प्रेम एक अधुरे स्वप्न (भाग १)
✍️नम्रता जांभवडेकर
स्थळ:-
साकेत कॉलेज लायब्ररी..
साकेत कॉलेज लायब्ररी..
सगळे विद्यार्थी आपापल्या बाकावर बसून पुस्तकं वाचत होते. राघव त्याच्या मित्रासोबत पुस्तक वाचत बसला होता, त्याने महिन्याभरापूर्वी वाचायला घेतलेल्या पुस्तकाच आज शेवटचं पान वाचून झालं. तसा तो दुसर पुस्तक घ्यायला पुस्तकांच्या रोमध्ये शिरला. त्याचवेळी प्रिया लायब्ररीमध्ये आली आणि दोघेही एकच पुस्तक शोधू लागले. तेवढ्यात, त्यांची नजर एका पुस्तकावर पडली.
"आधी मी पुस्तकाला हात लावलाय." प्रिया पुस्तक हातात घेण्याच्या उद्देशाने बोलली
"आधी मी हात लावलाय" राघवने सुद्धा आपला जोर लावला.
त्या दोघांच्या झटापटीत पुस्तक फाटायला आलं. तसं राघवनेच माघार घेत तिच्या हातात पुस्तक दिलं.
"सगळ्यांनी शांत बसा. सावित्री मॅडम लायब्ररीमध्ये येतायत." एक पिऊन दबक्या आवाजात सगळ्यांना सांगून गेला आणि पुढच्याच क्षणी लायब्ररीमध्ये टाचणी पडली तरी आवाज होईल एवढी शांतता पसरली.
प्रिया पुस्तक घेऊन मागे वळली, तसं मागून तिच्या हातातून राघवने पुस्तक खेचून घेतलं आणि पळायला लागला.
तशी प्रिया सुद्धा त्याला पकडायला धावली पण पावसामुळे खाली गुळगुळीत झालेल्या फरशीवरून तिचा पाय घसरला आणि ती पडणार तेवढ्यात राघवने तिला सावरलं.
"काय चाललंय इथे?" समोरून एक रागीट आवाज आला. तसं दोघांनी भानावर येतं समोर पाहिलं. समोर पन्नाशी ओलांडलेल्या कडक शिस्तीच्या सावित्री मॅडम उभ्या होत्या.
"मॅम, ती पडणार होती म्हणून मी सावरलं..," राघव पुढे काही बोलणार तेवढ्यात,
"पण मी कोणामुळे पडणार होते तुझ्याचमुळे ना." प्रिया चिडत बोलली
"हे करायला कॉलेजमध्ये येता तुम्ही? ही लायब्ररी आहे गार्डन नाही जे इथे कसही वागाल?" सावित्री मॅडम प्रियाकडे बघत बोलत होत्या पण त्यांची नजर राघववर होती.
"मॅम, तुमचा काहीतरी गैरसमज होतोय. मला आणि हिला हे एकच पुस्तक हव होतं वाचायला. त्यावरूनच आमची भांडण चालू होती आणि..," राघवने सगळा प्रकार सांगितला
"इतकी वर्षे मी इथे काम करतेय. माझा नाही कधी पाय घसरला. कुठल्या फरशीवरून. स्वतःच्या चुकांवर पांघरूण घालण बंद करा आणि जे काम करायला आलाय ते करा." सावित्री मॅडम बोलल्या
तसे दोघेही एकमेकांकडे बघितलं आणि जाऊ लागले
तेवढ्यात, त्याचं फरशीवरून सावित्री मॅडमचा पाय घसरला पण वेळीच राघवने त्यांना सावरले. अगदी तसेच जसे त्याने प्रियाला सावरले. लायब्ररी मधील बाकीचेही विद्यार्थी आवाजाने तिथे जमले.
"मॅम.." प्रिया घाबरून बोलली
"ठिक आहे मी.." सावित्री मॅडम स्वतःला सावरत म्हणाल्या
प्रियाने लगेच जाऊन एक खुर्ची आणली आणि पाण्याची बॉटल दिली. पाणी प्यायल्यावर त्यांना बर वाटलं. आता त्यांना कळलं. राघवने प्रियाला फक्त सावरलं होतं.
"तुम्ही सगळे आपापल्या अभ्यासाला जा." सावित्री मॅडम काहीश्या शांतपणे बोलल्या. तसे सगळे आपापल्या बाकावर जाऊन परत बसले.
"राघव, आय एम सॉरी. मी मगाशी तुम्हां दोघांना एकत्र बघून तुझ्याबद्दल गैरसमज करून घेतला." सावित्री मॅडम दिलगिरी व्यक्त करत म्हणाल्या
तशी प्रिया त्यांच्याकडे आश्चर्याने बघू लागली
"मॅम, तुम्ही आमच्यापेक्षा मोठ्या आहात. तुम्ही प्लिज सॉरी म्हणू नका." राघव
"राघव, आपल्याकडून चुकी झाली किंवा आपण कोणाबद्दल गैरसमज करून घेतला तर त्या व्यक्तीची माफी मागायला लाजायच का? तसही माफी मागितल्याने कोणी मोठा किंवा छोटा होतं नाही." सावित्री मॅडम स्मित हास्य करत म्हणाल्या आणि त्यांच्या जागेवर जाऊन बसल्या
प्रिया त्यांच्याकडे लागली. मगाशी चिडलेल्या सावित्री मॅडम आणि आताच्या स्मित हास्य करत गेलेल्या मॅडम ह्यात खूप फरक होता.
"काय लक्ष कुठेय तुझं? पुस्तक वाचायचंय ना. चल" राघवने प्रियासमोर चुटकी वाजवत तिला भाना
वर आणलं आणि दोघेही पुस्तक वाचू लागले.
वर आणलं आणि दोघेही पुस्तक वाचू लागले.
"कॉलेज सुटलं. सगळे विद्यार्थी लायब्ररीमधून गेलेले पण सावित्री मॅडम लायब्ररीमध्येच बसून होत्या. त्यांच्या हातात E.L. James ह्यांचं फिफ्टी शेड्स ऑफ ग्रे हे पुस्तक होतं आणि त्या पुस्तकात एक पासपोर्ट साईज फोटो होता. स्वतःचा थरथरता हात त्यांनी त्या फोटोवरून फिरवला तसे त्यांचे डोळे भरून आले.
"मला वाटलच होतं तू इथे असणार म्हणून." विजया मॅडम सावित्रीच्या समोर बसत म्हणाली
"तू गेली नाहीस अजून?" सावित्रीने डोळे पुसत विचारलं
"तुला घेतल्याशिवाय जाईन का मी!" विजयाने हसत विचारलं
"सावित्री, सगळी मुले त्याच्यासारखी नसतात ग. आज राघवने प्रियाला ती पडू नये ह्यासाठी सावरलं होतं पण तू किती चिडलीस राघववर" विजया म्हणाली
"आली वाटतं तुझ्यापर्यंत न्यूज.. सगळे माझ्यासमोर बोलायला घाबरतात आणि तुझ्यासोबत सगळ्यांचं छान जमत." सावित्री उपहासात्मक हसत म्हणाली
"पण एवढ असूनही आपण दोघीजणी एकमेकींच्या कॉलेज पासूनच्या घट्ट मैत्रिणी आहोत हे काय कमी आहे का!" विजया सावित्रीचा हात हातात घेत म्हणाली. तसं सावित्रीने हाताची पकड घट्ट केली आणि दोघीही निघाल्या.
*****
विजयाची फोर व्हिलर होती. ती ड्रायव्हिंग सीटवर बसली आणि सावित्री तिच्या बाजूच्या सीटवर बसली.
"माझं खरचं चुकलं का ग? मी असं राघववर ओरडायला नको हवं होतं. आधी त्याची बाजू ऐकून घ्यायला हवी होती का? नंतर माझाही पाय घसरून मी पडणार होते तेव्हा मला त्यानेच सावरलं." सावित्रीला आता खूप वाईट वाटतं होतं
"सावित्री, तू सगळ्या पुरूषांना एकाच तराजूत तोलतेस. तुझ्यासोबत तो असं वागला म्हणून सगळेच पुरूष सारखेच असतात असं नसतं. कधीकधी तर वाटतं तुझी आणि अमरची ओळख झाली नसती तर बर झालं असतं." विजया गाडी चालवतच समोर बघतं बोलली
तसं सावित्रीने तिच्याकडे आश्चर्याने बघितलं आणि भूतकाळात गेली.
क्रमशः
(कोण आहे अमर? वाचूया पुढील भागात?)
Download the app
आता वाचा ईराच्या कथा सोप्या पद्धतीने, आजच ईरा app इंस्टॉल करा