प्रेम हे 3

Marathi katha

आपण मागील भागात पाहिले की, शिरिष काका कार्तिकची मस्करी करत होते.. नंतर कार्तिक ऑफिसला गेला.. ऑफिसमध्ये त्याने श्रेयसला परी आणि मनस्वीबद्दल सांगितले.. मग तो ऑफिस सुटल्यावर घरी आला.. तो मनस्वीला शोधू लागला.. पण ती दिसली नाही.. नंतर तो रूममध्ये जात असतानाच समोरून मनू अचानक समोरून आली आणि कार्तिकला धडकली.. आता पुढे..

कार्तिक आणि मनस्वी बोलत होते.. तेव्हाच कार्तिकची आई त्याला बोलावते..
"कार्तिक, लवकर आवरून ये.. काका बोलावत आहेत.."

"हो आई, आलोच.." असे म्हणून कार्तिक फ्रेश व्हायला गेला.. फ्रेश होऊन आल्यावर तो आईला म्हणाला, "काय ग आई? काय काम होतं?"

"अरे, शिरिष काका बोलावत होते.." कार्तिकची आई

"बरं.." म्हणून कार्तिक बाहेर गेला..

"अरे कार्तिक, तुला उद्या सुट्टी मिळेल काय?" शिरिष काका

"का काका? काही कामं होतं का?" कार्तिक

"कामं अस नाही रे.. खूप दिवस झाले इकडे येऊन.. आजूबाजूचा परिसर पहायचा होता.. सगळेच जाऊन येऊ असे म्हणत होतो.." शिरीष काका

"बरं, मी उद्या रजा घेतो.. आपण जाऊया.." कार्तिक

"ये बात.. असा मुलगा हवा यार.. ग्रेट चॅम्प.." शिरीष काका खूश होऊन म्हणाले

खरं तर कार्तिकला देखील हेच हवे होते.. तेवढेच मनस्वी सोबत वेळ घालवता येईल म्हणून तो खूप खूश होता.. आता तिच्यासोबत छान मैत्री करता येईल आणि मनातलं बोलता येईल असा विचार तो करत होता.. मग सगळे मिळून जेवण करू लागले.. जेवताना गप्पा, चेष्टा, मस्करी, हसत खेळत सगळे जेवत होते.. घरातलं वातावरण अगदी आनंदी झाले होते.. कार्तिकचे बाबा तर खळखळून हसत होते..

"शिरीष, मनूच्या लग्नाचा काही विचार केला आहेस की नाही.." कार्तिकचे बाबा

"अजून नाही रे.. आत्ता कुठे तिचे शिक्षण झाले आहे.. लग्नाला अजून बराच वेळ आहे.." शिरीष काका

"अरे वेळ आहे म्हणता म्हणता तो दिवस उद्यावर येऊन ठेपतो बघ.." कार्तिकचे बाबा

"अरे, कशाला रडवतोयस तू मला.. मुलगी माझ्या काळजाचा तुकडा आहे.. ती गेल्यावर माझं कसं होणार?" असे म्हणून शिरीष काका भावूक झाले..

"बाबा, मी तुम्हाला कधीच सोडून जाणार नाही.." मनस्वी

"हो माझं बाळ.." असे म्हणून शिरीष काका मनूला जवळ घेतले..

"चला बास आता.. उद्याच प्लॅनिंग करा.. कुठे जायचं? कसं जायचं? ठरवा.. उगीच इमोशनल होऊ नका.." शिरीष काका

त्या दिवशी सगळे प्लॅनिंग करत गप्पा मारत उशीरा पर्यंत बसले.. या सगळ्या वेळेत कार्तिक फक्त मनू कडेच बघत होता.. तिच्याशी बोलण्याचा प्रयत्न करत होता.. मनूचे देखील तसेच झाले होते.. तिला सुध्दा कार्तिक अगदी पाहिल्या क्षणीच आवडला.. पण तिने तसे दाखवले नाही..

रात्री झोपायला गेल्यावर कार्तिक विचार करू लागला, "परी तर मला खूप आधीपासून आवडते.. तिचे लेखन मला भावते.. तिच्या लेखनाच्या मी प्रेमात पडलोय.. ती कशी आहे? कोण आहे? लग्न झाले आहे की नाही.. याचा तपास देखील मी लावला.. पण मला फक्त तिचे लग्न झाले नाही इतकीच माहिती मिळाली.. मग ते प्रेम खरे नाही का?

आता मनू आल्यापासून ती आवडू लागली आहे.. तिच्या मी प्रेमातच पडलो आहे.. ती देखील परी इतकीच प्रिय आहे.. मग हे नक्की प्रेम आहे की ते.. मला तर काहीच समजेना.. प्रेम नक्की कोणावर आहे? आणि ते किती खरे आहे? मी मनूला प्रपोज केलो आणि मग मला परी भेटली तर मी मनूला सोडून परीकडे जायचं का?? की परी भेटेपर्यंत मनूला मनातल सांगायचं नाही.. पण परी थोडीच मला होकार देणार आहे.. मग हे पण नाही आणि ते पण नाही असे होईल.. मला तर काहीच समजेना.." असा विचार करत करत कार्तिक झोपला..

सकाळी त्याला थोडी उशीराच जाग आली.. उठून तो नेहमीप्रमाणे पेपर वाचण्यासाठी बाहेर गेला.. पण नेहमीच्या जागेवर त्याला पेपर दिसला नाही.. मग त्याने इकडे तिकडे पाहिले तर मनस्वी पेपर वाचत बसली होती.. कार्तिक तिच्या जवळ जाऊन तिच्या हातातील पेपर घेतो.. कार्तिकने पेपर घेतल्यावर मनू रागाने त्याच्याकडे बघू लागली..

"काय रे कार्तिक? असा कसा पेपर ओढून घेतोस? मी पहिला वाचत होते ना.." मनू थोडीशी चिडक्या सुरात म्हणाली..

पण तिकडे कार्तिकने लक्ष दिलेच नाही.. तो त्याच्या तंद्रीत पेपर मधील त्याचा आवडता लेख बघू लागला..

मनस्वी परत कार्तिकच्या हातातील पेपर घेऊ लागली.. पण कार्तिकने पेपर गच्च पकडला होता.. ती पेपर ओढू लागली म्हणून तो तिथून दुसरीकडे गेला.. मनू तिथे पण जाऊन पेपर घेऊ लागली.. म्हणून तो त्याच्या रूममध्ये जाऊन आतून कडी लावून पेपर वाचू लागला..

प्रेम हे.....
पहिले प्रेम.. पहिले प्रेम कधी आणि कसे होते? सांगता येत नाही.. पहिल्याच नजरेत होते ते पहिले प्रेम.. पहिले प्रेम कुणावरही होऊ शकते.. आणि प्रत्येकाला आयुष्यात होतेच.. पहिल्या प्रेमात पहिला होते ती फक्त नजरानजर.. ती भावना खूप सुंदर असते.. आणि नाजूक.. पहिले प्रेम म्हटले तर असते आणि म्हटले तर नसते ही.. म्हणजे ती भावना आपल्याला खूप भावते..

पहिले प्रेम हे एका क्षणात होते.. मग तो क्षण कोणताही असो.. ठिकाण कोणतेही असो.. प्रेमाला ना बंधन असते, ना वयाची सीमा असते.. ते फक्त होते.. प्रेम ही एक खूप सुंदर गोष्ट आहे.. आयुष्यात प्रेम असते म्हणून तर आयुष्य सुंदर बनते.. प्रेमाशिवाय आयुष्यात काहीच अर्थ उरत नाही.. प्रत्येकाने कोणावर तरी प्रेम हे करावेच..
पहिल्या प्रेमात
असते ती भावना..
फक्त तू आणि मी
बेधुंद होऊनि चाल ना..
परी

पेपर वाचून झाल्यावर कार्तिक बाहेर आला.. आणि तो मनस्वीला शोधू लागला.. कारण ती आता खूप चिडली असणार हे त्याला माहित होतं.. आणि तिला मनवावे लागणार हे ही त्याला माहित होतं..
आता कार्तिक तिला कसे मनवणार हे आपण पुढच्या लेखात पाहू..
क्रमशः



🎭 Series Post

View all