Mar 01, 2024
कथामालिका

प्रीती... भाग - 12

Read Later
प्रीती... भाग - 12

(  मागील भागात आपण पहिली मोहनच्या मनाची तगमग...

आज वाचा त्याने घेतलेला निर्णय...! )

आपण वाचत आहात प्रेम..., तडजोड..., नात्यातील गुंतागुंत उलगडणारी कथामालिका...

प्रीती...!!

               ************************

निद्रादेवी त्याच्यादेखील डोळयांवर कुठे स्वार झाली होती...??

त्याच्या मिटल्या डोळ्यासमोर तिघीही  उभ्या होत्या...मृत्युच्या दाढेत अडकलेली त्याची आई....सगळं कळत असूनही केवळ आपल्या आईच्या सुखासाठी स्वतःच्याआयुष्याशी तडजोड करायला निघालेली शालिनी...

आणि...

आपल्या बाळासाठी सर्व नाती तोडून घरातून बाहेर पडलेली सोनिया...!!

...  त्याच्या आईचं आणि अजून जन्माला नं आलेल्या त्याच्या बाळाच्या आईचं...

दोघींचंही मातृत्व आता पणाला लागलं होतं...

शेवटी विचार करून त्याच्या थकल्या मनानं कौल दिला..

शालिनीच्या बाजूनं..

.
.
.
.
.... अंगणात  मंडप पडला होता.
सगळीकडे तोरणमाळा लागल्या होत्या..घर सजले होते. अंगणात काढलेली रांगोळी सगळ्यांचे लक्ष वेधून घेत होती..
लग्न उद्यावर येऊन ठेपलं..

आज हळद...!

मोहनच्या नावाची उष्टी हळद शालूच्या अंगाला लागली..!

तिच्या मैत्रिणी तिला चिडवायला लागल्या..

"..बालपणीचा नवऱदेव बरा टिकवून ठेवला गं..! "

सगळीकडे हास्याची कारंजी उडत होती.

तिनं नजर खाली केली..

"बघा बघा कशी लाजतेय...! "

तिच्याकडे पाहून कुणीतरी म्हणालं..

तसे पुन्हा सगळे हसायला लागले...खरंच ती लाजत होती का..??

डोळ्यात आलेले आसू कोणाला दिसू नयेत म्हणून चाललेली तिची धडपड होती ती..

हे लग्न...

केवळ एक तडजोड होती...

तिच्या लाडक्या आत्यासाठी...

... हा हास्याचा गलका तिला नकोसा वाटत होता..

तोच पुन्हा त्यात बँडच्या आवाजाची भर पडली..

"... येईय.. वाजवा रे...
माझ्या लेकीचं लगीन हाय...! "

तिचे बाबा ओरडत होते..

लहान मुलांनी फेर धरायला सुरवात केली तशी तिचे बाबा.. त्याचे बाबा.. दोघेही त्यांचसोबत नाचू लागले..

तिच्या पालथ्या हातावर एक थेंब निथळाला...

तसं तिनं नजर वर केली..

"... आत्या... काय झाले..? बरं वाटत नाहीये का तुला..?"

आत्याच्या डोळ्यातलं पाणी पाहून शालून विचारलं..

" काही नाही गं वेडे... आनंदाश्रू आहेत हे..
बघ तिकडे दोघेही कसे देहभान विसरून नाचत आहेत..
खूप आनंदी आहे शालू मी आज...
माझी इच्छा तुम्ही पुरी केलीत..
तुमचं लग्न चांगलं धूमधडक्यात करायचं होतं मला... पण तब्येतीमुळे घाईतच होत आहे.. वाईट मानून नको घेऊस पोरी...! "

तिच्या हातावर हात ठेऊन ती म्हणाली.

" नाही गं आत्या... असं नाहीये काही.. "

काय बोलावं तिला काही सुचत नव्हतं.

"... खूप समजूतदार आहेस शालू तू..!

अशीच राहा कायम.. काही चुकलं माकलं मोहनचं तर सांभाळून घे त्याला.. पटकन मोकळा होत नाही तो कोणासमोर.. पण मनानं खूप चांगला आहे गं.. माझा लेक तूझ्या स्वाधीन करत आहे मी.. जप त्याला..! "

आत्या हळवी होत म्हणाली..

"... आत्या.., अगं बालपणापासून ओळखते ना मी त्याला.. माहित आहे त्याचा स्वभाव..! "

मनाला सुचेल तसं ती उत्तर देत होती..

".. हो..! म्हणूनच तर तुझ्या हाती सोपवतेय मी त्याला..
काही झालं तरी त्याची साथ सोडू नकोस कधी.."
डोळे पुसत आत्या म्हणाली.

"... हो अगं.. नाही सोडणार साथ..! "

आता तिचाही हुंदका दाटून आला होता...

.

.
.
.
.
.
...  ती बेडवर उठून बसली..

तिचे श्वास जड होऊ लागले होते..
  "  पा.. णी..
मावशी पाणी देतेस का थोडं..! "
कशिबशी ती बोलली..

तिच्या हालचालीनी राधामावशी ला जाग आली.

" सोनिया.. बाळा अगं काय झालं..?? "

झटकन उठून बसत ती म्हणाली.

" पा... णी... "

अस्पष्ट तिला ऐकू आले.
तिनं लाईट लावला आणि पाणी आणून दिले..

तेवढ्यात तीला ओकारी आली..

एक.. दोन.. तिनं.. ती बेसिन मध्ये भडाभडा ओकत होती..
राधामावशी तिच्या पाठीवरून हात फिरवत होती..
तिनं तिला लिंबुपाणी करून दिलं.. ते पिल्यावर तिला थोडं बरं वाटू लागलं..
दरदरून फुटलेल्या घामानं ती पूर्ण भिजली होती..

मावशीनं तिला पुसून कोरडं केलं..

थोडावेळ ती तशीच  डोळे मिटून बसून होती... शांत...निश्चल...!

"... सोना.. काही होतंय का बाळ पुन्हा तुला..? "

तिच्या चेहऱ्यावर हात फिरवत मावशीनं विचारलं..

तसं तिनं डोळे उघडून समोर बघितलं.

"... सोना...

किती दिवसानंतर ही हाक ऐकली मी..
तुला माहितीये मावशी..

माझे आप्पा मला सोनाच म्हणतात...! "

क्षीण आवाजात ती बोलत होती..

"... मावशी.. डोकं चेपतेस का गं जरा..? खूप जड आलंय.. "
-ती.

राधामावशीन तिचं डोकं आपल्या मांडीवर ठेवलं आणि हलक्या हातानं दाब देऊ लागली.
मायेच्या त्या स्पर्शाने तिचे डोळे मिटायला लागले..

"... मावशी..."
".. बोल.. "
"... आप्पा मला माफ करतील का गं..?"
डोळे मिटूनच तिनं विचारलं..

".. हो बाळ.. नक्की करतील..!

मावशी हळुवार तिला थोपटत होती...

" आई गं.. "
वेदनेने कळवळली ती..

"... काय होतंय बाळा..?? "

किती काळजी होती तिच्या स्वरात..

" अगं.. पोटात कळ आली अचानक.. "

सोनिया हळू आवाजात म्हणाली.

"... सोना..,  मला काही ठीक वाटत नाहीये गं.. आपण हॉस्पिटलला जाऊया का..?? "

चिंतेने मावशी म्हणाली.

"... नाही गं.. मध्यरात्र उलटलीय आता कुठं जायचं...
तसही थोडं बरं वाटत आहे आता..
झोप तू.. मी देखील झोपते.."

राधामावशी कितीतरी वेळ तिला थोपटत होती..

ती झोपल्याची खात्री करूनच मग तिने डोळे मिटले...

.
.
.
.
.
.... लग्न घरात सगळीकडे धावपळ चालली होती..
तोरणमाळा... गजऱ्यांचे सुगन्ध..
जेवणाचा घमघमाट सुटला होता..
नेहमीच साधीशी राहणारी शालिनी आज नववधूच्या रूपात खूपच सुंदर दिसत होती..
हातातील हिरवा चुडा.. तीच्या गोऱ्या कांतीवर खुलणारा शालू..
हळदीचं चेहऱ्यावर आलेलं तेज...!
आत्यानं तिच्या कानामागे तीट लावलं..
"... माझीच नजर लागायची माझ्या लेकरांना ...! "
तिच्या मनात आलं.
मुहूर्ताची वेळ झाली.. भटजी आले.. मंत्र झाली..
आणि मग एकमेकांच्या गळ्यात माळा टाकण्याची वेळ झाली...
मोहनने तिच्याकडे पाहिलं.. मस्तकावर बाशिंग बांधलेल्या तिच्या चेहऱ्यात त्याला सोनिया दिसली..

तो तिच्याकडे बघून गोड हसला..

".. ओय... होय..!  तुझ्या मोहनची तर नजर हटतच नाहीये तुझ्यावरून..
फुल्ल टू लट्टू झालाय..! "
मैत्रिणीनं कोपरखळी मारली.

"... मोहनदादा... अरे तुझीच आहे ती आता.. "

त्याच्या डोळ्यासमोर चुटकी वाजवत ती मैत्रीण म्हणाली तसा तो भानावर आला..

समोर शालू होती...

आणि बाजूला तिची मैत्रीण हसत होती...!

... शुभ मंगल सावधान....

भटजी म्हणाले तसं दोघांनी एकमेकांच्या गळ्यात माळा टाकल्या..

.
.
.

जेवणावळी उठत होत्या... सगळीकडे आनंदीआनंद होता..
आई, बाबा, मामा..
त्यांच्या आनंदाला तर पारावर उरला नव्हता..

.

.
.
.
.
.
.

"... आ ss...

मावशी अजून परत दुखायला लागलं गं पोटात.. जाऊया का दवाखान्यात..?? "
लहानसा चेहरा करत सोनिया म्हणाली.

"... हो बाई जाऊया की पण त्या आधी  दोन घास टाकतेस का पोटात...
चेहरा बघ कसा मलुल झालाय.."
राधामावशी.
नको गं... मला घाबरल्यासारखं व्हायला लागलय... "
भिंतीला डोकं टेकत ती म्हणाली..
तसं राधामावशीही झटकन ताटावरून उठली.
"... आलेच गं."
म्हणत झटक्यात बाहेर निघून गेली.

चौकातून ती एका ओळखीच्या रिक्शावाल्याला घेऊन आली.
आणि त्याच्या मदतीने तिला दवाखान्यात घेऊन गेली..

.
.
.

"... बरं झालं काकू वेळेत घेऊन आलात तुमच्या लेकीला हॉस्पिटलमध्ये..."

डॉक्टर सोनियाला चेक करता करता राधामावशीला म्हणाल्या.

"... मॅडम..! काय झालंय काही सिरीयस आहे का...?? "
काळजीने मावशी.

"... हो. तसं थोडं सिरीयस आहेच.

बीपी शूट झालंय  म्हणजे वाढलंय हिचं..

आणि हलक्या स्वरूपाच्या प्रसवकळा देखील सुरु झाल्यात.. "
-डॉक्टर.

"... अहो मॅडम असं कसं होईल..??
नववा महिना लागून आत्ता कुठे दहा दिवस झालेत !"

- मावशी.

".. हो काकू.. परंतु काही बायकांना होतो असा त्रास. गरोदरपण म्हणजे साधी गोष्ट नाही ना ..!
एक हाडामासांचा अक्खा जीव आपल्या उदरात वाढत असतो. तुम्हालाही अनुभव आहेच की ..!"

डॉक्टर गंभीरपणे म्हणाल्या.अनुभव...?? अनुभव तर तिला कशाचाच नव्हता.

"... मग आता काय करायचं..?"

डॉक्टर चं बोलणं तोडत राधामावशीन विचारलं.

" तेच तर सांगतेय..!
तिला ऍडमिट करावं लागेल. बीपी जास्तच वाढलंय. ते धोकादायक असू शकते. तेव्हा ऍडमिट करून दोन तरी दिवस निरीक्षणाखाली ठेवावं लागेल.
पोटातील दुखणे कमी झाले तर मग पुढे काय करायचं ते बघू.डॉक्टर म्हणाल्या.
.
.

"... काय म्हणताहेत गं डॉक्टर..? "

केबिनमधून बाहेर येणाऱ्या राधामावशीला सोनिया विचारत होती.. तिला डॉक्टरांनी आधीच बाहेर पाठवलं होतं.

"थोडं बीपी वाढलंय तर ऍडमिट करायचं म्हणताहेत.. "
चेहऱ्यावरचं टेन्शन लपवत मावशी म्हणाली.

"... ऍडमिट...??  ऍडमिट होणं गरजेचं आहे का गं..?"
तिचा बालिश प्रश्न.

".. हो गं. दोन तर दिवसांचा प्रश्न आहे.."

तिला आश्वस्त करत ती म्हणाली...

.

.
.
.
.
.

.... मापं ओलांडून शालिनीचा गृहप्रवेश झाला...

मोहनच्या आईने दोघांचही औक्षवण केलं... आणि कमरेची किल्ली काढून शालिनीच्या हातात दिली..

"... अगं आत्या हे काय..राहू दे ना तुझ्याजवळ.. काही लागलं तर मागेन ना मी.."   

- शालू.

"... नाही गं बाई.. आता तू माझी मुलगी नाही तर सून आहेस या घरची..!

साक्षात लक्ष्मी ..!
ह्या किल्ल्या तुझ्याचकडे ठेव.. तसेही आता सारं काही तुझ्यावरच सोपवणार आहे मी.."

हसून आत्या म्हणाली...

" थकले आहात सारेच. झोपा आता.. उद्या सकाळी पूजा आहे, तेव्हा उठायचं आहे ना सगळ्यांनी लवकर...! "

असं म्हणून आत्या शालूला आपल्यासोबत झोपायला घेऊन गेली....

.

.
.
.
.
.
.

...हॉस्पिटलच्या  बेड वर सोनिया झोपली होती...
गाढ...
कितीतरी दिवसांनतर.

राधामावशीच्या डोळ्यावरची झोप मात्र उडाली होती.

".. झोप नं गं बाय कशाला येरझारा घालती..?
शेजारच्या पेशंटची नातेवाईक बाई म्हणाली.

(शेजारच्या..?? हो. प्रायव्हेट हॉस्पिटलचा खर्च परवडणार नव्हता तिला. म्हणून सरकारी रुग्णालयात सोनियाला दाखल केले राधामावशीने..)

जनरल वॉर्डातील त्या आठ दहा पोटुशा बायका... त्यांच्यासोबतीला नातेवाईकांची गर्दी...
तिनं असं कधी अनुभवलंच नव्हतं..
त्या कोलहलात तिला अपराध्यासारखं वाटत होतं..

त्यातच सोनियाच्या चिंतेने झोप डोळ्यांपासून चार हात दूर गेली होती..

" लेक हाय का सून..? "
त्या आजीनं विचारलं.

"... लेक..! "

नकळत तिच्या तोंडून निघून गेलं..

"... म्हणून जीव जास्ती तळमळताय बघ तुझं..
आपल्या काळजाच्या तुकड्याचं तरास नाही पाहवत गं   बाई..! "
आजी बोलून गेली.
"..लेक असो वा सून... त्रास तर दोघीनाही सारखाच होतो नं काकी.. "
राधामावशी म्हणाली.

आजी हसली जराशी..

"... बाई.. ह्या सत्तर वर्षात माझ्या डोक्याचे केस असेच काळ्याचे पांढरे नाही झाल्ये..
रक्ताचं नातं ते रक्ताचंच रायते..
आता माझवालचं बघ. माझ्या नातीच्या बाळतपणाले मीच आली का नाही..? का आले कोणी तिच्या सासरचे..??
मनून मनते...
रक्ताचं नातं ते रक्ताचंच रायते... "
ती बोलतच होती...

राधामावशीन तिथेच खाली पाठ टेकवली..

... खरंच रक्ताचं नातंच तेवढं श्रेष्ठ असते का..??
ही कोण माझी...??

का माझा जीव तुटतो हिच्यासाठी..
हिने मला मावशी म्हटले नी लगेच मी तिला माझी लेक मानले...
मग हे कोणते नाते आहे आमचे..?? "

मनात आलेले प्रश्न तिने झटकून टाकले..

रात्री उशिरा केव्हातरी तिचा डोळा लागला.....

.

.

.

.

. क्रमश :

      **************************

सॉरी.. सॉरी.. सॉरी...

मला माहितीय.. खूप साऱ्या माझ्या मैत्रिणींना मोहनचा हा निर्णय नाही पटलेला...

मलाही नाहीच पटला.. प्रेम एकीशी आणि लग्न दुसरीशी...

कसं पटेल कोणाला..??

पण कधी कधी परिस्थितीपुढे माणूस एवढा हतबल होतो की  त्यावेळी योग्य- अयोग्य नाही ठरवता येत..

सोनिया त्याची priority होती.. पण त्याच्या जन्मदात्रीच्या आजारापुढं तो आलेल्या परिस्थितीला तसाच सामोरा गेला.

तरी मला एवढंही रागावू नका..

कारण...

.

.

.

पिक्चर अभी बाकी हैं मेरे दोस्त....

तो पर्यंत हा भाग कसा वाटला नक्की सांगा..... रागवा पण मनात नको..  कमेंट करून आपला रोष व्यक्त करा..

ईरा वाचनाचा आनंद घ्या आता app मधून, आजच download करा. Download App Now
ईराच्या कथांचे कुठलेही भाग मिस करू नका, आजच जॉईन करा ईरा वाचनालय. व्हाट्सएप: व्हाट्सएप:
//