Jan 26, 2022
स्पर्धा

प्रेम हे 2

Read Later
प्रेम हे 2

आपण मागील भागात पाहिले की, कार्तिकला प्रेम हे हा लेख वाचायला खूप आवडत असतो.. त्यादिवशी त्यांच्या घरी शिरिष काका, काकू आणि मनू आले होते.. कार्तिकला मनू खूप आवडली.. आणि पहिल्या भेटीत त्या दोघांनी एकमेकांकडे बघून एक छोटीशी स्माईल दिली.. आता पुढे..

चहा नाश्ता करून कार्तिक ऑफिसला जाण्यासाठी तयार झाला.. खरं तर त्याला ऑफिसला जायची इच्छाच नव्हती पण जावं तर लागणारच होतं.. महत्वाची मिटींग होती ऑफिसमध्ये.. त्यामुळे कार्तिक ऑफिसला जायला निघाला..

"हे काय कार्तिक? तू निघालास.. आम्ही आलोय.. एक दिवस रजा काढायची रे.." शिरीष काका

"हो काका, आज एक महत्वाची मिटींग आहे.. नाहीतर मी गेलोच नसतो.." कार्तिक

"बरं ठिक आहे.. जा तू.. हो पण लवकर ये हं.. नाहीतर मैत्रीणींसोबत गप्पा मारत बसशील.." शिरीष काका कार्तिकची मस्करी करत होते..

"काय काका? तसे कोणी नाही हो.." कार्तिक

"तसे म्हणजे.. मी फक्त मैत्रीण म्हणालो.. तूच वेगळा अर्थ काढत आहेस..." असे म्हणून काका हसू लागले..

"काय रे शिरीष, तू पण ना.." कार्तिकचे बाबा

"अरे किती हॅण्डसम आहे हा.. मग मुली याच्या मागे लागणारच ना.. म्हणून थोडी मस्करी केली रे.." असे म्हणून शिरीष काका हसू लागले..

इतक्यात मनू तेथे आली.. "काय झालं इतकं हसायला?" असे म्हणाली..

"काही नाही ग.. कार्तिकची थोडी मस्करी करत होतो.." शिरीष काका

"हं.." मनू

"अरे तुम्ही बोललात की नाही अजून.. नाही म्हणजे मनू तू अजून फुगलेली, रुसलेली दिसली नाहीस म्हणून म्हणालो.." असे म्हणून शिरीष काका आणि सगळेजण हसू लागले..

"बाबा, तुम्ही पण ना.." मनू थोडीशी चिडक्या सुरात म्हणाली

"अरे कार्तिक शांत का आहेस तू? लहानपणी किती बडबड बडबड करायचास.. मी काही तुझा सासरा नाहीये इतका लाजू नको रे.. बोल ना थोडं.." असे म्हणून शिरीष काका हसू लागले आणि कार्तिक अजूनच शरमला..

"मला ऑफिसला जायला वेळ होतोय.. मी जातो.." असे म्हणून कार्तिक घरातून बाहेर पडला..

तो घरातून बाहेर पडला खरा पण त्याच्या मनात मनू विषयीचा विचार चालू होता.. तिच्याशी बोलायला हवं असं त्याला राहून राहून वाटू लागले.. संध्याकाळी ऑफिसमधून घरी गेलो की मी तिच्याशी बोलणारच असे त्याने ठरवले होते.. मनूचा विचार करत तो ऑफिसला गेला.. ऑफिसमध्ये गेल्यानंतर त्याच्या डेस्कवर जाऊन बसला आणि समोर पाहतो तर काय? शरयू तिच्या डेस्कवर खाली मान घालून बसली होती..

इतक्यात त्याचा एक मित्र श्रेयस तेथे आला..
"काय झालं कार्तिक? कसला विचार करतोयस.." श्रेयस

"अरे काही नाही.. ह्या आरवीला काय झाले? ही मान खाली घालून बसली आहे.." कार्तिक म्हणाला

"पुस्तक वाचत आहे ती.. तू पण ना.." श्रेयस

"काय यार.. हिला कंटाळा येत नसेल काय? रोज पुस्तक वाचत असते.. त्यात ऑफिसमधले काम.. अजून ऑफिस सुरू व्हायला वेळ आहे तर ही पुस्तक वाचत बसली आहे.. काय एकेकाला वेड असतं.." कार्तिक

"अरे तिला आवडतं तर वाचू दे ना.." श्रेयस

"वाचू दे माझ काय? श्रेयस अरे, त्या न्युज पेपरमध्ये प्रेम हे हा किती छान लेख येतो ना.. प्रेमाबद्दलच्या गोष्टी लिहिलेले असतात.. किती सुंदर असतात.. तो लेख मला खूप आवडतो.. ते वाचल्याशिवाय माझा दिवसच जात नाही.. मी फक्त तेच वाचण्यासाठी पेपर घेतो हातात.." कार्तिक

"हो रे.. मी पण वाचतो.. मी तर खूप मोठा फॅन आहे तिचा.." श्रेयस

"मी तर तिच्या प्रेमातच पडलोय.. जर कधी भेटली तर प्रपोजच करणार.." कार्तिक

"आणि तिचं लग्न झालं असेल तर.." श्रेयस

"नाही झालं.." कार्तिक

"तुला काय माहित?" श्रेयस

"मी तेवढी चौकशी केली आहे.. पण ती कोण आहे हे मला समजले नाही रे.." कार्तिक

"समजेल आणि भेटेल सुध्दा.." श्रेयस

"बरं चला कामाला लागू या.. मला संध्याकाळी लवकर जायचं आहे घरी.." कार्तिक

"का बरं? आज काही विशेष.." श्रेयस

"काही नाही रे.. बाबांचे एक जुने मित्र आहेत शिरीष काका ते आले आहेत म्हणून जायचं आहे.." कार्तिक

"अच्छा, मला वाटलं काही सेटिंग लागली की काय?" श्रेयस

"लागली नाही पण लागेल लवकरच.." कार्तिक

"अरे वा कोण रे? आणि दोन्ही कडे सेटिंग लावणार.. जरा आमच्याकडे बघा.." श्रेयस

"शिरीष काकांची मुलगी मनस्वी.. माझ्या बालपणीची मैत्रीण.. खूप सुंदर दिसते यार ती.. पण अजून आम्ही बोललो नाही रे.. आणि जिथे लागेल तिथे लागेल रे.. आपण फक्त प्रयत्न करायचं.." कार्तिक

"हं.. अरे मग का थांबलास तू? बोल ना.. मैत्रीण आहे ना तुझी.. बोलण्यातूनच प्रेम होतं.. कसलं भारी रे.. एकीकडे तरी फिक्स आहे.." श्रेयस

"अरे हो.. बघू काय होतंय ते? आणि तिच्या मनात तसे काही नसेल तर.." कार्तिक

"अरे तू विचारून तर बघ.." श्रेयस

"हं.." म्हणून सगळे आपापल्या कामाला गेले..

ऑफिस सुटल्यावर कार्तिक लगेच घरी गेला.. घरी गेल्यावर तो मनस्वीला शोधू लागला.. पण ती कुठे दिसली नाही.. कार्तिक थोडासा नाराज झाला.. मग तो फ्रेश होण्यासाठी रूममध्ये जात होता तरी त्याचे डोळे तिलाच शोधत होते.. तो रूममध्ये जात असतानाच समोरून अचानक मनू आली आणि ती कार्तिकला धडकली.. अचानक धडक झाल्यामुळे दोघेही पडत होते.. पण कार्तिक सावरला आणि मनस्वीला त्याने पकडले.. दोघेही एकमेकांच्या जवळ.. एकमेकांच्या हातात हात होते..

कार्तिकच्या हृदयात समथिंग समथिंग होऊ लागले.. दोघांची नजरानजर झाली.. बराच वेळ ते तसेच होते.. मग मनस्वी भानावर आली आणि ती लगेच बाजूला झाली..

"साॅरी.." कार्तिक

"इट्स ओके.." मनस्वी

"काय चाललंय तुझं.." कार्तिक

"काही नाही.. सध्या शिक्षण पूर्ण झालंय.. एम. बी. ए. केले.. आता बाबांच्या बिझनेसमध्येच जाते.." मनस्वी

"बरं.." कार्तिक

"तुझं काय चाललंय?" मनस्वी

"माझं काय? जाॅब आहे.. बाकी निवांत.." कार्तिक

"हं.. आणखी काय मग?" मनस्वी

"काही नाही बघ.. तुझं काय?" कार्तिक

"काही नाही बघ..." मनस्वी

"मनू तू छान दिसतेस.." कार्तिक

"आ....." मनू

क्रमशः

ईरा वाचनाचा आनंद घ्या आता app मधून, आजच download करा. Download App Now
Circle Image

Priyanka Abhinandan Patil

मनात जे काही येतं ते लिहिते.. मनापासून लिहायला आवडते..