Jan 20, 2021
स्पर्धा

प्रेम हे 11

Read Later
प्रेम हे 11

आपण मागील भागात पाहिले की, कार्तिकला आवडीचा लेख वाचायला मिळाला नाही म्हणून तो उदास होता.. ऑफिसमध्ये शरयूशी बोलून त्याला बरे वाटले.. जेव्हा तो रात्री झोपायला गेला तेव्हा त्याच्या मनात परी, मनस्वी आणि शरयूचा विचार सुरू होता.. आता पुढे..

कार्तिक रात्री उशीरापर्यंत जागा होता.. त्यामुळे त्याला सकाळी उठायला उशीर झाला.. उठायला उशीर झाला म्हणून त्याची गडबड चालू होती.. आवराआवर, ऑफिसला जाण्याची लगबग सगळी घाई गडबड चालू होती नुसता.. त्यात त्याला आज मीटिंगसाठी जायचे होते त्यामुळे तो आणखीनच टेन्शनमध्ये होता..

शेवटी सगळे आवरून कार्तिक ऑफिसला जायला निघाला.. पण घाई गडबडीत तो त्याचा डबा विसरून गेला.. ऑफिसमध्ये गेल्यावर त्याला लगेच मीटिंगसाठी दुसरीकडे जायचे होते.. शरयू आधीच येऊन त्याची वाट बघत उभी होती.. मग दोघे मिळून मीटिंगसाठी गेले..

मीटिंगमध्ये समोरच्या पार्टीला प्रेझेंटेशन करून दाखवायचे होते आणि ते प्रश्न विचारतील ती सगळी उत्तरे द्यायची होती.. प्रेझेंटेशनला सुरुवात झाली.. प्रेझेन्टेशन कार्तिक निम्मा आणि शरयू निम्मा असे दोघांनी मिळून प्रोजेक्ट प्रेसेंटेशन दिले.. आता वेळ आली प्रश्न-उत्तरांची.. समोरची पार्टी प्रश्न विचारत होती आणि दोघे मिळून उत्तर देत होते.. शेवटचा प्रश्न कार्तिकसाठी विचारण्यात आला.. पण काही केल्या त्याचे उत्तर कार्तिकला देता येईना.. मग मध्येच शरयूने त्याचे उत्तर दिले..

"अहो, आम्ही मिस्टर कार्तिक यांना प्रश्न विचारला होता.. पण याचे उत्तर तुम्ही दिले.. त्यांना उत्तर येत नाही का??" समोरची व्यक्ती

"नाही सर, तसे काही नाही.. प्रोजेक्ट आम्ही दोघांनी मिळून केला आहे.. पण फायनल प्रोजेक्ट झाल्यावर मी यांना न सांगताच सरांना विसरून तो मुद्दा घेतले होते.. त्यामुळे हा घोळ झाला.. साॅरी सर.." शरयू

"ठिक आहे.. पण ग्रुपने मिळून प्रोजेक्ट केलाय म्हटल्यावर सगळी माहिती ग्रुप मेंबरला द्यायला हवी.." समोरची व्यक्ती

"हो सर, पण एकच मुद्दा होता म्हणून मी घेतला.. साॅरी.." शरयू

"बरं, ठिक आहे.. प्रोजेक्ट आम्हाला खूप आवडला म्हणून आम्ही तो एक्सेप्ट केलाय.. बाकी डिटेल्स आम्ही नंतर कळवतो.." असे म्हणून ते निघून जातात.. कार्तिक थोडा वेळ शांत बसला.. नंतर तो शरयूला म्हणाला, "तुझा हा पाॅईंट आधीपासून होता.. तू खोटं का बोललीस?"

"अरे, तुला त्याचं उत्तर येत नव्हते.. मग प्रोजेक्ट रिजेक्ट होईल म्हणून मी खोटं सांगितले.." शरयू

"पण का? रिजेक्ट झाला तरी सर मला ओरडले असते ना.. मग तू माझ्यासाठी खोटं का बोललीस?" कार्तिक

"मी तुझ्यासाठी नाही.. कंपनीसाठी खोटं बोलले.. इतकं मेहनतीने प्रोजेक्ट केलाय आपण.. रिजेक्ट झाला तर खूप वाईट वाटेल आणि डील कॅन्सल झाली तर कंपनीचे खूप नुकसान होईल म्हणून मी खोटं बोलले.." शरयू

"बरं ठिक आहे.." असे म्हणून कार्तिक आणि शरयू निघून जातात..

राहून राहून कार्तिकला सारखं वाटत होते की, शरयू त्याच्यासाठीच खोटं बोलली.. त्याला मदत व्हावी म्हणून ती उत्तर दिली.. आता कार्तिकच्या मनात शरयूविषयी आदर वाढला.. त्याला शरयू आवडू लागली होती.. मिटींग झाल्यावर कार्तिक तिचाच विचार करत घरी गेला..

कार्तिक घरी गेल्यावर त्याचे सगळे आवरून तो बाहेर आला..
"कार्तिक आम्ही उद्या जाणार आहोत.." मनस्वी

"काय?? उद्या लगेच.." कार्तिक

"हो.. लग्नाला आलो होतो.. आता लग्न झाले आणि बाबांची पण कामं आहेत.. त्यामुळे निघावे लागेल.." मनस्वी
हे ऐकून कार्तिक थोडा नाराज झाला.. "आपण दोन दिवस झाले प्रोजेक्टच्या नादात हिच्याशी व्यवस्थित बोललो देखील नाही.. मनात हिच्याविषयी काय वाटते? ते कळत देखील नाही.. काय करावे? तेच सुचेना.. आता जर ही गेली तर लवकर भेटणार नाही.. काय ते हिला लगेच सांगावे.. नाहीतर वेळ निघून गेली की ही पण नाही आणि ती पण नाही असे होईल.." अशा विचारात कार्तिक असतानाच त्याचा फोन वाजला..

"अरे, कार्तिक कुठे आहेस? तुझ्यासाठी एक गुड न्यूज आहे.." श्रेयस

"घरीच आहे, बोल की काय गुड न्यूज आहे?" कार्तिक

"अरे उद्या त्या परीचा सत्कार होणार आहे आणि तिथे तू जा.. म्हणजे तुला तुझी परी भेटेल.. मलाही आत्ताच समजले.. म्हणून तुला सांगत आहे.." श्रेयस

"काय?? कधी आणि कुठे?? मला सांग बघू लवकर.." कार्तिक

"हो हो सांगतो थांब.. भावे नाट्यगृहात सत्कार आहे आणि सकाळी दहा वाजता होणार आहे.. तेव्हा तू ऑफिसला जायच्या आधी तिला भेटून जाऊ शकतोस.." श्रेयस

"अरे यार.. थँक्यू यार.. ठीक आहे.. उद्या मी ऑफिसला जाताना तिला भेटून जाईन.." कार्तिक

कार्तिक रात्रभर फक्त परीचाच विचार करत होता.. कशी असेल परी? तिला बघितल्यानंतर माझ्या मनाचे समाधान होईल का? ती माझ्याशी बोलेल का? ती मला भेटेल का? असे एक ना अनेक प्रश्न त्याच्या मनात घोळत होते आणि उद्या परीला भेटल्यानंतर कसे काय होईल? याचा विचार तो रात्रभर करत होता.. पण राहून राहून परत मनस्वीचा विचारदेखील येत होता.. मनू उद्या चालली आहे.. ती परत भेटेल की नाही आणि परी तर माझ्याकडे बघितले देखील नाही तर काय करू? परीच्या मागे धावतो आहे पण उद्या परीने जर नकार दिला तर.. मनूदेखील चालली आहे.. काय करू? तेच समजेना.. अशा विचारात तो झोपी गेला..

सकाळ झाली.. कार्तिक नेहमीप्रमाणे उठला.. पण आज त्याने नेहमीप्रमाणे पेपर घेतला नाही.. तर भरभर आवरून परीला भेटायला जायचे म्हणून तो आवरू लागला.. तो त्याचे सगळे आवरला.. चहा नाष्टा केला आणि तो आता निघणार होता इतक्यात त्याच्या बाबांनी त्याला थांबवले..

"कार्तिक शिरीष काका, काकू आणि मनस्वीला स्टेशनपर्यंत तेवढं सोडून ये जा बाळ.." कार्तिकचे बाबा

"बाबा, माझं एक महत्त्वाचं काम आहे.. मला तिकडे जायचं आहे.. प्लीज मी नाही सोडू शकत.. सॉरी बाबा.." कार्तिक

"अरे असं म्हणू नकोस.. माझ्यासाठी एवढं काम कर बघू.. कधी नाही ते आपल्या घरी आले आहेत आणि तू असं का म्हणत आहेस? तेवढं काम कर जरा.. ऑफिसला वाटल्यास हाफ डे टाक आज.." कार्तिकचे बाबा

"पण बाबा.." कार्तिक

"पण बिन काही नाही.. थांब थोडा वेळ.." कार्तिकचे बाबा

"अरे शिरीष कधी जाणार आहात तुम्ही? कार्तिक सोडतोय बरं का तुम्हाला.." कार्तिकचे बाबा

"हो सांगतो रे.. मनू कुठे बाहेर गेली आहे? तिचे काही महत्त्वाचे काम आहे.. ती आल्यावर मग आम्ही जाणार.." शिरीष काका

"बरं ठिक आहे.. कार्तिक तोपर्यंत थांबेल.. तुम्हाला सोडूनच तो ऑफिसला जाईल.. ठीक आहे ना कार्तिक.." कार्तिकचे बाबा

"अरे त्याला कशाला त्रास.. आम्ही जाऊ की रिक्षाने.." शिरीष काका

"एवढा मुलगा असताना तुला रिक्षाने पाठवू.. नाही नाही सोडेल तुम्हाला कार्तिक.. तू काळजी करू नकोस रे.." कार्तिकचे बाबा

"बरं बाबा.. तू ऐकणार आहेस कोणाचं?" शिरिष काका

आता कार्तिक काय करेल? त्याला परी भेटेल की नाही.. हे आपण पुढच्या लेखात पाहू..
क्रमशः


Circle Image

Priyanka Abhinandan Patil

मी काही प्रोफ़ेशनल लेखिका नाही.. मनात जे काही येतं ते लिहिते..