प्रेम हे -EP-2

A Story By Sarjesh


प्रेम हे... EP-2

दोघे कॉफी पिऊन बाहेर आले.

तनिष बोलला "परत कधी भेटणार"

“आताच भेटलो.. परत भेटूया कधीतरी"

“उद्या भेटूया" तो बोलला

“उद्या लगेच" ती बोलली

“मग तु म्हणशील तेव्हा" तो जरा नाराज झाला

त्याच्या उदास चेह-याकडे बघत ती बोलली "भेटूया उद्या"

तनिषचा चेहरा खुलला व तो बोलला "थॅन्कस्"

ती हसली व बोलली "निघू आता"

“तु कुठे राहतेस" तो बोलला

“स्नेहनगर ला"

“काय सांगतेस... “

“कां बरं"

“अगं मी पण स्नेहनगरलाच राहतो...”

“सरप्राईज... अन्नपूर्णा बंगला आहे तो आमचा आहे" ती बोलली

“क्या बात है.... मी सप्तपदी टॉवर ला आहे, 11 व्या माळयावर"

“नाईस"

“चल मग मी सोडतो तुला" तो बोलला

“नाही नको... मी जाते रिक्षाने.. बाईकवर बरं दिसणार नाही ना"

“अगं बाईक नाही .. कार आहे माझी..”

“अरे व्वा... सरप्राईज फॉर मी" ती हसत बोलली

“चल तुला‍ स्नेहनगर स्क्वेअरला सोडतो"

“उगाच तुम्हाला त्रास" ती बोलली

“तुम्ही.. कशाला बोलतेय.... तु म्हणं ना"

“ठिक आहे... तनिष बोलेल... छान नावं आहे आवडलं मला" ती हसत बोलली

“तु इथेच थांब मी कार घेवून येतो"

“ओके"

00000

तनिष कार घेवून आला, तिच्यासाठी डोअर उघडला आणि ती आत बसली, अन्वी नं त्याच्याकडे बघून स्मित केलं व  बोलली "Wow होंडा सिटी. नेव्ही ब्ल्यू...नाईस कार.. आय लाईक इट"

“रियली, थॅन्क्स्"

तो हळुवार ड्रायव्हिग करत होता, आणि ती एकसारखी त्याच्याकडेच बघत होती, तिला आपल्याकडे बघतांना बघून तो बोलला "अशी काय बघतेय"

“काही नाही.. असचं"

तो जरा लाजला व परत हसला

“छान" ती बोलली

“काय.. छान"

“छान लाजतोस" ती हसत बोलली

“काहीतरीच तुझं"

“कोण कोण आहे तुझ्या घरी" ती बोलली

“कुणी नाही मी एकटाच आहे..”

ती जरा गप्प झाली व बोलली "म्हणजे एकटा कां?”

“अग.. आई वडील गावाला असतात मी इथे एकटाच आहे"

“ओह.... मग एकटं करमतं"

“उमा आहे ना सोबत"

“उमा, कोण आहे ही"?

“ही" नाही, "हा" आहे, अगं मित्र आहे माझा, त्याचं नाव उमेश आहे, मी "उमा" च म्हणतो, तो पण माझ्याच कंपनीत आहे कामाला"

"उमा.. म्हणतो... उमेशला" ती जोरात हसली व बोलली "अच्छा म्हणजे दोघे रहाता"

“होय दोघे रहातो... आणि माझा मित्र उमा मला काय म्हणतो माहित आहे"

“काय"?

“तो मला तनू बोलतो"

“तनू... “ ती जोरात हसली व बोलला "एक उमा एक तनू... काय नावं आहेत"

“हसतेय काय एवढी.. आमची नावं मुलींची वाटतात म्हणून"

“हो.....मग तो तुझ्यासोबत नाही निघाला ऑफीसमधून"

“नाही … तो नंतर येईल.. त्याला काम आहे"

“ओके"

“तुझ्या घरी कोण कोण आहेत"

“आज्जी, आई , बाबा आणि लहान भाऊ "

“छान" तो हसत बोलला

दोघे बोलत बोलतच स्नेहनगर चौकात पोहोचले

तनिषनं कार थांबवली... तिनं हसत तनिषकडे बघीतलं.. आणि बोलली "थॅन्क्स"

“थॅन्क्स् कसले, आपण friends आहोत ना"

ती गोड हसली आणि कार मधून उतरली... आणि हसतच त्याला बाय केलं.

00000

सायंकाळी 6.30 वाजता

तनिषनं कार सप्तपदी टॉवरला पार्क केली, साधारणत: एक वर्षापूर्वी त्यांन हा फ्लॅट घेतला होता, शहरापासून लांब निसर्गरम्य वातावरणात... त्याच्यासोबत त्याचा मित्र उमेश रहायचा, दोघेही एकाच ठिकाणी जॉबला होते, तनिष नागपूरपासून 40 किलोमिटर दूर अंतरावर मकरधोकडा इथला मुळचा राहणारा होता, घरी आई वडील,, एक मोठी बहिण... सगळेच होते, हा मात्र इकडे एकटाच होता. घरी शेती वाडी पुष्कळ होती, खरं तर त्याला नोकरी करायची काहीच आवश्यकता नव्हती, पण त्याला शिक्षणाची आवड होती, आणि त्याच्या बळावर तो इथपर्यंत पोहोचला होता.

बॅग घेवून लिप्टने निघाला, 11 व्या माळयावर येवून त्यानं, फ्लॅट नं 1105 चा दरवाजा उघडला, येताच हॉलची बाल्कनी उघडली, आणि त्याची नजर समोरच्या बाल्कनीत गेली, तिथं उभी होती ती, गेले पंधरा दिवसांपासून त्याला ती तिथे दिसायची, तशी काही खूप सुंदर नव्हती, पण आकर्षक मात्र होती, एक वेणी घातलेली, तिच्या चेह-याला शोभेसा चष्मा... विस बाविस वर्षाची असेल, छान दिसायची....

त्याच्याकडे सारखी बघायची, आताही तो बाल्कनीत आला‍ आणि ती त्याच्याकडे बघायला लागली. त्याची आणि तिची नजरानजर झाली आणि तो गडबडला आणि दुसरीकडे बघायला लागला .. तो तिथून बाजूला झाला.

छान मस्त शॉवर घेतला.. देवाला दिवा लावला, घरात धूप दाखवला... आणि हॉलमध्ये एक चटई टाकली, मोबाईल घेतला, आणि त्याला हेडफोन लावला, सहज एक नजर बाल्कनीत टाकली, ती आताही तिथेच उभी होती, तिची नजर त्याला शोधत होती.

त्याच्या मनात खळबळ माजली... त्यानं मानेला एक झटका दिला.. आणि हेडफोन कानाला लावला, आता तो 40 मिनीटे मेडीटेशन करणार होता.

00000

क्रमश:
©® sarjesh