Sep 30, 2022
// rablogging.com_GGINT //
प्रेम

प्रेम हे- EP 23

Read Later
प्रेम हे- EP 23


प्रेम हे-EP 23

19 नोव्हेंबर

सकाळी 10.05 वाजता

तनिष, देशपांडे क्लासच्या खाली असलेल्या कॅफेमध्ये एकटाच कॉफी प्यायला आला होता.

कॉफी पिऊन तो चालत पार्कमध्ये आला. तो आणि अन्वी नेहमी ज्या ठिकाणी बसायचे तिथे कुणीतरी दुसरचं कपल बसलेलं होतं, तनिष एका झाडाखाली असलेल्या बाकाबर जावुन बसला.

त्याला झाडाच्या पाठीमागून कुजबूज आणि हलका हलका हसण्याचा आवाज येत होता, कदाचीत झाडामागे कुणीतरी कपल होतं प्रेम मस्तीत मग्न असावं. तो बाकावर डोळे मिटून शातं बसला.

इतक्यात त्याच्या मोबाईलची रिंग वाजली

मोबाईल स्क्रीनवर नजर टाकली... स्क्रीन वरील नाव बघून तो चमकला.. त्याच्या चेहऱ्यावर स्माईल आली आणि त्यांन फोन रिसीव्ह केला.

“हाय" तो बोलला

“विसरला ना तिकडे जावून.. तरी बोलत होते नको जावू एैकलं नाही"

“काय हे... कसा विसरेल अगं"

“मग काय.. आठवण येते का तुला.. फोन तरी करतोय का एखादा... मला सांग तु प्रेमात वैगरे तर पडला नाही ना कुणाच्या तिकडे"?

तनिषचे डोळे पानावले... तो बोलला "तुला भेटायचं आहे अगं.. तुझी आठवण येते खूप"

“काय झालं... तुझा आवाज कां असा येतोय रडवेला"

“सांगितलं ना भेटायचं आहे तुला"

“तनिष तु ठिक तर आहे ना"

“हो ठिक आहे, तु कशी आहेस...कुठे आहेस तु...”

“मी ठिक आहे, गावाला आहे.. कालच आलीय.. दिवाळीच्या सुटया लागल्याय, येतो ना... तुझ्याशी महत्वाचं बोलायचं आहे मला"

“येतो.. “

“कधी....”
“तु म्हणशील तेव्हा"

“आज दुपारी 4 वाजता ची फ्लाईट आहे... तुला तिकीट सेंड केलय.. तु ये, नागपूर एअरपोर्टला मी येते कारने घ्यायला"

“लव यु "

“लव यु टू डिअर"

पाणावलेले डोळे पुसत तो मोबाईल खिश्यात ठेवून तिथून उठला, झाडाच्या पाठीमागे असलेलं कपल.. अचानक त्याच्या समोर आलं, आणि तो थबकला ... कारण त्या कपलमधली एक लिना होती.. दुसरा कदाचीत तिचा ब्वॉयफ्रेंड होता.

जरावेळ त्यानं लिनाकडे बघीतलं .. लिनानं त्याला हलकं स्माईल दिलं, त्यानं पण तिला स्माईल दिलं आणि तो तिथून निघाला.

00000

दुपारी 2 वाजता

तनिष आपल्या फ्लॅटवर आला.

दिप्तीनं दार उघडलं ती एकटीच होती घरी, अमन ऑफिसला गेला होता.

“असे अचानक.. सगळं ठिक तर आहे ना" दिप्ती बोलली

“हो ठिक आहे... मला गावाला निघायचं आहे लगेच 4 वाजताची फ्लॉईट आहे"

“असं अचानक.. गावाला"

“दिवाळी आहे ना.. दिवाळीला गावी खूप छान वाटतं, सगळे असतात ना..आता मस्त पंधरा दिवसांच्या सुटया टाकल्यात .. मी येतपर्यंत तुम्ही सगळे लक्ष ठेवा घराकडे"

“हो... नक्कीच" दिप्ती जरा नाराज झाली.. तिलाही कदाचीत घरची आठवण येत असावी

जरावेळ दिप्ती गप्प राहली व बोलली "सॉरी"

“कशाबद्दल"

“मला माहित नव्हतं तुमचं आणि अन्वीचं हे असं झालयं, आणि मी मुर्खासारखी तुम्हाला बोलून गेली त्यादिवशी,, कधी कुणावर प्रेम केलयं कां ते... खूप खूप सॉरी"

“नाही अंग.. .. मला नाही वाईट वाटलं, नको मनाला लावून घेवू"

तनिषनं न एअरपोर्टला जाण्यासाठी ओला मागवली.‍ आणि पॅकिग करायला घेतलं

तनिषनं त्याचा लॅपटॉप आणि आवश्यक सामान बॅग मध्ये भरलं, आणि दिप्तीचा निरोप घेवून तो इमारतीच्या बाहेर आला. ऑफिसमधून निघतांना त्यानं उमेशला आणि निताला गावाला जातोय हे सांगितलं होतं. इमारतीच्या आवारात ओला आली आणि तो लगेच त्यात बसून एअरपोर्ट ला निघाला.

00000

एअरजेटची फ्लाईट नागपूर एअरपोर्टवर पोहोचली तेव्हा सायंकाळचे पाऊने सहा वाजले होते. तनिष एअरपोर्टच्या बाहेर आला, आणि त्याची नजर प्रणालीवर गेली. प्रणालीला बघताच त्याच्या डोळयात आसवं साचली, तो तिच्याजवळ आला आणि तिला घट्ट मिठी मारली.

“काय‍ झालं रे...”

“काही नाही अगं.. खूप दिवसांनी तुला भेटतोय ना म्हणून"

“हळवा आहेस अगदी... चल निघूया"

प्रणालीनं कार काढली आणि तनिष कार मध्ये बसला... आणि कार निघाली त्याच्या गावाच्या दिशेनं

सायंकाळची वेळ.. सुर्य मावळतीला गेला होता, दोन्ही बाजुला हिरवीगार झाडं, गार वारा सुटलेला, प्रणाली अगदी सावकाश ड्रायव्हींग करत होती.

“आई आणि बाबांना नाही सांगीतलं आहे तु येणार आहे ते.. त्यांच्यासाठी सरप्राईझ आहे" प्रणाली बोलली

“अरे व्वा...”

“Something wrong happened with you...”?

“कसं ओळखलं"

“बहिण आहे तुझी.. लहानपणापासून एकत्र खेळलोय, वाढलोय.. मला नाही तर कुणाला कळणार, सकाळी फोनवर तुझा आवाज एैकला आणि तेव्हाच कळलं की तु ठिक नाही...कोण आहे ती.. माझ्या सोन्यासारख्या भावाचं हृदय तोडणारी"

“तुझ्या भावाचं हृदय नाही तोडलं तिनं... परिस्थिती तशी होती त्यामुळे आम्हाला वेगळं व्हावं लागलं"

“म्हणजे... मी नाही समजले"

“अन्वी... माझं प्रेम... माझं पहिलं प्रेम"

आणि अन्वीसोबत सुरवातीपासून जे जे घडलं ते तो प्रणालीला सांगत सुटला.

एैकून प्रणालीचे डोळे पाणावले.. तिनं कार रस्त्याच्या कडेला उभी केली, जरावेळ स्तब्ध होती ती.

“इतकं सगळं झालं आणि एका शब्दानही बोलला नाही मला... काही वाटत नाही काय रे तुला" ती भारावलेल्या स्वरात बोलली

“सॉरी ताई"

“तु ना बोलूच नको माझ्याशी.... एकदा मला सांगितलं असतं तर मी नसते का आले तिकडे"

“नाही सूचलं अग मला...खूप डिस्टर्ब होतो मी... खूप रडलोय अगं मी"

“दिसतयं मला.. किती त्रास करुन घेतलाय ते स्वत:ला... असा कसा रे तू.... तुला माहित आहे तुझ्यासाठी जीव तुटतोय माझा" प्रणालीचा स्वर भारावला

“सॉरी ना अगं" तो भारावलेल्या स्वरात बोलला

“मला बोलायचं आहे तिच्याशी"

“ठिक आहे.. घरी गेल्यावर मी फोन लावतो तिला मग बोलुया"

प्रणालीनं पाणावलेल्या नेत्रांनी होकारार्थी मान हलवली आणि दोघे निघाले.

00000

तनिषला अचानक घरी आलेला बघून आई बाबांना खूप आनंद झाला, तनिषन घरी येताच आईबाबाला मिठी मारली. त्यांना मिठी मारताच त्याचे डोळे पाणावले.

तनिष फ्रेश झाला, प्रणालीनं त्याच्यासाठी छान कॉफी बनवून आणली. जरावेळानं दोघेही वाडयाच्या टेरेसवर आले, टेरेसवर येताच तनिषनं प्रणालीला मिठी मारली... आणि तिच्या कुशीत शिरुन रडून मन हलकं करुन घेतलं, प्रणालीला त्याच्या पाठीवरुन प्रेमानं हात फिरवताना गहिवरुन आलं होत.. “बस ना यार आता.. रडवलस मला आज तु" पाणावलेल्या स्वरात ती बोलली

जरावेळानं तो शांत झाला.

“तुला बोलायचं आहे ना अन्वीसोबत" तो बोलला

“हो आणि बघायचं सुध्दा आहे तिला... बघू दे जरा माझ्या इतक्या छान भावाला इतकं रडवणारी कोण आहे ती,‍ व्हिडिओ कॉल लाव तिला"

“ओके, आधी बघतो ती कुठे आहे ते, मग नंतर व्हिडीओ कॉल लावतो, पण ताई प्लीज तु रागावू नको अगं तिला"

“नाही रागावणार"

तनिषनं अन्वीला फोन लावला

जरावेळानं अन्वीचा पलीकडून आवाज आला "हाय"

“कशी आहेस"

“ठिक.. तु कसा आहेस"

“मी ठिक आहे गावी आलोय आजच... तु कुठे आहेस"

“मी मांडवपरतणीला आली आहे घरी"

“तुझ्या जवळपास आहे कुणी"

“नाही... मी बेडरुममध्ये एकटीच आहे.. कां विचारतोय"

“माझ्या ताईला.. प्रणालीला बोलायचं आहे तुझ्याशी.. व्हिडीओ कॉलवर"

“जरा थांब मी टेरेसवर जातेय ... 5 मिनीटांनी बोलतेय"

“ओके"

QQQQQQ

क्रमशः
©️®️sarjesh

ईरा वाचनाचा आनंद घ्या आता app मधून, आजच download करा. Download App Now
Circle Image

Sarjesh Welekar

Govt.Service

लिखाण करण्यापेक्षा मला वाचन करायला जास्त आवडत प्रेमकथा, रहस्य, भय कथा लिहायला आवडतात