... ह्या घरात पुन्हा पाय ठेवणार नाही असं म्हणून सोनियाने घराचा उंबरठा तर ओलांडला... पण पुढे काय करायचं तिला काहीच कळत नव्हतं. हातात बॅग् घेऊन ती निघाली.. कुठे जायचं.. उत्तर नव्हतं.. रात्रीची वेळ... आणि आता पाऊसही सुरु झाला होता.. त्या पावसात तिच्या डोळ्यातील पाऊस कधी मिसळला तिलाही कळलं नाही..
"... कुठे जायचंय मॅडम..??.. सोडून देऊ का...? "
करकचुन ब्रेक दाबत एक रिक्षा तिच्या जवळ थांबली..
".. मॅडम... खूप पाऊस पडत आहे... कुठे जायचंय.. सोडून देतो.. "
रिक्षावाला पुन्हा म्हणाला... तशी ती भानावर आली. येवढया पावसात ती पूर्ण भिजली आहे हे आत्ता तिच्या लक्षात आलं.. पटकन सामान आत घेऊन ती रिक्षात बसली..
".. कुठे सोडून देऊ मॅडम... "
आरशातुन तिच्या कडे पाहत तो बोलला.
तशी ती जरा सावरून बसली..
"... कुठे जायचं आहे मॅडम..? "
तो आता वैतागला होता..
अरे हो... पण कुठे जायचं आहे मला.. तिला कळेना..
...आणि अचानक आठवला तिला मोहन...
हो... आत्ता तर मला मोहन कडेच जायला हवं... तिने मनात म्हटलं.
रिक्षावाल्याला त्याचा पत्ता सांगितला...आणि त्याच्या सोबत ती निघाली...
टिंग..टॉंग..
दरवाज्याची बेल वाजली..
"..येवढया पावसात.. अशा अवेळी कोण कडमडलय... "
थोड्या त्रासीक मुद्रेने त्यानं दरवाजा उघडला...
दारात सोनिया उभी होती..
"...सोनिया तू... ह्या वेळेस इथे... पटकन आत ये.. "
प्रश्न विचारतच त्यानं तिला आत ओढलं...
दरवाजा बंद केला..
"..काय झालं सोनिया..?? इथे कशी..?? "
त्यानं तिला विचारलं... तशी..
"मोहन... "म्हणून ती त्याला बिलगली आणि रडू लागली..
त्याला जाणवलं.. ती नखशिखानत भिजली आहे तस त्याने तिला बाजूला केलं..
"..सोनिया... आधी तू फ्रेश हो.. नंतर आपण निवांत बोलूया.. "
असं म्हणून मोहन उठला..
त्याने तिच्या साठी पाणी गरम करून तिला आंघोळीला पाठवलं.
ती येईपर्यंत तिच्यासाठी मउशार खिचडी बनवली..
बाथरूम मधून ती आली.. आंघोळीनंतर चे तिचे ओलीते रूप.. पाठीवर सोडलेले तिचे ओलसर मोकळे केस...
तिला तस बघून त्याची पुन्हा एकदा विकेट पडली... वाटलं त्याला पटकन तिला मिठी मारावि...पण स्वतःला सावरलं त्यानं...
तिच्यापुढे गरमागरम खिचडीचे ताट ठेवले.. ते बघून तिलाही सपाटून लागलेल्या भुकेची जाणीव झाली..
अधाशासारखं तिने ते पटापटा संपवल...
तोवर तो गरमागरम चहा घेऊन आला..
दोघांनी चहा घेतला...
चहा पिल्यावर तिला आता बरीच तरतरी आली...
...तिचा हात हातात घेत तो म्हणाला..
"..हं.. बोल आता... "..
...आणि ती त्याला बिलगून पुन्हा रडू लागली....
---------------*********--------------*********---------------
.... काय घडेल पुढे... जाणन्यासाठी वाचा पुढील भाग... तोवर हा भाग कसा वाटला नक्की सांगा. आणि आवडल्यास share करा...
Download the app
आता वाचा ईराच्या कथा सोप्या पद्धतीने, आजच ईरा app इंस्टॉल करा