Jan 26, 2022
स्पर्धा

प्रेम हे 8

Read Later
प्रेम हे 8

आपण मागील भागात पाहिले की, कार्तिक आणि शरयूचे भांडण झाले होते.. सरांनी त्यांना एक प्रोजेक्ट करायला सांगितले.. कार्तिक नकार देत होता, पण सरांनी माझी ऑर्डर आहे असे त्याला सांगितले.. त्यामुळे नाईलाजाने त्याला तो प्रोजेक्ट करायला लागला.. आता पुढे

कार्तिक आणि शरयू दोघेही आपापल्या पद्धतीने प्रोजेक्टचा अभ्यास करू लागले.. कार्तिकला प्रोजेक्ट बनवण्यासाठी एक आयडिया सुचली आणि त्या साच्यातूनच प्रोजेक्ट बनवायचा असे त्याने ठरवले.. त्याने स्टेप बाय स्टेप सगळी प्रोजेक्टची मांडणी करण्यासाठी मुद्दे तयार केले आणि त्याची प्रिंट मारून तो कागद श्रेयसकडे दिला..

"श्रेयस, हा कागद तिला देऊन ये जा.." कार्तिक

"तिला म्हणजे कोणाला रे?" श्रेयस

मला कोणासोबत प्रोजेक्ट करायचा आहे तिला.." कार्तिक थोडासा रागातच म्हणाला..

"अरे, मग सरळ नाव घे ना.." श्रेयस

"तू देणार आहेस की नाहीस एवढंच सांग मला.." कार्तिक

"बरं बाबा जातो मी.. काय द्यायचं आहे ते तर दे?" असे म्हणून श्रेयस कार्तिकने दिलेला कागद घेऊन शरयूकडे गेला..

"मिस शरयू हा कागद कार्तिकने तुला दिलेला आहे.. एवढं पाहून घे.." असे श्रेयस म्हणाला

"ठिक आहे.. मी बघेन आणि नंतर त्याला सांगेन.." शरयू

"बरं.." म्हणून श्रेयस त्याच्या डेस्कवर जाऊन बसला..

शरयूने त्यावरील सगळे मुद्दे बघितले आणि त्यात थोडे करेक्शन करून तिने काढलेली नवीन मुद्यांची एक प्रिंट काढून ती तिकडे गेली..

"हे बघ, मी काढलेले नवीन मुद्दे आहेत हे.. तुला कसे वाटतात? बघून मला सांग.." शरयू

कार्तिकने सगळे मुद्दे बघून तिला तिच्या मुद्द्यांमध्ये देखील थोडेसे करेक्शन करायला सांगितले.. आणि त्याने तिला समोर खुर्चीत बसायला सांगितले.. शरयू खुर्चीत बसली.. मग दोघांनी मिळून दोघांनी काढलेल्या मुद्द्यांचे एकत्रीकरण करायला सुरुवात केली..

त्यामध्ये मुद्दे निवडताना देखील त्या दोघांमध्ये तुझा मुद्दा कि माझा मुद्दा असे चालू होते.. फायनली दोघांनी मिळून सगळे मुद्दे बाजूला केले.. आता फायनल प्रोजेक्टला सुरुवात करणार होते.. प्रोजेक्ट बनवतानाचा साचा दोघांनी बनवला होता.. आता त्यामध्ये कसे काय लिहायचे? हे फक्त बाकी होते..

"आपण दोघेही निम्मे-निम्मे प्रोजेक्ट बनवू.. सुरुवातीला याच्यामध्ये काय काय लिहायचे ते ठरवू? आणि नंतर आपल्या आपण प्रोजेक्ट बनवू.. चालेल का?" कार्तिक

"बरं चालेल.. पण फायनल प्रोजेक्ट सरांना द्यायच्या आधी आपण दोघांनी बनवलेला निम्मा निम्मा प्रोजेक्टचा अभ्यास करायला हवा.. नाही तर सरांनी काही प्रश्न विचारले तर उत्तर देता येणार नाही.." शरयू

"हो.. फायनल प्रोजेक्ट बनवून झाला की, आपण एकत्र बसून यावर एकदा चर्चा करू चालेल का?" कार्तिक

"हो चालेल.." शरयू

दोघांनी मिळून प्रोजेक्ट बनवायला सुरुवात केली.. दोघांचे मिळून मुद्दे काढायला त्यांना खूप वेळ झाला आणि फायनली प्रोजेक्ट कसा बनवायचा? याचा विचार करता करता ऑफिस सुटायची वेळ कधी झाली? ते त्यांचे त्यांनाच कळले नाही.. ते दोघे प्रोजेक्टचा विचार करत असताना ऑफिस कधी सुटले आहे हे त्यांच्या लक्षातच आले नाही आणि ते दोघे तसेच प्रोजेक्ट बनवत राहिले..

फायनली प्रोजेक्ट कसा बनवायचा? हे त्यांचे ठरले आणि मग त्यांनी आजूबाजूला बघितले तर ऑफिसमध्ये कोणीच नव्हते.. मग त्यांनी घड्याळ बघितले.. तर ऑफिस सुटून दोन तास झाले होते.. त्यांना घरी जायला उशीर झाला होता..

"बापरे! इतका उशीर झाला.." कार्तिक

"अरे बापरे! एवढा वेळ झाला.. कामात कसा वेळ गेला कळलंच नाही?" शरयू

"तुला सोडू की काय?" कार्तिक

"नको मी बसने जाईन.." शरयू

"बरं.." म्हणून कार्तिक त्याचं आवरू लागला.. शरयू पण तिच्या डेस्कवर जाऊन सगळं आवरू लागली.. तिची बॅग भरू लागली..

शरयू बॅग भरून ऑफिसमधून बाहेर पडेपर्यंत कार्तिक तिथेच थांबला.. शरयू ऑफिसमधून बाहेर जाऊन बस स्टॉपवर बसची वाट पाहू लागली.. कार्तिकने सुद्धा त्याची बाईक पार्किंग मधून बाहेर काढली आणि तो जाऊ लागला.. इतक्यात त्याला शरयू दिसली.. ती बस स्टॉपवर एकटीच उभी होती आणि थोड्या अंतरावर काही मुले टवाळक्या करत होती.. ते पाहून कार्तिक तिच्या जवळ गेला.. कार्तिकला बघून शरयूला थोडसं बरं वाटलं..

बराच वेळ झाला तरी बस आली नाही.. नेहमीची तिची बस चुकली होती.. त्यामुळे नंतरच्या बसची वेळ तिला माहित नव्हती.. त्यामुळे ती तशीच उभी होती..

"बस किती वाजता येते?" कार्तिक

"मला माहित नाही.." शरयू

"मग इतका वेळ अशी का उभी आहेस?" कार्तिक

"मग काय करू?" शरयू

"अगं कुणाला तरी विचारायचे ना? बस किती वाजता येते ते?" कार्तिक

"पण इथे तर कुणीच नाही?" शरयू

कार्तिक डोक्यावर हात मारून "चल मी सोडतो तुला.." म्हणाला

"अरे, पण तुला कशाला त्रास?" शरयू

"तुला असेच सोडून गेलो तर मला त्रास होईल.. बस तू गाडीवर.. मी सोडतो.." कार्तिक

मग नाईलाजाने शरयूला कार्तिकच्या बाईकवर बसावे लागते.. शरयू त्याच्या गाडीवर अगदी कडेला मधे भरपूर जागा सोडून बसली.. ते पाहून कार्तिक हसला.. ती अगदी अवघडून बसली होती..

"काय झालं हसायला?" शरयू

"तू इतकी का अवघडून बसली आहेस? थोडी रिलॅक्स हो.. मी काही खाणार नाही तुला.." असे म्हणून कार्तिक परत हसला..

"तू नुसता हसत बस.. माझी ही पहिलीच वेळ आहे.. कुणाच्या तरी बाईकवर बसण्याची.." शरयू

"म्हणजे.. याआधी कधीच तू बाईकवर बसली नाहीस?" कार्तिक

"तसे नाही रे.. म्हणजे मित्राच्या वगैरे किंवा अनोळखी व्यक्तीच्या बाईकवर बसले नाही.." शरयू

"अच्छा.. म्हणजे मी अनोळखी व्यक्ती आहे तर.." कार्तिक

"तू कसा अनोळखी असणार?" शरयू

"मग मी मित्र आहे काय??" कार्तिक हसत म्हणाला

"मग.. आता माझा कलिग म्हणजे मित्रच ना.." शरयू

"धन्यवाद.." कार्तिक

"का? रे.." शरयू

"मित्र म्हणालीस म्हणून.." कार्तिक

"मित्राला मित्रच म्हणणार ना.." शरयू

"बरं.." असे म्हणत दोघेही हसत बोलत कार्तिक शरयूला सोडायला तिच्या घरी जातो..

क्रमशः

ईरा वाचनाचा आनंद घ्या आता app मधून, आजच download करा. Download App Now
Circle Image

Priyanka Abhinandan Patil

मनात जे काही येतं ते लिहिते.. मनापासून लिहायला आवडते..