A PHP Error was encountered

Severity: Warning

Message: fopen(/home/irablogging/public_html/system/cache/irablog_sessionb9b8467089128da5e5941c8f519dcefd98e0e38cb5712339ea4e101bb56f78ee531fa654): failed to open stream: No space left on device

Filename: drivers/Session_files_driver.php

Line Number: 176

Backtrace:

File: /home/irablogging/public_html/application/controllers/Blog.php
Line: 7
Function: __construct

File: /home/irablogging/public_html/index.php
Line: 315
Function: require_once

A PHP Error was encountered

Severity: Warning

Message: session_start(): Failed to read session data: user (path: /home/irablogging/public_html/system/cache)

Filename: Session/Session.php

Line Number: 143

Backtrace:

File: /home/irablogging/public_html/application/controllers/Blog.php
Line: 7
Function: __construct

File: /home/irablogging/public_html/index.php
Line: 315
Function: require_once

Prem bhang
Oct 26, 2020
स्पर्धा

प्रेमभंग

Read Later
प्रेमभंग

जीवनाच्या वाटेवर जशी सुखाची  गुलाबाची फुले अंथरलेली असतात . तसेच गुलाबाची काटे देखील बोचतात . हे काही नव्याने सांगायला नको . 

      या जगात अशी कोणतीही व्यक्ती नाही की परिपूर्ण आहे . प्रत्येकामध्ये काही गुणदोष असतातच ‌आणि त्या गुणदोषांसकट स्वीकारून एकमेकांसोबत आयुष्यभर  राहणे यालच तर जीवन म्हणतात . 

          निलाक्षी  अतिशय सुसंपन्न , गुणी मुलगी , दिसायला अतिशय सुंदर , राहणीमान एकदम व्यवस्थित . संगणकावर कमांड असलेली . सोबतच होमिओपॅथी डॉक्टररची पदवी मिळविलेली . काही वर्षांतच स्वत:चा दवाखाना उभारण्याचे स्वप्न होते .

    संगणकाचे प्रशिक्षण घेतले असल्यामुळे काही वर्ष अनुभवासाठी एका महाविद्यालयात अॅज टिचर म्हणून नोकरीला लागली . त्याच महाविद्यालयात नेमकी  एक  कंपनीतील काही माणसे आली . तिथे तिची मानसशी भेट झाली . काही कामांसाठी त्यांनी एकमेकांचे फोन नंबर घेतले . कामासाठी भेटता भेटता कधी ते एकमेकांच्या प्रेमात पडले कळलेच नाही. 
       मानस एका कंपनीत मॅनेजर म्हणून काम करत होता. काही दिवसांतच दोघा़च्याही घरी एकमेकांविषयी सांगितले . मनोजच्या घरून कडाडून विरोध होता . त्यांना जास्त शिकलेली मुलगी नको होती . 

    परंतु , मनोज स्वत:च्या निर्णयावर ठाम होता . त्याने निलाक्षी सोबतच लग्न करणार असे ठासून सांगितले . शेवटी त्यांनी कोर्ट मॅरेज केले आणि घरच्यांचा आशीर्वाद घेऊन घरातून बाहेर पडले . 

      निलाक्षीच्या आयुष्यात एकीकडे आनंद तर सासर दुरावल्याच दुःख . पण , नाईलाज होता . त्यांनी छोटेसे घर भाड्याने घेतले . दोघेही कमावते असल्यामुळे लवकरच त्यांनी एक फ्लॅट देखील बुक केला . दोन तीन वर्षातच ते त्यांच्या नवीन घरातला राहायला गेले . हळूहळू दवाखान्यासाठी योग्य जागा सुध्दा शोधणे सुरू केले . सर्व कसं आनंदात सुरू होते . घरची परिस्थिती आणि मनस्थिती  अजुनही तशीच होती . तिच्या मनावर एक दडपण होते . आपल्यामुळे मानसला त्याच्या आईवडीलांपासून दूर राहावे लागत होते . माहेर होतं सोबतीला आठवणीतून झाकाळायला . राजा आणि राणी चार संसार सुरु झाला. 

    दिवस सरत होते . या सगळ्यात जवळजवळ पाच वर्ष निघून गेली . ती नोकरी सोडून स्वत:चा दवाखाना सुरू करण्याचा विचार करू लागली . दुसरीकडे तिच्या मनात आई होण्याचे स्वप्न तरंगू लागले . तिचे मन आतून दुःखी होऊ लागले . परंतु , आपण  सध्या हि जबाबदारी नको घ्यायला असे मानसला वाटत होते . पण , आपण प्रयत्न तर करू या . नाही तर ट्रीटमेंट वगैरे घ्यावी लागेल असे निलाक्षीचे म्हणणे होते . कारण , घरूनही नको नको ते कानावर येऊ लागले . नैराश्याचे काळे ढग तिच्या मनावर गर्दी करू लागले . व्हायचे होते तेच झाले .
      निलाक्षीच्या मनात शंका होतीच आणि ती खरी ठरली . मानसला डॉक्टरची गरज होती . हे तिला कळले होते . पण , त्याला कसे सांगावे ? एक माणूस म्हणून तो दुःखी होणारच .
      काय करावे सुचत नव्हते . कोणताही पुरुष स्वत:च्या षुरषार्थावर शंका कसा करणार ? परत घरचे होतेच टोमणे द्यायला . कारण , तो दर महिन्याला घरी सर्वांची भेट घेऊन येत असे . शिवाय समाज .... त्याला कसं विसरुन चालणार . अशावेळी तर बोट ठेवायला लोक तयार असतातच . 
          आजकाल अनेक उपाय निघालेले आहेत. पण , सत्य स्वीकारयची तयारी नव्हतीच .तिने काही दिवस हा विचार बाजूला ठेवून दवाखान्यासाठी  जागा शोधली . मोठ्या थाटामाटात उद्घाटन झाले. हळुहळु जम बसू लागला . पण , तरीही  तिचे मन कशातच लागत नव्हते .सतत आपला बाळाचा विचार मनात डोकावू लागला . तरीही फार धीराने घेऊ लागली . पण , अचानक दोन महिन्यांतच ती माहेरी निघून गेली . दवाखाना बंद . काय झाले कळलेच नाही सुरवातीला . पण , कारण स्पष्ट होते . ती माहेरी जाण्या अगोदर घरात दोघांमध्ये खूप भांडणं झाले . तिने त्याला स्पष्टपणे विचारले असता त्याला खूप राग आला .‌ त्याने तिच्यावरच नको नको ते आरोप केले . आपल्या  प्रेमाचा असा शेवट होईल असे तिला कधीच वाटले नव्हते. नैराश्याची गडद छाया तिच्या मनावर अधिराज्य गाजवू लागली .  
      एका स्त्रीला कोणी रागावले तर सहन करेल . परंतु , स्वत:च्या चारित्र्यावर संशय घेतलेला कदापि सहन होणे शक्य नाही . आपले प्रेम इतके कमजोर कसे असू शकते . खूप टेन्शन आले . अन्न पाणी घेईनासी झाली . खूप अशक्त पणा आला . पण , तो काही ऐकेनासा झाला . त्यांचे प्रेम , त्यांनी पाठविलेली पत्रे , गुलाबाची फुले , त्यांची लपून छपून होणारी भेट हे सगळं तिच्या डोळ्यासमोर सरकत होते . 
     पण , हा भूतकाळ तिला वर्तमानात सुखाने जगू देतच नव्हता . सोबत भविष्याची चिंता, एकटेपणा , निराशा , यांनी तिला ग्रासले होते . 
       कोणासाठी जगावे आता ? अनेक वाईट विचार भेडसावत होते . परंतु , कोणताही अविचार न करता 
मानस पासून वेगळे होण्याचा निर्णय घेतला . 
      सगळ्यांनी तिला खूप समजावून सांगितले . पण , तिचा निर्णय ठाम होता . 
     तिचा हा प्रवास खडतर होता . एकटीने करायचा होता . निराशा सोबत होती . पण आशा सोडली नव्हती .  कधीही प्रेम न मिळालेलं सासर , माहेर असूनही परकं , समाज आणि बाकीचे होतेच कि उणदुण काढायला . पण ,न डगमगता काही दिवसांसाठी ती आईकडे राहिली . परंतु , तिच्या माहेरी येण्याने तिची वहिनी मात्र नाराज होती . पण , नाईलाज होता . 
     दुःखात कुढत बसून , नाराज होण्यापेक्षा जीवनाच्या उलट्या प्रवाहात तिने उडी घेतली . 
     परत , महाविद्यालयात नोकरी सुरू केली . हळुहळु  तिने झेप घेतली . परत नव्याने सुरुवात केली . कोणालाही तिचा त्रास नको म्हणून स्वत:साठी भाड्याने घर शोधले . स्वत:मधील ममतेचा झरा मात्र सतत वाहत ठेवण्यासाठी तिने एक मुलगी व एक मुलगी दत्तक घेतले . त्यांना स्वत:चे नाव दिले . एक नवीन ओळख निर्माण केली . निराशेवर मात केली . सासरचे नाव , नवऱ्याचे नाव पुसून स्वत:चे नाव, वडीलांचे नाव सार्थकी लावले .