललीस?" तो तिच्या मागे जात म्हणाला.

"मी कुठे काय बोलले?" ती गालात हसली.
"राधा.." त्याने तिचा हात पकडला.

तिने त्याच्याकडे पाहिले तसे त्याने सोडूनही दिला.तिचे घर येईपर्यंत चकार शब्दही ती बोलली नाही.

दोन दिवसांनी त्याचा वाढदिवस. ती केक घेऊन आली. गल्लीतल्या पोरांना सोबत घेवून छान सेलेब्रेशन केले. पोरं केक खाऊन परतली. त्याच्या त्या झोपडीवजा घरात ते दोघेच उरले होते.

"राधा थँक यू." तो.

"निल, हॅपी बर्थडे!" ती गोड हसली.

तिने एक छोटासा हातरूमाल त्याला दिला. त्यावर 'राधानील' नावाची एम्ब्रायडरी केलेली, स्वतःच्या हातांनी.

"राधा, हे आजपर्यंतचं सगळ्यात भारी गिफ्ट. मी जपून ठेवेल शेवटच्या क्षणापर्यंत." तो हळवा होत बोलला.

काही कळायच्या आत तिने त्याला आवेगाने मिठी मारली.

"निल, मला प्रॉमिस कर मी असेन नसेन पण तू खूप खूप मोठा हो. आणि काकीला कामं होत नाही रे आता. तिला सुखाचे दिवस दाखव."

"राधा अशी का बोलतेस तू?" तिचा चेहरा ओंजळीत घेत तो म्हणाला.

"माहित नाही." एवढंच बोलली ती. पण डोळ्यात काहीतरी खोल दडल्यासारखं होतं.

"निल, आय लव्ह यू!" त्याच्या मिठीत शिरत ती म्हणाली.

ती तिची पहिली मिठी..
तो तिचा पहिला स्पर्श..
ती कबुली पहिल्या प्रेमाची..!

त्यानंतर पुढे कधी ती त्याला भेटलीच नाही. तेव्हाची आज भेटतेय, तेही ह्या अवस्थेत.

******
सारे काही आत्ताच घडल्याप्रमाणे निलच्या डोळ्यसमोरून सगळे चित्र सरकले. इतर कॅन्डीडेट्सच्या मुलाखती आपल्या एका सहकाऱ्याकडे सोपवून तो धावतच बाहेर निघून गेला.
तिच्यामागोमाग तोही बसस्टॉपला पोहचला.

"राधा.." त्याच्या हाकेसरशी ती वळली.

"निल प्लीज, का असा मागे करतोहेस?"

"थँक गॉड. म्हणजे तू ओळखतेस मला." त्याच्या बोलण्यावर ती गप्पच होती.

"राधा.." त्याच वेळी पुन्हा श्रावण बरसायला लागला. "पाऊस लागलाय. चल ना माझ्या कारमध्ये बसून बोलूया. निदान या बाळाचा तरी विचार कर."
त्यावर काही न बोलता ती त्याच्यासोबत कारमध्ये बसली.

"कुठे होतीस इतके दिवस?" त्याने अपेक्षित प्रश्न विचारला.
:
क्रमश :
©®Dr. Vrunda F. (वसुंधरा..)
सांगेल का राधा तिच्या आयुष्यातील सत्य? वाचा पुढील अंतिम भागात.

ईरा वाचनाचा आनंद घ्या आता app मधून, आजच download करा. Download App Now
ईराच्या कथांचे कुठलेही भाग मिस करू नका, आजच जॉईन करा ईरा वाचनालय. व्हाट्सएप: व्हाट्सएप:
//