प्रेम हे -EP-4

A Story By Sarjesh


प्रेम हे... EP-4

दोघेही लाँग ड्रॉईव्ह ला निघाले, नॅशनल हायवे आणि दोन्ही बाजुनी हिरवीगार झाडे... पाच सात किलोमिटर दूर आल्यावर... रस्त्याच्या कडेला एक छान गर्द आंब्याचं झाडं होतं, त्या ठिकाणी त्यानं कार थांबवली व तो तिला बोलला "चल जरा निसर्गाचा आस्वाद घेवूया"

तिनं होकारार्थी मान हलवली... दोघेही कारमधुन बाहेर आले.. गार वारा सुटला होता, आभाळ चांगलच भरलं होतं, पाऊस कोणत्याही क्षणी पडणार होता.दोघेही थंडगार क्लायमेट मध्ये हिरव्यागार निसर्गाचा आस्वाद घेत होते, अन्वी तर तिथलं क्लायमेट बघून मोहरुन गेली होती. तो मात्र तिच्याकडेच बघत होता  दोघांची नजरानजर झाली आणि ती लाजली.गार वारा अंगाला झोंबत होता.आणि मस्त‍ रिमझिम पावसाला सुरवात झाली, अन्वी लगेच कार मध्ये शिरली.. पण तनिष मात्र मस्त पावसात‍ भिजत होता, त्याला पावसात भिजतांना बघून ती बोलली

"आत ये ना... पावसात कशाला भिजतोय"

“मला छान वाटते, आवडतं पावसात भिजायला"

“आजारी पडशील"

“नाही पडणार... नेहमीच भिजतो.. तु पण ये ना पावसात"

“नाही बाबा, मी पावसात भिजली तर आई ओरडेल मला"

“कां ओरडेल....”

“आईला नाही आवडत असं मोठया मुलींनी पावसात भिजायला"

“कोण मोठी मुलगी" तो खटयाळपणे बोलला

“आता मारेल हं... मी काय लहान आहे काय आता"

“ओ हो... असं आहे काय"

तनिष जरावेळ पावसात भिजला आणि मग कार मध्ये आला

“आता काय ओल्या अंगानेच राहणार" ती बोलली

“हो... घरी जातपर्यंत सुकेल ना कपडे"

“सर्दी होईल, आजारी पडशील"

“नाही पडणार..”

“आता काय.. निघायचं घरी"

“हो निघूया.. पण मला जरा मस्त गरमागरम कॉफी घ्यायची आहे"

“इथे कुठे मिळेल कॉफी"

“इथून जवळच एक कॅफे आहे तिथं जाऊया"

“तुला कसं माहित... तु आधी पण आला आहेस इकडे"

“हो बरेचदा...”

“एकटाच की कुणासोबत...”

तो हसला व बोलला "कुणासोबत येणार.. सोबत उमा असतो"

“असं होय"

“तुला काय वाटलं.. कुणी गर्लफ्रेंड" ? तो हसत बोलला

“आहे काय?” ती त्याच्याकडे बघत बोलली

“नाही ना.. आतापर्यंत नव्हती.. पण आता झाली आहे काल परवाच" तो तिच्या डोळयात बघत बोलला

ती लाजली व दुसरीकडे बघायला लागली. तनिषनं कार सुरु केली व कॅफे कडे निघाला.

000000

रात्री 9.30 वाजता

उमेश बेसीन मध्ये भांडे घासत होता, आणि तनिष भांडे धुऊन टब मध्ये ठेवत होता. भांडे घासता घासता उमेश बोलला

"सांग आता काय चाललय तुझं"

“कुठे काय"

“तनु आता पल्टी मारु नको .. मला सांगणार होता तु"

“देशपांडे क्लास माहित आहे ना आपल्या ऑफिसच्या खाली आहे"

“माहित आहे... आपण कॉफी प्यायला जातो त्या गल्लीत आहे, त्याचं काय"

“तिथे क्लासला एक मुलगी येते"

“माहित आहे... तुला बरेचदा बघतांना बघीतलं आहे तिच्याकडे"

“दोन दिवस झाले.... तिच्यासोबतच असतो"

“काय सांगतोस... म्हणजे... तु आणि ती...”

“अन्वी नावं आहे तिचं, तिच्याशी बोललो परवा.. आणि पार्क मध्ये भेटायला बोलावलं"

"क्या बात है... मग"?

“आणि ती सायंकाळी खरचं भेटायला आली"

“काय सांगतोस.. हे तर मस्तच आहे"

“मला खूप आवडते ती, काल सायंकाळी तिच्यासोबत लाँग ड्राईव्हला गेलो होतो...”

“अरे व्वा... कुठे"

“आपण नेहमी जातो तिथे... घोडबंदर रोड ला"

“तु तो छा गया यार... मग पुढे काय?"

“म्हणजे... "

“तु जर तिच्यावर प्रेम करतोय तर.. तीला कधी सोडू नको यार... "

“तो तर विचारही मनात नाही आणू शकत उमा... ती कायमची मला हवी आहे माझ्या लाईफ मध्ये.. लग्न करेल तिच्याशी"

“ये हुयी ना बात... माझी भेट कधी घालून देतो तिच्याशी"

“तु म्हणशील तेव्हा.... परवा सांगितलं तिला माझा मित्र आहे उमेश नावाचा.. त्याला मी उमा म्हणतो .. तर ती इतकी हसत होती की काय सांगू"

“आणि मी तुला तनु म्हणतो ते नाही सांगितलं"

“सांगितलं ना.. तर आणखी हसायला लागली"“छान... keep it up... जोडी सलामत रहे दोनोकी"

000000

21 जून


तनिष ऑफिसच्या कामात व्यस्त होता, पण निताचं लक्ष मात्र कामात लागत नव्हतं, ती सारखा विचार करत होती, कोण असेल ती .. काल तनिष सोबत त्याच्या कारमध्ये गेली... त्याची गर्लफ्रेंड तर नाही ना, त्याला विचारावं काय, तिला काही सुचत नव्हतं...

जरावेळानं ती तनिष जवळ आली व बोलली "हाय"

“हाय" तो तिच्याकडे बघत बोलला

“आज सायंकाळी काय करतोय"

“काही नाही... कां"

“मग चल आज आपण एकत्र डिनर घेवूया"

तो जरावेळ गप्प झाला कारण त्याला आज परत अन्वीला भेटायचं होतं, नंतर स्वत:ला सावरत बोलला

"डिनर रात्री घ्यायचं असतं, सायंकाळी नाही... जावुयात आपण डिनरला"

“किती वाजता ? ती बोलली

“आठ साडे आठ पर्यंत जावुयात"

“मग काय ऑफिस सुटल्यावर घरी जावुन यायचं"

“हो चालेल, तु सांग कुठे येवू ते, मी पिकअप करेल तुला"

“ठिक आहे... मी सांगते तुला" निता मनोमन खुष झाली

00000

सायंकाळ झाली

अन्वी आणि तनिष पार्क मध्ये एका बाकावर बसले होते, तनिष बोलला "काय मग मज्जा आली ना काल"

“हो .. तुला बर आहे ना"

“कां"

“काल पावसात भिजला ना, मला वाटलं आजारी पडतो की काय"

“मी सहसा आजारी पडत नाही"

“व्हेरी गुड"

“घरी काय सांगीतलं.. उशीर झाला ना काल, तुझी आई रागावली नाही तुला"

“रागवली ना, पण मी सांगितलं की मैत्रीणीचा बर्थडे होता तिच्याकडे गेली होती"

“देशपांडे क्लासमध्ये कसला क्लास लावलाय...कुठल्‍या ईयर ला आहे"

“MBA फायनल ईयर"

तनिष स्माईल देत बोलला "nice  यार... अन्वी आय लव यु... तु मला खूप आवडते"

तीनं स्माईल केलं व बोलली "आय लव यु टू"

तनिषनं स्माईल केलं व बोलला "आज पण छान आभाळ भरुन आलयं, कालच्या सारखं आज पण जायचं long drive ला"

तिनं होकारार्थी मान हलवली व बोलली "आवडेल मला... जावुयात चल.. ये पण आज लवकर यायचं, काल सारखा उशीर नको व्हायला"

“ठिक आहे आज लवकर येवू... मी आलोच कार घेवून"

तनिषनं, देशपांडे क्लासच्या गल्लीतून चहाच्या कॅफे मधून थर्मास मध्ये कॉफी घेतली.

आणि कारने पार्कच्या बाहेर आला, ‍ अन्वी कार मध्ये बसली आणि कार सुसाट निघाली घोडबंदर रोडला.

000000

क्रमश:
©® sarjesh