Feb 22, 2024
कथामालिका

प्रीती.... भाग -6

Read Later
प्रीती.... भाग -6

प्रेम.. तडजोड...  नात्यातील गुंतागुंत.. उलगडनारी कथामालिका... प्रीती.... 


हा पार्ट खूप लेट येतोय...... त्याबद्दल सॉरी..


( मागील भागात आपण बघितले..
सोनिया.. एक श्रीमंत घरातील मुलगी असते. मोहन आणि तीचे एकमेकांवर जीवापाड प्रेम असते.. ती प्रेग्नेंट झाल्याच दोघांनाही कळतं. आणि ते घरी सांगण्याचा निर्णय घेतात. पण मोहन च्या घरी आईची अचानक तब्येत बिघडल्या मुले तर सोनिया आप्पा बिझनेस टूरवर असल्यामुळे दोघेही घरी सांगू शकत नाही.. पण तिची फाईल आईसाहेबांच्या हाती लागल्यामुले त्यांना सर्व माहिती होते. त्या तिला abortion करण्याचा सल्ला देतात.. पण त्यावर नकार देत ती घर सोडण्याचा निर्णय घेते आणि मोहन कडे येते. आपण लग्न करूया असं ती म्हणते पण मोहनला ते इतक्यात शक्य नसते..
आता तो काय निर्णय घेईल वाचा आजच्या भागात... )

..... रात्रभर मोहन विचार करत होता. नेमके काय करायचे त्याला कळत नव्हतं. शेवटी त्याने एक निर्णय घेतला.. आता त्यालाही झोप येऊ लागली.. तो तिथेच बेडवर पाय लांब करून खुर्चीला टेकून झोपला..


...पक्ष्यानच्या किलबिलाटाने त्याला जाग आली.. आळोखेपिळोखे देत तो उठला. रात्रभर जागरण झाल्यामुळे आता डोळे - डोके जड झाल्यासारखे वाटत होते.. डोळे चोळत तो बेडकडे बघत होता...
... त्यानं बघितलं तर तिथे सोनिया नव्हती. खाडकण तो उठून उभा झाला. एका क्षनात डोक्यात काय काय विचार येऊन गेले त्यालाही कळले नाही..
"... सोनिया ss... " त्यानं हाक मारली. ... आणि नाकाला मोहवनाऱ्या चहाच्या सुगंधाने तो मागे वळला... किचनच्या दारातून चहाचे दोन कप घेऊन सोनिया येताना त्याला दिसली..
" अरे उठलास तू..?? तुलाच उठवायला येत होते बघ.
डोळे कसे सुजलेत बघ. झोपला नाहीस ना रात्री तू ?
चहा घे.. थोडी तरतरी येईल.. "
असं म्हणून तिने चहाचा कप त्याच्यासमोर धरला..
काही न बोलता त्यानं चहा घेतला.. खरंच त्याला थोडी तरतरी आल्यासारखि वाटली..
".. मस्त झाला चहा.. ! खरंच बर वाटत आहे आता.. केव्हा शिकलीस तू चहा बनवायला..?? "
त्यानं विचारलं.
"... शिकले मी तुझ्यासाठी... " . .. ती उत्तरली.
".. मोहन.. खूप त्रास दिला ना रे मी तूला काल..??
सॉरी.. ! "
दोन्ही कान पकडून ती त्याच्यासमोर उभी होती.. डोळ्यात अश्रू जमा झाले होते.. !
" ... अगं काही काय बोलतेस.. वेडू कुठली तर.. आणि आता रडत राहू नको अशी. सगळं ठीक होईल अगं.. "
तो तिला मिठीत घेत म्हणाला.
" सोनिया.. मी एक निर्णय घेतलाय.. बघ तूला पटतोय
का.? "
तिला खुर्चीवर बसवत तो म्हणाला.
"आपण मुंबईला जाऊयात..?? "
तिचा हात हातात घेत त्यानं विचारलं..
"... मुंबईला..?? पण काय करणार तिथे जाऊन आपण..?"
तिने विचारलं.
"... ऐक ना अगं.. थोड्याच दिवसांचा प्रश्न आहे. आत्ताच एक्साम संपल्या आपल्या. रिजल्ट ला वेळ आहे. मुंबईला राहून एखादे काम बघेन. रिजल्टनंतर मग नोकरीच बघूया.. "
....तो.
".. अरे हो पण राहायचे कुठे? काही विचार केला का
तू..?? " .. ती.
"...तू नको टेन्शन घेऊ. माझा एक मित्र आहे.. त्याच्याकडे जाऊयात आपण.. तो काहीतरी व्यवस्था नक्की करेल.. माझ्या कडेही आहेत , थोडे फार पैसे जमा.. होईल नीट आपलं.
आणि काही दिवसांनी आई ठीक झाली कि मग गावाला जायचंच आहे.. "
तो तिला समजावत म्हणाला..
तिलाही ते पटलं. तसाही सध्यातरी दुसरा पर्याय नव्हता त्यांच्याकडे..
"किती वाजता निघायचं..??
तिने प्रश्न केला.
" दहाच्या ट्रेन ने.. " ... तो उत्तरला.
फारशी आवराआवर करायची नव्हतीच. तिची बॅग पॅक होतीच. त्यानेही त्याचे दोन चार ड्रेस एका बॅगेत भरले. रूमवर असलेलं थोडंफार सामान घेतलं. आणि शरद साठी "..काही वयक्तिक कामानिमित्त थोडे दिवस बाहेरगावी जातोय... बाकी लवकरच कळवेन.. "
अशा आशयाची एक चिट्ठी लिहून ठेवली..
.
.
.
.
.
....गार्ड ने हिरवी झेंडी दाखवली..
झुक -झुक -झुक.... गाडी पुढे निघाली..
.....आणि सुरु झाला सोनिया मोहनच्या प्रीतीचा प्रवास...
जनरल बोगीमधून त्यांचा प्रवास सुरु होता. डब्यातिल चिक्कार गर्दी.. लोकांची चाललेली असम्बन्ध बडबड...तो मुतारी चा दर्प..

त्यातल्या त्यात चांगली गोष्ट म्हणजे काशीबशी दोघांना बसायला जागा मिळाली होती. पण समोरचे दोन डोळे तिच्याकडे घाणेरडया नजरेने बघत होते.. सोनियाला हे सर्व नवीन होतं ह्या सगळ्या वातावरणामुळे तिला मळमळ व्हायला लागली.. अंगाला दरदरुण घाम फुटला...
" सोनिया.. अगं काय होतेय तूला..?? "
घाबरून त्यानं विचारलं.
ती इशाऱ्याने त्याला सांगत होती.. पण त्याला काही कळत नव्हतं..
"अरे पोरा ओकारी येताय तिला.. "
समोरची एक म्हातारी बोलली आणि लगेंच एक रिकामी प्लास्टिक तिच्यासमोर धरलं..
एक.. दोन.. तिन... भळाभळा ती ओकायला लागली. त्यालाही बघून कसतरी व्हायला लागलं..
त्या म्हातारीनं तिला घोटभर पाणी दिले.. आता तिला थोडं बरं वाटत होतं..
" पोटुशी आहेस होय..?? "
म्हातारीने आपल्या अनुभवी नजरेनं विचारलं.. तिचा स्वर काळजी आणि प्रेमाने भरला होता.
पहिल्यांदाच कोणीतरी तिला हे प्रेमाने विचारत होतं. तिला भरून आलं. हलकेच हसून तिने होकार भरला.
" कितवा महिना..?? "
म्हातारीने लगेच विचारलं..
" दुसरा... " ती पूसटशी बोलली..
" होतोच बाई सुरवातीला त्रास.. बाईच्या जातीला हे भोग आहेतच लागून.. " म्हातारीची बडबड चालूच होती.
आणखी ही आजी काही विचारेल म्हणून तिने उगाच आपले डोळे मिटले. मोहनच्या खांद्यावर मान टेकवली.. गाडी आपल्याच वेगाने पळत होती. सोनिया च्या डोळ्यासमोरून तिचा कुटुंबासोबतचा प्रवास तरळत होता...
...काही वर्षांपूर्वी सर्वांसोबत ती मुंबईला आली होती.. तेव्हा आप्पानी बुक केलेला तो ac कोच.. वीरेन, रजत, विश्वास दादासोबत केलेल्या मस्त्या.. आईसाहेबांकडून पुरवलेले चोचले... आणि आप्पासाहेब..? "साहेब " ते इतरांसाठी.. माझ्यासाठी ते फक्त माझे आप्पाच आहेत. " नेहमीच असं म्हणायची ती.. "कित्ती लाड करतात माझे. किती मस्त नातं आहे आमचं.. "
" नेहमी ऐकता पप्पा माझं.... मग परवाला का नाही ऐकलत..?? का नाही थांबलात माझ्यासाठी? तुम्ही असता तर आज कदाचित वेगळं चित्र असतं माझ्या आयुष्याचं.. !
मिस यू आप्पा.. ! काय माहित आता या जन्मी आपण भेटू कि नाही.. पण तुम्ही मला माफ करणार ना..?? "
तिच्या हृदयात कालवाकालव सुरु होती. एक उमाळा दाटून आला.. मनानं साद घातली.....
" ... आप्पा... "
.
.
.
.
.
. " सोना.. मी आलोय..... "
आप्पासाहेब आत येत म्हणाले. त्यांच्या आवाजात पाहिजे तेवढा आनंद नव्हता. आईसाहेब आरतीचे ताट घेऊन आल्या. त्यांनी त्यांना ओवळले.
" कशाला ओवळताय?? गड जिंकून नाही आलोय आम्ही. " काहीशा खिन्न स्वरात ते म्हणाले.
"म्हणजे... " .... आईसाहेब.
" म्हणजे डिल गेली आमच्या हातून... "
हातातील बॅग सोफ्यावर ठेवत ते म्हणाले.
" फार नुकसान झाले असेल.. " आईसाहेब.
"बिजनेस म्हटला कि ह्या गोष्टी आल्याच.. चढ उतार येणारच... मला खात्री होती कि डिल आपलीच आहे, पण वेळेवर बाजू पलटली. आणि तो प्रधान जिंकला..
जाऊ दे.. तशी चूक माझीच आहे. तुम्ही नका टेन्शन घेऊ.. " .... आप्पासाहेब.
" कसली चूक..?? " विश्वास ने विचारलं..
" चूक ही कि मी सोनाचं ऐकलं नाही आणि गेलो. तिने मला माझा एक दिवस मागितला पण तो नाही दिला मी.. आणि बघा डिल गेली आपल्या हातून.. " ... आप्पासाहेब.
" असं काही नसतं हो.. " आईसाहेब काही बोलणार त्यावर लगेच आप्पासाहेब म्हणाले ,
" असंच आहे.. सोना आपल्या घरची लक्ष्मी आहे साक्षात...! ती जर दुखावली ना तर आपल्या घराचे वासे उलटे फिरल्या शिवाय राहणार नाहीत... "
"अरे पण एवढं बोलतोय तिच्याबद्दल ती आहे तरी कुठे..??
सोना ss रागावलीस का गं आप्पावर..
चला पॅकिंग करायला घे आता एक आठवडा मस्त फिरून येऊ सगळे.. ! "
ते हसत म्हणाले.
वीरेन च्या डोळ्यात पाणी तरळले.
" हो - हो.. आधी फ्रेश तर व्हा.. मग बोलूया निवांत.. " आईसाहेबनीं विषय बदलला.
ते फ्रेश व्हायला निघून गेले.
" बघितलं आईसाहेब....?? ती नुसती घराबाहेर पडली तरी किती नुकसान झाले आपले??
आता पुढे काय काय घडेल कुणास ठाऊक... "
वीरेन म्हणाला.
"असं काही नसते वीरेन.. आणि तुम्ही थोडा वेळ जरा गप्पच बसा.. " ... आईसाहेब.
ते फ्रेश झाले. जेवण झालं. पुन्हा एकदा सोनिया बद्दल विचारलं त्यांनी तर मैत्रिणीकडे गेलीये असं सांगितलं.. दुपारी सगळं निवांत बसल्यावर आईसाहेबांनीच विषय काढला ...
"... आम्हाला बोलायचं होतं तुमच्याशी.. "
" हां.. मग परवानगी कशाची मागता.. बोला की. "
"..सोना घरी नाहीये... "
":हो मगा तुम्हीच तर सांगितलं... "
" तसं नाही हो.. ती घर सोडून गेलीये... ! "
"..म्हणजे... " - आप्पासाहेब.
मग त्यांनी झालेला वृतांत सविस्तर सांगितला..
आई चेच हृदय ते.. इतका वेळ दाबून ठेवलेला हुंदका फुटला त्यांचा...
त्यांना वाटलं.. आप्पासाहेब चिडतील.. राग राग करतील.. रागावतील..!!
पण तसं काहीच झालं नाही... आप्पासाहेब चिडले नाही.. रागावलेही नाहीत... ! ते शांत होते.
आईसाहेब नेमके काय म्हणाल्या आधी त्यांना कळलंच नाही. नंतर ते उठून उभे राहिले..
" काय..?? असं कसं तुम्ही करू शकता?? सोना ह्या घराची शान आहे... तिला घराबाहेर काढण्याची हिम्मत कशी झाली तुमची..??? "
रागाने त्यांचे शरीर हलत होते.
".. घर सोडण्याचा निर्णय त्यांचा होता..
आणि... आपल्या घराच्या इभ्रतीसाठीच हा निर्णय घेतलाय.. !" - आईसाहेब.
" कसली इभ्रत घेऊन बसला आहात तुम्ही...
अहो..., ह्या घराची खरी इभ्रत तर सोनियाच आहे.. चुकलात तुम्ही.. खरंच चुकलात...."
पुन्हा काही बोलणार तोच आप्पासाहेबांच्या छातीत एक जोरदार कळ आली... आणि ते खाली कोसळले...
" अहो ss... " त्या ओरडल्या.
" विश्वास ss.., रजतss वीरेन ss.."
सर्व बाहेर आले..
" आप्पासाहेब.... " वीरेन ओरडला.
.
.
.
.....सर्व हॉस्पिटलमध्ये गोळा झाले होते.. आप्पासाहेबांना जोराने अटॅक आला होता.. हळूहळू शुद्ध येत होती. डोळ्यांच्या अंधुक नजरेसमोर त्यांना त्यांची लाडकी सोना दिसली...
छोटूशी.. नुकतीच जन्मलेली इवलूशी सोनपरी.. त्यांच्या हाताच्या पाळण्यात निर्भीड पणे खेळणारी... ! दुडूदुडू धावनारी...
" पडशील अगं... !" त्यांच्या तोंडातुन पूसटसा आवाज आला..
सगळ्यांना वाटलं ते शुद्धीत आले.. पण ते आपल्याच भ्रमात होते.. त्यांच्या डोळ्यसमोर आता शाळेत जाणारी.. त्यांना बिलगून रडणारी सोना होती... अरे कॉलेजलाही पोचली ही?? किती लवकर मोठी झाली..
आणि त्यांना दिसली त्यांची लाडकी सोना... त्यांच्या गळ्यात हात घालून त्यांचा फक्त एक दिवस मागणारी..
त्यांच्या डोळ्यसमोर तिचे वेगवेगळे रूपं येत होती.. ते झटक्यात उठून बसले.
"...सोना ss.."
ते मोठ्याने ओरडले आणि परत कोसळले....
आता कोसळले ते परत कधीच न उठन्यासाठी... !
" ही इज नो मोअर.... " dr. म्हणाले...
"...आप्पासाहेब.. " सगळीकडे एकच गलका झाला....
.
.
.
"... आप्पा माफ करा मला.... ! "
मोहनच्या खांद्यावर डोकं ठेवलेली ती मिटल्या डोळ्यांनीच मनात म्हणत होती...
अलगद एक अश्रूचा थेंब तिच्या गालावर ओघळला..

                                                                    क्रमश:

                ************************************

भाग पोस्ट करायला जरा लेट झालाय.. त्याबद्दल क्षमस्व.. 

...

आणि आजचा भाग कसा वाटला ते नक्की सांगा.... 

ईरा वाचनाचा आनंद घ्या आता app मधून, आजच download करा. Download App Now
ईराच्या कथांचे कुठलेही भाग मिस करू नका, आजच जॉईन करा ईरा वाचनालय. व्हाट्सएप: व्हाट्सएप:
//