प्रीती... भाग -4

प्रेम... तडजोड... नात्यातील गुंतागुंत.. सोडवणारी नवीन कथामालिका... प्रीती...

मागील भागात आपण वाचलं... सोनिया मोहन कडे गेलेली... 

आता पुढे.... 

.

.

.

....दोघांनी चहा घेतला... 

चहा पिऊन तिला आता बरीच तरतरी आली... 

तिचा हात हातात घेऊन त्यानं विचारलं... 

"... हं... सांग आता काय झालं..?? "

तशी ती पुन्हा त्याला बिलगून रडू लागली.. 

त्यानं ही तिला आता आपल्या मिठीत घट्ट पकडलं.. 

तिच्या पाठीवरून हात फिरवत तिला आश्वस्त करू लागला.. 

थोडा वेळ पुन्हा रडू दिले तिला.. मग दोन्ही हातांनी चेहरा वर करून तिच्या कपाळावर आपले ओठ टेकवले.. 

"..वेडाबाई... पुरे न आता...  किती रडशील... 

बाहेरचा पाऊस केव्हाच थांबलाय... पण तूझ्या डोळयांतून पुन्हा पुन्हा बरसतोय.. 

अशाने माझ्या एवढयाशा रूममध्ये पूर येऊन जायचा.. "

वातावरण हलके करायला तो हसत म्हणाला.. 

तशी ती त्याच्या मिठीतुन दूर व्हायला निघाली... 

तीन -चार तासांपूर्वी घडलेली घटना.. आईसाहेबांशी झालेला वाद... तिला पुन्हा सगळं  आठवलं.... 

"मोहन.. "

मिठीतुन बाहेर निघण्याचा प्रयत्न करीत ती म्हणाली.. 

तशी मिठी पुन्हा घट्ट करत तो हळुवार म्हणाला, 

"...बोल इथेच... ऐकतोय मी... "

"...नाही... आपण बसून बोलूयात... "

त्याचे हात बाजूला करत ती म्हणाली.. 

तसा तोही बाजूला झाला.. 

ती बेडवर बसली.. तोही तिच्यापुढे खुर्चीवर बसत म्हणाला.., 

"..हं.. बोला मॅडम.. "

"...मोहन... आपल्या प्रेग्नेंसी बद्दल कळलंय घरी.. "

त्याच्या डोळ्यात बघत ती म्हणाली...

"आपली प्रेग्नेनसी..? "....

तो तिच्याकडे बघत म्हणाला. 

"हो.., बाळ आपल्या दोघांचं... तशी प्रेग्नेंसी पण आपली.. "

ती त्याच्या नजरेला  नजर मिळवत म्हणाली.. 

"..हो गं.. 

पण आपण सांगणारच होतो न काही दिवसांनी.. "

तो म्हणाला... 

"..हो ना रे... पण अचानकच हे झालं.. 

हॉस्पिटल ची फाईल आईसाहेबांना मिळाली.. आणि सगळा घोळ झाला... 

खूप चिडल्या होत्या त्या... 

माझं काही ऐकूनच घ्यायचं नव्हते त्यांना... 

वाद झाला थोडा... आणि मग मीही निघाले.. घर सोडून... 

कायमचं... "

डोळे पुसत ती म्हणाली...

"...म्हणून अशा अवेळी इथे आलीस तू... "

तिचे हात हातात घेत तो म्हणाला.. 

"..मग कुठे जायचं होतं मी,  मोहन..? "

त्याच्याकडे बघत तिने विचारलं.. 

"तसं नव्हते गं म्हणायचे मला... पण आता काय करायचं..?? "

तो विचार करत म्हणाला..  

".. लग्न... 

आणखी काय..? "

ती पटकन म्हणाली. 

"...मला थोडा विचार करू दे... सोनिया.. "

तो म्हणाला. 

"...एवढं सगळं घडल्यावर आता आणखी काय उरलय... विचार करायला... 

एक...  एक.. मिनिट.. 

तुला लग्नच करायचं नाहीये का माझ्याशी...?? "

ती  थोडया रागातच बोलली. 

" काय बोलतेस... तूला तरी कळतंय का...??

मला असं नव्हते म्हणायचं गं..

पण असला  निर्णय एकदम कसा घ्यायचा ना ...? "

तिला समजावत तो म्हणाला.. 

"..मोहन.. मी घेतला निर्णय.. असाच... अचानक.. 

एका क्षणात सर्व सोडून आलेय.. 

आणि तू असा रे कसा बोलतो आहेस..?? "

तिचे पेशंन्स आता संपत आले.. 

"अगं राणी... चुकीचं नको समजू मला.. 

तूच सांग.. ज्या रूम मध्ये आपण आहोत सध्या ती रूम देखील माझी नाहीये अगं.. 

दोन दिवसांनी माझा रूम पार्टनर शरद येईल... तेव्हा आपण तिघे कसे राहणार एकत्र...?? 

तूला मी गावी पण घेऊन जाऊ शकत नाही...

...आई -बाबा..  त्यांना नाही सहन होणार हे सगळं असं लग्नाआधीच झालेलं.. " 

तो एक उसासा टाकून म्हणाला.. 

"..ह्या सगळ्यांचा विचार आधीच करायला हवा होता मोहन... 

आता खूप उशीर झालाय... 

तूला नसेल लग्न करायचे तर नको करू... निघते मी.. "

असं म्हणून ती जायला वळली देखील... 

" अगं माझे बाई...  कुठे निघालीस तू...? 

तिला एका हाताने थांबवत  तो म्हणाला. 

" किती गं बडबड चालवली आहे... थोडं थांब... शांत बैस.. 

नाहीतर आपलं बाळ देखील असाच बडबडा कासव व्हायचा.. "

तिला बेडवर बसवत तो म्हणाला.. 

"...आपलं बाळ... 

म्हणजे... लग्न करशील ना तू माझ्याशी.. "

थोडं शांत होत ती म्हणाली. 

 "..हो गं माझे राणी.. बाळा ला सांग की आपण आहोत त्याच्या  सोबत.. पण विचार करायला थोडा वेळ हवाय मला.. "

तो हसून म्हणाला. 

"..ऐकलं का बाळा.. बाबा काय म्हणतोय ते.. "

पोटाला हात लावत हळूच ती म्हणाली. 

"..ये.. बाबा काय गं.. पप्पा म्हणायला शिकव हं.."

तो थोडा चिडून म्हणाला. 

, "..बघितलं का बाळा... पप्पा कसा चिडका बिब्बा आहे ते.. "

ती त्याला चिडवत म्हणाली.. 

"..मी चिडका बिब्बा का..? 

मग तू.. तू.. चिडकी बीबी.. हा.. !"

तिला उशीने मारत तो म्हणाला... 

ती हसत होती.. 

"...अशी हसतना किती गोड दिसतेस यार सोनिया तू... 

रडत जाऊ नको ना.. 

तूझ्या रडण्याने मी खचून जातो यार.. 

अशीच हसत रहा.. कायम.. "

तो तिला मिठीत घेत म्हणाला.. 

"..झोप आता तू निवांत... उदयाचं उदयाला बघू.. "

तिच्या अंगावर पांघरून नीट करत तो म्हणाला.. 

दिवसभराच्या शिणाने थकली होती ती... 

..पोटावर हात ठेऊन झोपली...  शांत... 

...त्याची झोप मात्र उडाली होती... 

तिथेच खुर्चीवर बसून तो विचार करत होता... 

उजाडनाऱ्या उदयाचा... 

.

.

.

...काय असेल मोहन चा विचार.... वाचा पुढील भागात... 

      ******************************************

..ही कथा मालिका फ्री आहे... याला subscription लागणार नाही.. 

🎭 Series Post

View all