प्रेम हे बावरे! भाग - चार. (अंतिम)

वाचा एक अनोखी प्रेमकथा!


प्रेम हे.. बावरे!
भाग - चार.(अंतिम)


"कुठे होतीस इतके दिवस?" त्याने अपेक्षित प्रश्न विचारला.


"निल मला नाही करायची तुझ्याकडे नोकरी." ती बाहेर बघत म्हणाली.

"आय नो. म्हणूनच तर मी माझ्या प्रश्नांची उत्तरं शोधायला आलोय. सांग ना कुठे होतीस तू?"

"तुझ्या प्रश्नांची उत्तर द्यायला मी बांधील नाहीये निल."


"आहेस राधा. कारण माझ्यावर तुझंही प्रेम होतं. हा रुमाल, तुझी प्रेमाची पहिली भेट. अजूनही माझ्याकडे आहे." तो हळवे होत म्हणाला.

"तू तिथेच अडकलाहेस. पण मी खूप पुढे निघून गेलेय निल. एका बाळाची आई आहे आता." डोळ्यात आसवांची गर्दी झाली होती.

"तिथेच अडकलो म्हणून हा निल बनू शकलो ना? तुला हवा असणारा. राधा, कसल्या बोचऱ्या दुःखात जगते आहेस तू?"
त्याने कार ब्रेक करत हळूच तिच्या हातावर हात ठेवून विचारले.

त्याचा तो स्पर्श. आजही तसाच होता पूर्वीप्रमाणेच निर्मळ..इतक्या वर्षानंतर पहिल्यांदा एक मायेचा आश्वासक स्पर्श तो.
इतकावेळ अडवून ठेवलेला तिचा बांध फुटला.
वडिलांच्या मृत्यूनंतर आई तिला घेवून मामाकडे आलेली. मामा श्रीमंत, पण तेवढाच लालची. फायनल कम्प्लिट व्हायच्या आतच तिचे.एका गर्भश्रीमंत घरच्या वेडसर मुलाशी लग्न ठरवले. लग्नाची बक्कळ रक्कम अदा करून घेतली नी मग दोघी मायलेकीना वाऱ्यावर सोडले.

रोज मानसिक आणि शारीरिक आत्याचार, प्रेमाचा साधा लवलेशही नाही कुठे. कशीतरी एवढी वर्ष काढली पण जेव्हा तिच्या गर्भारपोटावर नवऱ्याची लाथ पडली, त्याच क्षणी तिने ते घर सोडले. पोलिसांत तक्रार केली.

एकटी होती तोवर ठीक, पण आता बाळाला इथे नाही वाढवायचे हे तिचे पक्के झाले होते. यथावकाश काडीमोड झाला. आता लेकरू वर्षाचे होत आले म्हणून ती नोकरीच्या शोधात बाहेर पडली. तर नशिबाने पुन्हा तिला नीलसमोर उभे केले. इतक्या वर्षांनी. त्याच श्रावणात.

तिचा स्टॉप आला तसे तिने कार थांबवायला सांगितली.


अश्रू पुसून बाहेर निघणार तोच तिचे बाळ 'बा, बा' करत त्याच्याकडे झेपावले. ह्या एका वर्षाच्या काळात त्याच्या तोंडून निघालेला तो पहिला शब्द.
******
दोन दिवसानंतर सायंकाळी घरासमोर एक कार थांबली. दारात निल त्याच्या आईसोबत उभा होता.

"निल मला तुझी नोकरी नकोय हे सांगितलं होतं ना? का आलास मग?" ती.

"तुला नोकरीची काय गरज? आरएन ग्रुपची पार्टनरशिप आहे तुझी. तुझं नाव माझ्यापूर्वी केव्हाचंच लागलंय. 'राधानील' तीच आपली कंपनी. आरएन ग्रुप त्याच्या आद्यक्षरावरून तयार झालाय.

मी तुला मागणी घालायला आलोय राधा. ह्या बाळासकट तू माझी होशील?" त्याच्या डोळ्यात आर्जव होते.


"माझी तेवढी पात्रता नाहीये निल. प्लीज सोडून दे नाद माझा." डोळ्यात पाणी आणून ती म्हणाली.

"अनुबेबी, तो नादखुळाच झालाय. आणि पात्रता ठरवणारी तू कोण गं? माझा हा नालायक गुंड मुलगा एवढा मोठा माणूस बनलाय.. तुझ्यामुळे. दुसऱ्यांच्या दारात काम करणारी मी आज राणीसारखी जगतेय तुझ्याचमुळे. पण माझं हे लेकरू तूझ्या वाटेवर आस लावून बसलंय गं.

अनुबेबी, या निल्याच्या विराण आयुष्यात त्याची राधा बनून ये ना गं परत. मी पदर पसरते."


तिने आपल्या आईकडे पाहिले. आईने डोळ्यांनीच होकार दिला.

"काकी एकाच अटीवर. अनुबेबी न म्हणता तुही मला राधा म्हणशील तरच लग्न करेन मी ह्याच्याशी." राधा डोळे पुसत म्हणाली.

दोनच दिवसात रजिस्टर पद्धतीने त्यांनी लग्न केले.

आरएन ग्रुपची 'आर' म्हणजे राधा हे जगाला कळले होते.
कुणाकडे न जाणारे तिचे बाळ त्याच्या खांद्यावर झोपले होते.

अन राधा? आज हक्काने निलच्या कुशीत विसावली होती.


******समाप्त ******
©® Dr. Vrunda F.(वसुंधरा..)
*साहित्यचोरी गुन्हा आहे.*

🎭 Series Post

View all