प्रेम हे 4

Marathi katha

आपण मागील भागात पाहिले की, कार्तिक सकाळी उठून पेपर शोधत होता.. तर तो पेपर मनू वाचत होती.. कार्तिक तिच्या हातातून पेपर घेऊन वाचू लागला.. मनस्वीला त्याचा खूप राग आला.. ती रूसून बसली.. कार्तिक पेपर वाचून झाल्यावर बाहेर आला.. पण त्याला मनस्वी दिसली नाही.. आता पुढे..

कार्तिक रूममधून बाहेर आला.. आणि मनस्वीला शोधू लागला.. पण ती कुठेच दिसली नाही.. मग तो सगळीकडे शोधू लागला.. इतक्यात शिरीष काका कार्तिकला बोलावतात..
"हा काका, बोला.." कार्तिक

"अरे, आमच्या मनूशी तू भांडलास का??" शिरिष काका

"नाही काका.. असे का विचारत आहात?" कार्तिक

"अरे, ती चिडून, रूसून बाहेर बागेत जाऊन बसली आहे.. म्हणून विचारलो.." शिरिष काका

"बरं.. मी बघतो.." कार्तिक

"जरा लवकरच रे.. आपल्याला निघायचं आहे.." शिरिष काका

"हो काका.." असे म्हणून कार्तिक घराबाहेर असलेल्या त्यांच्या छोट्याशा बगिच्यात गेला.. तिथे मनू आजूबाजूची झाडे पहात होती.. ती तिच्यात तंद्रीत होती.. कदाचित गुणगुणत देखील होती.. कार्तिक हळूच तिच्या मागून गेला आणि ती तंद्रीतच असताना हळूच तिच्या खांद्यावर हात ठेवला.. ती एकदम दचकली आणि मागे वळून पाहिली तर कार्तिक होता.. परत तिने रुसवा आणून तोंड फिरवले..

"अगं मनू, इतकं चिडायला काय झालं?" कार्तिक

"तू का आलायस? जा तू इथून.." मनस्वी

"अगं, साॅरी ना.." कार्तिक

"तुझं हे नेहमीचेच आहे.. मला चिडवतोस आणि नंतर साॅरी म्हणायला येतोस.. यावेळेस मी तुझ्याशी बोलणारच नाही.." मनस्वी

इतक्यात एक मांजर एकदम तिच्या समोर उडी मारले.. ते पाहून मनू खूप घाबरली आणि एकदम कार्तिकच्या मिठीत गेली..

बराच वेळ ते दोघे त्याच अवस्थेत होते.. मग थोड्या वेळाने मनस्वी सावरली आणि बाजूला झाली..
"साॅरी..." मनस्वी

"खरं तर मी तुला सॉरी म्हणायला आलो आहे.. सॉरी माझं चुकलं.. मी असा तुझ्या हातातून पेपर घ्यायला नको होता.." कार्तिक

"माझ्याकडे मागितला असतास तर मी तुला दिले असते ना.. न मागताच असा ओढून पेपर कोण घेतं का?" मनस्वी

"सॉरी म्हटलं ना आता.. की उठाबशा काढू.. हे बघ कान पकडतो मी.." असे म्हणून कर्तिक दोन्ही हाताने कान पकडतो.. ते पाहून मनस्वीला हसू आले.. पण ती हसत नाही..

परत ती तोंड फिरवते.. "पहिला चूक करायची आणि नंतर सॉरी बोलायचं.. हे तुझं कायमच आहे.. लहानपणी पण असाच करायचास तू.." मनस्वी परत थोडासा रागाचा आव आणून म्हणाली..

"अग पण मी मुद्दामून नाही केलं.. मला पहिला उठल्याबरोबर पेपर लागतो आणि ती माझी सवयच आहे.. पेपर मधील लेख वाचल्याशिवाय माझा दिवसच जात नाही.. पण हे चुकीने झालंय ना.. मी भावनेच्या भरात असा वागलो.. तुला दुखावण्याचा हेतू नव्हता.. सॉरी ना यार अजून किती रूसतेस.. बोल ना आता.." कार्तिक

"इतका निरागस चेहरा करू नकोस हं.. जितका तू निरागस दिसतोस ना तितका निरागस अजिबात नाहीस.. असं तोंड केलास की मी लगेच पाघळते.. तुला माहिती आहे.. म्हणून असं करतोस.." मनस्वी

"अगं खरच मनापासून सॉरी.. माझ्या मनात तसे काहीच नाही.. उलट मला तू......" इतके बोलून कार्तिक गप्प बसतो

"तू म्हणजे काय? पुढे बोल ना.. तुला काय म्हणायचं आहे ते.." मनस्वी

"काही नाही गं.. चल आता आणि हा रुसवा सोड.. आपल्याला जायचं आहे ना.. आत सगळे वाट बघत थांबले असतील.." कार्तिक

"पण कार्तिक सांग ना.. तू पुढे काय म्हणायचं होतं तुला?" मनस्वी

"आता नको परत तुला सांगेन.." कार्तिक

"नाही..... मला आत्ताच ऐकायचं आहे.. बोल ना प्लीज.. काय म्हणायचं आहे तुला?" मनस्वी

"आत्ता नको ना.. परत नक्की सांगेन.. प्लीज... माझ्यासाठी..." कार्तिक

"बरं, ठिक आहे.. चल.." मनस्वी थोडीशी नाराज होऊन जात होती.. तेच कार्तिकने परत तिच्याकडे पाहिलं.. आणि तो म्हणाला, "तू खूप सुंदर दिसतेस.. असे म्हणणार होतो.." कार्तिक

"खोटं... तू दुसरं काहीतरी बोलणार होतास.." मनस्वी

"अगं, खरंच हेच बोलणार होतो.." कार्तिक

"बरं..." असे म्हणून दोघेही आत जात होते.. त्या दोघांची सगळे वाट पाहत होते.. ते दोघे गेल्यावर शिरिष काका मनस्वीला म्हणाले, "गेला का रूसवा?? का रूसलं होतं आमचं बाळ?"

"बाबा बघा ना हा कार्तिक.. उगीच मला चिडवतो.. आणि नंतर मी चिडले की सगळे मलाच बोलता.." मनस्वी

"का रे कार्तिक? आमच्या मनूला चिडवतोस.. थांब तुझं घर उन्हातच बांधतो.." शिरिष काका हसत म्हणाले

"बाबा, मी काय आता लहान आहे का?? तुम्ही सगळे मला असे चिडवता.." मनस्वी

"अरे बाळा, तू आमच्यासाठी लहान बाळच आहेस ना.." शिरिष काका

"हं.." मनस्वी

"चला आता.. नाहीतर इथेच उशीर होईल.." शिरिष काका

मग सगळेजण फिरायला अर्थात वन डे पिकनिकला निघाले.. मस्त तयार होऊन सगळे गाडीत बसले.. कार्तिकची आई आणि मनूची आई ज्या नेहमी साडी नेसायच्या त्या आज मनस्वीच्या सांगण्यावरून ड्रेस घातल्या होत्या.. मनस्वीने पण छान जीन्स घातली होती.. सगळेजण तयार होऊन मज्जा मस्ती करायला गेले..

आता पुढे काय होतंय ते पाहूया..
क्रमशः


🎭 Series Post

View all