Oct 26, 2020
कविता

प्रेम

Read Later
प्रेम

                                                                        प्रेम

 

 

किनाऱ्यावर राहणार्यांना

 सागराची काय भीती?

प्रेम करणार्यांना

या जगाची काय भीती ?

 

प्रेम करायचे नसते

ते नकळत होत असते

प्रेम साठवायचे नसते

ते वाटायचे असते

 

प्रेमाला सीमा नसते

ते अमर्याद असते

प्रेम हि तारुण्यातील भावना

एकमेकात लीन होण्याची कामना

 

प्रेमात सौदर्य असते

सर्वानाच ते दिसत नसते

प्रेमात सत्यता असते

ती करणार्यांना च कळत असते

 

प्रेमाचा अनुभव जरी

स्वतः अनुभवायचा असतो

प्रत्येकाच्या आयुष्यात

तो येतोच एकदा तरी

 

प्रेमात हवं असेल यश

तर होऊ नका वासनावश

प्रेम पवित्र आहे

ते पवित्रच ठेवा

© शीतल महामुनी माने