Dec 01, 2021
कथामालिका

प्रीती... भाग - 9

Read Later
प्रीती... भाग - 9

❤️ ईरा दिवाळी अंक 2021 ❤️

मर्यादित प्रति.. आजच बुक करा खालील फॉर्म भरून..

(मागील भागात आपण बघितलं... आईला बरं नसल्याचं कळल्यावर मोहन सोनियाला राधामावशीच्या सोबतीने ठेऊन गावाकडे निघाला....

आता पुढे....)

.

.

.


"....राधामावशी काळजी घेशील गं सोनियाची... "

आपली ट्रन्क घेऊन तो निघाला.


त्यानं पुन्हा एकदा सोनियाला घट्ट मिठीत पकडलं..  आणि तिच्या पोटाची पापी घेतली.
" बाळा येईल मी लवकरच.. "
तो म्हणाला...


पाठमोरा तो दिसेनासा होईपर्यंत त्या दोघी हात हलवत होत्या...

.
.
.
.
मोहन गावाला पोहचला..

तब्बल दोन महिन्यानंतर तो घरी आला होता..
" बाबा.. "
त्यानं हाक दिली.
दाराला कुलूप घालत असलेल्या त्याच्या वडिलांनी वळून पाहिलं...


" मोहन तू...? "


त्यांच्या चेहऱ्यावर आश्चर्य होते. "... एवढा काय व्यस्त असतोस लेका... की घरी तुझं पाऊलही पडत नाही...? "
त्याचे वडील  खिन्नपणे म्हणाले.

नोकरीच्या कामात वेळच नाही मिळाला बाबा... "

तो खाली बघत म्हणाला.


बाबांशी नजर मिळवणं नाही जमलं त्याला...


" अरे.., किमान जवळपासच्या एखाद्या मित्राचा नंबर तरी देऊन ठेवायचा ना मला..
आईची अवस्था बघितली..? दवाखान्यात भरती आहे तरी सारखा तुझ्याच नावाचा जप चाललाय तिचा..  काय करतोस? कुठं राहतोस..? जेवतो की नाही...? सारखा तुझाच धोशा चालला असतो. अरे...एकुलता एक लेक आहेस आमचा.. तुला काही झालं तर कोणाकडे बघायचं आम्ही...?? "


डोळ्यांच्या कडा पानावल्या त्यांच्या.


मोहनने घट्ट मिठी मारली त्यांना..


" बाबा..., मला आईला भेटायचंय..! प्लीज घेऊन चला ना मला..."
तो काकूळतीने म्हणाला.


" हो चल... मी दवाखान्यातच निघालोय.. तूझ्या आईसाठी डबा न्यायचा होता.. खाणं तर सोडलं तिने... पण तूझ्या हातचं दोन घास टाकेल तरी पोटात.. "
बाबा म्हणाले.
थोड्यावेळाने ते दोघे हॉस्पिटलला पोहचले.. Icu मधून कालच आईला जनरल वॉर्डमधे शिफ्ट केले होते.. आईला त्या अवस्थेत बघून त्याला भरून आलं.
" आई... "
मोहनने हाक मारली.
त्याचा आवाज ऐकून तिनं आपले खोल गेलेले डोळे उघडले.
"... मोहन... आलास बाळा तू..? " किलकिल्या नजरेनं बघत ती म्हणाली.
" आई... काय अवस्था करून घेतली आहेस गं तू..? "
तिच्याकडे बघत तो म्हणाला.
" आता आलास ना तू...? मी होईन लवकर बरी.. तू मात्र जाउ नकोस हं कुठे.. "
ती आशाळभूतपणे त्याच्याकडे बघत होती.
" नाही जाणार गं आता कुठेच..
आधी दोन घास खाऊन घे बरं.. "
विषय बदलवत तो म्हणाला.
" नाही असं नाही.. वचन दे आधी मला की तू कुठेच जाणार नाहीस..  आणि माझं सर्व ऐकशील... "
ती पुन्हा म्हणाली.
" नाही जाणार गं.. दिलं वचन..
आता जेव बघू.. "
ती जेवायला हवी म्हणून तो पटकन बोलून गेला.
" माझं ऐकशील ना तू...? "
तिच्या डोळ्यात निरागसता होती... आणि आवाजात अगतिकता...
".. हो.. ऐकेन सगळं.. आधी जेव बघू. "
त्यानं तिला मिठी मारली. आणि तिचे डोळे पुसत एक घास चारून दिला..
तिच्या चेहऱ्यावर हसू फुललं.
कितीतरी दिवसानंतर ती अशी हसून जेवत होती...
दोन दिवस अंडर ऑबसेर्व्हशन ठेवल्यानंतर मोहनच्या आईला हॉस्पिटलमधून सुट्टी झाली.


हृदयविकार, वाढलेलं ब्लडप्रेशर, मधुमेह... ह्या सगळ्या मित्र आजरांनी एकाच वेळी तिच्या शरीरात घर केलं होतं. तशी ती आता स्टेबल होती पण कोणतेही मानसिक ताण घेण्यास तिचे शरीर अजून तयार नव्हते.


" पेशंटला जास्तीत जास्त आनंदी ठेवा.., मनावर ताण येईल असं वागू नका..  थोडं त्यांच्या कलाने घ्या. दोन अटॅक येऊन गेले त्यांचे.. तिसरा आला तर सगळ्यांना खूप कठीण जाईल.. तेव्हा जपा त्यांना.. "


मोहन आणि त्याच्या वडिलांना डॉक्टर समजावून सांगत होते...


दोघे डॉक्टरांच्या केबिन मधून बाहेर पडले.. आईला  आता घरी घेऊन जायचे होते...


डॉक्टरांच्या बोलण्यापासून मोहनची आई अनभिज्ञ होती.
घरी जायचंय म्हणून ती खुश होती.
मुलाच्या येण्याने तिला आता तरतरी आली होती...


रिक्षाने तिघे घरी आले..

अंगणात सुरेख रांगोळी काढलेली होती.

एवढया दिवसानंतर आपलं घर बघून आईला भरून आलं..

ती आत प्रवेश करणार तोच एक गोड आवाज कानावर पडला..


" अगं.. अगं.. आत्ये .., थांब जरा.. "


समोर शालिनी उभी होती, हातात पाण्याने भरलेला तांब्या घेऊन...
"एवढ्या दिवसांनी बरी होऊन परतली आहेस...  अशी नको येऊस... थांब. "
ती म्हणाली.


हातातील तांब्यातलं पाणी तिनं तिच्या पायावर ओतलं. तिच्या अंगावरून भाकरीचा तुकडा फिरवून त्यावर थू.. थू.. करून बाजूला फेकला आणि मग तिला ओवाळून घेतलं..
" ये आता आत... "
तिचा हात पकडून शालिनी तिला घरात घेऊन आली .
" गुणाची गं माझी शालू... कुठून शिकलीस गं हे..? "
तिच्या चेहऱ्यावरून हात फिरवून आई म्हणाली.
" कुठून काय गं आत्ये..?? तुझ्याचकडून शिकले मी सारं..
अंगणातली रांगोळी बघितली?? खास तूझ्यासाठी काढली.. तुझं स्वागत करायला.. "
हसून शालिनी म्हणाली आणि सगळ्यांसाठी पाणी आणायला गेली.
" हुशार झाली हं आपली शालू.. "
मोहनची आई कौतुकाने म्हणत होती..
पाण्यासोबत ती सर्वांसाठी चहा देखील घेऊन आली.
मोहनला चहा देतांना दोघांची नजरानजर झाली. तिच्याकडे बघत त्यानं स्मित केलं.. तशी लाजून तिनं नजर खाली केली....
.
.
.
... शालिनी...
मोहनच्या मामाची मुलगी...! ती नऊ दहा वर्षांची असतांना एका अल्पशा आजाराने तिच्या आईचे निधन झाले होते. तेव्हापासून मामा ह्याच गावात राहायला आला होता.. बिनमायेची पोर म्हणून मोहनच्या आईने तिला खूप जीव लावला. शालू ही दिवसभर आत्या आत्या करत तिच्या मागे फिरायची...आत्यावर तिचाही जीव होता.
आत्तासुद्धा आत्या हॉस्पिटलमधून घरी येणार म्हणून तिनं सर्व घर आवरलं होतं... तिच्या स्वागताची तयारी केली होती..
.
.
.
.... दोन दिवसासाठी घरी आलेला मोहन आठ दिवसांपासून इथेच अडकला होता.. सोनियाच्या आठणीने मन व्याकुळ होत होतं. तिला काय वाटत असेल..?  नीट असेल ना..?? एक ना दोन सतरा प्रश्न त्याच्या मनात थैमान घालत होते. तिकडे परतायची ओढ लागली होती. संधीची तो वाटच बघत होता...
...आई  थोडी बरी वाटली तसं त्यानं आपली बॅग पॅक करायला घेतली...
" कुठे जायची तयारी सुरु आहे..? "
शालिनी आत येत मृदू आवाजात म्हणाली.
तिच्या अचानक येण्याने तो एकदम दचकला.
" अरे.. दचकायला काय झाले..? तुझी चोरी पकडल्या गेली का ? "
ती गोड हसली.
त्याच्या कपाळावर आठ्या पडल्या.
" तू काय करत आहेस इथे..? आणि केव्हा आलीस..?? "
त्याने चिडून विचारलं.
" ये.. चिडतोस कशाला रे माझ्यावर..?? दोन घरांच्या अंतरावर तर राहते मी. दिवसभर इथे आत्याकडेच असते. तू नसतोस इथे म्हणून तुला माहित नसेल. आणि तसही आत्यानी तुला बोलावलं हे सांगायला मी तुझ्याकडे आले होते.. "
डोळ्यात पाणी आणून ती म्हणाली.
" शालू.. अगं माफ कर मला. तुला दुखवायचा हेतू नव्हता माझा.."
तिचा हात पकडून तो म्हणाला. आपल्यामुळे ही दुखावली हे लक्षात आलं त्याच्या.
... पण तिचं लक्ष मात्र उडालं... त्याच्या स्पर्शाने ती मोहरून गेली.
" आत्या तुझी वाट बघतेय.. लवकर ये.. "
आपला हात सोडवत लाजून हसत ती तेथून पळाली...

" आत्ताच डोळ्यात पाणी होतं आणि लगेच हसायला काय लागते.. खुळीच मुलगी आहे..!"
तो मनात म्हणाला.
"... आणि ही सारखी सारखी का लाजते मला बघून..?? "
त्याला कळत नव्हते...
बॅग बाजूला सारून तो बाहेर आला.
छपरातल्या खाटेवर आई पहुडली होती. बाजूलाच बाबा आणि खुर्चीवर मामा बसले होते.. स्वयंपाकघराच्या दारात शालिनी ओढणीच्या टोकाशी चाळा करत  उभी होती..
" काय झालं आई..? मला बोलावलंस तू..?  बरं आहे ना तुला..?"
आईजवळ बसत मोहनने विचारलं. त्याच्या आवाजात काळजी होती.
" आता तर ठीक आहे बाबा.. पण ह्या आजाराने पुरतं घेरलंय मला.. एका क्षणी ठीक तर दुसऱ्याच क्षणी केव्हा या जीवाचं बरवाईट होईल पांडुरंगालाच ठाऊक... "
बोलता बोलताच तिला धाप लागली.
" आत्ये.. असं काही होणार नाही बघ. उगाच काही बरळू नकोस.. "
तिच्यासाठी पटकन पाणी आणत शालिनी म्हणाली.


" तू आहेस म्हणून तर इतके दिवस तग धरतेय बाळा... माझ्या आजारपनापासून पूर्ण घर एकहाती सांभाळत आहेस... दिसतेय न मला. नाहीतर घराची पूर्ण वाताहात झाली असती.. "
पाण्याचा घोट घेत ती म्हणाली.
"आत्ये .. मी असतांना कशी होऊ देणार गं वाताहात घराची.."
तिच्याजवळ बसत शालू म्हणाली.
आईनं शालूचा हात हातात घेतला आणि उठून बसली.


"... दादा बऱ्याच दिवसापासून मनात होतं.. पण बोलले नाही..
आज सगळीच घरी आहेत.. मुख्य म्हणजे मोहनही आहे..."
बोलता -बोलता तिने एक लांब श्वास घेतला.


" बोलना अगं..!  का थांबलीस? "
खुर्ची तिच्याकडे सरकावत मामा म्हणाला.


" दादा.. शालू आता मोठी झालीय. मोहनही कमावायला लागलाय.. तिचा जीव आहे मोहनवर माहितीय मला.. पोरगी गुणाची आहे.. सोज्वळ आहे. माझ्या साध्या मोहनला सांभाळून घेईल याची खात्री आहे..
दादा.., मोहनचे बाबा आणि माझे तुझ्याकडे एकच मागणे आहे.. तूझ्या शालूचा हात माझ्या मोहनच्या हातात देशील..?? तूझ्या लेकीला आमच्या घरात आमची सून म्हणून पाठवशील..??? "
शालू आणि मोहनचा हात घट्ट पकडत आईनं विचारलं..


मोहनने चमकून वर पाहिलं.

त्याच्यासाठी हे अनपेक्षित होतं... शालू लाजून खाली बघत होती..


"...अगदी माझ्या मनातलं बोललीस बघ तू.."
मामा आनंदाने बोलत होता.
"  आईविना पोर माझी .. पण तू तिला कधीच आईची कमतरता  जाणवू दिली नाहीस.. आता सून बनवून सासूचेही प्रेम दे..! "
मामाचा आनंद गगनात मावत नव्हता.
... आणि शालिनी... ती तर लाजेने चूर चूर झाली होती...
"... अगं किती लाजशील..?? जा देवापुढे साखर ठेव आणि आमच्यासाठीही घेऊन ये..! "
बाबा तिच्या डोक्यावर हात ठेऊन म्हणाले. तशी ती पळतच आत गेली...
".. काय मग मोहनराव... आता जावईबुवा होणार तुम्ही आमचे..."
मामानं त्याला मिठी मारली. त्या मिठीत मात्र त्याला श्वास गुदमरल्या सारखं वाटलं..
सगळ्यांना साखर देऊन शालिनीने नमस्कार केला..
" आता तुम्ही दोघांनी एकमेकांचं तोंड गोड करा... "
बाबा म्हणाले तसे साखरेची वाटी घेऊन ती मोहनसमोर उभी राहिली...
काय करावं त्याला काही कळेना. सारखी सोनिया त्याच्या डोळ्यासमोर येत होती.. आणि मग डॉक्टरांचं बोलणं त्याला आठवत होतं..
त्यानं एकवार आईकडे पाहिलं. किती प्रसन्न मुद्रा होती तिची..
" अरे.. माझ्याकडे काय बघतोस..?? भरव ना शालूला साखर..! "    - आई.
त्यानं विचार करून साखरेची वाटी खाली ठेवली.
"... आई मी नाही लग्न करू शकत शालूशी... "
मन घट्ट करून मोहन म्हणाला.
" काय...??? पण का..?? "
आईच्या छातीत कळ दाटल्यासारखी झालं... तिचा चेहरा खारकन उतरला..
शालूच्या डोळ्यात आसू उभे राहिले..
आईला तसं बघून त्याला पुन्हा डॉक्टरांचे बोलणे आठवले. सोनियाचा विषय काढायची ही योग्य वेळ नाहीये असं त्याला वाटलं..
"...म्हणजे आत्ताच कसे करायचे ना लग्न..? माझी नोकरीही पक्की नाहीये.. "
काहीतरी बोलायचं म्हणून तो बोलून गेला.
" अरे नोकरी काय होईल ती पक्की.. आणि नाही झाली तरी आहेच आपलं शेत... त्याची काळजी नको करुस..
आणि लक्षात ठेव... शालूच्या डोळ्यात पाणी आलेलं चालणार नाही मला.. सून होण्यापूर्वी लेक आहे माझी ती.
तिची साथ सोडलीस तर शपथ आहे तुला माझी... "
तिला बोलतांना परत धाप लागली.
" आत्या अगं.. किती धाप लागतेय तुला.. पाणी पी बघू आधी.. "
शालिनीने पाण्याचा ग्लास तिच्या ओठाला लावला.
"... मोहन बघतोस ना किती काळजी करते ती माझी. इतकी प्रेमळ मुलगी भेटायची नाही रे.
माझे डोळे मिटण्याअगोदर तुमचं लग्न बघायचे आहे मला... "
गालावरचे अश्रू पुसत ती म्हणाली.
" आई काय गं सारखं सारखं तेच बोलतेस.. "
तो चिडून आत गेला.
" आत्या काही होणार नाही बघ तुला. आणि का सारखी अशी बोलतेस गं तू? दुखावला ना आता तो.."
शालू नाराज सुरात म्हणाली.
" अगंबाई... लग्नाची बोलणी झाल्याबरोबर त्याची बाजू घेतेस होय? लबाड....! जा त्याला समजाव जरा.. "
हसून आई म्हणाली.


" खरंच जाऊ..? "


बाबांकडे बघून ओढणीशी खेळत तिने विचारलं.


" हो.. जा. अगं हक्क आहे तो आता तुझा.. "
बाबांनीही होकार दिला.
ती लाजून त्याच्या खोलीकडे पळाली...


आई , बाबा, मामा...

सगळ्यांच्या चेहऱ्यावर हसू फुलले होते...

.

.

.

. क्रमश :


       *********************************

काय होईल पुढे..??  काय असेल मोहनचा निर्णय..? तुम्हीदेखील कॉमेंट करून थोडी मदत करा निर्णय घ्यायला...

आणि हा भाग आवडल्यास कॉमेंट, like आणि share करा.

❤️ ईरा दिवाळी अंक 2021 ❤️

मर्यादित प्रति.. आजच बुक करा खालील फॉर्म भरून..
ईरा वाचनाचा आनंद घ्या आता app मधून, आजच download करा. Download App Now