प्रीती.... भाग -5

प्रेम... तडजोड... नात्यांची गुंतागुंत उलगडनारी कथामालिका... प्रीती...

.....पोटावर हात ठेऊन सोनिया झोपली होती... 

मोहन बाजूलाच खुर्चीवर बसून विचार करीत होता... 

त्यानं एकवार तिच्याकडे पाहिलं... 

झोपेत किती निरागस दिसतेय ही... आत्ता पर्यंत असंख्य बडबड करणारे हिचे ओठ... मिटलेल्या गुलाब पाकळी सारखे दिसताहेत...ह्या मिटलेल्या गुलाब पाकळी वर आपलेही ओठ टेकवावेत...असा मनात विचार आला तसे त्यानं पुन्हा पाहिलं.. तिने झोपेत कूस बदलली. आता तिचा चेहरा त्याच्याकडे होता. तिचे ओठ रुंदावले... 

"...स्वप्नात दिसतेय वेडाबाई.... "

तो मनात म्हणाला.. 

"...हसताना किती गोड दिसतेस यार... ! अशीच हसत राहा आयुष्यभर...  किती विश्वासाने आलीस माझ्याकडे... हाच विश्वास कायम ठेव माझ्यावर... लग्न तर करायचंच आहे यार... आपलं ठरलंच तर होतं... पण इतक्यात... शक्य नाही यार... 

तू गर्भश्रीमंत आहेस... तुझ्या फॅमिलीची सामाजिक प्रतिष्ठा महत्वाची आहे... मी आपला सर्वसाधारण... पण माझ्याही घरच्यांना त्यांची इभ्रत प्रिय आहे... आठ

 दिवसांपूर्वी च आईला एक हार्ट अटॅक येऊन गेलेला... अशा परिस्थितीत तूला घरी तरी कसे घेऊन जाऊ यार...??? "

तिच्या निरागस चेहऱ्याकडे बघत तो मनात म्हणत होता.. 

...एक मोहाचा क्षण... आणि  त्याचे परिणाम असे भोगावे लागतील... तेव्हा दोघांनाही याची कल्पना आली नव्हती... 

मागच्याच आठवडयात तिला जरा मळमळायला होत होते,  पाळी आली नव्हती म्हणून दोघे डाक्टरानकडे जाऊन आले होते.. रिपोर्ट बघून त्याचीच पायाखालची जमीन सरकली होती.. आणि ती.... ती आत्ता जमिनीवर आली होती... काय करायच दोघांनाही कळत नव्हतं... त्याला तर रडायलाच आलं.. 

"...मोहन.. अरे चिल...  

असा काय रडतोस मुलीसारखा...? 

मी बघ... मुलगी असून सुद्धा कशी स्ट्रॉंग आहे.. "

तिला समजावायचं.. तर तीच त्याला धीर देत होती... 

"..सोनिया यार... काय होऊन बसले हे... 

तीन वर्षांपासून आपण एकत्र आहोत.. कितीदा मोहाचे क्षण आले... पण आपली पायरी आपण कधीच ओलांडली नव्हती... आणि आताच आपण स्वतः ला आवर कसा घालू नाही शकलो ग..? "

डोळे पुसत तो म्हणाला. 

"...सगळं ठीक होईल... शांत हो... काढूया काहीतरी मार्ग... 

आणि... तो मोहाचा क्षण नव्हता... आपल्या प्रेमाची उत्कटता होती.. त्यात वासनेचा लवलेशही नव्हता मोहन... आपल्या प्रेमाची परिपूर्णता होती... 

प्लीज.. गिल्टी वाटून नको ना घेऊस... "

त्याचा हात हातात घेत ती म्हणाली.. 

"...आता काय करायचं...? "

तिच्याकडे पाहत तो बोलला... तिने काहीच उत्तर दिले नाही.. 

दोघेही हातात हात घेऊन शांत बसले होते.. त्यांच्या नेहमीच्या ठिकाणी... 

सूर्य मावळतीकडे  झुकत होता.. त्याची लालीमा आकाशात पसरली होती... दोघेही आकाशाकडे बघत होते... 

थोडावेळ स्तब्धतेत गेला.. 

"...घरी सांगायचं..?? "

दोघेही एकदम म्हणाले... 

घरी सांगायचं पक्कं ठरलं.. ती घराकडे परतली.. तोही आपल्या रूमवर निघून गेला... 

...रूमवर आल्या -आल्या शरद... मोहन चा मित्र त्याच्यावर ओरडू लागला.. 

"...काय रे शऱ्या...,  काय झालं.. नीट सांगशील का...? "

तो थोडा चिडला. 

"..कुठे होता रे इतका वेळ..? घरून फोन येऊन गेला तुझ्या... 

त्यांना काय सांगायला पाहिजे होतं मी...??  "

शरद ही आता चिडला होता.. 

"..कोण बोललं..?  काय म्हणाले...? "

मोहन आता शांत झाला. 

"...बाबाच बोलले तुझे... बर नाही म्हणाले आई ला तूझ्या... "

शरद चा ही स्वर शांत होता आता..

"..काय झालं आईला..?? "

काळजी ने त्यानं विचारलं. 

"माहित नाही यार.. " शरद म्हणाला. 

"मोबाईल दे यार तुझा... एक फोन करतो.. " -मोहन. 

"हा घे... " मोबाईल त्याच्या हातात देत शरद म्हणाला,  "...पण बॅलन्स नाही आहे रे.. "

"शऱ्या... मस्करी करायची वेळ नाहीये... चल चौकातल्या बूथ वर जाऊ.. "

जवळपास त्याला खेचतच मोहन म्हणाला. 

..त्याच्या घरी फोन नव्हता... शेजारच्या काकाकडे फोन करून पाहिला.. 

"...हॅलो.. 

मधुकर काका.... 

मी मोहन बोलतोय.. कोल्हापूरवरून.. "

"..हा.. बोल रे मोहन्या...  कसा आहेस लेका... "

मधुकर काकाने विचारले. 

"..मी ठीक आहे काका... पण आमच्या घराकडे काय हालचाल आहे.... आई बरी आहे ना..?? "

त्यानं विचारलं. 

"...आई होय... अरे कालच  काहीतरी अटॅक आला म्हणत होते बा... "

थोडं अस्पष्ट.. असा मधुकर काका चा आवाज ऐकू येत होता... 

"काय..??.... हॅलो... हॅलो... हॅलो.. काका.. "

थोडया वेळाने फोन डिस्कनेक्ट झाला.. 

"..काय झालं रे... काही सिरीयस आहे का? "

त्याच्या डोळयांतील पाणी बघून शरद म्हणाला.. 

"...शऱ्या... अरे आईला... आईला अटॅक आला म्हणाले.. 

मी उद्या सकाळीच गावी जातो... "

रडत मोहन म्हणाला.. 

"मी पण येईल सोबत... आता चल रूमवर जाऊ या. "

शरद त्याला घेऊन रूमवर आला.. 

दुसऱ्या दिवशी मोहन आणि शरद गावी जाऊन आले... आई ठीक होती आता... पण कोणताही मानसिक धक्का तिला पोहचनार नाही याची काळजी घ्यायला डाक्टरानीं सांगितलं... 

...मोहन ला जे सांगायचं होतं... ते राहूनच गेलं.... 

.

.

.

...सोनिया घरी पोहचली.. आप्पा ना ती शोधत होती.. 

"...काय ग सोना... काय झालं...?? "

वीरेन ने विचारलं. 

"काही नाही दा.... 

दा... आप्पाना बघितलंस...?? "

तिने हळू आवाजात विचारलं.. 

"अगं.. आज रात्री उशिरा येत आहेत ते... काय ग?  कसली सेटिंग लावायची आहे..??? "

हसत त्यानं विचारलं.. 

"..काहीं नाही रे सहजच.. "

थोडीशी खटटू होत ती म्हणाली.. 

पुढले दोन दिवस आप्पासाहेबांशी तिची भेटच झाली नाही.. 

आणि आता दोन दिवसापूर्वी भेटले तर त्यांच्या कडे वेळ नव्हता... 

"...गुड मॉर्निंग आप्पा.... "

सकाळी नाश्त्याला डायनीग टेबल कडे येत ती म्हणाली.. 

"...अरे.. गुड मॉर्निंग सोना बेटा... अरे... चेहरा का सुकला असा माझ्या परी चा..? "

तिला एक झप्पी देत ते म्हणाले. 

"...आप्पा तुमच्या कडे वेळच नाहीये माझ्या साठी.. "

लटक्या रागाने ती म्हणाली.. 

"...अरे.. राग आलाय का आमच्या सोना बेटाला...?? 

काय करू म्हणजे तुमचा राग जाईल..?? "

त्यांनी हसत विचारलं.. 

"...आजचा दिवस माझ्यासोबत स्पेंड कराल...? "

अगदी निरागस पणे तिने विचारलं.. 


"ओह... I'm sorry sona... फक्त हे चार दिवस थांब.. 

आज बंगलोरला जायचं आहे.. आल्यावर एक दिवस काय.. मस्त आठ दिवस फॅमिली ट्रिप ला जाऊया... "

ते म्हणाले... 

"प्रॉमिस ss.."

आनंदात तीन विचारलं.. 

"...पक्का प्रॉमिस.. "

ते म्हणाले.. आणि निघून गेले... 

.... पण आप्पासाहेब येण्यापूर्वीच आईसाहेबांच्या हाती फाईल लागली... आणि सोनिया घर सोडून आज मोहन कडे आली... 

.

.

.

....मोहन विचारात गढला होता..

..त्यानं विचार करून एक निर्णय घेतला.. पहाट होत आली होती... सहाचा गजर लावून तिथेच खुर्चीवर तो झोपी गेला.....

               ****************************


काय असेल मोहन चा विचार.... उदया नक्की वाचा... आणि तोपर्यंत अभिप्राय द्यायला विसरू नका...

..ही कथामालिका फ्री आहे तिला subscription लागणार नाही...  







🎭 Series Post

View all