Jan 23, 2022
स्पर्धा

प्रेम हे 1

Read Later
प्रेम हे 1

कार्तिक सकाळी सकाळी उठला.. आणि पेपर आणायला बाहेर गेला.. पेपर घेऊन आत येऊन त्याचा आवडता लेख तो वाचत बसला..

प्रेम हे.. प्रेम म्हणजे नक्की काय?
प्रेम म्हणजे एक विश्वास
प्रेम म्हणजे एक जिव्हाळा
प्रेम म्हणजे एक नाते तुझ्यापासून माझ्यापर्यंत प्रेम म्हणजे मिलन दोन मनाचे
प्रेमामध्ये ना रंग, देश ना वेश कोणताच भेदभाव होत नाही.. प्रेम म्हणजे प्रेम म्हणजे प्रेम असतं तुमच आमचं सगळं सेम असतं..
राधाचे कृष्णावर निस्वार्थ प्रेम होते आणि कृष्णाचे ही राधावर.. प्रेमामध्ये मिळवण्याची अपेक्षा कधीच करू नये, तर देण्याची वृत्ती असावी, ह्यालाच तर प्रेम म्हणतात..
हे प्रेम कधी? कुणावर? कसे? होऊ शकते हे कुणालाच सांगता येत नाही.. अगदी एखाद्या ठिकाणावर, एखाद्या निसर्गावर देखील आपले प्रेम होते.. एखाद्या घरात पाळलेल्या जनावरावर आपले तितकेच प्रेम असते.. जितके आपण आपल्या मुलावर करतो.. आईचे मुलावर, नवऱ्यावर, बहिणीवर, भावावर अशी कितीतरी नाती आहेत.. जे प्रेमाने भरलेले आहे.. अगदी एखाद्या कवीवर, लेखिकेवर देखील प्रेम होऊ शकते.. म्हणजे त्यांची लेखणी आपल्याला खूप आवडू लागते.. ते देखील प्रेमच असते..
तर मनातील हे प्रेमभाव जपा आणि एकमेकांवर प्रेम करा आणि खूश रहा..
तुमचीच परी......

कार्तिकचा हा रोजचा दिनक्रम.. सकाळी उठला की, पेपर घेऊन त्याच्या आवडीचा लेख 'प्रेम हे' वाचल्याशिवाय त्याचा दिवस सरतच नव्हता..
"काय यार.. मला तर ही खूप आवडते.. परी नाव पण किती गोड आहे ना.. दिसायला कशी असेल ही काय माहिती.. एकदा हिला भेटायला हव.. हिने सांगितल्याप्रमाणे मी हिच्या लेखाच्या प्रेमातच पडलोय.. आणि कदाचित हिच्या देखील.. हिचे लेख वाचल्याशिवाय दिवसच चांगला जात नाही.. मला जणू सवयच झाली आहे आता.." कार्तिक मनातच बडबडत असतो..

कार्तिक अशा विचारात असतानाच त्याची आई तेथे आली आणि ती कार्तिकला म्हणाली, "कार्तिक उठ लवकर.. आवरून घे.. शिरिष काका येणार आहेत.."

"काय?? शिरिष काका.. आत्ता.... खूप दिवसांनी येत आहेत ना ते.. लहानपणी मला खूप सारे चॉकलेट देत होते.." कार्तिक

"हो रे.. ते सगळे येत आहेत.. त्यांच्या कोणा एका पाहुण्याचे लग्न आहे.. त्यामुळे ते चार दिवस राहण्यासाठी येत आहेत.." कार्तिकची आई

"त्यांची मुलगी मनू पण येत आहे काय? चिडकी लहानपणी किती चिडायची.. कोणताही खेळ खेळत असलो की ही नुसता चिडायची.. आता कशी दिसत असेल ग ती?" कार्तिक

"काय माहित रे कशी दिसत असेल? पण मोठी नक्की झाली असेल आता.. तू मात्र आता तिला चिडवायचं नाही हं.. तू काही कमीचा होतास काय? तिला चिडवून बाजूला होत होतास.." कार्तिकची आई

"काय आई तू पण.. तिचीच बाजू घेणार आहेस काय? तेव्हा पण असंच करायचीस.." कार्तिक

"नाही रे तस काही.. पण तू थोडं शांत राहायचं हं.." कार्तिकची आई

"बरं.. मी काहीच बोलत नाही.. झालं....." कार्तिक

"बरं आवर आता.. नाहीतर ते सगळे येतील आणि तू असाच बसशील.." कार्तिकची आई

"येस बाॅस.." असे म्हणून कार्तिक त्याचे आवरायला गेला..

कार्तिक अंघोळ वगैरे आवरून खाली आला.. इतक्यात शिरीष काका, काकू आणि मनू म्हणजेच मनस्वी हे आले.. पहिल्यांदा काका-काकू आले.. मग कार्तिकने त्यांना आत बोलावून त्यांना नमस्कार केला.. कार्तिकचे बाबा काकांना बसायला सांगून काकूंना आज जायला सांगतात.. काकू आत गेल्यानंतर थोड्यावेळाने घाईघाईने एक मुलगी म्हणजेच मनू आली.. आणि कार्तिक तिला पाहतच राहिला..

मनस्वीने येऊन बॅग ठेवली आणि कार्तिकच्या बाबांना नमस्कार करून ती आत गेली.. तरीही कार्तिक तिच्याकडेच बघत होता.. त्याच्या बाबांनी त्याला दोन-तीन वेळा हाक मारली तरीही तो मनूच्याच विचारात होता.. जेव्हा त्यांनी तिसरी हाक मारली, तेव्हा कार्तिक भानावर आला आणि "काय म्हणालात बाबा.." असे म्हणाला

"अरे चहा नाश्त्याचे काही झाले आहे की नाही.. ते बघून ये जा.." कार्तिकचे बाबा

"बरं बाबा.." म्हणून कार्तिक आत गेला.. आत गेल्यावर तिथे मनू, तिची आई आणि कार्तिकची आई बोलत होते.. ते बघून कार्तिक तेथेच थांबला.. त्याच्या डोळ्यांवर विश्वासच बसेना की, हीच ती मनू आहे का?? जी आधी इतकी चिडायची, रूसायची, रडायची.. आता किती सुंदर दिसत आहे.. तिच्याकडेच पाहत बसावेसे वाटते.. काय तिचे रूप? अप्रतिम.. गोरी गोमटी, मोठे रेशमी केस, पाणीदार डोळे.. ही माझ्याशी बोलेल का?? असा मनात विचार करत असतानाच कार्तिकची आई त्याला बोलावते..

"काय रे कार्तिक? तू असा आत का आला आहेस? काही काम होतं का?" कार्तिकची आई

"हो.." कार्तिक

"काय हवं आहे?" कार्तिकची आई

"नाश्ता.." कार्तिक

"हो बनवले मी.. तू घेऊन खा.." कार्तिकची आई

"बाहेर बाबांनी विचारलय की, नाश्ता चहा झाला आहे काय?" कार्तिक

"अरे हो, बोलण्याच्या नादात मी विसरूनच गेले बाहेर चहा-नाश्ता द्यायचा आहे ते.. घालून देते तेवढे नेऊन दे हं बाळ.." कार्तिकची आई

"अरे कार्तिक, किती मोठा झालास? काय करतोस सध्या तू?" मनूची आई

"मी जॉब करतो काकू.. एका फायनान्स कंपनीमध्ये.. आता वर्ष होईल मी जॉईन होऊन.." कार्तिक

" किती मोठा झाला ना कार्तिक.." मनूची आई कार्तिकच्या आईला म्हणाली..

" हो आणि मनू देखील किती मोठी झाली आहे.. आणि किती छान दिसत आहे? माझीच नजर लागायची तिला.." कार्तिकची आई

हे बोलत असतानाच कार्तिकीची आणि मनस्वीची नजरानजर होते आणि त्या दोघांनीही एकमेकांकडे बघून एक छोटीशी स्माईल दिली..

कार्तिकीची आणि मनस्वीची मैत्री होते की, पुढे आणि काय घडतं हे आपण पुढच्या भागात पाहू..
क्रमशःईरा वाचनाचा आनंद घ्या आता app मधून, आजच download करा. Download App Now
Circle Image

Priyanka Abhinandan Patil

मनात जे काही येतं ते लिहिते.. मनापासून लिहायला आवडते..