प्रीती.. भाग -1

प्रेम... तडजोड... नात्यांची गुंतागुंत... उलगडनारी हृदय स्पर्शी कथामालिका... प्रीती.....

"....सोनिया काय ऐकतोय आम्ही... " 

आईसाहेबांचा आवाज चढला होता.

हातातील फाईल दाखवत त्या म्हणाल्या. 

"हो आईसाहेब... खरं आहे हे... "

खाली मान घालून सोनिया म्हणाली.

तिच्या होकाराने त्यांच्या तळपायाची आग मस्तकात गेली. 

".. उद्या च्या उदया दवाखान्यात जायचं आणि सगळं क्लिअर करून यायचं...  कळलं..?? "

शक्य तेवढा आवाज कमी करत त्या म्हणाल्या. 

"..नाही आईसाहेब... आता ते शक्य नाही... हे पाप मी करणार नाही... "

सोनिया त्यांच्या नजरेला नजर भीडवत म्हणाली...

...सपाssक....

तिच्या गालावर आईसाहेबांचे पाचही बोटे उमाटली. 

".. पाप - पुण्याच्या गोष्टी तुम्ही आम्हाला शिकवायच्या नाहीत... 

तो अधिकार आम्ही तुम्हाला अजूनपर्यंत तरी दिलेला नाहीये... "

त्यांचे डोळे आग ओकत होते...

..तिचे डोळे पाण्याने डबडबले... 

"..पण आईसाहेब... माझ्याने नाही होणार हे.. "

डोळ्यातील अश्रू ना अलगद रोखून ती म्हणाली. 

क्षणभर थांबून त्यांनी विचारलं, 

"तुमचं हे फायनल आहे...?? "

"हो... "

ती देखील तिच्या निर्णयावर आता ठाम होती. 

" ठीक आहे मग.... 

आत्ताच्या आत्ता आपलं सामान घ्यायचं आणि घराबाहेर निघायचं... 

...आणि जाण्यापूर्वी लक्षात ठेवा... ह्या घराचा उंबरठा पुन्हा चढता नाही यायचा कधी... "

त्यांच्या आवाजाची धार आता कमी झाली होती... 

"...पण आईसाहेब... ह्या वेळेस कुठे जाईल ती... "

इतका वेळ मान खाली घातलेला वीरेन हिम्मत करून म्हणाला. 

"..आम्हाला नाही माहिती. त्यांचा निर्णय आहे.. त्यांनी बघावं... "

- आईसाहेब. 

".. आईसाहेब... "वीरेन काही बोलणार तोच ती म्हणाली. 

"...माझा निर्णय मान्य आहे मला... 

मरेन तरी मी आता ह्या घरात परतनार नाही  ...

तुमचीच लेक आहे.. आईसाहेब मी ...

दिलेला शब्द मागे फिरवनार नाही... "

" आमची लेक आहात.. हेच तर दुःख आहे.. "

तिच्या कडे एक कटाक्ष टाकून त्या म्हणाल्या... 

...मोजकेच दोन -तीन ड्रेस आणि आपले डाकुमेंटस घेऊन ती जायला निघाली.. 

वीरेन... विश्वास.. रजत... तिघेही मान खाली घालून होते. 

"तुम्ही सर्व आत जा... "

आईसाहेबांनी आदेश सोडला तसा तिघेही आपापल्या रूम मध्ये निघून गेले... 

अश्रू पूर्ण नजरेने सोनियाने त्यांच्या कडे पाहिलं.... त्यांनी नजर दुसरीकडे वळवली... 

..तिने घराचा उंबरठा ओलांडला.... 

....परत कधीच न येण्यासाठी.... 

------------------------------------------------------------------------------------

...नवीन कथेची नवीन सुरवात.... 

कशी वाटली नक्की सांगा.... 

🎭 Series Post

View all