आपण मागील भागात पाहिले की, कार्तिक ऑफिसला गेला आणि तिथे एक कार्यक्रम आयोजित केला होता.. कार्तिक श्रेयसच्या शेजारी जाऊन बसला.. श्रेयसने त्याला कार्यक्रम कशाबद्दल आहे ते सांगितले.. तेवढ्यात तो शरयूच्या जागेवर बसला होता म्हणून तिने त्याला तिथून उठवल्यामुळे कार्तिक चिडला.. आता पुढे..
कार्यक्रम संपल्यावर सगळे आपापल्या डेस्कवर जाऊन बसले.. थोड्या वेळाने वेळाने जेवणाची वेळ झाली.. ऑफिसमध्येच सगळी सोय केली होती.. त्यामुळे सगळेजण तेथेच गेले.. तेथे गेल्यावर कार्तिक आणि श्रेयस त्यांची डीश वाढून घेऊन टेबलाकडे जात असतानाच शरयूचा हात कार्तिकला लागला आणि कार्तिकच्या अंगावर डिशमधील थोडसं अन्न पडलं..
मग काय? कार्तिक खूप चिडला.. आणि कोण आहे ते म्हणतच त्याने हात उचलला.. तोपर्यंत समोर शरयू साॅरी म्हणत डोळे बंद केलेली दिसली.. कार्तिकला शरयू दिसल्यावर तो शांत झाला.. खरंतर शरयू एका कलिगसोबत बोलत असताना ती हातवारे करत सांगत होती.. आणि अचानक तिकडून कार्तिक आला आणि त्याला तिचा हात लागला..
आता कार्तिकला आणखीनच शरयूचा राग येऊ लागला.. तो कपड्यावरील सांडलेले पाण्याने धुऊन आला आणि मग जेवण करू लागला..
"कसली काय रे ही? समोर बघता पण येत नाही काय हिला? माझ्या तर डोक्यात जात आहे ही.. मघाशी एक आणि आता एक.. उगीचचं का त्रास देत आहे? आधीचं माझ्या आवडीच्या लेखिकेचा लेख वाचून हिरमोड केलाय हिने.. आणि आता माझ्या मागे लागली आहे.." कार्तिक श्रेयसला म्हणाला..
"राहू दे ना यार.. तू पण तिच्या काय मागे लागला आहेस?" श्रेयस
"तू का तिची बाजू घेत आहेस? ती तुझी मैत्रीण आहे की मी तुझा मित्र.." कार्तिक
"दोघेही.." श्रेयस
"काय?? ती कधीपासून तुझी मैत्रीण झाली??" कार्तिक
"अरे मैत्रीण म्हणजे तसे नाही.. पण मला ती आवडते.." श्रेयस
"काय????? काय चाॅईस आहे यार तुझी.." कार्तिक
"गप्प रे, म्हणजे मनात आहे.. मी अजून कुणाला बोललो नाही.. तिच्याशी तर मी बोललोच नाही.." श्रेयस
"अरे, काय यार? मग हे कसलं प्रेम.. अवघड आहे तुझं.." कार्तिक
"काही नाही अवघड.. मी सिरियसली काहीच घेत नाही.. झालं तर छानच नाही तर नाही.. त्यात काय एवढं? पण मला ती आवडते.." श्रेयस
"बरं बाबा.. जेव लवकर.. धन्य आहेस तू.." असे म्हणून कार्तिक आणि श्रेयस जेवू लागले..
जेवण झाल्यावर सगळेजण जाऊन आपापल्या डेस्कवर बसले.. सगळेजण कामाला सुरवात केली.. थोड्यावेळाने बाॅसने कार्तिकला बोलावून घेतले.. कार्तिक केबिनमध्ये गेला.. "मे आय कम इन सर.." कार्तिक
"येस कम इन.." सर
"सर, बोलावलात तुम्ही.." कार्तिक
"हो थोडं काम आहे.. थांब दोन मिनिट.." असे म्हणून सरांनी कार्तिकला बसायला सांगितले.. इतक्यात शरयू आली..
"सर, काही काम होतं का?" शरयू
"हो, एक खूप महत्त्वाचा प्रोजेक्ट करायचा आहे.. त्याच्यासाठी मी तुम्हा दोघांची एक टीम बनवली आहे.. तुम्ही दोघांनी मिळून हा प्रोजेक्ट पूर्ण करून द्यायचा आहे.. आणि त्याच्यासाठी अवधी सुद्धा खूप कमी आहे.. अगदी दोन दिवसात हा प्रोजेक्ट पूर्ण करून हवा आहे.. त्यामुळे तुम्ही काही पण करा आणि हा प्रोजेक्ट मला पूर्ण करून द्या.." सर
"सर, इतक्या कमी वेळात कसं शक्य आहे? आणि विषय कोणता आहे? कशावरती करायचा आहे प्रोजेक्ट? ते तरी सांगा.. आधी अभ्यास करून मगच हा प्रोजेक्ट बनवायला लागेल.. कसे होणार सर?" कार्तिक
"कार्तिक, हे तुम्ही बोलताय.. या आधीदेखील तुम्ही असे प्रोजेक्ट बनवून दिलेले आहात.. आणि आता काय अशक्य आहे तुम्हाला? ते काही नाही.. ही माझी ऑर्डर समजा हव तर आणि मला प्रोजेक्ट बनवून द्या.." सर
"पण सर.." कार्तिक.. खरंतर कार्तिकला शरयू सोबत प्रोजेक्ट बनवायचा नव्हता.. म्हणून तो काहीतरी कारणे सांगत होता.. पण त्याचे सर काही ऐकायला तयार नाहीत.. त्यामुळे नाईलाजास्तव त्याला ते काम करायला लागणार होते..
सरांनी त्यांना प्रोजेक्ट बद्दल सगळी माहिती दिली.. प्रोजेक्ट करण्याचा अवधी खूपच कमी होता आणि तेही शरयूसोबत करायचा होता त्यामुळे कार्तिक थोडासा नाराज झाला.. पण जाऊ दे.. आपण आपलं कामं करायचं.. दुसरीकडे लक्षच द्यायचं नाही.. असे त्याने ठरवले होते..
प्रोजेक्ट बद्दल सगळी माहिती समजावून घेऊन कार्तिक त्याच्या डेस्कवर जाऊन बसला.. तो थोडा वेळ शांतच बसला.. मग तिथे श्रेयस आला..
"काय झालं रे? सर ओरडले काय?" श्रेयस
"नाही रे.. नवा प्रोजेक्ट दिलाय.." कार्तिक
"अरे, मग असा का बसलायस? काही प्राॅब्लेम आहे का?" श्रेयस
"काही नाही रे.. प्रोजेक्ट त्या शरयूसोबत करायचा आहे.." कार्तिक
"वाव.. कसलं भारी यार.. मला मिळायला हवं होतं.. मग यात काय अडचण आहे??" श्रेयस
"तिचं तर अडचण आहे.. मला ती नको आहे प्रोजेक्टसाठी.." कार्तिक
"अरे मग सरांना तसे सांगायचे ना.." श्रेयस
"काही उपयोग नाही.. सरांनी जणू ऑर्डरच दिली आहे.." कार्तिक
"हं.. मी असतो तर आनंदाने केलो असतो.." श्रेयस
"होय काय? मग कर की तूच.." कार्तिक
"तुला दिलंय ना.. मग मी कसे करणार??" श्रेयस
"मी सांगेन सरांना.. सांगू काय?" कार्तिक
"नको बाबा.. सर ओरडतील.. तुला काही मदत हवी असेल तर मी नक्की करेन.." श्रेयस
"हो.. तुझी मदत तर लागणारच आहे.. आमच्यातील दुवा असणार आहेस तू.. इकडची माहिती तिकडे पाठवायला हवी ना.. मी नाही बोलणार तिच्याशी.. तू तेवढी मदत कर.." कार्तिक
"बरं.. करेन.. तेवढंच मलाही तिच्याशी बोलायला मिळेल.. आमची मैत्री पण होईल.." श्रेयस
"बरं.. मग माझा प्रश्नच मिटला.." कार्तिक
"सांग मग तुला काय मदत हवी आहे?" श्रेयस
"बरं.. आधी मी बघून घेतो.. आणि मग सांगतो.." कार्तिक
"बरं.." म्हणून दोघेही आपापल्या कामाला लागले..
यापुढील भाग आपण पुढच्या लेखात पाहू..
क्रमशः
Download the app
आता वाचा ईराच्या कथा सोप्या पद्धतीने, आजच ईरा app इंस्टॉल करा