आपण मागील भागात पाहिले की, कार्तिक परीला भेटायला जाणार होता.. जिथे परीचा सत्कार होता तिथे कार्तिक जाणार होता.. पण त्याच्या बाबांनी शिरीष काकांना सोडायला सांगितले होते.. त्यामुळे त्याला जाता आले नाही म्हणून तो थोडा नाराज झाला.. आता पुढे..
"मनस्वी अजून का आली नाही? मी तुम्हाला सोडून माझे थोडे काम आहे तिकडे गेलो असतो.." कार्तिक
"हो रे.. पण तिचे देखील काही तरी महत्त्वाचे काम असल्याशिवाय असे जाणार नाही.. त्यामुळे तू थोडा वेळ वाट बघत.. नाहीतर तू तुझ्या कामाला आम्ही आमचे जाऊ.." शिरीष काका
"कार्तिक, तू हाफ डे टाकला आहेस ना.. मग आता कशाला गडबड करत आहेत.. थांब थोडा वेळ आणि त्यांना सोडून तू ऑफिसला जा ना.." कार्तिकचे बाबा
"हो बाबा.. नंतर तर जाईनच पण माझं काम जर झालं असतं तर बर झालं असतं.." कार्तिक
"अरे राहू दे ना एक दिवस.. इतकं पण काम महत्त्वाचं आहे का ते? आपल्या माणसांसाठी वेळ द्यायलाच हवाच ना.. माझ्या पायाला थोडं लागलंय म्हणून.. नाहीतर मी सोडून आलो असतो यांना.." कार्तिकचे बाबा
"बरं.." कार्तिक म्हणाला आणि मनातल्या मनात बडबडू लागला.. "ह्या मनूला पण आत्ताच जायचे होते काय? त्यांना सोडलं तर निघून गेलो असतो नाट्यगृहात.. परीला भेटायचं होतं.. भेटलो असतो तर बरं झालं असतं.. किती दिवस झाले तिला भेटण्यासाठी मी आस लावून बसलो आहे.. पण ती भेटेल की नाही काय माहित? मनू प्लीज लवकर ये ना.. मला परीला भेटायचं आहे.. आज संधी मिळाली आहे मला आणि त्यात तू अशी उशीर करत आहेस.. प्लीज लवकर ये ना ग.."
खूप वेळ झाला.. साधारण साडेअकरा वाजले होते.. पण मनू अजून आली नव्हती.. "झालं इतका उशीर म्हणजे कार्यक्रम संपला असेल.." कार्तिक मनातच बडबडतो.. त्याला आता खूप राग आलेला असतो आणि तो राग आता कुणावर निघेल हे सांगता देखील येणार नव्हते.. तरी तो तसाच शांत बसून होता..
"कार्तिक, तुला उशीर होत असेल तर तू जा हं बाळा.. आम्ही टॅक्सीने जातो.. आमच्यासाठी तुला इतका वेळ थांबायला लागलं.. सॉरी बाळ.." शिरीष काका
"राहू दे काका.. इतका वेळ थांबलो आहे तर सोडूनच जाईन.." कार्तिक
"बरं.. पण तुझं काम.." शिरीष काका
"राहू दे.. बघू आता कधी होतंय ते?" कार्तिक
इतक्यात मनस्वी आली.. मनस्वीला बघून कार्तिकचा पारा जास्तच चढला.. तो पळतच तिच्याकडे गेला.. "तुला जरा तरी काही वाटतंय का? सांगून जायला येत नव्हत.. मी तुझ्यासाठी, तुम्हाला सोडण्यासाठी इतका वेळ ऑफिस सोडून, माझं महत्त्वाचं काम सोडून थांबलोय.. तुला याची जरादेखील कदर नाही का? तुला माणसांपेक्षा तुझी काम महत्त्वाची वाटतात का? समजतेस कोण तू स्वतःला? साधा एक फोन देखील करावासा वाटला नाही तुला.. बरं ठीक आहे निदान आम्ही फोन करतोय तो तरी उचलायचा.. का तोदेखील उचलायला तुला वेळ नव्हता? इतकं महत्त्वाचं काम होतं का तुला? असं कोणतं काम होतं ते तरी कळू दे?" कार्तिक मनस्वीला ओरडत होता.. पण मनस्वी शांत होती ती निघून आत आली..
"मनू बाळ, किती उशीर केलास? कार्तिक आपल्यासाठी थांबला आहे.. तो सोडायला येणार होता आपल्याला.. कुठे गेली होतीस तू? इतका का उशीर?" शिरिष काका
"अहो बाबा, कुठे गेले होते ते मी नंतर सांगेन? पण आपण आत्ताच जायला नको.. आपण संध्याकाळी जाऊ.." मनस्वी
"पण का? काय झाले? बाळा सांगशील का नाही?" शिरीष काका
"अहो बाबा, माझी एक मैत्रीण येणार आहे संध्याकाळी.. मी तिला घरी बोलावले आहे.. तिला भेटेन आणि मग आपण जाऊया.. ती आपल्याला स्टेशनवर सोडायला येईल आणि तुम्हाला देखील तिला भेटायचं आहे.. त्यामुळे आपण तिला भेटूया आणि मगच निघूया.. प्लीज बाबा.." मनस्वी
"बरं, चालेल.. पण आपल्यासाठी हा कार्तिक किती वेळ झालं थांबला आहे? बिचारा याच महत्त्वाचं काम सुद्धा सोडून थांबला आहे.. त्याला आता वाईट वाटेल ना.." शिरीष काका
"बाबा, मी बोलेन त्याच्याशी.. तुम्ही काळजी करू नका.." मनस्वी
मनस्वी कार्तिकशी थोडं गोड बोलून त्याला सॉरी म्हणते.. मग कार्तिक रागाने नाट्यगृहाकडे जायला निघाला.. पण तो तेथे जाऊन पोहोचतो तर कार्यक्रम संपलेला होता आणि तिथे कोणीच नव्हते.. मग तो ऑफिसला गेला.. ऑफिसमध्ये गेल्यावर शरयु नुकताच आली होती.. मग त्याने शरयूला पाहून विचारले, "तुला इतका का उशीर झाला?"
शरयू सांगणार इतक्यात सर येतात आणि सगळ्यांना मीटिंगसाठी कॉन्फरन्स रूममध्ये यायला सांगतात.. त्यामुळे सगळेजण कॉन्फरन्स रूममध्ये जातात.. मीटिंग संपली आणि सगळेजण आपापल्या कामाला लागले.. थोड्यावेळाने ऑफिस सुटले.. कार्तिक ऑफिस सुटल्यावर शेयससोबत बोलत थांबला.. तो थोडा वैतागलेला होता.. कारण आज त्याला परीला भेटायला मिळाले नव्हते..
"काय यार? आज परीला भेटलास म्हण.. परीला भेटून देखील आता का तोंड पाडून उभारला आहेस?" श्रेयस
"कुठलं काय? त्या शिरीष काकांना सोडायला जायच्या भानगडीत गेलोच नाही तिकडे.. आज संधी होती पण आज भेटलीच नाही परी.. आता यानंतर कधी भेटेल काहीच सांगता येत नाही.. कदाचित कधीच भेटणार देखील नाही.." कार्तिक थोडा वैतागून म्हणाला..
"भेटेल रे.. परत कुठे तिचा सत्कार असेल? तर मी सांगेन तुला.. नक्की भेटेल तुला ती.. तू असा नाराज होऊ नकोस.." श्रेयस
"बरं.." कार्तिक
बराच वेळ कार्तिक आणि श्रेयस बोलत उभा राहिले होते.. त्यामुळे कार्तिकला घरी जायला उशीर झाला.. कार्तिक घरी गेला आणि पाहतो तर काय? घरामध्ये शरयू आली होती..
"शरयू तू इथे कशी काय?" कार्तिक
क्रमशः
Download the app
आता वाचा ईराच्या कथा सोप्या पद्धतीने, आजच ईरा app इंस्टॉल करा