Jan 23, 2022
स्पर्धा

प्रेम हे 9

Read Later
प्रेम हे 9

आपण मागील भागात पाहिले की, शरयू आणि कार्तिक प्रोजेक्ट करत असताना ऑफिस सुटण्याची वेळ निघून गेली हे त्यांच्या लक्षात आले नाही.. त्यामुळे ऑफिस सुटून दोन तास झाल्यावर दोघांच्या लक्षात आले.. तोपर्यंत उशीर झाला होता.. मग कार्तिक शरयूला सोडायला गेला.. आता पुढे..

कार्तिक शरयूला सोडायला जाताना शरयू त्याच्या बाईकवर एकदम कडेला बसली होती.. पण अचानक स्पीडब्रेकर आल्यावर तिचा तोल जाऊन ती आपसूकच कार्तिक जवळ आली.. आणि कार्तिक परत हसला.. ते पाहून शरयूला राग आला..

"गाडी व्यवस्थित चालवता येत नाही काय? येत नसेल तर गाडी चालवूच नये.." शरयू

"माझ्यासारखी गाडी कोणीच चालवू शकत नाही.." कार्तिक

"तेच म्हणाले ना.. गाडी येत नसेल तर चालवायचीच नाही.." शरयू

हे ऐकून कार्तिकने लगेच गाडी थांबवली.. ते पाहून शरयू म्हणाली, " अरे, अजून खूप पुढे आहे माझे घर.."

"तू उतर आधी.." कार्तिक

"अरे पण का??" शरयू

"मला गाडी चालवता येत नाही ना.. मग असल्या गाडी चालवणाऱ्या व्यक्तीच्या मागे बसायचं नाही.. उतर तू आधी" कार्तिक

"अरे, तू असा सिरीयसली का घेतोस? मी गंमत केली थोडी.." शरयू

"मी पण तेच करतोय.. उतर बघू तू आधी.. इथून कसे जायचे? तुझं तू जा.." कार्तिक

"सॉरी ना यार.. माझं चुकलं.. मी आता शांत बसते काही बोलत नाही झालं.." शरयू

" आता कसं? मी काही मुद्दाम करतो का? स्पीडब्रेकर दिसला नाही मला.. तर तू उलट माझीच खेचतेस.." कार्तिक

"सो सॉरी.." शरयू

"बरं बरं.." म्हणून कार्तिकने बाइक सुरू केली आणि त्याने शरयूला तिच्या घरापर्यंत सोडले.. घर आल्यानंतर शरयू बाईक वरून खाली उतरली आणि तिने कार्तिकला "थँक्यू.." म्हटले..

"अगं, मित्र म्हणतेस आणि थँक्यू पण म्हणतेस.. दोस्ती मे 'नो सॉरी नो थँक्यू' तुला हे माहित नाही का?" कार्तिक

"हो.. माहित आहे.. पण तरिही तुला मी थॅन्क्यू म्हणणार आहे.. तू माझ्यासाठी इतकं केलंस.." शरयू पुढे बोलणार इतक्यात कार्तिक तिला मधेच थांबवतो..

"बास बास.. आपण तुझ्या भाषणाचा कार्यक्रम ठेऊया.. तेव्हा तू आभार मान.. आता नको मला खूप उशीर झाला आहे.." कार्तिक

"तू म्हणजे ना.. तुझ्यावर चिडायच की बोलायचं हेच कळत नाही.. असा कसा रे तू.." शरयू

"मी असाच आहे.. बर मी चलतो.. आधीचं खूप उशीर झाला आहे.. ओके बाय.. उद्या पुढचा प्रोजेक्ट बनवू.." असे म्हणून कार्तिक जातो..

कार्तिक घरी गेल्यावर त्याची आई वाट पाहतच होती.. कारण कार्तिकला खूप उशीर झाला होता.. आणि तो त्याचा फोनही उचलत नव्हता.. शरयूला सोडण्याच्या नादात त्याचे फोनच्या रिंगकडे देखील लक्ष नव्हते.. त्याने फोन काढला तर त्यात दहा मिस्डकाॅल्स.. आईचे तीन आणि मनस्वीचे सात..

"अरे, आज दिवसभरात मनूच एकदाही नाव घेतले नाही.. ती आहे हे देखील विसरलो.. आता काय करत असेल ती.." कार्तिक मनातच बडबडत असतो..

"अरे, कार्तिक लवकर ये.. मी वाढते तुला.. भूक लागली असेल ना.." कार्तिकची आई

"हो आई, खूप भूक लागली आहे.. वाढ लवकर.." कार्तिक

कार्तिक आवरून जेवायला आला.. जेवताना त्याचे डोळे मनस्वीलाच शोधत होते.. तरी त्याने आईसमोर तिचा विषय काढला.. पण आईने काहीतरी करत असेल इतकेच सांगितले.. जेवण झाल्यावर कार्तिक रूममध्ये गेला..

कार्तिक रूममध्ये गेल्यावर पाहतो तर काय? मनस्वी त्याच्या रूममध्ये बसली होती. कार्तिकला बघून ती थोडी चिडक्या सुरात म्हणाली, "काय हे? आज इतका का उशीर? आधीच आम्ही चार दिवसासाठी आलो आहे.. त्यात तू असा.. आमच्यासोबत वेळच नसतो तुला.. असा कसा रे तू?" मनस्वी

"अगं मनू, एक नवीन प्रोजेक्ट मिळाला आहे.. त्याच भरपूर काम होतं.. वेळ कमी आणि कामं जास्त आहे बघ.." कार्तिक

"अच्छा.. मग आमच्यासाठी वेळ नाही का तुमच्याकडे? बरं राहू दे.." असे म्हणत मनू जात असते.. तोच कार्तिक तिचा हात पकडतो..
"अग, तसे कुठे मी म्हणालो? फक्त कामं जास्त आहे म्हणालो.." कार्तिक

"हं.." म्हणत मनूने लाजतच कार्तिकच्या हातातून तिचा हात काढून घेते..

"अगं, खरंच सांगतोय मी.." कार्तिक

"बर.. पण आम्ही आता दोनच दिवस आहोत.. तर तू जरा लवकर ये.." मनस्वी

"बरं.. पण मला एक कळेना.. तू मला लवकर का ये? म्हणत आहेस.." कार्तिक

"अरे, सहजच.. आम्ही जाणार ना..मग आत्ताच दोन दिवसात बोलून चालून वेळ घालवूया असे म्हणत होते.. बरं चल.. उद्या बोलू.. तू सुद्धा दमला असशील.." असे म्हणून मनस्वीने तेथून हळूच पळ काढला..

इकडे शरयू घरी आल्यावर तिचे आवरून जेवण करून झोपायला गेली.. पण तिला झोप येईना..
"हा दिसतो तसा मुळीच नाही.. किती काळजी घेतो.. माझी आणि त्याची साधी मैत्री देखील नाही.. पण आज त्याने जे केलंय त्यामुळे तर मी त्याच्या प्रेमातच पडले आहे.. दिसायला पण हॅण्डसम आहे आणि मुलींशी वागणे देखील चांगले आहे.. आणखी काय हवं??" शरयू मनातच कार्तिक बद्दल विचार करत होती..

इकडे मनस्वीची पण तिचं कंडीशन होती.. ती देखील हळूहळू कार्तिकच्या प्रेमात पडत होती.. कारण तिला कार्तिकचा दोन दिवसाचा सहवास मिळाला होता.. आणि जर तो ऑफिसला गेला तर तिला ते नको वाटतं होत.. कार्तिकने तिच्यासोबत आणखी वेळ घालवावा असे तिला वाटत होते.. तिला त्याच्याशी भांडायचे नव्हते तर प्रेमाने दोन गोष्टी बोलायचे होते..

मनस्वी आणि शरयू दोघीही एकाच वेळी हळूहळू कार्तिक कडे ओढल्या जात होत्या.. दोघींनाही तो आवडू लागला होता.. त्याच्यासोबत बोलायला आवडत होतं.. पण कार्तिकच्या मनात काय होतं? त्याच्या मनात नक्की कोण होतं? प्रेम हे या लेखाची परी तर त्याला आधीपासून आवडतच होती.. मनू बघता क्षणी आवडली होती.. पण शरयू.... तिचं आणि कार्तिकच तर भांडणच सुरू होतं.. तेथूनच तर सुरूवात झाली.. मग याचा शेवट प्रेमात तर होणार नाही ना..

काय होतंय ते आपण पुढच्या लेखात पाहू..
क्रमशः

ईरा वाचनाचा आनंद घ्या आता app मधून, आजच download करा. Download App Now
Circle Image

Priyanka Abhinandan Patil

मनात जे काही येतं ते लिहिते.. मनापासून लिहायला आवडते..