Jan 26, 2022
स्पर्धा

प्रेम हे 6

Read Later
प्रेम हे 6

आपण मागील भागात पाहिले की, कार्तिक आणि मनस्वी दोघेही डोंगर चढून लवकर वर गेले.. नंतर त्यांचे आईबाबा येतात.. कार्तिक मनस्वी दोघे एकमेकांच्या जवळ येतात.. तेथे गेल्यावर कार्तिकला परीची आठवण आली.. आता पुढे..

सगळे जण वरचा परिसर, निसर्ग पाहून खाली आले.. त्यांना खाली येण्यासाठी संध्याकाळ झाली.. मग सगळे घरी जायला निघाले.. जाताना हाॅटेलमध्ये जेवण करून जायचे ठरले.. जेवण झाल्यावर आईस्क्रीम ऑर्डर करतात..

"कोणाला कोणतं आईस्क्रीम हव ते सांगा?" शिरिष काका

"मला व्हॅनिला.." कार्तिक आणि मनस्वी दोघेही एकदम म्हणाले ..

"अरे वा! दोघांची चाॅईस सेम आहे की.." कार्तिकची आई..

"असणारच.. बेस्ट फ्रेण्ड तर आहेत ना ते.." मनस्वीची आई..

सगळे आईस्क्रीम खाऊन घरी जायला निघाले.. घरी गेल्यावर कार्तिकला झोपच येईना.. दिवसभरात जे काही घडले ते सगळे त्याला आठवू लागले.. मनस्वी सोबत केलेली धम्माल, दंगा मस्ती सगळं आठवत होतं.. त्यामुळे त्याला झोप येत नव्हती..

कार्तिकला रात्री झोपायला उशीर झाल्यामुळे सकाळी उठायला उशिर झाला.. मग काय सकाळी ऑफिसला जायची त्याची गडबड.. त्यातच आज उशिरा उठल्यामुळे आणखीनच गडबड झाली.. त्या गडबडीत तो त्याचा आवडता लेख प्रेम हे वाचायचे राहून गेले.. आज पर्यंत हा लेख वाचायचे कधीच राहिले नाही.. पण आज गडबडीत राहून गेले.. ऑफिसला जाताना गाडीवर बसल्यावर त्याच्या लक्षात आले की "आपण पेपर जरी घेतला असता, तरी ऑफिसमध्ये बसून वाचलो असतो.. पण ऑफिसमध्ये तर पेपर येतोच मग तेथेच वाचूया.." असे म्हणून तो ऑफिसला गेला..

ऑफिसमध्ये गेल्यावर तेथे कार्तिकला कोणीच दिसले नाही.. मग तो इकडे तिकडे बघत त्याच्या डेस्कवर जाऊन बसला.. इतक्यात ऑफिसमधला एक कामगार येऊन त्याच्याशी बोलू लागला.. "अहो सर, तुम्ही इथेच का बसून राहिलात? कॉन्फरन्स रूममध्ये छान कार्यक्रम सुरू आहे.. तुम्ही तिथे का गेला नाहीत?"

"होय का? सगळेजण तिकडेच गेले आहेत तर.. मला माहिती नव्हतं.. बर आता जातो.." असे म्हणून कार्तिक कॉन्फरन्स रूममध्ये गेला..

कार्तिक कॉन्फरन्स रूममध्ये गेल्याबरोबर त्याच्या कानावर शब्द पडू लागले..
प्रेम ही एक भावना.. प्रेम म्हणजे नक्की काय? प्रेम फक्त दोन शब्द.. पण अर्थ परिपूर्ण.. प्रेमाशिवाय आयुष्यात काहीच अर्थ नाही.. प्रेम दिल्याने प्रेम मिळते.. प्रेमात कसलेही बंधन नसते.. एखाद्या व्यक्तीला पाहिले की, आपल्याला पहिल्याच नजरेत ती व्यक्ती आवडू लागते.. हेच ते पहिल्या नजरेतील प्रेम.. मग जिथे तिथे तिच व्यक्ती आपल्याला दिसू लागते.. अगदी स्वप्नात देखील.. मग हळूहळू बोलण्यातून प्रेम वाढते..

प्रेम ही जगातील सर्वात सुंदर गोष्ट आहे.. प्रेमानेच तर सगळे जिंकता येते.. प्रेम दिल्याने प्रेम वाढते आणि प्रेमानेच नात्यातील दुरावा कमी होतो.. म्हणूनच एकमेकांवर प्रेम करावे..

हे बोल कार्तिकच्या कानावर पडले.. "अरे हे तर परीने म्हटलेले आहे.. परी आली आहे की काय?" असे म्हणून तो काॅन्फरन्स हाॅलचे दार उघडून आत गेला.. आत गेल्यावर पाहतो तर काय? तेच वर शरयू होती आणि ती हे सगळे वाचून दाखवत होती.. कार्तिक दोन मिनिट तिथेच स्तब्ध उभा राहिला.. त्याला काहीच कळेना.. शरयूच परी आहे की काय? असे त्याला दोन सेकंदासाठी वाटले.. कारण ऑफिसमध्ये किंवा इतर वेळी ती कायम पुस्तकच वाचत असायची.. त्यामुळे लेखन देखील करीत असेल असे त्याला वाटले..

मग कार्तिक जाऊन श्रेयसच्या शेजारी बसला..
"हे काय चालू आहे रे?" कार्तिक

"अरे, सरांनी एक कार्यक्रम आयोजित केला होता.. प्रत्येकाने काहीना काही सादर करायचे असे या कार्यक्रमात ठरले आहे.. ही शरयू काहीतरी वाचून दाखवत आहे.. प्रत्येकांनी काहीतरी करून दाखवायचे आहे.." श्रेयस

"पण का?" कार्तिक

"आपल्या नेहमीच्या कामातून थोडं वेगळं काहीतरी.. तेच तेच काम करून कंटाळा येतो.. म्हणून एक दिवसाचा कार्यक्रम सरांनी अरेंज केला आहे.. नेहमीच्या कामापेक्षा थोडसं वेगळं.. आपल्याला एंटरटेनमेंट करण्यासाठी, आपल्या आवडीचं काहीतरी सादर करण्यासाठी म्हणून आजचा दिवस निवडला आहे.. प्रत्येकाने कंपल्सरी याच्यामध्ये भाग घ्यायचा आहे.. तेवढाच विरंगुळा आणि परत काम करायला एनर्जी मिळावी यासाठी आज हा कार्यक्रम आयोजित केला आहे.." श्रेयस

"मग तू मला आधी का सांगितले नाहीस? काल फोन केला असतास तर.. उगीच विनाकारणच ना...." कार्तिक थोडा वैतागून म्हणाला..

"अरे, तुला किती वेळा फोन केला? बघ जरा मोबाईल काढून.. कुणीकडे लक्ष होतं तुझं? आणि काल कुठे गेला होतास? काहीही न सांगता.. नंतर कळालं तुझी रजा आहे ते.. तू काही सांगत नाहीस आणि मग आमच्यावर ओरडतोस.. बघ मोबाईल किती मिस कॉल आहेत माझे?" श्रेयस

कार्तिक मोबाईल काढून बघतो, तर श्रेयसचे दहा मिस कॉल आले होते.. मग त्याच्या लक्षात आले की, काल डोंगरावर बहुतेक रेंज नसेल.. तसेच गर्दी भरपूर असल्यामुळे रिंग ऐकायला देखील आली नाही.. आणि नंतर त्याने मोबाईल उघडून बघितला नाही.. त्यामुळे श्रेयसचा फोन आल्याचे कार्तिकला समजले नाही..

"सॉरी यार.. मग आता काय करायचं? मला तर काहीच येत नाही.. आणि ही शरयू पण परीचा लेख वाचून दाखवत आहे.. मग ती तिचे असे काय सांगत आहे?" कार्तिक

"राहू दे ना.. पण ती छानच सांगत आहे.." श्रेयस

"हो, परी छानच लिहिते.. विषयच नाही.. परी आहे ती.. माझी आवडती.. कधी भेटेल काय माहित?" कार्तिक

"परी की मनस्वी.. कोणी एक ठरव?" श्रेयस

"मनस्वीच काही माहीत नाही.. आणि परीचा तर पत्ताच नाही.. मी तरी काय करणार?" कार्तिक

"हं.. बघ नाही तर ना घर का न घाट का... असे होऊन जाईल.. मनस्वीला तरी मनातलं बोलून दाखव.. नाहीतर परीच्या नादात ती पण हातची निघून जाईल.." श्रेयस

"हो रे.. बघतो.. मनस्वी जायच्या आधी तिला बोलेन मी.. परी जरी भेटली तरी ती मला हो म्हणेल असे वाटत नाही.." कार्तिक

इतक्यात शरयू कार्तिक जवळ आली..
"तू माझ्या का खुर्चीत बसला आहेस?" शरयू

"यावर तुझे नाव लिहिलंय का?" कार्तिक थोडासा हसून म्हणाला..

"होय लिहिलंय.. उठ आधी त्या खुर्चीतून.." शरयू

"काय वैताग आहे? घे तुझी खुर्ची.. घरी जाताना पण घेऊन जा.." कार्तिक थोडा रागातच म्हणाला.. आणि दुसरीकडे जाऊन बसला..
क्रमशः 

ईरा वाचनाचा आनंद घ्या आता app मधून, आजच download करा. Download App Now
Circle Image

Priyanka Abhinandan Patil

मनात जे काही येतं ते लिहिते.. मनापासून लिहायला आवडते..